Marathi Bible Reading | 13th week in ordinary Time| Wednesday 2nd July 2025

सामान्यकाळातील १३ वा सप्ताह 

 बुधावार   दि.२ जुलै   २०२५

 “हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस?

 "What have you to do with us, O Son of God? 



 
संत प्रोसेयुस व मार्टिनिअन
· रक्तसाक्षी (..... १७०)

संत पीटर आणि पौल ह्यांना रोमच्या तुरुंगात टाकण्यात आले त्यावेळी तुरुंगाचे रक्षक म्हणून हे दोघे काम पाहात होते. संत पीटर आणि पौल ह्यांनी तुरुंगातदेखील ख्रिस्ती धर्माची सुवार्ता सांगितली आणि अनेक चमत्कार केले.

त्यांनी प्रभावित होऊन अनेकांनी ख्रिस्ती धर्माचा जाहीर स्वीकार केला. त्यात प्रोसेयुस आणि मार्टिनिअन हे सुद्धा होते. त्यांनी पीटर व पौल ह्यांना तुरूंगातून मुक्त होण्याची संधीदेखील देऊ केली होती. परंतु सत्यनिष्ठ प्रेषितांनी ती सरळसरळ नाकारली. पुढे स्नानसंस्कारासाठी आवश्यक असलेले पाणी त्या तुरूंगातील एका खडकातून अद्भुतरित्या धो धो वाहत राहिले.

तुरुंगाधिकारी पौलीनस ह्यांनी प्रोसेयुस आणि मार्टिनिअन ह्या दोघांना आपल्या नवीनतम श्रद्धेपासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते आपल्या दृढ विश्वासापासून तीळमात्र ढळत नाहीत हे पाहून त्यांचा क्रूर छळ करण्यात आला. त्यांच्या श्रद्धेचा अपमान करण्यासाठी त्यांना ज्युपिटरच्या मूर्तीपुढे धूप देण्यास सांगण्यात आले. त्यालाही त्यांनी साफ नकार दिला. संपूर्ण छळाच्या काळात त्यांच्या मुखी एकच वाक्य होते “परमेश्वर सदैव सुवंदित असो." शेवटी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.


पहिले वाचन : उत्पत्ती  २१:५.८-२० 
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर या दासीचा मुलगा वारस नसावा.
इसहाक झाला तेव्हा आब्राहाम शंभर वर्षाचा होता. तो बाळ मोठा झाला तेव्हा त्याचे दूध तोडले. इसहाकचे दूध तोडले त्या दिवशी आब्राहामने मोठी मेजवानी दिली. हागार मिसरिणीस आब्राहामपासून झालेल्या मुलाला खिदळताना साराने पाहिले. तेव्हा ती आब्राहामला म्हणाली, "या दासीला आणि हिच्या मुलाला घालवून द्या; कारण माझा मुलगा इसहाक याच्याबरोबर या दासीचा मुलगा वारस नसावा.' आब्राहामला आपल्या मुलासंबधी ही गोष्ट फार वाईट वाटली. तेव्हा देव आब्राहामला म्हणाला, “हा मुलगा आणि तुझी दासी यांच्यासंबधी तू वाईट वाटून घेऊ नकोस. सारा तुला जे काही सांगते ते सगळे ऐक, कारण तुझ्या वंशाचे नाव इसहाकच चालवणार. या दासीच्या मुलापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करीन, कारण ते तुझे बीज आहे." नंतर आब्राहामने मोठ्या पहाटेस उठून भाकर आणि पाण्याची कातडी पिशवी आणून हागारेच्या खाद्यांवर ठेवली आणि तिचा मुलगा तिच्या हवाली करून तिला रवाना केली. ती निघून बैरशेबाच्या रानात भटकत राहिली.
कातडी पिशवीतील पाणी संपल्यावर तिने त्या मुलाला एका झुडपाखाली टाकले आणि ती बाणाच्या टप्प्याइतकी दूर जाऊन त्याच्यासमोर बसली; कारण ती म्हणाली, “आपण आपल्या मुलाचा मृत्यू पाहू नये" आणि ती त्याच्यासमोर बसून हंबरडा फोडून रडू लागली. देवाने मुलाची वाणी ऐकली आणि देवाच्या दूताने आकाशातून हाक मारून हागारला म्हटले, “हागारे, तू कष्टी का? भिऊ नकोस, कारण मुलगा आहे तेथून देवाने त्याची वाणी ऐकली आहे. ऊठ मुलाला उचलून आपल्या हाती घट्ट धर; त्याच्यापासून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करीन." मग देवाने तिचे डोळे उघडले आणि पाण्याचा झरा तिच्या दृष्टीस पडला, तेव्हा तिने जाऊन कातडी पिशवीत पाणी भरले आणि मुलास पाजले. देव त्या मुलाचा पाठिराखा झाला आणि तो रानात लहानाचा मोठा होऊन तिरंदाज झाला.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Genesis 21:5, 8-20: 

Abraham was a hundred years old when his son Isaac was born to him. And the child grew and was weaned. And Abraham made a great feast on the day that Isaac was weaned. But Sarah saw the son of Hagar the Egyptian, whom she had borne to Abraham, laughing. So she said to Abraham, "Cast out this slave woman with her son, for the son of this slave woman shall not be heir with my son Isaac." And the thing was very displeasing to Abraham on account of his son. But God said to Abraham, "Be not displeased because of the boy and because of your slave woman. Whatever Sarah says to you, do as she tells you, for through Isaac shall your offspring be named. And will make a nation of the son of the slave woman also, because he is your offspring. So Abraham rose early in the morning and took bread and a skin of water and gave it to Hagar, putting it on her shoulder, along with the child, and sent her away. And she departed and wandered in the wilderness of Beersheba. When the water in the skin was gone, she put the child under one of the bushes. Then she went and sat down opposite him a good way off, about the distance of a bowshot, for she said, "Let me not look on the death of the child." And as she sat opposite him, she lifted up her voice and wept. And God heard the voice of the boy, and the angel of God called to Hagar from heaven and said to her, "What troubles you, Hagar? Fear not, for God has heard the voice of the boy where he is. Up! Lift up the boy, and hold him fast with your hand, for I will make him into a great nation." Then God opened her eyes, and she saw a well of water. And she went and filled the skin with water and gave the boy a drink. And God was with the boy, and he grew up. He lived in the wilderness and became an expert with the bow.
This is the word of God 
Thanks be to God 


प्रतिसाद स्तोत्र   ३४ : ७-८, १०-१३

प्रतिसाद : प्रतिसाद ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला.

१) ह्या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला 
आणि त्याच्या सर्व संकटांतून त्याला सोडवले.
 परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती छावणी देतो 
आणि त्यांचे संरक्षण करतो.

२) परमेश्वराचे पवित्र जनहो, त्याचे भय धरा.
 त्याचे भय धरणाऱ्यांनो काही उणे पडत नाही. 
तरुण सिंहालाही वाण पडते आणि त्यांची उपासमार होते,
 पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही
 चांगल्या वस्तूची वाण पडत नाही.

३) मुलांनो या, माझे ऐका; 
मी तुम्हांला परमेश्वराचे भय धरावयाला शिकवीन 
सुख भोगावे म्हणून जीविताची इच्छा धरणारा 
आणि दीर्घायुष्य अपेक्षिणारा असा मनुष्य कोण ?


Psalm:  Psalm 34:7-8, 10-11, 12-13

R.  This lowly one called; the Lord heard, and rescued him

This lowly one called; the Lord heard, 
and rescued him from all his distress.
The angel of the Lord is encamped
around those who fear him, to rescue them. R

Fear the Lord, you his holy ones. 
They lack nothing, those who fear him
The rich suffer want and go hungry,
but those who seek the Lord lack no blessing.R

Come, children, and hear me, 
that may teach you the fear of the Lord.
Who is it that desires life and longs 
to see prosperous days? R

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे; ते मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे.
  आलेलुया!

Acclamation: 
  Of his own will he brought us forth by the word of truth, that we should be a kind of first fruits of his creatures.


शुभवर्तमान   मत्तय   :२८-३४
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला पीडावयास येथे आला आहेस काय ?"मग येशू पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असताना त्याला भेटले; ते इतके अक्राळविक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हांला पीडावयास येथे आला आहेस काय ?" तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती भुते त्याला विनंती करू लागली की, “तू जर आम्हाला काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे.” त्याने त्यांना म्हटले, “जा." मग ती निघून डुकरात शिरली आणि पाहा, तो कळपच्या कळप कड्यावरून समुद्रात धडक धावत जाऊन पाण्यात बुडून मेला. मग चारणारे पळाले आणि त्यांनी नगरात जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पाहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Matthew 8:28-34

At that time: When Jesus came to the other side of the sea, to the country of the Gadarenes, two demon-possessed men met him, coming out of the tombs, so fierce that no one could pass that way. And behold, they cried out, "What have you to do with us, O Son of God? Have you come here to torment us before the time?" Now a herd of many pigs was feeding at some distance from them. And the demons begged him, saying, "If you cast us out, send us away into the herd of pigs." And he said to them, "Go." So they came out and went into the pigs, and behold, the whole herd rushed down the steep bank into the sea and drowned in the waters. The herdsmen fled, and going into the city they told everything. especially what had happened to the demon-possessed men. And behold, all the city came out to meet Jesus, and when they saw him, they begged him to leave their region,
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: प्रभू येश ख्रिस्त अशुद्ध आत्म्यांस गप्प करतो, शांत करतो, अशुद्धता ही केवळ एक बाह्य कृती नसून अंतःकरणातील भाव आहे. ह्याचाच प्रत्यय आजच्या पहिल्या वाचनात साराच्या वागण्यातून आपल्याला पहायला मिळतो. आपला पुत्र इसाहाक याच्याबरोबर दासीचा मुलगा ईस्माईल ह्याने वाढू नये, त्याच्याबरोबर त्याचे नातेसंबंध असू नये म्हणून साराने आब्राहामास हागेर व तिच्या मुलास दूर पाठविले. अशाप्रकारे सारा आपली अशुद्धता प्रकट करत आहे. आपल्या प्रत्येकाला शुद्ध व्हायची गरज आहे. ज्याप्रमाणे कबरेतील भूतग्रस्ताने शुभवर्तमानात प्रभूकडे शुद्धतेसाठी विनंती केली त्याचप्रमाणे आपणदेखील स्तोत्रकार म्हणतो त्याप्रमाणे प्रभूकडे पवित्र होण्यासाठी धावा करणे गरजेचे आहे. स्तोत्रकार म्हणतो त्याप्रमाणे सर्व संकटांतून आपल्याला सोडविण्यासाठी व आपले रक्षण करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. त्याचे जेव्हा आपण भय धरतो व त्याला शरण येतो, तेव्हा आपणास कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही. परमेश्वर आपल्या पाठीशी आहे, असा अनुभव आपणांस यावा व आपण त्याचे भय धरावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्यावर संपूर्ण विसंबून राहण्यास व सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होण्यास आम्हाला प्रेरणा व सामर्थ्य दे, आमेन..


✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या