✝️
हे नवीन वर्ष आपल्या सर्वाना प्रभूच्या सहवासात
सुखाचे व भरभराटीचे जावो .
प्रभूजन्मानंतरचा नववा दिवस
गुरुवार दि. २ जानेवारी २०२५
✝️
“जो माझ्या मागून येत आहे तो माझ्या पूर्वीच अस्तित्वात होता.
John answered them, saying: I baptize with water; but there hath stood one in the midst of you, whom you know not
संत बेसिल महान व संत ग्रेगरी नाझियांझन यांचा सण
पहिले वाचन : योहानचे पहिले पत्र २:२२-२८
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते जर तुम्हांमध्ये राहिले
येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्यासारखा कोण लबाड आहे ? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे. जो कोणी पुत्राला नाकारतो त्याला पिता लाभला नाही; जो पुत्राला स्वीकारतो त्याला पिता लाभला आहे. तुमच्याविषयी म्हणावयाचे तर, जे तुम्ही प्रारंभापासून ऐकले ते जर तुम्हांमध्ये राहिले तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. हे जे अभिवचन त्याने स्वत: आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय.
तुम्हाला बहकवणाऱ्या लोकांविषयी हे मी तुम्हाला लिहिले आहे. तुम्हांविषयी म्हणावयाचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुम्हांमध्ये राहतो. तेव्हा तुम्हांला कोणी शिकवण्याची गरज नाही. त्याचा अभिषेक जो सत्य आहे, खोटा नाही, तुम्हांला सर्व गोष्टींविषयी जे शिकवतो त्याप्रमाणे व त्याने तुम्हांला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा.
तो प्रकट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस त्याच्यापासून लाजेने माघार घ्यावी लागू नये म्हणून आता मुलांनो, त्याच्यामध्ये राहा.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
In times, past, God spoke to our ancestors through the prophets: in these last days, he has spoken to us through his Son.
Alleluia, alleluia
यहुद्यांनी येरुशलेमहून याजक व लेवी ह्यांना योहानला आपण कोण आहा असे विचारायला पाठविले तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे. त्याने कबूल केले. नाकारले नाही. मी खिस्त नाही असे त्याने कबूल केले. तेव्हा त्यांनी त्याला विचारले, "तर मग आपण कोण आहा? एलिया आहा काय ?" तो म्हणाला, "मी नाही." "आपण तो संदेष्टा आहा काय ?" त्यावर त्याने "नाही" असे उत्तर दिले. ह्यावरून ते त्याला म्हणाले, "ज्यांनी आम्हांला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून, आपण कोण आहा, हे सांगा. स्वत:विषयी आपले काय म्हणणे आहे ?" तो म्हणाला, "यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे, परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी मी आहे." आता पाठवलेली ही माणसे परुश्यांपैकी होती. त्यांनी त्याला विचारले, "आपण ख्रिस्त नाही, एलिया नाही व तो संदेष्टाही नाही, तर बाप्तिस्मा का करता ?" योहानने त्यांना उत्तर दिले, "मी पाण्याने बाप्तिस्मा करतो. ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक तुम्हांमध्ये उपस्थित आहे. तो माझ्यामागून येणारा आहे. त्याच्या पायतणाचा बंद सोडायला मी योग्य नाही."
यार्देनच्या पलीकडे बेथानीत योहान बाप्तिस्मा करीत होता तेथे ह्या गोष्टी घडल्या.
✝️
0 टिप्पण्या