Marathi Bible Reading | Sunday 12th January 2025| Baptism of The Lord

 प्रभूच्या स्नानसंस्काराचा सण 

रविवार  दि.१२ जानेवारी  २०२५-

"हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे."
Thou art my beloved Son; in thee I am well pleased. 


प्रभूच्या स्नानसंस्काराचा सण 

ख्रिस्तसभा आज प्रभू येशूचा बाप्तिस्मा सोहळा साजरा करीत आहे. प्रभू येशूच्या बाप्तिस्मा बरोबरच नाताळ पर्व संपून सामान्य काळाला सुरुवात होते. आजच्या प्रभूच्या बाप्तिस्माद्वारे प्रभू येशू देवाचा पुत्र व अखिल मानवजातीचा तारणारा असल्याचे खुद्द परमेश्वराने प्रकट केले आहे. 
आपल्या सर्वांचा बाप्तिस्मा परमेश्वर  ! पिता, प्रभू येशू ख्रिस्त व पवित्र आत्मा ह्यांच्या नावाने झालेला आहे. पवित्र  त्रैक्याद्वारेच आपल्या सर्वांचे तारण केले आहे. आपल्या सर्वांना नवजीवनाचा पवित्र आत्मा मिळाला आहे. आपणसुद्धा देवपित्याची प्रिय मुले बनलो आहोत. 
प्रभू येशूच्या बाप्तिस्म्याचा सोहळा आपल्या सर्वांना आपल्या बाप्तिस्म्याची आठवण करुन देत आहे.ख्रिस्तात मुळावलेले असे पवित्र व  परोपकारी जीवन जगण्यास प्रेरणा लाभावी म्हणून आज अंतर्मूख बनून आपल्या जीवनावर चिंतन करुया.

पहिले वाचन यशया  ४२:१-४,६-७
वाचक :यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“पाहा, हा माझा सेवक आहे. त्याच्याविषयी माझा आत्मा संतुष्ट आहे."

प्रभू म्हणतो, “पाहा हा माझा सेवक याला मी आधार आहे. पाहा, हा माझा निवडलेला, याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. याच्याठायी मी आपला आत्मा घातला आहे. तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल. तो गवगवा करणार नाही. तो आपला स्वर उंच करणार नाही. तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझवणार नाही. तो प्रामाणिकपणे न्याय प्रस्थापित करील. पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही व भंगणार नाही. द्वीपे त्याच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करतात.

मी परमेश्वर आहे. मी न्यायानुसार तुला बोलावले आहे. तुझा हात धरला आहे. तुला राखले आहे. तू लोकांना मी करार व राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन. आंधळ्याचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून बंदिवानांना व अंधारात बसलेल्यांना कारागृहातून बाहेर काढावे म्हणून मी असे करीन."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :: Isaiah 42: 1-4, 6-7 or Isaiah 40: 1-5, 9-11
Behold my servant, I will uphold him: my elect, my soul delighteth in him: I have given my spirit upon him, he shall bring forth judgment to the Gentiles. He shall not cry, nor have respect to person, neither shall his voice be heard abroad. The bruised reed he shall not break, and smoking flax he shall not quench: he shall bring forth judgment unto truth. He shall not be sad, nor troublesome, till he set judgment in the earth: and the islands shall wait for his law.
 I the Lord have called thee in justice, and taken thee by the hand, and preserved thee. And I have given thee for a covenant of the people, for a light of the Gentiles: That thou mightest open the eyes of the blind, and bring forth the prisoner out of prison, and them that sit in darkness out of the prison house.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  २८:१-४, ९-१०

प्रतिसाद : परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देईल.

१) अहो देवपुत्रांनो, परमेश्वराला श्रेय द्या.
 परमेश्वराला गौरव व सामर्थ्य यांचे श्रेय द्या. 
परमेश्वराला त्याच्या वैभवी नामाचे श्रेय द्या. 
पावित्र्याने युक्त होऊन त्याची आराधना करा.

२) परमेश्वराचा ध्वनी जलामधून उठत आहे. 
रमेश्वर जलाशयावर आहे. परमेश्वराचा ध्वनी प्रबल आहे. 
परमेश्वराचा ध्वनी प्रतापमय आहे.

३ )वैभवशाली परमेश्वर गर्जना करतो.
त्याच्या मंदिरात महिमा ! असे ते म्हणतात. 
परमेश्वर जलप्रलयावर आरूढ होतो. 
परमेश्वर राजासनावर सर्वकाळ बसलेला आहे.


Psalm: 
Psalms 104: 1b-2, 3-4, 24-25, 27-28, 29-30
R. (1) O bless the Lord, my soul.

1 O Lord my God, thou art exceedingly great. 
Thou hast put on praise and beauty:
2 And art clothed with light as with a garment. 
Who stretchest out the heaven like a pavilion:
R. O bless the Lord, my soul.

3 Who coverest the higher rooms thereof with water. 
Who makest the clouds thy chariot: 
who walkest upon the wings of the winds.
4 Who makest thy angels spirits: 
and thy ministers a burning fire.
R. O bless the Lord, my soul.

24 How great are thy works, O Lord? 
thou hast made all things in wisdom:
the earth is filled with thy riches.
25 So is this great sea, which stretcheth wide its arms: 
there are creeping things without number:
Creatures little and great.
R. O bless the Lord, my soul.

27 All expect of thee that thou give them food in season.
28 What thou givest to them they shall gather up: 
when thou openest thy hand, they shall all be filled with good.
R. O bless the Lord, my soul.

29 But if thou turnest away thy face, they shall be troubled: 
thou shalt take away their breath, 
and they shall fail, and shall return to their dust.
30 Thou shalt send forth thy spirit, 
and they shall be created: 
and thou shalt renew the face of the earth.
R. O bless the Lord, my soul.

दुसरे वाचन : प्रेषितांची कृत्ये : १०:३४-३८
वाचक : प्रेषितांची कृत्ये यातून घेतलेले वाचन 

पेत्रने बोलण्यास आरंभ केला आणि तो म्हणाला, "देव पक्षपाती नाही, हे माझ्या पक्के ध्यानात आहे. तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. येशू ख्रिस्ताच्या (तोच सर्वांचा प्रभू आहे) द्वारे देवाने शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले जे वचन इसरायलच्या संततीस पाठवले ते हे. योहानने जो बाप्तिस्मा गाजवला त्यानंतर गालिलपासून प्रारंभ होऊन सर्व यहुदियामध्ये घडलेली गोष्ट तुम्हांला तर माहीत आहे. नाझरेथकर येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला. तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला. कारण देव त्याच्याबरोबर होता."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading:
Acts 10:34–38

34 So Peter opened his mouth and said: “Truly I understand that fGod gshows no partiality, 35 but fin every nation anyone who fears him and hdoes what is right is acceptable to him. 36 As for ithe word that he sent to Israel, jpreaching good news of kpeace through Jesus Christ (lhe is Lord of all), 37 you yourselves know what happened throughout all Judea, mbeginning nfrom Galilee after the baptism that John proclaimed: 38 how oGod anointed Jesus of Nazareth pwith the Holy Spirit and with qpower. He went about doing good and healing all rwho were oppressed by the devil, sfor God was with him

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
मेघातून अशी वाणी झाली की, "हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका.”
  आलेलुया!
Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
2 We saw his star at its rising and have come to do him homage.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  लूक ३:१५-१६,२१-२२
वाचक :  लूक लिखितपवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन  "
लोक वाट पाहत असत व हाच ख्रिस्त असेल काय असा सर्वजण योहानविषयी आपल्या मनात विचार करीत असत आणि योहान त्या सर्वांना सांगत असे, “मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु जो माझ्यापेक्षा अधिक समर्थ आहे, ज्याच्या पायतणांचा बंद सोडावयास मी योग्य नाही, तो येत आहे. तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करील."
सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला. येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले, पवित्र आत्मा कबुतराच्या रूपात त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी ऐकू आली, "तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Luke 3: 15-16, 21-22
And as the people were of opinion, and all were thinking in their hearts of John, that perhaps he might be the Christ; John answered, saying unto all: I indeed baptize you with water; but there shall come one mightier than I, the latchet of whose shoes I am not worthy to loose: he shall baptize you with the Holy Ghost, and with fire: Now it came to pass, when all the people were baptized, that Jesus also being baptized and praying, heaven was opened; And the Holy Ghost descended in a bodily shape, as a dove upon him; and a voice came from heaven: Thou art my beloved Son; in thee I am well pleased. 
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .


चिंतन: 
आज आपण 'प्रभू येशूचा बाप्तिस्मा' हा सण साजरा करीत आहोत. बाप्तिस्मा साक्रामेंताविषयी आपल्या मनात कोणती भावना आहे? आपल्या बाप्तिस्मा साक्रामेंताबद्दल आपण सिरीयस असतो का? की तो लहानपणी विस्मरणात जमा झालेला विधी म्हणून आपल्याला वाटते? नुकत्याच संपन्न झालेल्या सिनडच्या अंतिम संदेशामध्ये ठळकपणे अधोरेखित करण्यात आले आहे की, कोणत्याही काळी सर्व ख्रिस्ती व्यक्तीची अत्युच्च प्रतिष्ठा बाप्तिस्मा आहे, कारण बाप्तिस्मा साक्रामेंत आपणांस देवाची मुले होण्याचा अधिकार प्राप्त करून देते. आज प्रभू येशूच्या बाप्तिस्म्याचा सण साजरा करीत असताना ख्रिस्तसभा आपणांस सांगते की, प्रभू येशूच्या जीवनात त्याचा बाप्तिस्मा हा अत्यंत महत्त्वाचा आणि विलक्षण असा टप्पा होता, त्यामुळे पुढे येणाऱ्या मोहावर विजय मिळविण्यासाठी व दुःखसहनाला आणि मरणाला सामोरे जाण्यास प्रभू येशूला पित्याचे आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त झाले. प्रभू येशूच्या बाप्तिस्म्यामध्ये आपल्या बाप्तिस्म्याचेसुद्धा रहस्य दडलेले आहे आणि योहान बॅप्टीस्टा साक्ष देतो की, प्रभू येशूच पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा करणारा आहे. बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे आपण थेट त्रैक्य परमेश्वराच्या जीवनात प्रवेश करतो आणि त्याची मुले बनून आपण परमेश्वराला आपला पिता म्हणून संबोधितो. आपल्या जीवनात आपण बाप्तिस्मा साक्रामेंताचे महत्त्व ओळखावे म्हणून ख्रिस्तसभा आज आपणांस आपल्या बाप्तिस्म्याच्या कृपेची आठवण करून देते व आपण बाप्तिस्म्याची कृपा दररोज जगत राहावी म्हणून आवाहन करते.

प्रार्थना :  हे प्रभू परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याने मला भरुन टाक तसेच सर्व बंधनातून आणि तुझी सुवार्ता पसरविण्यास प्रेरणा दे, आमेन..

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या