Marathi Bible Reading | Saturday 11th January 2025 |

सामान्यकाळातील पहिला सप्ताह 

शनिवार  दि. ११ जानेवारी  २०२५

  ✝️ 

"मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.
A man cannot receive any thing, unless it be given him from heaven.



संत थिओडोसियस
वर्तनसाक्षी (४२३-५२९)


संत थिओडोसिअस ह्यांच्या मठाचे ब्रीदवाक्य होते, “मरणाचा विचार नजरेसमोर असू दया. तुम्ही केव्हाही पाप करणार नाही."

✝️
'मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही.' ह्याचा अर्थ आपली बुध्दीमत्ता, शहाणपण, आपल्याला लाभलेले वैभव, सत्ता, सन्मानाचे पद हे सर्व देवापासून आहे. आपल्या सर्वस्वावर देवाचीच अधिसत्ता आहे. कर्ता करविता तोच प्रभू परमेश्वर आहे. म्हणूनच त्याग, समर्पण, दया आणि परोपकाराची भावना  मनात बाळगून आपण देवाच्या वचनाप्रमाणे जीवन आचरण करण्यास शिकले पाहिजे. देवासमोर सर्वजण समान आहोत.
आपल्यातील खोटा अभिमान तसेच अहंकार व स्वार्थ बाजूला सारुन  आपण प्रभू येशूला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवून खरे ख्रिस्ती जीवन  जगण्यासाठी  वचनाद्वारे प्रेरणा मागू या.

पहिले वाचन  योहानचे पहिले पत्र ५:१४-२१
वाचक :  योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचनपहिले वाचन
त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे, म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले तर त्याने त्याच्याकरिता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल, अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यांना ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही. सर्व प्रकारची अनीती पापच आहे, तरीपण ज्याचा परिणाम मरण नाही असेही पाप आहे.

जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे . जो देवापासून जन्मला तो (ख्रिस्त) त्याला सुरक्षित ठेवतो आणि त्या दुष्टाचा संपर्क त्याला होत नाही. आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे. सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे. आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे आणि तो सत्य आहे. त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्या ठायी, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या ठायी, आपण आहो हाच खरा देव आणि सार्वकालिक जीवन आहे. मुलांनो, तुम्ही स्वत:ला मूर्तीपासून दूर ठेवा.


प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद. 

First Reading :
: First John 5: 14-21
And this is the confidence which we have towards him: That, whatsoever we shall ask according to his will, he heareth us.
 And we know that he heareth us whatsoever we ask: we know that we have the petitions which we request of him. He that knoweth his brother to sin a sin which is not to death, let him ask, and life shall be given to him, who sinneth not to death. There is a sin unto death: for that I say not that any man ask. All iniquity is sin. And there is a sin unto death. We know that whosoever is born of God, sinneth not: but the generation of God preserveth him, and the wicked one toucheth him not. We know that we are of God, and the whole world is seated in wickedness. And we know that the Son of God is come: and he hath given us understanding that we may know the true God, and may be in his true Son. This is the true God and life eternal. Little children, keep yourselves from idols. Amen.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  १४९:१-२ ,३-४,५-६.९

प्रतिसाद :   प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे.

१) एखादे नवीन गीत गाऊन गुणगान करा. त्याच्या भक्तजनांच्या मेळाव्यात त्याचे स्तवन करा. इस्राएलला त्याचा निर्माणकर्ता आनंदित करो. सियोनच्या नागरिकांना त्यांच्या राजामुळे आनंद देवो.

२) नृत्य करीत ते त्याच्या नामाचा महिमा वर्णोत. डफ व वीणा वाजवून त्याची स्तुती गावोत. कारण प्रभू आपल्या लोकांवर प्रसन्न आहे; नम्र जनांना तो विजयाने भूषवितो.

३) भक्तजनांना विजयाचा उन्माद चढो. अंथरूणांवर त्यांना आनंदाने गजर करू द्या. त्यांना मुक्तकंठाने देवाचे स्तवन करू द्या. हे साऱ्या भक्तजनांचे भूषण आहे.


Psalm  149: 1-2, 3-4, 5 and 6a and 9b
R. (4a) The Lord takes delight in his people.

1 Sing ye to the Lord a new canticle: 
let his praise be in the church of the saints.
2 Let Israel rejoice in him that made him: 
and let the children of Sion be joyful in their king.
R. The Lord takes delight in his people.

3 Let them praise his name in choir: 
let them sing to him with the timbrel and the psaltery.
4 For the Lord is well pleased with his people: 
and he will exalt the meek unto salvation.
R. The Lord takes delight in his people.

5 The saints shall rejoice in glory:
 they shall be joyful in their beds.
6a The high praise of God shall be in their mouth.
9b This glory is to all his saints. Alleluia.
R. The Lord takes delight in his people.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
यहुदियांना प्रकट झालेल्या ख्रिस्ताचा गौरव असो, 
जगात ज्यावर विश्वास ठेवला गेला त्या ख्रिस्ताचा गौरव असो.
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
 The people who sit in darkness have seen a great light, on those dwelling in a land overshadowed by death light has arisen.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  योहान ३:२२-३०

वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

    येशू आणि त्याचे शिष्य यहुदा प्रांतात आले आणि तेथे त्यांच्याबरोबर राहून तो बाप्तिस्मा करीत होता. योहानही शालिमाजवळचे एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता, कारण तेथे पाणी मुबलक होते. आणि लोक येऊन बाप्तिस्मा घेत असत, कारण योहान तोपर्यंत कैदेत पडला नव्हता.

मग योहानच्या शिष्यांचा एका यहुद्याबरोबर शुद्धीकरणाविषयी वादविवाद झाला. ते योहानकडे येऊन त्याला म्हणाले, "गुरुजी, पाहा, यार्देनच्या पलीकडे जो आपल्याबरोबर होता, ज्याच्याविषयी आपण साक्ष दिली आहे तो बाप्तिस्मा करतो आणि सर्व लोक त्याच्याकडे जातात." योहानने उत्तर दिले, "मनुष्याला स्वर्गातून दिल्यावाचून काहीच मिळू शकत नाही. मी ख्रिस्त नव्हे तर त्याच्यापुढे पाठवलेला आहे असे मी म्हणालो होतो, ह्याविषयी तुम्हीच माझे साक्षी आहा. वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे. त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास  व्हावा हे अवश्य आहे."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading:
 John 3: 22-30
 After these things Jesus and his disciples came into the land of Judea: and there he abode with them, and baptized. And John also was baptizing in Ennon near Salim; because there was much water there; and they came and were baptized. For John was not yet cast into prison. And there arose a question between some of John’s disciples and the Jews concerning purification: And they came to John, and said to him: Rabbi, he that was with thee beyond the Jordan, to whom thou gavest testimony, behold he baptizeth, and all men come to him. John answered, and said: A man cannot receive any thing, unless it be given him from heaven. You yourselves do bear me witness, that I said, I am not Christ, but that I am sent before him. He that hath the bride, is the bridegroom: but the friend of the bridegroom, who standeth and heareth him, rejoiceth with joy because of the bridegroom’s voice. This my joy therefore is fulfilled. He must increase, but I must decrease.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
जगामध्ये परमेश्वराचा पुत्र आला आहे आणि प्रभू येशू सत्य आहे. त्याला ओळखण्याची बुद्धी त्याने आपणांस दिली आहे. संत योहान बॅप्टीस्टा हेच सत्य आपल्या शिष्यांना सांगताना त्यांना प्रभू येशूची खरी ओळख करून देतो. सर्व लोक येशूकडे जात होते, म्हणून योहान बॅप्टीस्टाच्या शिष्यांना वाईट वाटले; परंतु योहान बॅप्टीस्टा त्यांना समजावून सांगताना म्हणतो, येशू वधूचा 'वर' आहे आणि त्याचे बोलणे जो ऐकतो तो 'वराचा मित्र' आहे. यहुदी समाजातील लग्नसोहळ्यामध्ये वराच्या मित्राकडे कामाची व्यवस्था पाहण्याची मोठी जबाबदारी असायची. त्याचप्रमाणे संत योहान बॅप्टीस्टा प्रभू येशू 'वर' त्याचा मित्र म्हणून प्रभू येशूला प्रकट करण्याची आपली जबाबदारी पार पाडतो आणि सांगतो, प्रभू येशूची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा, हे अवश्य आहे आणि त्यामध्येच योहान बॅप्टीस्टाचा आनंद पूर्ण झाला आहे. संत योहान बॅप्टीस्टा ख्रिस्तसभेचा सभासद आहे आणि त्याला ठाऊक आहे की, प्रभू येशू 'वर' आहे आणि ख्रिस्तसभा त्याची 'वधू' आहे. योहान बॅप्टीस्टाप्रमाणे आपल्या जीवनातील प्रभू येशूचे महत्त्वाचे स्थान ओळखून आपणदेखील प्रभू येशू वराचे - मित्र बनावे आणि प्रभू येशूला प्रकट करण्याचे कार्य करावे.

प्रार्थना :प्रभो, परमेश्वरा, मला लाभलेल्या सर्व कृपादानाबद्दल तुझे मनापासून आभारगीत गाण्यास मला प्रेरणा दे, आमेन.

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या