Marathi Bible Reading | Friday 13th December 2024 | 2nd Week of Advent

आगमनकाळातील दुसरा  सप्ताह 

शुक्रवार १३ डिसेंबर २०२४

  ✝️ 

'आम्ही बासरी वाजविली पण तुम्ही नाचला नाही, 
 "We played the flute for you, and you did not dance;

✝️


संत ल्यूसी 

कुमारिका, रक्तसाक्षी ( २८३-३०४)


एका प्राचीन ख्रिस्ती परंपरेनुसार संत ल्युसी ही इटलीमधील सायराकूस या ठिकाणी एका श्रीमंत कुटुंबात जन्माला आली होती. तिचे वडील तिच्या बालपणीच मरण पावले आणि जरी ल्युसी हिने आमरण कौमार्याचे व्रत स्वीकारण्याचा व देवाशी एकनिष्ठ राहण्याचा निश्चय केलेला असला तरी तिच्या विधवा आईने मात्र एका श्रीमंत परंतु मूर्तिपूजक युवकाशी तिची सोयरिक करून दिली. संत सिसिलीयाप्रमाणे आपण देखील आपल्या पतीचे मनपरिवर्तन करू आणि आपल्या पावन व्रताचा आदर राखण्यास त्याचे मन वळवू अशी आशा ती आपल्या मनाशी बाळगून होती.
ल्यूसीची आई बरीच वर्षे रक्तस्रावाने पीडलेली होती. त्यामुळे तिच्या मुलीच्या सूचनेवरून ५० मैल अंतरावर असलेल्या संत आगथाच्या चमत्कारकर्त्या थडग्याला भेट देण्याचे तिने मान्य केले. तिथे ती ताबडतोब गेली आणि संपूर्णपणे बरी झाली. आपले दुखणे कायमचे बरे झाले हे पाहून ल्युसीच्या आईला अत्यानंद झाला. तिने त्या चमत्काराप्रीत्यर्थ आपल्या मुलीकडे आपली संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकण्यासाठी सुपूर्द केली. यापूर्वी ल्युसीने आपल्या आईला तशी विनंती अनेकदा केलेली होती. परंतु आईने मात्र त्याला मान्यता दिली नव्हती.
आपल्या भावी पत्नीने व सासूने आपल्याला मिळणाऱ्या संपत्तीची अशी उधळपट्टी केल्याचे कानी येताच लोभी वृत्तीच्या त्या तरुणाने रागापायी लुसीला सिसिली देशाच्या गव्हर्नरकडे आणले व ती ख्रिस्ती जीवन जगत असल्याचे त्याच्या निदर्शनास आणून दिले.
तो काळ ख्रिस्ती लोकांच्या (डायक्लोशियन) छळाचा काळ होता. एखादा रोमन कितीही देशभक्त असला तरी चालेल परंतु तो ख्रिस्ती असण्याला सम्राटचा तीव्र विरोध होता. जणू ख्रिस्ती धर्म राष्ट्रीय एकात्मतेला आणि लोकांच्या राष्ट्रनिष्ठेला धोकादायक होता अशीच त्यांची धारणा झाली होती.
अशा पार्श्वभूमीवर एक कट्टर ख्रिस्ती म्हणून संत ल्यूसी हिला गर्व्हनरच्या समोर उभे करण्यात आले. तिला अत्यंत भयानक आणि लज्जास्पद मानहानीला व छळाला सामोरे जावे लागले. शेवटी ती १३ डिसेंबर ३०४ साली वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी एक कुमारिका म्हणून रक्तसाक्षी बनली. एका तरवारीने तिचा गळा चिरून तिला आरपार भोसकण्यात आले होते. ज्या कंठातून ख्रिस्ताचे नाव उच्चारले जात होते तो कंठ भेदून छेदून टाकण्यात आला होता.
ती सिसिली देशातील सायराकूस प्रांताची आश्रयदाती संत आहे. डोळे 
येणे, घशाचे विकार, रक्तस्राव आणि संसर्गजन्य रोगांपासून मुक्ती मिळविण्यासाठी तिचा धावा केला जातो. 
चिंतन : ज्यांची हृदये शुद्ध आहेत तेच खऱ्या अर्थाने पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. - संत ल्यूसी 

✝️
जीवनात बदल घड़वून आणण्यासाठी आणि आनंदित परिवर्तनासाठी परमेश्वराच्या हाकेला प्रतिसाद देणे गरजेचे आहे. नीतिमुल्ये व आध्यात्मिकता अंगिकारल्यावरच परमेश्वराचा आशीर्वाद लाभत असतो. आपण अंतर्मुख बनून देवाच्या आज्ञेप्रमाणे आचरण करण्यास प्रेरणा घेऊ या. 


पहिले वाचनयशया ४८:१७-१९
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"माझ्या आज्ञांकडे तुम्ही लक्ष पुरविले असते तर किती छान झाले असते."
तुमचा उद्धारकर्ता इस्राएलचा पवित्र प्रभुदेव असे म्हणतो, “मी तुमचा प्रभुदेव आहे. तुमच्यासाठी जे हितकारक असेल त्याचेच मी तुम्हांला शिक्षण देतो. ज्या मार्गाने तुम्ही जायला हवे त्या मार्गाने मी तुम्हांला नेतो.
माझ्या आज्ञांकडे तुम्ही लक्ष पुरवले असते तर किती छान झाले असते. मग निरंतर वाहणाऱ्या नदीप्रमाणे तुम्हाला शांती लाभली असती. तुमची सात्त्विकता सागराच्या लाटांप्रमाणे भरून वाहिली असती.
तुमचा वंशविस्तार वाळूसारखा विपुल झाला असता तुमची संतती रेतीच्या कणांसारखी अगणित झाली असती त्यांचा नाश व्हावा किंवा नावनिशाणी मिटावी असे मी घडू दिले नसते."
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Isaiah 48:17-19
Thus says the Lord, your Redeemer, the Holy One of Israel: "I am the Lord your God, who teaches you to profit, who leads you in the way you should go. Oh that you had paid attention to my commandments! Then your peace would have been like a river, and your righteousness like the waves of the sea; your offspring would have been like the sand, and your descendants like its grains; their name would never be cut off or destroyed from before me."
This is the word of God 
Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र : १:१-४,६
प्रतिसाद :  प्रभो, तुझ्यामागे येणाऱ्याला जीवनाचा प्रकाश लाभेल. 

१) जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याप्रमाणे चालत नाही,
पापीजनांच्या वाऱ्याला उभा रहात नाही, 
किंवा देवनिंदकांच्या बैठकीत सामील होत नाही, 
उलट प्रभूच्या धर्मशास्त्रात रमतो, 
त्याच्या धर्मशास्त्राचे रांत्रदिवस मनन करतो तो धन्य

२) वाहत्या पाण्याजवळ एखादे झाड लावलेले असते, 
यथाकाळी त्याला बहर येतो, 
त्याची पाने कोमेजत नाहीत, 
अशा झाडासारखा तो असतो.
 तो हाती घेतो ते सर्व सफळ होते.

३) पण दुर्जनांचे ते मुळीच नाही 
वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत. 
सज्जनांच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते. 
परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.


Psalm 1:1-2, 3, 4 and 6
R. He who follows you, Lord, will have the light of life. 
Blessed indeed is the man
who follows not the counsel of the wicked, 
nor stands in the path with sinners, 
nor abides in the company of scorners, 
but whose delight is the law of the Lord, 
and who ponders his law day and night. 

He is like a tree that is planted
 beside the flowing waters,
that yields its fruit in due season, 
and whose leaves shall never fade, 
and all that he does shall prosper.  

Not so are the wicked, not so! 
For they, like winnowed chaff, 
shall be driven away by the wind.
 For the Lord knows the way of the just, 
but the way of the wicked will perish.  R


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
पाहा, आपला राजा, 
जगाचा मालक येईल. 
तो आपल्याला दोरखंडाच्या बंधनातून मुक्त करील 
आलेलुया!

Acclamation: 
 Shower, O heavens, from above, and let the clouds rain down righteousness; let the earth open, that salvation and righteousness may bear fruit.
.

शुभवर्तमान मत्तय११:१६-१९
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“त्यांनी योहानचे ऐकले नाहीच परंतु परमेश्वरपुत्राचेसुध्दा त्यांनी ऐकले नाही."
येशू म्हणाला, “या पिढीची मी कोणाशी तुलना करू ? चावडीवर जमलेली मुले आपल्या सवंगड्यांना म्हणतात, 'आम्ही बासरी वाजविली पण तुम्ही नाचला नाही, आम्ही विलापगीत गायले पण तुम्ही शोक केला नाही.' त्याप्रमाणे ही पिढी आहे. कारण योहान आला त्याने उपवास केला आणि द्राक्षरस घेतला नाही, तर सगळे म्हणतात 'त्याला भूत लागले आहे' मानवपुत्र आला आणि तो खातोपितो तर सगळे म्हणतात, 'बघा, कसा खादाड आणि दारूबाज आहे, हा नोकरदारांचा तसाच पापीजनांचा दोस्त आहे.' पण देवाचे ज्ञान रास्त आहे हे खऱ्या ज्ञान्यांच्या कृत्यांवरून पटते."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Matthew 11:16-19
At that time: Jesus said to the crowds: "To what shall I compare this generation? It is like children sitting in the market-places and calling to their playmates, "We played the flute for you, and you did not dance; we sang a dirge, and you did not mourn." For John came neither eating nor drinking, and they say, 'He has a demon. The Son of Man came eating and drinking, and they say, 'Look at him! A glutton and a drunkard, a friend of tax collectors and sinners!' Yet wisdom is justified by her deeds."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:आजच्या सुवार्तेमध्ये येशू जो मुद्दा मांडत आहे तो म्हणजे त्याच्या काळातील लोक बदलण्यास तयार नाहीत. बाप्तिस्मा करणारा योहान जो एक अतिशय कठोर जीवन जगला, त्याला त्यांनी भूत म्हटले. दुसरीकडे, येशू जकातदार आणि पापी लोकांशी संबंध ठेवत असल्यामुळे त्यांनी त्याला जकातदाराचा मित्र म्हटले. त्यांनी योहान आणि येशू दोघांनाही नाकारले. ते एक हट्टी लोक होते ज्यांना त्यांचे दृष्ट्य मार्ग चालू ठेवायचे होते. म्हणूनच ते योहान आणि येशूबद्दल वाईट बोलत होते. आमच्याबद्दल काय? आपण देखील आपल्या पापी मार्गांना जर चिकटून असाल आणि त्याच वेळी देवाच्या जवळ जाण्याची अपेक्षा करत असाल, तर अशा स्थितीचा अर्थ असा होतो की, आपण देवाला नाकारत आहोत. पापी लोकांना वाचवण्यासाठी येशू जगात आला हे आपण विसरू नये. आपल्या पापांपासून आपल्याला वाचवण्यासाठी त्याने आपले प्राण दिले. आगमन काळ आपल्याला आपले जीवन बदलून आपल्या तारणाऱ्याचे आनंदाने आणि प्रेमाने स्वागत करण्यास आणखी एक संधी देत आहे.
प्रार्थना: हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या ज्ञानात, शहाणपणात आणि आज्ञेत वाढण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

✝️                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या