Marathi Bible Reading | wednesday 11th September 2024 | 23rd Week in Ordinary Time

सामान्य काळातील तेवीसावा  सप्ताह 

बुधवार ११ सप्टेंबर  २०२४

“अहो, जे तुम्ही आता भुकेले आहा ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल 

Blessed are ye that hunger now: for you shall be filled.

संत पाफ्नेशियस महान

महागुरू, वर्तनसाक्षी


दीन म्हणजे केवळ गरीब, लाचार किंवा भूकेला असे नव्हे तर दीनता म्हणजेच नम्रता, सौम्यता, दयाळूपणा, सहनशिलता आणि प्रेमळपणा. नम्रतेने देवाच्या आज्ञेचे पालन करुन त्याच्या वचनाप्रमाणे जीवन  जगणाऱ्यास स्वर्गाच्या राज्यात सर्वकाळचे जीवन मिळणार आहे, ह्याची शाश्वती प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला आज देत आहे. त्यासाठीच तर प्रभू येशू  ख्रिस्ताने देव प्रीति व परस्परप्रीतिची आज्ञा आपल्याला दिली आहे.  

पहिले वाचन : करिथ  ७:२५-३१
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 
“तू पत्नीला बांधलेला आहेस काय ? असलास तर मुक्त होण्यास पाहू नकोस."

अविवाहित तरुण-तरुणींसंबंधी मला प्रभूची आज्ञा नाही, तथापि ज्या माझ्यावर विश्वासू होण्याची दया प्रभूद्वारे झाली आहे, तो मी आपले मत सांगतो. प्रस्तुतच्या अडचणीमुळे जो ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्याने राहावे हे माणसाला योग्य आहे. तू पत्नीला बांधलेला आहेस काय? असलास तर मुक्त होण्यास पाहू नकोस. पत्नीपासून मुक्त आहेस काय? असलास तर पत्नी करण्यास पाहू नको. तथापि तू लग्न केलेस म्हणून पाप केलेस असे होत नाही; तसेच कुमारिकेने लग्न केले म्हणून तिने पाप केले असे होत नाही. तरी पण अशांना संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील आणि अशा हालअपेष्टा तुम्हाला भोगाव्या लागू नयेत अशी माझी इच्छा आहे. बंधुजनहो, काळाचा संक्षेप करण्यात आला आहे, ह्यासाठी ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे असावे, जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्यांनी आनंद करत नसल्यासारखे, जे विकत घेतात त्यांनी आपणाजवळ काही. नसल्यासारखे आणि जे ह्या जगाचा उपभोग घेतात, त्यांनी त्याचा उपभोग पूर्णपणे करत नसल्यासारखे असावे, कारण ह्या जगाचे बाह्यस्वरूप लयास जात आहे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :First Corinthians 7: 25-31
 Now concerning virgins, I have no commandment of the Lord; but I give counsel, as having obtained mercy of the Lord, to be faithful. I think therefore that this is good for the present necessity, that it is good for a man so to be. Art thou bound to a wife? seek not to be loosed. Art thou loosed from a wife? seek not a wife. But if thou take a wife, thou hast not sinned. And if a virgin marry, she hath not sinned: nevertheless, such shall have tribulation of the flesh. But I spare you. This therefore I say, brethren; the time is short; it remaineth, that they also who have wives, be as if they had none; And they that weep, as though they wept not; and they that rejoice, as if they rejoiced not; and they that buy, as though they possessed not; And they that use this world, as if they used it not: for the fashion of this world passeth away.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र   : ४५:११-१२,१४-१५,१६-१७
प्रतिसाद :  राजकन्ये, इकडे लक्ष दे, कान देऊन ऐक.

१) राजकन्ये, इकडे लक्ष दे, कान देऊन ऐक..
 तू आपले लोक आणि आपल्या बापाचे घर ही विसर, 
म्हणजे राजा तुझ्या सौंदर्याचा अभिलाषी होईल, 
तो तुझा पती आहे, म्हणून त्याच्या चरणी लाग.

२) राजकन्या आपल्या अंत:पुरात अगदी 
ऐश्वर्यमंडित आहे, तिची वस्त्रे सुवर्णालंकृत 
व भरजरी आहेत. तिला कशिद्याची 
वस्त्रे नेसवून तिच्या कुमारी सख्या 
तिला राजाकडे घेऊन जातील.

३) आनंदाने आणि उत्सवाने त्यांना मिरवतील, 
त्या राजमंदिरात प्रवेश करतील, 
तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले येतील,
 तू सर्व पृथ्वीवर त्यांना अधिपती करशील.

 Psalms Psalms 45: 11-12, 14-15, 16-17
R. (11) Listen to me, daughter; see and bend your ear.

Hearken, O daughter, and see, and incline thy ear: 
and forget thy people and thy father’s house.
 And the king shall greatly desire thy beauty;
 for he is the Lord thy God, and him they shall adore.

R. Listen to me, daughter; see and bend your ear.

 All the glory of the king’s daughter is within in golden borders, Clothed round about with varieties. 
After her shall virgins be brought to the king: 
her neighbours shall be brought to thee.

R. Listen to me, daughter; see and bend your ear.

 They shall be brought with gladness and rejoicing:
 they shall be brought into the temple of the king.
 Instead of thy fathers, sons are born to thee: 
thou shalt make them princes over all the earth.

R. Listen to me, daughter; see and bend your ear.

जयघोष                                             

आलेलुया, आलेलुया! 
 हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास 
माझे अंत:करण वळव. आणि 
तुझे नियमशास्त्र मला शिकव.
 आलेलुया!

Acclamation: 
   Rejoice and leap for joy! Your reward will be great in heaven.

शुभवर्तमान  लूक :६:२०-२६
वाचक :लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
अहो गरीब जनहो, तुम्ही धन्य ! धनवानांची केवढी दुर्दशा होणार !

येशूने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले, “अहो गरीब जनहो, तुम्ही धन्य; कारण देवाचे राज्य तुमचे आहे!” 
“अहो, जे तुम्ही आता भुकेले आहा ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही तृप्त व्हाल ! “अहो, जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य, कारण तुम्ही हसाल !”
“मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य ! त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा; कारण पाहा, स्वर्गात त्याचे प्रतिफळ मोठे आहे, त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करीत असत."
“परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात."
“अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहा त्या तुमची केवढी दुर्दशा होणार ! कारण तुम्हाला भूक लागेल.”
“अहो, जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल.”
"जेव्हा सर्व लोक तुम्हांला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच म्हणत असत.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel ReadingLuke 6: 20-26
And he, lifting up his eyes on his disciples, said: Blessed are ye poor, for yours is the kingdom of God.
 Blessed are ye that hunger now: for you shall be filled. Blessed are ye that weep now: for you shall laugh.
 Blessed shall you be when men shall hate you, and when they shall separate you, and shall reproach you, and cast out your name as evil, for the Son of man’s sake.
 Be glad in that day and rejoice; for behold, your reward is great in heaven. For according to these things did their fathers to the prophets.
 But woe to you that are rich: for you have your consolation.
 Woe to you that are filled: for you shall hunger. Woe to you that now laugh: for you shall mourn and weep.
Woe to you when men shall bless you: for according to these things did their fathers to the false prophets.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन : आजच्या शुभवर्तमानात धनवानाविषयी प्रभूने काढलेले विधान मनाला अस्वस्थ करणारे आहे. प्रभूने त्यांना धन्य म्हटले नाही तर शोषितांना धन्य म्हटले आहे. जग, जे धनवान व खाऊन पिऊन तृप्त झालेले आहेत, ज्यांच्याकडे सुख-सोयी आहेत त्यांना धन्य मानते. भौतिक सुख-सोयी कितीही लहान मोठ्या असोत त्या जास्त काळ आनंद देऊ शकत नाही. गरीब आपले श्रेयस व प्रेयस सर्वकाही परमेश्वराला मानतात. त्यांच्याकडे भौतिक संपत्ती नाही, मात्र सुखाचा स्त्रोत असलेल्या देवावर ते भिस्त ठेवतात. जीवनात प्रत्येक गोष्टीवर ते देवावर अवलंबून असतात. देवाकडून मिळणारा आनंद हा न संपणारा व खूप समाधान देणारा आनंद असतो. मी जीवनाचा आनंद कशात शोधत आहे ?

प्रार्थना हे प्रभू येशू, स्वर्गराज्याचे वारसदार बनण्यास पात्र ठरावेत म्हणून आम्हाला खरे ख्रिस्ती जीवन जगण्यास प्रेरणा दे, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या