आगमनकाळातील दुसरा सप्ताह
शनिवार १४ डिसेंबर २०२४
✝️
एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला ओळखले नाही.
I tell you that Elijah has already come, and they did not recognise him,
क्रूसभक्त संत जॉन
वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१५४२-१५९१)
✝️
बालपणापासून त्याला देवाधर्माची व अध्यात्माची ओढ असल्यामुळे तो आध्यात्मिक वृत्तीच्या माणसांमध्ये, धर्मगुरू तसेच धर्मभगिनींच्या सहवासामध्ये रमू लागला. आध्यात्मिक विषयावर चर्चा करणे किंवा एकत्र प्रार्थना करणे त्याला खूप आवडत असे. लवकरच त्याची अविलाच्या संत तेरेजाशी ओळख झाली आणि दोघेही आध्यात्मिक स्वभावाचे असल्यामुळे त्याची दाट मैत्री जमली.
ज्याप्रमाणे आपण धर्मभगिनींसाठी कार्मेलाईट संस्था उघडलेली आहे, त्याचप्रमाणे जॉनने देखील पुरुषांसाठी कार्मेलाईट संस्था स्थापन करावी असे मत अविलाच्या संत तेरेजाने आपला मित्र जॉन ह्याच्याकडे प्रदर्शित केले. लागलीच हे स्वप्न वास्तवात अवतरले आणि १५६८ साली डुरूएलो येथे "डिस्काल्स्ड फ्रायर्स" ह्या संघाची स्थापना झाली. संस्थापक होते क्रूसभक्त संत जॉन आणि सहसंस्थापिका अविलाची संत तेरेजा !
एका झोपडीवजा घरामध्ये पहिल्या तीन व्रतस्थ फ्रायर्सनी आपले व्रतस्थ जीवन सुरू केले. “आत्यंतिक दारिद्र्य, विरक्ती आणि दैवी चैतन्य" अशा तत्त्वांवर बेथलेहेमच्या त्या गोठ्यात (अविलाच्या संत तेरेजा त्या झोपडीला बेथलेहेमचा गोठा म्हणत असे) त्यांनी आपली संस्था उघडली. त्यानंतर शाखा, उपशाखा व अध्यात्मकेंद्रे उघडण्यात आली.
पाच वर्षे संत जॉन अविलाच्या संत तेरेजांना आणि तिच्या धर्मभगिनींना अविला येथे आध्यात्मिक मार्गदर्शन करीत असे. परंतु धर्मसुधारकांच्या काळात (सोळाव्या शतकात धर्मसुधारक आले त्यात मार्टिन ल्यूथरचा समावेश होता) त्या दोघांना खूप मानसिक त्रास आणि आत्मक्लेश ह्यांना सामोरे जावे लागले. पोप महाशयांच्या राजदूताने दिलेले आदेश, संस्थेच्या जनरलने केलेले नियम आणि जाहीर परिषदांमध्ये घेतले गेलेले नियम ह्यांचा कुठेच मेळ बसत नव्हता.
तशात नऊ महिने जॉनला त्याच्या स्वतःच्या संस्थेतील धर्मबंधूंनी एका आखूड खोलीत कोंडून ठेवले आणि त्याच्याविषयी उगाच नाही त्या कागाळ्या करायला आणि अफवा पसरायला सुरुवात केली; परंतु देव नीतिमानांना कधीही टाकून देत नाही ह्याचा प्रत्यय स्वत: जॉनला आला. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे जसा पेत्रही देवाच्या दूताद्वारे कडक बंदोबस्त असलेल्या तुरुंगातून सोडविण्यात आलेला होता (प्रे. कृ. १२:७-११) तसाच संत जॉनदेखील चमत्कारिकरित्या त्या आखूड खोलीतून बाहेर आला. मात्र ह्या नऊ महिन्यांच्या अंधाऱ्या भूतकाळातच त्याच्या जीवनातील सर्वश्रेष्ठ दृष्टान्त आणि दैवी साक्षात्काराचा प्रकाशझोत दडलेला आहे.
धर्मसुधारक आणि कार्मेलाईट संस्था ह्यांच्यात फूट पडल्यानंतर संत जॉन हा प्रांताधिकारी म्हणून कार्यभार सांभाळू लागला. त्याच्या ठायी आपुलकी, जिव्हाळा, आत्मीयता, सहानुभूती ह्यांचे जणू घडेच्या घडे भरलेले होते. शिवाय त्याचा पिंड कवीचा होता. ह्याच त्याच्या स्वभावामुळे त्याच्या हातून अलौकिक अशी सेवा आणि साहित्यनिर्मिती झालेली आहे.
पुढे पुन्हा एकदा अंतर्गत बंडाळी माजली आणि त्यामुळे त्याला आपले प्रांताधिकारीपद सोडावे लागले. त्याला दूरवरच्या एका ओसाड मठामध्ये पाठविण्यात आले. तिथे तो एकाकी होता, त्यामुळे लवकरच आजारी पडला. त्यात अपमान, गैरसमज, मानहानी ह्यांना तोंड देत अखेरीस १४ डिसेंबर १५९१ रोजी वयाच्या ४९ व्या वर्षी तो मरण पावला. येशूप्रमाणे आपल्याला देखील दुःख, हालअपेष्टा सहन करीत असताना मृत्यू यावा अशी त्यानेच केलेली प्रार्थना अशा प्रकारे ऐकली गेली.
सेगोव्हिया येथे पुरण्यात आलेला त्याचा मृतदेह आजही अविनाशी अवस्थेत पाहायला मिळतो. पुढे पोप बेनेडिक्ट तेरावे ह्यांनी त्याला १७२६ साली संतपदाचा मान बहाल केला. तो साक्षात्कारी होता. साक्षात्कारी जीवनाचं जे ईशज्ञान आहे, त्याचा विद्वान पंडित म्हणून संत जॉन क्रूसवीर ह्याला गौरविले गेलेले आहे. शिवाय त्याने लिहिलेल्या साक्षात्कारी पुस्तकांमुळे त्याला सर्व साक्षात्कारी संतांचा प्रमुख म्हणून सन्मानीत करण्यात आलेले आहे.
क्रूसभक्त संत जॉन ह्याने माऊंट कार्मेलवरील आरोहण, एका आत्म्याची काळरात्र, आध्यात्मिक स्तोत्र, प्रेमाची जिवंत ज्वाला, अशी अनेक पुस्तके लिहिली. त्यात त्याने आध्यात्मिक जीवनाचा मूलमंत्र, तंत्र पद्धती गरज आणि गहनता ह्याचा सांगोपांग विचार सुव्यवस्थितपणे मांडलेला आहे. ह्या जगातील ऐहिक सुखापासून जो दूर आहे, जे अधिक कठीण आहे, अधिक अप्रिय आहे आणि अधिक दुःखदायक आहे त्याला मिठी मारण्यास जो तयार आहे त्यांच्यासाठी सदर पुस्तके निश्चितच कल्याणकारी आहेत.
संत जॉनची आध्यात्मिकताही खूप प्रगल्भ होती. “आपल्याला सार्वकालिक जीवन हवे असेल तर ह्या जगातील कोणत्याही गोष्टीची आसक्ती आपण बाळगू नये. केवळ श्रद्धेच्या माध्यमातूनच आपला आत्मा देवाशी तादात्म्य पावू शकतो. एकरूप होऊ शकतो” असे परखड विचार त्याने अध्यात्मसंदर्भात लिहून ठेवलेले आहेत.
अध्यात्म्याच्या क्षेत्रात त्याने केलेल्या ह्या अजोड कामगिरीबद्दल पोप पायस अकरावे ह्यांनी त्याला २४ नोव्हेंबर १९२६ रोजी ख्रिस्तसभेचा विद्वान धर्मपंडित हा किताब बहाल केला.
चिंतन: जो आत्मा दैवी ज्ञानासाठी आसुसलेला असतो त्याला पहिल्या प्रथम क्रुसाला वेंगेत घेण्याची तयारी ठेवावी लागते. क्रूसभक्त संत जॉन
✝️
पहिले वाचन बेन सिरा ४८:१-४,९-११
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन
"एलिया पुन्हा येईल.”
एलिया भविष्यवादी अग्नीप्रमाणे उठला आणि त्याचे शब्द मशालीप्रमाणे जळत होते. त्याने त्यांच्यावर दुष्काळ आणला आणि त्याने आपल्या आस्थेने त्यांची संख्या कमी करून घेतली. त्याच्यामुळे प्रभूने आज्ञा केली आणि आकाशाचे दरवाजे बंद झाले आणि तीन वेळा अग्नीचा वर्षावसुद्धा करून घेतला. हे एलिया, तुझ्या अद्भुत कार्यांनी तू किती महान होतास !
अग्नीच्या चक्रवातामधून, ज्वालामय अश्वाच्या रथातून तुला वर घेतले गेले. तुझ्याविषयी असे लिहिले गेले आहे की, देवाचा कोप प्रज्वलित होण्याच्या अगोदर तो शांत करण्यासाठी, मुलाचे मन पित्याकडे वळविण्यासाठी आणि याकोबची कुळे पुनः प्रस्थापित करण्यासाठी तू नेमलेल्या वेळी तयार असशील जे प्रेमाने नटवले आहेत आणि ज्यांनी तुला पाहिलेले आहे ते धन्य होत कारण आम्हीसुद्धा निश्चित जगणार आहोत.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Sirach 48:1-4, 9-11b
In those days: The prophet Elijah arose like a fire, and his word burned like a torch. He brought a famine upon them, and by his zeal he made them few in number. By the word of the Lord he shut up the heavens, and also three times brought down fire. How glorious you were, O Elijah, in your wondrous deeds! And who has the right to boast that which you have? You who were taken up by a whirlwind of fire in a chariot with horses of fire; you who are ready at the appointed time, it is written, to calm the wrath of God before it breaks out in fury to turn the heart of the father to the son, and to restore the tribes of Jacob. Blessed are those who saw you and those who have been fallen asleep in love.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र :८०:२-३,१५-१६,१८-१९
प्रतिसाद : प्रभो, आम्हांला पूर्वस्थितीवर आण.
१) हे इस्राएल राष्ट्रांच्या मेंढपाळा, आमच्याकडे लक्ष दे.
करुबासनावर विराजमान झालेल्या परमेश्वरा,
आम्हांला तुझे तेजस्वी दर्शन घडू दे.
तुझा पराक्रम गाजव आणि
आमचा उद्धार करायला धावून ये.
२) हे सर्वसमर्थ देवा, मागे फीर,
स्वर्गातून नजर टाकून बघ.
या द्राक्षलतेची, आपल्या उजव्या हाताने
लावलेल्या रोपाची काळजी घे.
३ ) तू निवडलेल्या आणि आपल्या सेवेसाठी
समर्थ केलेल्या मानवावर
तुझा वरदहस्त दे. पुन्हा काही आम्ही
तुझ्यापासून तोंड फिरवून जाणार नाही.
आम्हांला नवजीवन दे
म्हणजे आम्ही तुझ्या नामाचा धावा करू.
३) पण दुर्जनांचे ते मुळीच नाही
वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत.
सज्जनांच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते.
परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.
Psalm Psalm 80:2ac and 3b, 15-16a, 18-19
R O God, bring us back; let your face shine on us, and we shall be saved.
O shepherd of Israel, hear us,
enthroned on the cherubim, shine forth.
Rouse up your might and come to save us. R
God of hosts, turn again, we implore;
look down from heaven and see.
Visit this vine and protect it,
the vine your right hand has planted. R
May your hand be on the man at your right hand,
the son of man you have confirmed as your own.
And we shall never forsake you again;
give us life that we may call upon your name. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
परमेश्वराचा दिवस आता जवळ आला आहे.
पाहा, तो आमचे तारण करण्यास येत आहे.
आलेलुया!
Acclamation:
Prepare the way of the Lord, make his paths straight and all flesh shall see the salvation of God.
.
शुभवर्तमान मत्तय १७:१०-१३
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला कधीच ओळखले नाही."
पर्वतावरून खाली येत असताना शिष्यांनी येशूला विचारले, “मग एलिया यायला हवा असे शास्त्री कसे म्हणत ?"
येशूने उत्तर दिले, "एलिया येईल आणि सारे काही स्थिरस्थावर करील, पण मी तुम्हांला सांगतो. एलिया केव्हाच आला आहे पण लोकांनी त्याला ओळखले नाही. त्यांनी आपल्या मर्जीनुसार त्याला वागवले. मानवपुत्रालाही त्यांच्या हातून तसेच भोगावे लागेल." येशू बाप्तिस्मा करणाऱ्या योहान विषयी बोलत आहे हे तेव्हा कोठे शिष्यांच्या लक्षात आले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading :Matthew 17:10-13
As they were coming down the mountain, the disciples asked Jesus, "Then why do the scribes say that first Elijah must come?" He answered, "Elijah does come, and he will restore all things. But I tell you that Elijah has already come, and they did not recognise him, but did to him whatever they pleased. So also the Son of Man will certainly suffer at their hands." Then the disciples understood that he was speaking to them of John the Baptist.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:आजच्या सुवार्तेच्या आधीचा मजकूर वाचताना आपण पाहतो की, पेत्र, याकोब यांना येशूच्या रूपांतराचा अनुभव झाला होता. ढगातून आलेला आवाज ऐकून त्यांना आता येशूची ओळख पटली होती. परंतु, ते संदेष्टा एलियाच्या ओळखीबद्दल गोंधळले होते. ज्याची मलाखीने भविष्यवाणी केली होती की, तो "परमेश्वराचा दिवस" येण्याची घोषणा करण्यासाठी परत येईल. आणि येशू त्यांना समजावून सांगतो की, एलियाच्या दुसऱ्या आगमनाची घटना तर आधीच घडली होती. याचा अर्थ असा की, बाप्तिस्मा देणारा योहान संदेष्टा एलिया सारखा अभिषिक्त होता. परंतु, बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाला मृत्युदंड देण्यात आला होता आणि येशूलाही अशाचप्रकारचा त्रास सहन करावा लागणार होता. प्रभू येशूला देखील खूप दुःखसहन करावे लागले व मृत्यूला सामोरे जावे लागले. हे सत्य प्रभूचे शिष्य मान्य करू शकले नाही. परंतु येशूच्या रूपांतराच्या या प्रसंगाद्वारे त्यांना देवाच्या योजनेची अंतदृष्टी झाली.
प्रार्थना: हे प्रभू येशू, अंतर्मनाने तुला ओळखण्यास व तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या