Marathi Bible Reading | Friday 3rd January 2025 | Happy New Year to All the Readers

  ✝️ 

हे नवीन वर्ष आपल्या सर्वाना प्रभूच्या  सहवासात
सुखाचे व  भरभराटीचे जावो  .
शुक्रवार  दि. ३ जानेवारी  २०२५
✝️ 
जो माझ्या मागून येत आहे तो माझ्या पूर्वीच अस्तित्वात होता.

John answered them, saying: I baptize with water; but there hath stood one in the midst of you, whom you know not


कुरियाकोस एलायस चावरा

व्रतस्थ धर्मगुरू (१८०५-१८७१)
Born10 February 1805, Kainakary
Died3 January 1871, Koonammavu
Feast18 February (Roman Latin Catholic Church) 3 January (Syro-Malabar Church)
Canonized23 November 2014, Rome by Pope Francis

भारतातील केरळ राज्यामधील कयनाकारी येथे १० फेब्रुवारी १८०५ रोजी कुरियाकोस चावरा याचा जन्म झाला. सहा भावंडांमध्ये कुरियाकोस हे सहावे अपत्य होते. त्याचे आईवडिल सिरो मलाबार चर्चचे भक्तिमान कॅथोलिक होते. १८२९ साली धर्मगुरूपदाची दीक्षा स्वीकारल्यानंतर त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या फादर थॉमस पलाक्कल ह्यांचे सहाय्यक म्हणून ते मदत करू लागले. त्याचबरोबर अलिकडे “कार्मेलाईट्स ऑफ मेरी इमॅक्युलेट  (सी. एम्. आय.)" ह्या व्रतस्थांचे संस्थापक फा. थॉमस पोरूकारा ह्यांनाही ते सहाय्य करीत. सह-संस्थापकांच्या मृत्यूनंतर फादर कुरियाकोस ह्यांनी नवीन संघाची जबाबदारी स्वीकारली. आपल्या व्रतविधीच्या वेळी त्यांनी कुरियाकोस एलायस ऑफ द होली फॅमिली हे नाव धारण केले. इ. स. १८५५ साली ह्या संघाला अधिकृत मान्यता प्राप्त झाली त्यावेळी त्यांचा व्रतविधी संपन्न झाला.
ह्या संघाची पहिली शाखा मन्त्रानाम येथे उघडण्यात आली. तसेच फादर चावरा ह्यांच्या हयातीत केरळमध्ये आणखी पाच शाखा उघडण्यात आल्या. फादर चावरा हे विविध क्षेत्रांमध्ये अग्रगण्य होते. सेमिनरी सुरू करणे, शाळा, वृद्धाश्रमे उघडणे, नवख्रिस्तीयांसाठी धर्मशिक्षण वर्ग चालविणे, धर्मगुरू आणि लोकांसाठी तपसाधना आयोजित करणे अशी काही कार्ये पुढे त्यांच्या अनुयायांनीही सुरू ठेवण्यात यश संपादन केले.
आध्यात्मिक, धर्मशिक्षणपर व भक्ती-उपासनेची पुस्तके प्रकाशित करता यावीत म्हणून मोठ्या कष्टाने व अपार मेहनतीने फादर चावरा ह्यांनी छपाईचा कारखाना सुरू केला. पवित्र मिस्साच्या उपासनेमध्ये समानता व एकवाक्यता यावी म्हणून त्यानी उपासनेच्या नियमांचे पुस्तक प्रसिद्ध केले. ते खूप गाजले, धर्मगुरूंच्या एका प्रार्थनापुस्तकाचे व एका दिनदर्शिकेचे संपादनही त्यांनी केले. सिरीयन आणि लॅटीन उपासनाविधीत सहभागी होणाऱ्या केरळच्या कॅथोलिक पंथियांचे कल्याण व्हावे अशी जबरदस्त तळमळ त्यांच्या अंतर्यामी होती.
फादर कुरियाकोस हे अत्यंत प्रार्थनाशील वृत्तीचे होते. पवित्र मरियेवर त्यांची नितांत भक्ती होती. आजाऱ्यांना भेटी देणे त्यांना फार आवडे. संसर्गजन्य रोग झालेल्या रूग्णाईतांनाही ते प्रेमाने वागवीत. अशा आजाऱ्यामध्ये गरीब व गरजू जर असतील तर त्यांच्यावर फादर चावरा ह्यांची मेहेरनजर असायची.
फादर कुरियाकोस ३ जानेवारी १८७१ रोजी स्वर्गवासी झाले. त्यांचे अवशेष १८८९ साली मन्नानाम येथे आणण्यात आले. आज मन्नानाम हे केरळमधील भाविक यात्रेकरूंचे तीर्थक्षेत्र झाले आहे. ८ फेब्रुवारी १९८६ रोजी आपल्या भारतभेटीवर • असताना कोट्टायाम (केरळ) येथे पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी फादर कुरियाकोस ह्यांना धन्यवादित म्हणून घोषित केले.
चिंतन : एकमेकांवर प्रीती करा, परस्परांच्या दोषांवर पांघरूण घाला, क्षमा करा, जर आपण अशा प्रकारचे जीवन जगलात तर ह्या जगातच सार्वकालिक शांती आणि आनंदाचा आस्वाद तुम्हाला घेता येईल. ज्या दिवशी तुमच्या हातून काही विशेष कार्य घडले नसेल तो दिवस तुमच्या आयुष्यातून वजा करा. संत कुरियाकोस चावरा
                                                    ✝️
पहिले वाचन : योहानचे पहिले पत्र २:२९-३:६
वाचक :   योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 
 "जो कोणी प्रभूच्या ठायी राहतो तो पाप करत नाही.”
योहान म्हणतो, “तो न्यायसंपन्न आहे हे जर तुम्हांला माहीत आहे, तर जो कोणी नीतीने चालतो तो त्याच्यापासून जन्मलेला आहे हेही तुम्हांला माहीत झाले आहे.” आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहातच. ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत आणि पुढे आपण काय होऊ, हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा तो शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करतो.
जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. तुम्हाला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला. त्याच्याठायी पाप नाही. जो कोणी त्याच्याठायी राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही व त्याला ओळखलेही नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :First John 2: 29 – 3: 6
 If you know, that he is just, know ye, that every one also, who doth justice, is born of him. Behold what manner of charity the Father hath bestowed upon us, that we should be called, and should be the sons of God. Therefore the world knoweth not us, because it knew not him. Dearly beloved, we are now the sons of God; and it hath not yet appeared what we shall be. We know, that, when he shall appear, we shall be like to him: because we shall see him as he is. And every one that hath this hope in him, sanctifieth himself, as he also is holy. Whosoever committeth sin committeth also iniquity; and sin is iniquity. And you know that he appeared to take away our sins, and in him there is no sin. Whosoever abideth in him, sinneth not; and whosoever sinneth, hath not seen him, nor known him.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद ९८:१-३,६
प्रतिसाद :  पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे.
१) नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा. 
कारण त्याने अलौकिक कृत्ये केली आहेत.
 त्याने आपल्या हाताने व पवित्र बाहुबलाने 
विजय संपादन केला आहे.

२) पृथ्वीच्या कानाकोपऱ्यांनी आमच्या 
देवाचा विजय पाहिला आहे. 
पृथ्वीवरील सर्व लोकहो, प्रभूचा जयजयकार करा. 
जयघोष करून आनंदाने गा.
३) प्रभूचे गुणगान वीणेवर करा. 
मंजुळ स्वराने वीणेवर गा. 
तुतारी व कर्णा यांच्या निनादात 
प्रभुरायासमोर जयघोष करा.

Psalm: Psalms 98: 1, 3cd-4, 5-6
 R. (3cd) All the ends of the earth have seen the saving power of God. 
1 Sing ye to the Lord anew canticle: 
because he hath done wonderful things. 
His right hand hath wrought for him salvation, 
and his arm is holy.
R. All the ends of the earth have seen the saving power of God.

 3cd All the ends of the earth have seen the salvation of our God.
4 Sing joyfully to God, all the earth; make melody, rejoice and sing.
R. All the ends of the earth have seen the saving power of God.

 5 Sing praise to the Lord on the harp, on the harp, and with the voice of a psalm:
6 With long trumpets, and sound of comet. Make a joyful noise before the Lord our king:

R. All the ends of the earth have seen the saving power of God.

 जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
शब्द देह झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली, परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
The Word of God became flesh and dwelt among us. To those who accepted him he gave power to become the children of God.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  योहान १:२९-३४  
वाचक :   योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू."
येशूला आपणाकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हे पाहा, जगाचे पाप हरण करणारे देवाचे कोकरू. माझ्यामागून एक पुरुष येत आहे तो माझ्यापुढे झाला आहे कारण तो माझ्यापूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी म्हणालो, तो हाच आहे. मी त्याला ओळखत नव्हतो, तरी इस्राएलला प्रकट व्हावे म्हणून पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे." आणि योहानने अशी साक्ष दिली की, "आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला ओळखत नव्हतो तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठवले त्याने मला सांगितले होते की, ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणार आहे. मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : John 1: 29-34
The next day, John saw Jesus coming to him, and he saith: Behold the Lamb of God, behold him who taketh away the sin of the world. This is he, of whom I said: After me there cometh a man, who is preferred before me: because he was before me. And I knew him not, but that he may be made manifest in Israel, therefore am I come baptizing with water. And John gave testimony, saying: I saw the Spirit coming down, as a dove from heaven, and he remained upon him. And I knew him not; but he who sent me to baptize with water, said to me: He upon whom thou shalt see the Spirit descending, and remaining upon him, he it is that baptizeth with the Holy Ghost. And I saw, and I gave testimony, that this is the Son of God. 
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: योहान बाप्तिस्टा प्रभू येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देताना त्याच्याकडे पाहून म्हणतो, "हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!" योहान बाप्तिस्टा प्रभू येशूला देवाचा कोकरा म्हणून संबोधितो, कारण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या क्रुसावरील बलिदानाद्वारे आपली पापांपासून सुटका करणार होता. जसे परमेश्वराने कोकऱ्याच्या रक्ताने इस्त्रायली लोकांना इजिप्तमधील गुलामगिरीतून मुक्त केले, तसे प्रभू येशूने आपल्या पापांचेप्रायश्चित्त म्हणून स्वतःला क्रुसावर अर्पण केले व आपणास पापांपासून मुक्त केले, म्हणून तो देवाचा कोकरा आहे. संत योहान बाप्तिस्टाने प्रभू येशू विषयी दिलेली साक्ष खरी आहे, कारण त्याने स्वतः आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि प्रभू येशूवर स्थिर राहिलेला पाहिला आहे. पवित्र आत्मा प्रभूचे खरे स्वरूप प्रकट करतो, म्हणून योहान साक्ष देतो की, प्रभू येशू परमेश्वराचा पुत्र आहे. प्रभू येशू खरोखरच ख्रिस्त आहे, जिवंत देवाचा पुत्र आहे ह्यावर आपला विश्वास आहे का? परमेश्वराचा पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताचे खरे अस्तित्व ओळखण्यासाठी आपणास कृपा देतो. पवित्र आत्म्याच्या कृपेने प्रभू येशूचे खरे अस्तित्व ओळखण्यास आपण पात्र ठरावे, म्हणून पवित्र आत्म्याची कृपा मागू या.

प्रार्थना : प्रभू परमेश्वरा, पापाबद्धल पश्चात्ताप करुन तुझी आज्ञाधारक मुले बनण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
                                                        ✝️      
नवीन वर्षाच्या २०२५  हार्दिक शुभेच्छा  -

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या