सामान्य काळातील २९वा सप्ताह
सोमवार २१ ऑक्टोबर २०२४
संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” beware of all covetousness; for a man’s life doth not consist in the abundance of things which he possesseth.
✝️
संत हिलेरियन महान
- मठाधिकारी, वर्तनसाक्षी (२९१-३७१)
✝️
आपले जीवन क्षणभंगूर आहे, तरीसुध्दा अनेकजणांना धन संपत्तीचे आकर्षण असते. जीवनातील बहुसंख्य वेळ लोभी माणूस धन मिळविण्यात आणि साठविण्यात खर्ची घालतो. अनेकदा साठविलेल्या धनाचा उपभोग सुध्दा अशा माणसांना घेता येत नाही, मात्र जीवनातील अशा लोभापायी आपण देवापासून दूर जातो.
प्रभू येशू आपल्या सर्वांना आज लोभीपणा पासून दूर राहण्याचा सल्ला देत आहे. सर्व स्थितीत प्रभू येशूची कृपा आपल्याला पुरेशी आहे,
कारण सार्वकालिक जीवन व स्वर्गीय संपत्तीचे आपण सर्वजण वारसदार
आहोत. निस्वार्थी व सेवामय जीवन जगण्यास प्रभूकडे याचना करु या.
✝️
पहिले वाचन :: इफिसकरांस २:१-१०
वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"देवाने ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले आणि त्याच्याचबरोबर स्वर्गात बसवले."
तुम्ही आपले अपराध आणि आपली पापे ह्यांमुळे मृत झालेला होता, त्या पापांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्यांच्या धोरणाप्रमाणे चालत होता. त्या तुम्हांला देवाने जिवंत केले. त्या लोकांत आम्हीही सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरुप असे वागलो, आपल्या देहाच्या अणि मनाच्या इच्छांप्रमाणे करत होतो आणि स्वभावतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयासंपत्र आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. (कृपेने तुमचे तारण झालेले आहे) आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठवले आणि त्याच्याच बरोबर स्वर्गात बसवले, ह्यासाठी की, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुम्हां आम्हांवरील ममतेच्या द्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या अगाध कृपेचे भांडार दाखवावे. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ बाळगू नये कर्मे केल्याने हे झाले नाही; आपण सत्कृत्ये करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहो, ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Ephesians 2:1-10
And you were dead, through the crimes and the sins which used to make up your way of life when you were living by the principles of this world, obeying the ruler who dominates the air, the spirit who is at work in those who rebel. We too were all among them once, living only by our natural inclinations, obeying the demands of human self-indulgence and our own whim; our nature made us no less liable to God's retribution than the rest of the world. But God, being rich in faithful love, through the great love with which he loved us, even when we were dead in our sins, brought us to life with Christ -- it is through grace that you have been saved- and raised us up with him and gave us a place with him in heaven, in Christ Jesus. This was to show for all ages to come, through his goodness towards us in Christ Jesus, how extraordinarily rich he is in grace. Because it is by grace that you have been saved, through faith; not by anything of your own, but by a gift from God; not by anything that you have done, so that nobody can claim the credit. We are God's work of art, created in Christ Jesus for the good works which God has already designated to make up our way of life.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र : १०० : १- ५
प्रतिसाद : त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहो.
१ )अहो, पृथ्वीवरील सर्व लोकहो,
परमेश्वराचा जयजयकार करा.
हर्षाने परमेश्वराची सेवा करा.
आनंदगीत गात त्याच्यापुढे या.
२ )परमेश्वर हाच देव आहे हे जाणा.
त्यानेच आम्हाला उत्पन्न केले,
आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा,
त्याच्या कुरणातोल कळप आहोत.
३ त्याचे उपकारस्मरण करत त्याच्या दारात,
स्तवन करत त्याच्या अंगणात प्रवेश करा.
त्याचे उपकारस्मरण करा,
त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
४ कारण परमेश्वर चांगला आहे
त्याची दया सनातन आहे आणि
त्याची सत्यता पिढ्यान्पिढ्या टिकते.
Psalms 100: 2, 3, 4ab, 4c-5
R. The Lord made us, we belong to him.
1 Sing joyfully to God, all the earth:
serve ye the Lord with gladness.
Come in before his presence with exceeding great joy.
R. The Lord made us, we belong to him.
2 Know ye that the Lord he is God:
he made us, and not we ourselves.
We are his people and the sheep of his pasture.
R. The Lord made us, we belong to him.
3ab Go ye into his gates with praise,
into his courts with hymns.
R. The Lord made us, we belong to him.
4Give glory to him. Praise ye his name.
For the Lord is sweet,
his mercy endureth for ever,
and his truth to generation and generation.
R. The Lord made us, we belong to him.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
जे वचन ऐकून सालस आणि चांगल्या
अंतःकरणात धरून ठेवतात आणि
धीराने फळ देत जातात, ते धन्य होत..
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Blessed are the poor in spirit: for theirs is the kingdom of heaven.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान लूक १२:१३-२१
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल ?"
लोकसमुदायातील कोणा एकाने येशूला म्हटले, "गुरुजी, मला माझ्या वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा." पण तो त्याला म्हणाला, “गृहस्था मला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा कोणी नेमले ?” आणखी त्याने त्यांना म्हटले, संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा. कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” मग त्याने त्यांना एक दाखला सांगितला कोणाएका धनवान मनुष्याच्या जमिनीला फार पीक आले. तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की, आता मी काय करावे? कारण माझे उत्पन्न साठवायला मला जागा नाही. मग त्याने विचार ठरवला, मी असे करीन मी आपली कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तेथे मी आपले सर्व धान्य आणि माल साठवीन. मग मी आपल्या जिवाला म्हणेन, हे जिवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे. आता विसावा घे, खा, पी, आनंद कर. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, आज रात्री तुझा प्राण मागितला जाईल, मग जे काही तू सिद्ध केले आहे, हे कोणाचे होईल ? जो कोणी स्वतःसाठी द्रव्यसंचय करतो आणि देवविषयक बाबतीत धनवान नाही तो ह्या धनवानासारखा आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Luke 12: 13-21
And one of the multitude said to him: Master, speak to my brother that he divide the inheritance with me. But he said to him: Man, who hath appointed me judge, or divider, over you? And he said to them: Take heed and beware of all covetousness; for a man’s life doth not consist in the abundance of things which he possesseth. And he spoke a similitude to them, saying: The land of a certain rich man brought forth plenty of fruits. And he thought within himself, saying: What shall I do, because I have no room where to bestow my fruits? And he said: This will I do: I will pull down my barns, and will build greater; and into them will I gather all things that are grown to me, and my goods. And I will say to my soul: Soul, thou hast much goods laid up for many years take thy rest; eat, drink, make good cheer. But God said to him: Thou fool, this night do they require thy soul of thee: and whose shall those things be which thou hast provided? So is he that layeth up treasure for himself, and is not rich towards God.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: येशूला वारसा हक्कावरून बंधुत्वाचा वाद सोडवण्यास सांगितले जाते. कौटुंबिक संपत्ती, कौटुंबिक विभाजनास कारणीभूत आहे हे पाहून, येशू धनाच्या धोक्याबद्दल बोधकथा देत आहे. दृष्टांतात आपण पाहतो की, श्रीमंत मूर्ख आपली संसाधने साठवून ठेवतो आणि त्याला त्याच्या सुरक्षिततेचा आधार बनवतो आणि नंतर त्याच्या लोभात आळशीपणा जोडतो. "मी काय करू?” श्रीमंत मूर्ख स्वतःला विचारतो. येथे आपण हे समजून घेतले पाहिजे की श्रीमंत मूर्ख हे सर्व एकत्र करण्याचा आणि स्वतःच्यावापरासाठी साठवण्याचा आग्रह धरतो. गरजूंना देण्याचा विचार त्याच्या मनात कधीच येत नाही. माणसाने आपल्या जीवनातून आणि विचारांपासून इतर सर्वांना बंद केले आहे. कथेत दुसरे कोणी नाही, फक्त माणूस आणि त्याची मालमत्ता. त्याऐवजी त्याचे दिवास्वप्न ताबडतोब समाधानासाठी झरे. तो आपली कोठारे तोडून मोठी बांधील.
प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गीय संपत्तीचे वारसदार बनण्यास आम्हाला पात्र बनव, आमेन.

0 टिप्पण्या