Marathi Bible Reading | Thursday 12th December 2024 | 2nd Week of Advent

आगमनकाळातील दुसरा  सप्ताह 

गुरुवार १२ डिसेंबर २०२४

  ✝️ 

“योहानपेक्षा श्रेष्ठ असा कुणी झाला नाही.' 
 no one greater than John the Baptist. "

✝️


गावदालूपेची माता मरिया

✝️
परमेश्वराने भीतीने आणि संकटांनी ग्रासलेल्या त्रस्त लोकांना त्यातून बाहेर काढले आहे.
आजच्या शुभवर्तमानात योहान बाप्तिस्ताच्या जीवनाचे महत्व पटवून  देताना प्रभू येशू ख्रिस्त श्रेष्ठ आणि कनिष्ठ असे शब्द वापरत आहे. ही  महानता, श्रेष्ठता किंवा कनिष्ठता कोणत्याहि वैभव, सत्ता अथवा प्रसिद्धिच्या मार्गाने मोजता येत नाही तर जीवन जगण्याचा आणि तेही परमेश्वराच्या योजनेनुसार जगण्याचा एक दृष्टिकोन आहे. योहान बाप्तिस्ता श्रेष्ठ होता  त्याची श्रेष्ठता त्याच्या महान कार्यात नसून त्याने येशू ख्रिस्ताच्या येण्याने घेतलेल्या नम्रतेमध्ये आहे. योहानाने स्वत:ची अशा ओळख करुन दिली होती की तो केवळ वाणी असून त्याच्या मागून येण्याच्या पेक्षा तो स्वत: कनिष्ठ आहे. योहानने खूप महान कार्य करुन सुद्धा प्रभू येशूसमोर तो नतमस्तक बनला. त्याने देवराज्यासाठी अगदी त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्य केले. योहानचा आणखी महत्वाचा गुण म्हणजे तो धाडसी, निडर आणि स्पष्टवक्ता होता. त्याने न डगमगता प्रभू येशू साठी मार्ग तयार केला.
प्रभू येशूच्या आगमनासाठी आपण सज्ज बनत असताना इतरांनासुद्धा हा संदेश देऊन त्यांना सुवार्तेची ओळख करुन देऊ या. 
✝️

पहिले वाचन यशया ४१:१३-२०
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"मी इस्राएलचा पवित्र प्रभू तुमचा उद्धारकर्ता आहे."

मी प्रभू तुझा देव तुझा उजवा हात आपल्या हाती धरून आहे आणि मीच तुला सांगत आहे की, तू भिऊ नकोस, मी तुला साहाय्य करीन.
हे क्षुद्र याकोब हे दीन इस्राएल, तू भिऊ नकोस. मी इस्राएलचा पवित्र प्रभू, तुमचा उद्धारकर्ता, तुमच्या मदतीला धावून येईन. प्रभूचे हे बोल आहेत. 
बघ मी तुला नवीन तीक्ष्ण अनेक दात असलेले मळणीचे यंत्र बनवीत आहे. तू डोंगराची मळणी करून त्यांचा चुराडा करशील. टेकड्यांचा तू भुगा करशील.तू त्यांना उफणशील आणि वाऱ्यावर ते उडून जातील.
वावटळ त्यांना उधळून लावील. मग प्रभूठायी तू उल्हास पावशील आणि इस्राएल पवित्र प्रभूचा अभिमान बाळगशील.
जेव्हा दीन आणि दरिद्री जनांना पाण्याची तहान लागेल आणि ते मिळणार नाही जेव्हा त्यांची जीभ तहानेने कोरडी पडेल तेव्हा मी प्रभू स्वतः त्यांची विनंती  ऐकेन. मी इस्राएलचा देव त्यांचा त्याग करणार नाही मी उजाड टेकड्यांवर नद्या आणि खोल दऱ्यांतून झरे वाहवीन, जेथे वाळवंट आहे तेथे मी पाण्याचे तळे बनवीन निर्जन प्रदेशात झरे उत्पन्न करीन. वाळवंटात मी गंधसरू, बाभूळ, मेंदी आणि कण्हेर यांची लागवड करीन. कोरडवाहू जमिनीत वन निर्माण होईल. सुरू, देवदारू आणि भद्रदारू यांची वने तेथे फोफावतील. लोक ते पाहतील आणि समजतील की, प्रभूने असे केले आहे. ते विचार करतील आणि त्यांना कळेल की इस्राएलच्या पवित्र प्रभूची ही निर्मिती आहे.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Isaiah 41:13-20

I, the Lord your God, hold your right hand; it is I who say to you, "Fear not, I am the one who helps you." Fear not, you worm Jacob, you men of Israel! I am the one who helps you, declares the Lord; your Redeemer is the Holy One of Israel. Behold, I make of you a threshing sledge, new, sharp, and having teeth; you shall thresh the mountains and crush them, and you shall make the hills like chaff; you shall winnow them, and the wind shall carry them away, and the tempest shall scatter them.
And you shall rejoice in the Lord; in the Holy One of Israel you shall glory. When the poor and needy seek water, and there is none, and their tongue is parched with thirst I the Lord will answer them; I the God of Israel will not forsake them. I will open rivers on the bare heights, and fountains in the midst of the valleys. I will make the wilderness a pool of water, and the dry land springs of water. I will put in the wilderness the cedar, the acacia, the myrtle, and the olive. I will set in the desert the cypress, the plane and the pine together, that they may see and know, may consider and understand together, that the hand of the Lord has done this, the Holy One of Israel has created it.
This is the word of God 
Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र : १४५ :१,९-१३
प्रतिसाद :  प्रभू प्रेमळ आणि दयानिधी आहे.

१)माझ्या देवराया, मी माहात्म्य वर्णीन, 
सदासर्वदा तुझ्या नामाचा महिमा गाईन. 
प्रभू सर्वांशी चांगला आहे त्याने निर्मिलेल्या 
सर्वावर त्याची दयादृष्टी असते.

२) हे प्रभो, सर्व प्राणिमात्र तुझे स्तवन करतात.
 तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.

३) हे परमेश्वरा, तुझ्या राज्याचे ऐश्वर्य ते वर्णितात. 
तुझा पराक्रम ते कथन करतात.. 
तुझी महान कृत्ये आणि तुझ्या राज्याचे 
शाही वैभव ते मानवजातीला जाहीर करतात.

४) तुझे राज्य म्हणजे युगानुयुगीचे राज्य.
तुझी सत्ता पिढ्यान्पिढ्या टिकते.


Psalm 145:1 and 9, 10-11, 12-13ab

The Lord is kind and full of compassion, 
slow to anger, abounding in mercy.

I will extol you, my God and king 
and bless your name forever and ever.
How good is the Lord to all, 
compassionate to all his creatures.

All your works shall thank you, O Lord, 
and all your faithful ones bless you. 
They shall speak of the glory of your reign,
 and declare your mighty deeds. R

To make known your might to the children of men, 
and the glorious splendour of your reign. 
Your kingdom is an everlasting kingdom; 
your rule endures for all generations. R


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
हे प्रभो शांतीचे वरदान घेऊन आमच्याकडे ये, 
म्हणजे आम्ही सोज्वळ हृदयांनी तुझ्या 
सान्निध्यात आनंद आणि जल्लोष करू
आलेलुया!

Acclamation: 
 Shower, O heavens, from above, and let the clouds rain down righteousness; let the earth open, that salvation and righteousness may bear fruit.

शुभवर्तमान मत्तय ११:११-१५
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
“योहानपेक्षा श्रेष्ठ असा कुणी झाला नाही.' "
येशू लोकसमुदायाला म्हणाला, "मी तर खरेच सांगतो, स्त्रीच्या पोटी आलेल्या सर्वात योहानापेक्षा श्रेष्ठ असा कुणी झाला नाही. मात्र स्वर्गराज्यातला सर्वात कनिष्ठ तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानच्या काळापासून तर या घटकेपर्यंत स्वर्गराज्यावर आक्रमण होत आहे आणि आक्रमण करणारे ते बळकावीत आहेत, कारण योहानच्या काळापर्यंत सर्व संदेष्ट्यांनी आणि धर्मशास्त्राने संदेश दिले आणि हे मान्य करायची तुमची इच्छा असेल तर येणार असलेला एलिया तो हाच आहे; ज्याला ऐकायला कान असतील त्याने ऐकावे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Matthew 11:11-15
At that time: Jesus said to the crowds, "Truly, I say to you, among those born of women there has arisen no one greater than John the Baptist. Yet the one who is least in the kingdom of heaven is greater than he. From the days of John the Baptist until now the kingdom of heaven has suffered violence, and the violent take it by force. For all the Prophets and the Law prophesied until John, and if you are willing to accept it, he is Elijah who is to come. He who has ears to hear, let him hear.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला देव इस्त्रायल लोकांना त्याच्या दयेची आणि मदतीची खात्री देतो. ते बॅबिलोनमधील त्यांच्या बंदिवासाच्या शेवटी येत असताना, देवाने त्यांना सोडवण्याचे आणि त्यांना नवीन आशा देण्याचे वचन दिले. देव म्हणतो की, तो त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवेल आणि त्यांना आशीर्वाद देईल. जे स्वतःला कमकुवत समजतात, ते आता विजयी होतील. कारण देव त्यांच्या पाठीशी आहे. केवळ देवाच्या उपस्थितीमुळे त्यांच्या परिस्थितीमध्ये फरक पडेल. त्यामुळे आता त्यांना घाबरण्याचे कारण नाही. आगमन काळापासून नाताळकडे प्रवास करत असताना आपल्यालाही हाच संदेश दिला जातो. देव आपल्याला भूतकाळातील गोष्टींचा विचार करणे थांबवण्यास आणि आशेने भविष्याकडे आपले लक्ष वळवण्यास सांगतो. आपला देव खूप दयाळू आहे. आपण त्याच्यापासून कितीही दूर गेलो तरी ही तो आमच्या शोधात येतो. तो खरोखर आपल्यासाठी सर्वकाही बदलू शकतो. घाबरू नकोस असे सांगणाऱ्या त्याच्या शब्दांवर आपण विश्वास ठेवणार का? देव आपल्या पाठीशी आहे मग आपल्याला कुणाची भीती ?

प्रार्थना:  हे प्रभू येशू, धैर्याने जीवनाला सामोरे जाण्यास व तुझी सुवार्ता  पसरविण्यास आम्हाला शक्ति दे, आमेन.

✝️                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या