Marathi Bible Reading | Thursday 12th September 2024 | 23rd Week in Ordinary Time

सामान्य काळातील तेवीसावा  सप्ताह 

गुरुवार  १२ सप्टेंबर  २०२४

"तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही

Judge not, and you shall not be judged.



मरियेचे अति पवित्र नाम
The Feast of the Most Holy Name of the Blessed Virgin Mary is an optional memorial celebrated in the liturgical calendar of the Catholic Church on 12 September. It has been a universal Roman Rite feast since 1684, when Pope Innocent XI included it in the General Roman Calendar to commemorate the victory at the Battle of Vienna in 1683.[1] It was removed from the Church calendar in the liturgical reform following Vatican II but restored by Pope John Paul II in 2002, along with the Feast of the Holy Name of Jesus.
परमेश्वर प्रेमळ व दयाळू आहे, त्याचा पुत्र प्रभू येशू दयेचा महासागरआहे. म्हणूनच प्रभू आपल्या सर्वांना आज सांगत आहे, 'जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीहि दयाळू व्हा.' प्रीतिचे उत्कृष्ट दान आपल्या सर्वांना परमेश्वराने दिलेले आहे. देवाचे दान वाटून दिल्याने त्यामध्ये वाढ होते. अनेक माणसे आपल्या प्रेमासाठी आणि दये साठी हपापलेली आहेत. आपण दया दाखवणार का?

पहिले वाचन : करिथ  ८:१-७.११-१३
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

"बंधूविरुद्ध पाप करून आणि त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता."

ज्ञान फुगवते, प्रीती उन्नती करते. कोणाला वाटत असेल की, आपल्याला एखादी गोष्ट कळते; ज्याप्रमाणे कळले पाहिजे त्याप्रमाणे त्याला अदयाप कळत नाही. जर कोणी देवावर प्रीती करत असेल तर देवाला त्याची ओळख झालेली आहे.
आता मूर्तीला दाखविलेले नैवेद्य खाण्यासंबंधाने,आपल्याला ठाऊक आहे की, "जगात मूर्तीला खरे अस्तित्वच नाही" आणि "एकाखेरीज दुसरा देव नाही.” कारण ज्यांना देव म्हणून म्हणतात असे स्वर्गात किंवा पृथ्वीवर जरी असले आणि अशी बरीच 'दैवते' व आणि बरेच 'प्रभू' आहेतच तरी आपला एकच देव म्हणजे पिता आहे. त्याच्यापासून सर्वकाही झाले आणि आपण त्याच्यासाठी आहो आपला एकच सर्वकाही प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्याद्वारे सर्व काही झाले आणि आपण त्याच्याद्वारे आहो.
तथापि हे ज्ञान सर्वांच्या ठायी असते असे नाही. तर कित्येकांवर मूर्तिपूजेच्या सवयीचा संस्कार अजून राहिल्यामुळे ते मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खातात, तेव्हा त्यांची सदस‌द्विवेकबुद्धी दुर्बळ असल्यामुळे ती विटाळते. ह्याप्रमाणे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला असा जो दुर्बळ सदस‌द्विवेकबुद्धीला धक्का देऊन तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता. म्हणून मांसान्नामुळे माझ्या बंधूला अडखळण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळवू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :First Corinthians 8: 1b-7, 11-13
Knowledge puffeth up; but charity edifieth. And if any man think that he knoweth any thing, he hath not yet known as he ought to know. But if any man love God, the same is known by him. But as for the meats that are sacrificed to idols, we know that an idol is nothing in the world, and that there is no God but one. For although there be that are called gods, either in heaven or on earth (for there be gods many, and lords many). Yet to us there is but one God, the Father, of whom are all things, and we unto him; and one Lord Jesus Christ, by whom are all things, and we by him. But there is not knowledge in every one. For some until this present, with conscience of the idol: eat as a thing sacrificed to an idol, and their conscience, being weak, is defiled. And through thy knowledge shall the weak brother perish, for whom Christ hath died? Now when you sin thus against the brethren, and wound their weak conscience, you sin against Christ. Wherefore, if meat scandalize my brother, I will never eat flesh, lest I should scandalize my brother.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र   : १३८:१-३,१३-१४अब, २३-२४
प्रतिसाद  : हे देवा, मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने चालव.

१ हे प्रभू, तू मला पारखले आहेस, तू मला ओळखतोस,
 माझे बसणे आणि माझे उठणे तू जाणतोस, 
तू दुरून माझे मनोगत समजतोस. 
तू माझे चालणे आणि माझे झोपणे बारकाईने पाहतोस, 
माझ्या साऱ्या वागणुकीची तुला ओळख आहे.

२ तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस, 
तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस. 
भयप्रद आणि अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे. 
म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो.

३ हे देवा, माझी झडती घे आणि माझे मन ओळखून घे. 
मला कसोटीला लावून माझे मनोगत जाणून घे. 
माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा 
आणि मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने चालव

 Psalms :Psalms 139: 1b-3, 13-14ab, 23-24
R. Guide me, Lord, along the everlasting way.

 Lord, thou hast proved me, and known me:
Thou hast know my sitting down, and my rising up.
Thou hast understood my thoughts afar off: 
my path and my line thou hast searched out.
R. Guide me, Lord, along the everlasting way.

For thou hast possessed my reins: 
thou hast protected me from my mother’s womb.
I will praise thee, for thou art fearfully magnified: 
wonderful are thy works.
R. Guide me, Lord, along the everlasting way.

 Prove me, O God, and know my heart:
 examine me, and know my paths.
And see if there be in me the way of iniquity: 
and lead me in the eternal way.
R. Guide me, Lord, along the everlasting way.

जयघोष                                             

आलेलुया, आलेलुया! 
 तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, 
म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन
 आलेलुया!

Acclamation: 
   Alleluia, alleluia.
 If we love one another, God remains in us, 
and his love is brought to perfection in us.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  लूक :६:२७-३८
वाचक :लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्हा ऐकणाऱ्यांना मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमची निर्भर्त्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्यापुढे दुसराही गाल कर आणि जो तुझा अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नको. जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे आणि जो तुझे काही हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नकोस. लोकांनी तुम्हांशी जसे वागावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा.
"जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय ? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात. जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय ? पापी लोकही तसेच करतात. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले तर त्याततुमचा उपकार तो काय ? जितके दिले तितके परत मिळवण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांना उसने देतात. तुम्ही तर आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्न आणि दुर्जन ह्यांच्यावरही उपकार करणारा आहे. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा."
"तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही; कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला कोणी दोषी ठरवणार नाही; क्षमा करा म्हणजे तुम्हांला क्षमाकेली जाईल; द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल; चांगले माप दाबून, हालवून आणि शीग भरून तुमच्या पदरी घालतील. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel ReadingLuke 6: 27-38
But I say to you that hear: Love your enemies, do good to them that hate you. Bless them that curse you, and pray for them that calumniate you. And to him that striketh thee on the one cheek, offer also the other. And him that taketh away from thee thy cloak, forbid not to take thy coat also. Give to every one that asketh thee, and of him that taketh away thy goods, ask them not again. And as you would that men should do to you, do you also to them in like manner.  And if you love them that love you, what thanks are to you? for sinners also love those that love them. And if you do good to them who do good to you, what thanks are to you? for sinners also do this. And if you lend to them of whom you hope to receive, what thanks are to you? for sinners also lend to sinners, for to receive as much. But love ye your enemies: do good, and lend, hoping for nothing thereby: and your reward shall be great, and you shall be the sons of the Highest; for he is kind to the unthankful, and to the evil.
 Be ye therefore merciful, as your Father also is merciful. Judge not, and you shall not be judged. Condemn not, and you shall not be condemned. Forgive, and you shall be forgiven. Give, and it shall be given to you: good measure and pressed down and shaken together and running over shall they give into your bosom. For with the same measure that you shall mete withal, it shall be measured to you again.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन :आजच्या शुभवर्तमानात एक सुवर्ण नियम सापडतो. “लोकांनी तुम्हांशी जसे वागावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागावे.” (वचन ३१) खरे शिष्यत्व हे आपल्या वैऱ्यावर प्रेम करण्यास व त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास आव्हान करते. येशूने शिष्यांना पाचारण केले. त्यांनी केवळ मुखावाटे शब्द व्यक्त करण्यासाठी नव्हे तर कृतिशील होण्यासाठी येशू बोलावित आहे. जे आपल्या विचारांशी असहमत आहेत, जे हिंसक वृत्तीने प्रतिकार करतात त्यांच्याबरोबर प्रेमाने वागावे. जर कोणी आपल्याशी चांगला वागला तर आपण त्यांच्याशी चांगले वर्तन करतो परंतू जर कोणी आपल्या बरोबर सहमत नसेल तर त्यांच्याशी आपण खरोखरच चांगले वागतो का ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तू दयेचा अथांग सागर आहेस, आमच्या अंतःकरणात तुझी | | प्रीति व दया भाव वाढीस लाव, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या