आगमनकाळातील दुसरा सप्ताह
बुधवार ११ डिसेंबर २०२४
✝️
कारण मी लीन आणि नम्र अंत:करणाचा आहे. तुमच्या मनाला शांती मिळेल
for I am gentle and lowly in heart, and you will find rest for your souls.
✝️
✝️
ग्रीस देशामध्ये प्रेषितीय कार्य करण्यासाठी एखादा धर्मगुरू पाठविण्याचे धाडस करणारे संत दमास्कस हे पहिलेच पोप होते आणि तेही कॉन्स्टेन्टिनोपलच्या पेट्रिआर्कच्या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या हेतूने, हेही तितके महत्त्वाचे आहे.
विधवा आणि अनाथांकडून कोणत्याही देणग्या आणि भेटवस्तू मिळविण्याचा प्रयत्न केला जाऊ नये अशी सक्त ताकीद त्यांनी आपल्या धर्मगुरूंना दिलेली होती. सर्व प्रकारची धार्मिक प्रकरणे हाताळण्याचा अधिकार पोपना असावा हेही त्यांनीच कायद्याच्या साच्यात बसविले.
त्यांच्या काळात संत जेरोम रोम शहरात आला. काही काळापर्यंत तो पोपमहाशयांचा गुप्त सेक्रेटरी होता. त्यावेळी पोपमहोदयांनी त्यांना बायबलचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन दिले आणि बायबलचे लॅटिन भाषेत भाषांतर करण्याची परवानगीही त्यांनी संत जेरोम ह्यांना दिली.
रक्तसाक्षी संताविषयी त्यांना असलेल्या आदरभावनेतूनच त्यांनी अशा संतांची थडगी भाविकांना करमुक्त योजनेद्वारे पाहता यावी अशी व्यवस्था त्यांनी केली. अशी तीर्थक्षेत्रे त्यांनी सजविलीसुद्धा. तसेच त्या त्या रक्तसाक्षी संताविषयीची माहिती संगमरवरी लाद्यांवर कोरून त्यांनी भाविकांच्या माहितीसाठी सहज उपलब्ध केली. अनेक प्राचीन रक्तसाक्षी संतांचे जीवन चरित्र लिहिण्यासाठी ह्या माहितीचा आधार आजवर घेण्यात आलेला आहे.
रोमन मिस्साग्रंथामध्ये प्राचीन काळी खूप लांबलचक व दीर्घ उपासना समाविष्ट करण्यात आलेली होती; परंतु ह्या पोपमहाशयांनी ती थोडीशी संक्षिप्त रूपात तयार केली, ती आजतागायत वापरात आहे. त्यामुळे त्यांना रोमन मिस्साग्रंथाचे जनक किंवा उद्गाते म्हटले जाते. ११ डिसेंबर ३८४ साली ते मरण पावले.
यशया ४०:२५-३१
वाचन : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“सर्वसमर्थ परमेश्वर दुर्बलांना सबल करतो.”
पवित्र प्रभू विचारतो, “माझी कुणाशी तुलना कराल ? माझ्यासमान कोण आहे ? वर नजर टाका. कुणी निर्माण केलेत हे तारे ? त्यांची गणना करून त्यांना सेनेप्रमाणे बाहेर आणणाऱ्याने आणि त्या सर्वांना त्यांच्या नावाने हाक मारणाऱ्यानेच. त्याचे सामर्थ्य आणि शक्ती इतकी अफाट आहे की, एकही तारा कधी मागे रहात नाही.
हे याकोब, कशाला कुरकुरतोस ? हे इस्रायला का बडबडतोस? “माझी दैन्यावस्था प्रभूच्या नजरेआड झाली आहे. माझा देव माझ्या हक्कांकडे दुर्लक्ष करतो,” असे का म्हणतोस ?
तुम्हांला कळत नाही का ? तुम्ही ऐकले नाही का ? प्रभू हा सनातन देव, अफाट विश्वाचा निर्माता आहे. तो दमत नाही की थकत नाही. त्याच्या बुद्धीचा कुणाला ठाव लागत नाही. दमलेल्यांना तो चैतन्य देतो. दुर्बलांना सबळ करतो. तरुणदेखील दमतात आणि थकतात. नवजवान थकवा आल्याने धडपडतात. परंतु प्रभूवर भरवसा ठेवणारे नवा जोम संपादन करतील. गरुडाप्रमाणे पंख फडफडवीत ते भरारी मारतील. ते धावतील पण थकणार नाहीत. ते चालतील पण त्यांना शीण येणार नाही.
प्रभूचा शब्द.
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Isaiah 40:25-31
To whom then will you compare me, that I should be like him? says the Holy One. Lift up your eyes on high and see: who created these ? He who brings out their host by number, calling them all by name; by the greatness of his might and because he is strong in power, not one is missing. Why do you say, O Jacob, and speak, O Israel, "My way is hidden from the Lord, and my right is disregarded by my God? Have you not known! Have you not heard? The Lord is the everlasting God, the Creator of the ends of the earth. He does not faint or grow weary; his understanding is unsearchable. He gives power to the faint, and to him who has no might he increases strength. Even youths shall faint and be weary, and young men shall fall exhausted; but they who wait for the Lord shall renew their strength; they shall mount up with wings like eagles; they shall run and not be weary, they shall walk and not faint.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र : १०३:१- २,३- ४,८.१०
प्रतिसाद : हे माझ्या मना, प्रभूचे धन्यवाद गा.
१ हे माझ्या मना, प्रभूचे धन्यवाद गा
हे माझ्या अंत:करणा, त्याच्या मंगल नावाचे धन्यवाद गा.
हे मना, प्रभूचे धन्यवाद गा.
त्याचे अनंत उपकार विसरू नकोस.
२ तो माझे सगळे अपराध पोटात घालतो.
माझे सगळे रोग दूर करतो.
मृत्यूच्या खाईतून तो माझा उद्धार करतो.
आपल्या वात्सल्याची आणि अपार करुणेची
पाखर माझ्यावर घालतो.
३. प्रभू करुणेचा आणि प्रेमाचा सागर आहे.
तो मंदक्रोध आणि दयानिधी आहे.
आमच्या पापांप्रमाणे तो आमची फेड करत नाही.
आमच्या दुष्कृत्यांप्रमाणे आमची परतफेड करीत नाही.
Psalm 103:1-2, 3-4, 8 and 10
Bless the Lord, O my soul.
Bless the Lord. O my soul,
and all within me, his holy name.
Bless the Lord, O my soul,
and never forget all his benefits.
It is the Lord who forgives all your sins,
who heals every one of your ills,
who redeems your life from the grave,
who crowns you with mercy and compassion. R
The Lord is compassionate and gracious,
slow to anger and rich in mercy.
He does not treat us according to our sins,
nor repay us according to our faults. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
पाहा, आपला सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर येईल. आणि आपल्या दासाचे डोळे प्रकाशित करील.
आलेलुया!
Acclamation:
Behold, the Lord comes to save his people; blessed are those prepared to meet him
.
शुभवर्तमान मत्तय ११:२८-३०
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"कष्ट करणाऱ्यांनो, माझ्याकडे या."
तेव्हा येशूने म्हटले “अहो कष्ट करणाऱ्यांनो आणि भारी ओझी वाहाणाऱ्यांनो माझ्याकडे या मी तुम्हांला विसावा देईन. माझे जू आपल्या मानेवर घ्या. माझ्यापासून शिका. कारण मी लीन आणि नम्र अंत:करणाचा आहे. तुमच्या मनाला शांती मिळेल कारण माझे जू सोयीचे आणि माझे ओझे हलके आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Matthew 11:28-30
At that time: Jesus said, "Come to me, all who labour and are heavy laden, and I will give you rest. Take my yoke upon you, and learn from me, for I am gentle and lowly in heart, and you will find rest for your souls. For my yoke is easy, and my burden is light."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:तुम्ही थकलेले आहात का? तुम्ही ओड्याच्या भाराखाली चेपलेले आहात का? येशू अशा कष्टी व थकलेल्या लोकांना त्यांच्याकडे बोलावत आहे. जेणेकरून येशूच्या सानिध्यात देवाची खरी शांती अनुभवण्यास मिळेल. देवाच्या अस्तित्वात खरी शांती आहे. आपण चिंताग्रस्त किंवा अडचणीत असू नये अशी येशूची इच्छा आहे. सर्वदा आपण शांतीचा अनुभव घ्यावा अशी त्याची इच्छा आहे. त्याच्यावर आपली श्रद्धा असावी अशी त्याची इच्छा आहे. येशू म्हणतो, माझे वचन हे आत्मा व जीवन आहे. येशूच्या वचनावर विश्वास ठेवणे हे कठिण नाही कारण जो विश्वास ठेवतो त्याला तो मदत करतो. आपल्या समस्यांना येशू उत्तर आहे. त्यांच्याकडे जाऊया व शांतीचा अनुभव घेऊया.
प्रार्थना: हे प्रभू येशू, कृपा व दयेच्या सागरा, तुझ्या सहवासात विसावण्यास मला प्रेरणा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या