Marathi Bible Reading | Monday 13th January 2025| 1st Week in Ordinary Time

सामान्यकाळातील पहिला सप्ताह 

सोमवार  दि. १३ जानेवारी  २०२५

  ✝️ 

“माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन."
 Come after me, and I will make you to become fishers of men.


पोयतिअर्सचे संत हिलरी
महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपाल, धर्मपंडित (३१५-३६७)

चिंतन : दुष्प्रवृत्तीचे अनावश्यक आकर्षण टाळून ज्या व्यक्ती लहान बालकासमान साधेपणाचे जीवन जगतात त्यांनाच देवाच्या राज्यात प्रवेश मिळतो. - संत हिलरी
✝️

देवपुत्र ह्या जगात आला आणि त्याने स्वतः सुवार्ता प्रचाराला सुरुवात केली. परमेश्वर पित्याची अनादी कालापासूनची मानवाच्या तारणाची योजना  प्रभूयेशू ख्रिस्ताद्वारे पूर्ण झाली.  प्रभू येशूच्या  येण्याने नवजीवनाची सुरुवात झाली.  देवराज्यात जाण्यासाठी आपण आपले पापी जीवन शुद्ध बनविणे गरजेचे आहे. देवाविरुद्ध आणि आपल्या बंधु-भगिनी विरूद्ध केलेल्या सर्व अपराधांबद्धल पश्चाताप करण्याचे आवाहन प्रभू येशूने केले आहे. आपण शुद्ध व निर्मळ बनण्यासाठी योग्य  पावले उचलणार आहोत .    त्याच्या स्वर्गीय राज्याची सुवार्ता पूर्णपणे प्रीतिभोजनात दृश्यपणे सामावलेली आहे.  'देव पुत्र जगात आला, त्यांने आम्हावर प्रीति केली आणि पित्याचा आज्ञेप्रमाणे यज्ञबळी समर्पित केला'. आपण प्रभू वर पूर्ण विश्वास ठेवून त्याला शरण जाऊ या.

पहिले वाचन इब्री  १:१-६
वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन १:१-६
देव प्राचीन काळी अंशाअंशानी आणि प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्या द्वारे पूर्वजांशी बोलला. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हा पुत्र त्याच्या गौरवाचे तेज आणि त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. ज्या मानाने त्याला वारसाने देवदूतांपेक्षा श्रेष्ठ नाव मिळाले आहे त्या मानाने तो त्यांच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले :"तू माझा पुत्र आहेस,आज मी तुला जन्म दिला आहे ?"आणि पुन्हा
"मी त्याला पिता असा होईन आणि तो मला पुत्र असा होईल ?"
आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो तेव्हा तो म्हणतो:  "देवाचे सर्व
दूत त्याला नमन करोत."
प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद. 

First Reading :
: Hebrews 1: 1-6
    God, who, at sundry times and in divers manners, spoke in times past to the fathers by the prophets, last of all, In these days hath spoken to us by his Son, whom he hath appointed heir of all things, by whom also he made the world. Who being the brightness of his glory, and the figure of his substance, and upholding all things by the word of his power, making purgation of sins, sitteth on the right hand of the majesty on high. Being made so much better than the angels, as he hath inherited a more excellent name than they. For to which of the angels hath he said at any time, Thou art my Son, today have I begotten thee? And again, I will be to him a Father, and he shall be to me a Son? And again, when he bringeth in the first begotten into the world, he saith: And let all the angels of God adore him.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  ९७:१-२,६,७,९
प्रतिसाद :  सर्व दैवतांनो, प्रभूलाच नमन करा, 
१) प्रभू राज्य करतो, पृथ्वी जयघोष करो; 
बेटांच्या समुदायांना आनंद होतो. 
मेघ आणि अंधकार त्याच्या सभोवती आहेत, 
त्याचे सिंहासन न्यायनीतीवर आधारलेले आहे.

२) आकाश त्याची न्यायपरायणता जाहीर करते, 
सारी मानवजात त्याचे ऐश्वर्य पाहते. सर्व दैवतांनो, त्यालाच नमन करा.

३)  कारण हे प्रभो, तूच साऱ्या भूतलावर परमश्रेष्ठ आहेस.
 सर्व दैवतांहून तू थोर आहेस.

 Psalms 97: 1 and 2b, 6 and 7c, 9
R. (7c) Let all his angels worship him.

1 The Lord hath reigned, let the earth rejoice: 
let many islands be glad.
2b Justice and judgment are the establishment of his throne.
R. Let all his angels worship him.

6 The heavens declared his justice: and all people saw his glory.
7c Adore him, all you his angels:
R. Let all his angels worship him.

9 For thou art the most high Lord over all the earth: 
thou art exalted exceedingly above all gods.
R. Let all his angels worship him.


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे: 
सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. आलेलुया!
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
 The Kingdom of God is at hand; repent and believe in the Gospel.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  मार्क १: १४-२०
वाचक :   मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
   शुभवर्तमानातून घेतलेले वाचन १:१४-२०
   योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाचे शुभवर्तमान प्रकट करीत गालिलात आला आणि म्हणाला, "काळाची पूर्णता झाली आहे आणि देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा आणि शुभवर्तमानावर विश्वास ठेवा." नंतर गालिल समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते आणि येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन." मग ते लागलेच जाळी सोडून त्याला अनुसरले. तेथून काहीसे पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळी नीट करताना दिसले आणि त्याने त्यांना लागलेच बोलावले. मग ते आपला बाप जब्दी ह्याला भाडोत्री चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्यामागे गेले.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading:
 Mark 1: 14-20
And after that John was delivered up, Jesus came into Galilee, preaching the gospel of the kingdom of God,
And saying: The time is accomplished, and the kingdom of God is at hand: repent, and believe the gospel. And passing by the sea of Galilee, he saw Simon and Andrew his brother, casting nets into the sea (for they were fishermen). And Jesus said to them: Come after me, and I will make you to become fishers of men. And immediately leaving their nets, they followed him. And going on from thence a little farther, he saw James the son of Zebedee, and John his brother, who also were mending their nets in the ship: And forthwith he called them. And leaving their father Zebedee in the ship with his hired men, they followed him.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
प्रभू येशू आपल्या प्रेषित कार्याला सुरुवात करताना लोकांना आवाहन करतो की, "काळाची पूर्णता झाली आहे आणि देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि शुभवर्तमानावर विश्वास ठेवा.” आपणांस प्रभू येशू दोन गोष्टी करण्यासाठी सांगतो, प्रथम पापांबद्दल पश्चात्ताप करा आणि त्याने घोषित केलेल्या शुभवर्तमानावर विश्वास ठेवा. प्रभू येशूचे हे प्रेषितकार्य अखंडितपणे ख्रिस्तसभेमध्ये चालू आहे. प्रभू येशूचे प्रेषितकार्य पुढे चालूठेवण्यासाठी त्याने प्रथम शिष्यांना पाचारण केले आणि सर्वकाही सोडून ते शिष्य प्रभू येशूच्या मागे गेले. जेव्हा परमेश्वर आपणांस कोणत्या परोपकारी कार्यासाठी बोलावतो तेव्हा आपण त्याच्या पाचारणाला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. ख्रिस्ती व्यक्तीने त्याचे परोपकारी पाचारण काय आहे, हे ओळखले पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये जे काही करतो, ते प्रभू येशूच्या पाचारणाच्या प्रकाशामध्ये करावे. प्रभू येशूच्या शिष्यांप्रमाणे आपण प्रभू येशूच्या पाचारणाला होकार देण्यास तयार आहोत का?

प्रार्थना : हे प्रभू येशू, देवराज्याचे सहभागीदार बनण्यास आम्हाला पात्र बनव, आमेन.

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या