And the Lord spoke to Moses, saying:Say to Aaron and his sons: Thus shall you bless the children of Israel, and you shall say to them:The Lord bless thee, and keep thee.The Lord shew his face to thee, and have mercy on thee.The Lord turn his countenance to thee, and give thee peace. And they shall invoke my name upon the children of Israel, and I will bless them.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद : हे देवा, आम्हांला आशीर्वाद दे.
१) हे परमेश्वरा, आम्हांवर दया कर.
आम्हांला आशीर्वाद दे.
तू आपला मुखप्रकाश आम्हांवर पाड.
यासाठी की पृथ्वीवर तुझा मार्ग कळावा,
सर्व राष्ट्रांना तू सिद्ध केलेले तारण समजावे.
२) राष्ट्रे हर्षोत व जयघोष करोत कारण
तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करतोस व
पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवतोस.
३) हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुती करोत,
सर्व राष्ट्रे तुझी स्तुती करोत.
देव आम्हांला आशीर्वाद देवो व
पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत.
Psalm
R. (2a) May God bless us in his mercy.
May God have mercy on us, and bless us:
may he cause the light of his countenance to shine upon us,
and may he have mercy on us.
That we may know thy way upon earth:
thy salvation in all nations.
R. May God bless us in his mercy. Let the nations be glad and rejoice:for thou judgest the people with justice,and directest the nations upon earth.
R. May God bless us in his mercy.
6 Let the people, O God, confess to thee:
let all the people give praise to thee:
8 May God bless us: and all the ends of the earth fear him.
R. May God bless us in his mercy.
दुसरे वाचन गलतीकरांस पत्र ४:४-७
वाचक : पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“देवाने आपल्या पुत्राला पाठवले, तो स्त्रीपासून जन्मलेला होता."
काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता. यात उद्देश हा होता की, जे नियमशास्त्राधीन होते त्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे आणि आम्हांला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहा, म्हणून देवाने अब्बा, बापा, अशी हाक मारणाऱ्यांना आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंत:करणात पाठवले आहे. यावरून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस आणि पुत्र आहेस तर देवाद्वारे वारसही आहेस.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
But when the fulness of the time was come, God sent his Son, made of a woman, made under the law:That he might redeem them who were under the law: that we might receive the adoption of sons. And because you are sons, God hath sent the Spirit of his Son into your hearts, crying: Abba, Father. Therefore now he is not a servant, but a son. And if a son, an heir also through God.
This is the word of God
Thanks be to God
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
देव प्राचीन काळी निरनिराळ्या मार्गे संदेष्ट्यांच्याद्वारे आमच्या पूर्वजांशी बोलला परंतु ह्या अंतिम काळात तो त्याच्या पुत्राद्वारे आम्हांबरोबर बोलला आहे.
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
In the past God spoke to our ancestors through the prophets; in these last days, he has spoken to us through the Son.
R. Alleluia, alleluia
शुभवर्तमान लूक २:१६-२१
वाचक : लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मरिया, योसेफ व बाळ ही त्यांना सापडली.... आठवा दिवस आला तेव्हा त्याला येशू म्हणण्यात आले."
मेंढपाळ घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळही त्यांना सापडले. त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंत:करणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करीत परत गेले.आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
0 टिप्पण्या