सामान्यकाळातील पहिला सप्ताह
मंगळवार दि. १४ जानेवारी २०२५
✝️
तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच."
I know who thou art, the Holy One of God.
धन्यवादीत देवसहायम् पिल्लय
रक्तसाक्षी
(२३ एप्रील १७१२ - १४ जानेवारी १७५२)
पोप फ्रान्सिस हे देवसाय पिल्लई ह्यांना १५ मे २०२२ रोजी संत म्हणून घोषित करतील
देवसहायम् पिल्लय (जन्माच्या वेळचे मूळ नाव निळकंठ पिल्लय) ह्यांचा जन्म एका श्रिमंत नायर समाजातील कुटूंबात नत्तालम् ह्या सध्याच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील ठिकाणी २३ एप्रील १७१२ रोजी झाला होता. नायर समाजातील तत्कालीन मातृसत्ताक परंपरेत देवसहायम् पिल्लय ह्यांची जडनघडन त्यांच्या मामांनी केली, आणि लवकरच त्यांना हिंदू श्रद्धा व परंपरा ह्यांचेही ज्ञान झाले.
देवसहायम् ह्यांच्या कुटूंबावर त्रवणकोरचे राजे महाराजा मारतंड वर्मा ह्यांच्या शाही महालाचा प्रभाव होता, आणि देवसहायम् तरुणपणी महालात सेवेसाठी रुजू झाले. त्यांच्या क्षमता व उत्साह महालात दुर्लक्षीत राहिला नाही, त्यामुळे लवकरच त्यांना त्रवणकोरचे दिवण रामायन दलावा ह्यांच्या अधिकाराखाली राज्यातील घडामोडींचे अधिकृत प्रमूख म्हणून नेमण्यात आले.
ख्रिस्ती श्रद्धेत परिवर्तन:
१७४१ मध्ये एड डच नौदल कमांडर कॅप्टन युस्टाचीयस डी लॅनॉय ह्यांना डच इंस्ट इंडिया कंपनी मार्फत त्रवणकोरच्या अखत्यारीत असलेल्या कोलाचेल ह्या बंदरावर नौदलाच्या एका मोहिमेसाठी पाठवण्यात आले होते. त्रवणकोरचे सैन्य आणि डि लॅनॉय ह्यांची माणसे ह्यांच्यात झालेल्या लढाईत डच सैन्यांची हार झाली आणि त्यांची अनेक माणसे मारली गेली व अनेक कैद करण्यात आली. युस्टाचियस डी लॅनॉय, त्याचा साथीदार डोनाडी आणि आणखी काही डच सैनीक कैदेत ठेवण्यात आले.
डी लॅनॉय व त्याच्या सैनिकांना नंतर राजाकडून ह्या अटीवर अभय मिळाले की ते त्रवणकोरच्या लष्करात सेवा देतील. डी लॅनॉय नंतर अनेक लढाया जिंकून व अनेक शेजारील राज्ये त्रवणकोरला मिळवून देऊन राजाची मर्जी संपादन करून त्रवणकोर लष्करात कंमांडर बनला.
राजाच्या मर्जीत असतानात डी लॅनॉय आणि देवसहायम् पिल्लय ह्यांचा चांगला परिचय झाला. डी लॅनॉयच्या ख्रिस्ती श्रद्धेत देवसहायम् ह्यांना रसवाटू लागला आणि डी लॅनॉय कडून त्यांच्या मनात ही श्रद्धेची ज्योत प्रज्वलीत केली ज्याचे पर्यावसन १७४५ सालच्या त्यांच्या धर्मपरिवर्तनात झाले.
स्नानसंस्कार: ख्रिस्ती श्रद्धेचा स्विकार करून देवसहायम ह्यांनी वडक्कनकुलम गावातील(आताच्या तमीलनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यातील) रोमन कॅथोलीक लॅटीन राईट चर्च मध्ये बाप्तीस्मा घेतला, जिथे येशुसंघीय धर्मगुरू मठ चालवीत असत. निळकंठ पिल्लय हे त्यांचे जन्माच्या वेळचे नाव त्यावेळी बदलून लाझर ठेवण्यात आले तरी ते त्यांच्या नावाच्या तमीळ व मल्याळम भाषांतराने बनणारे देवसहायम ह्या नावानेच सगळीकडे सुपरिचीत आहेत(ज्याचा अर्थ होतो देवाचे सहाय). तोपर्यंत त्यांचा विवाह त्रवणकोर मधील भार्गवी अम्मल ह्यांच्याशी झाला होता. पतीकडून त्यांचेही पुढे मनपरिवर्तन होऊन त्यांनीही ख्रिस्ती श्रद्घा स्विकारली. त्यांना बाप्तीसम्याच्या वेळी ग्नानापू अम्मल(ज्याचे तमीळ व मल्याळम भाषांतर तेरेसा असे होते) हे नाव देण्यात आले होते. धर्मांतरामुळे त्यांच्या गावात त्यांच्या विरुद्घ उठलेल्या रोशाच्या भीतिने तिने त्या गावचे विस्थापीत नागरीक म्हणून राहणे पसंत केले. देवसहायमच्या कुटुंबियांनीही नंतर बाप्तीसमा स्विकारला.
चर्च इतिहासकार सांगतात की, राज्यातील ब्राहामण मुख्य पुरोहीत, सामंत स्वामी, राजघराण्याचे सदस्य आणि नायर समाजाने दिवान रामायन देलावा ह्यांच्यासमोर देवसहायमवर चुकीचे आरोप केले. देवसहायम ह्यांना त्यांच्या सेवेतून पदच्यूत करण्यात आले आणि त्यांच्यावर राजद्रोह केल्याचा व राज्याची गुपिते प्रतिस्पर्धी युरोपीयन ह्यांच्यासमोर फोडल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना नंतर अटक करण्यात आली व तीन वर्षे त्यांचा छळ करण्यात आला.
नीलकंठ पिल्लई यांचा जन्म २३ एप्रिल १७१२ मध्ये त्रावणकोर राज्यातील एका हिंदू कुटुंबात झाला. ते त्रावणकोरचे महाराज मार्तंड वर्मा यांच्या दरबारात अधिकारी म्हणून कार्य करत होते. सदरच्या काळात त्यांची ओळख डच नाविक कॅप्टन युस्टाशिअस डे लेनाॅय यांच्याशी झाली. कॅप्टननी निलकंठ ह्यांना कॅथोलिक विश्वासाची ओळख दिली व ख्रिस्ती श्रद्धेत मार्गदर्शन केले. बाप्तिस्माच्या वेळी त्यांनी देवसहाय्यम (लाजरस) हे नाव घेतले. त्यांनी आपला कॅथोलिक विश्वास जाहीर केल्यामुळे त्रावणकोर राज्यात त्यांना रक्तसाक्षी म्हणून मरण आले इसवी सन 2004 मध्ये कोट्टर डायोसिस, तामिळनाडू विशपांची काउंसिल व भारतीय कॅथोलिक बिशपांची परिषद यांनी देवसहाय्यम पिल्लई यांच्या धन्यवादिपणाची प्रक्रिया सुरू करण्याविषयी वॅटिकनला विनंती केली. 28 जून 2012 रोजी पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी संती करण्याची प्रक्रिया पाहणाऱ्या संघटनेला/ समितीला देवसहाय्यम पिल्लई यांना आशीर्वादित रक्तसाक्षी म्हणून त्याविषयी योग्य कार्यवाही करण्याविषयी सूचना केली. 2 डिसेंबर 2012 रोजी दक्षिण भारतातील कॉटर कॅथलिक डायलिसिस मधील नागरकोईल येथे देव सहायम पिल्लई यांचं धन्यवादितपणाचा व रक्तसाक्षी म्हणून बहुमान करण्याचा विधी पोपचसाहेबांचे प्रतिनिधी कार्डिनल अांजेलो अमातो यांच्या पौरोहित्याखाली पार पडला. देवसहाय्यम हे पहिले भारतीय प्रापंचिक आहेत ज्यांना धन्यवादित घोषित करण्यात आले आहे. आणि कॅथोलिक कॅनल लाॅ च्या अनुषंगाने त्यांचं संतीकरणाच प्रक्रिया ही फक्त एक पाऊल अजून बाकी आहे. २१ फेब्रुवारी २०२० रोजी पोप फ्रान्सिस ह्यांनी देवसहाय्यम यांच्या मध्यस्थीने झालेल्या चमत्काराला अधिकृत मान्यता दिली. आणि त्यांच्या संती करणाची प्रक्रिया पुढे चालवावी असे सांगितले
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहो ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे :
"मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावी? अथवा मानवपुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावे? तू त्याला देवदूतांपेक्षा किंचितकाल कनिष्ठ केले आहे, तू त्याला गौरव आणि थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहे, तू सर्व काही त्याच्या अधीन-त्याच्या पायांखाली ठेवले आहे.'
सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे, म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाही. परंतु सर्व काही त्याच्या अधीन ठेवले आहे असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचितकाल कनिष्ठ केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव आणि थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केलेला असा आपण पाहतो.
कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे आणि ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो प्रवर्तक त्याला दु:खसहनाद्वारे त्याने परिपूर्ण करावे हे उचित होते. कारण जो पवित्र करणारा आणि ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत; ह्या कारणास्तव त्यांना बंधू म्हणावयाची त्याला लाज वाटत नाही. तो म्हणतो, "मी आपल्या बंधूजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, महामंडळात तुझे स्तवन करीन."
प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
: Hebrews 2: 5-12
For God hath not subjected unto angels the world to come, whereof we speak. But one in a certain place hath testified, saying: What is man, that thou art mindful of him: or the son of man, that thou visitest him? Thou hast made him a little lower than the angels: thou hast crowned him with glory and honour, and hast set him over the works of thy hands: Thou hast subjected all things under his feet. For in that he hath subjected all things to him, he left nothing not subject to him. But now we see not as yet all things subject to him. But we see Jesus, who was made a little lower than the angels, for the suffering of death, crowned with glory and honour: that, through the grace of God, he might taste death for all. For it became him, for whom are all things, and by whom are all things, who had brought many children into glory, to perfect the author of their salvation, by his passion. For both he that sanctifieth, and they who are sanctified, are all of one. For which cause he is not ashamed to call them brethren, saying: I will declare thy name to my brethren; in the midst of the church will I praise thee.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद ८:२,५-९
प्रतिसाद :प्रभो, आपल्या हातच्या कलाकृतींवर तू तुझ्या पुत्राला स्वामित्व दिले आहेस.
१) हे प्रभो, आमच्या परमेश्वरा,
साऱ्या भूतलावर तुझे नाम कितीतरी थोर आहे!
तू मर्त्य मानवाची आठवण करावी,
क्षुद्र मानवजातीची तू पर्वा करावी, असा तो कोण?
२) तरीपण देवापेक्षा तू त्याला किंचित कनिष्ठ केले आहेस;
त्याला वैभव आणि मोठेपणा ह्यांनी अलंकृत केले आहेस,
आपल्या हातच्या कलाकृतीवर तू त्याला स्वामित्व दिले आहेस,
सारे काही त्याच्या चरणांपाशी ठेवले आहेस.
३) शेरडेमेंढरे, गुरे ढोरे, अगदी एकूणएक जंगली जनावरे,
आकाशातली पाखरे, समुद्रातले मासे,
सागरात संचार करणारे प्राणी देखील
तू त्याच्या चरणापाशी ठेवले आहेत.
Psalms 8: 2ab and 5, 6-7, 8-9
R. (7) You have given your Son rule over the works of your hands.
2 O Lord our Lord, how admirable is thy name
in the whole earth!
5 What is man that thou art mindful of him? or
the son of man that thou visitest him?
R. You have given your Son rule over the works of your hands.
6 Thou hast made him a little less than the angels,
thou hast crowned him with glory and honour:
7 And hast set him over the works of thy hands.
R. You have given your Son rule over the works of your hands.
8 Thou hast subjected all things under his feet,
all sheep and oxen: moreover the beasts also of the fields.
9 The birds of the air, and the fishes of the sea,
that pass through the paths of the sea.
R. You have given your Son rule over the works of your hands.
आलेलुया, आलेलुया!
माझ्या प्रभो, तुझा मार्ग मला दाखव, तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव.
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Receive the word of God, not as the word of men, but as it truly is, the word of God.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क १: २१-२८
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू आणि त्याचे शिष्य कफर्नाहुमस गेले आणि लागलेच त्याने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीवरून लोक थक्क झाले, कारण तो त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवीत होता. त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो ओरडून म्हणाला "हे येशू नाझरेथकरा तू आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करावयास आलास काय ? तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूच." परंतु येशूने त्याला धमकावून म्हटले, "गप्प राहा आणि ह्याच्यातून नीघ , तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला आणि त्याच्यातून निघून गेला. तेव्हा ते सर्व इतके थक्क झाले की ते एकमेकांस विचारू लागले, "हे आहे तरी काय ? काय ही अधिकारयुक्त नवीन शिकवण! हा अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात." ही त्याचा कीर्ती लागलीच गालिलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
Mark 1: 21-28
And they entered into Capharnaum, and forthwith upon the sabbath days going into the synagogue, he taught them. And they were astonished at his doctrine. For he was teaching them as one having power, and not as the scribes. And there was in their synagogue a man with an unclean spirit; and he cried out, Saying: What have we to do with thee, Jesus of Nazareth? art thou come to destroy us? I know who thou art, the Holy One of God. And Jesus threatened him, saying: Speak no more, and go out of the man. And the unclean spirit tearing him, and crying out with a loud voice, went out of him.
And they were all amazed, insomuch that they questioned among themselves, saying: What thing is this? what is this new doctrine? for with power he commandeth even the unclean spirits, and they obey him. And the fame of him was spread forthwith into all the country of Galilee.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
आपली पात्रता नसताना प्रभू येशूने त्याच्या दुःखसहनाद्वारे आणि क्रुसावरील बलिदानाद्वारे आपणांस देवाची मुले आणि स्वतःचे बंधू बनवले, म्हणून आपण विश्वासाने, न घाबरता परमेश्वराजवळ यावे, ही त्याची इच्छा आहे. परमेश्वर त्याच्या मुलांवर प्रेम करणारा आपला प्रेमळ पिता आहे आणि आपल्यालेकरांना प्रेमाने कवटाळण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. आपण परमेश्वराच्या विपुल प्रीतीचा नित्य अनुभव घ्यावा, हीच त्याची इच्छा आहे. परमेश्वर शिक्षा करील म्हणून भयाने आपण परमेश्वराकडे येत नाही, तर त्याच्यावरील विश्वासामुळे आणि प्रीतीमुळे आपण त्याच्याकडे येतो. आजच्या शुभवर्तमानातील अशुद्ध आत्मा हा एक उदाहरण होऊ शकतो की, काही लोक कसे परमेश्वराकडे विश्वासामुळे नव्हे; तर भयामुळे येतात. अशुद्ध आत्मा भीतीमुळे प्रभू येशूला प्रकट करतो की, तो देवाचा पवित्र आहे. आपण भयामुळे नव्हे, तर प्रीतीने प्रभू येशूवर विश्वास ठेवावा. परमेश्वराने आपणांस भीतीचा नव्हे, तर धैर्याचा आत्मा दिला आहे, म्हणून आपल्या जीवनाचा प्रवास हा भीतीचा नव्हे, तर श्रद्धेचा प्रवास असला पाहिजे. आजचे शुभवर्तमान आपल्यासमोर प्रभू येशूचे सामर्थ्य आणि अधिकार प्रकट करते. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या अधिकाराचा आणि सामर्थ्याचा प्रभाव आहे का? परमेश्वराठायी अर्पण केलेले व परोपकारासाठी झिजवलेले जीवन आपणांस विश्वासमय आनंदाचा अनुभव घेण्यास पात्र ठरवते.
प्रार्थना : तुझ्या वचनावर व सामर्थ्यवर अवलंबून विश्वासाने जीवन जगण्यास प्रभू येशू आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या