First Reading : Acts 10:24-35
In those days: Peter and brothers from Joppa entered Caesarea.
Cornelius was expecting them and had called together his relatives and close friends. When Peter entered, Cornelius met him and fell down at his feet and worshipped him. But Peter lifted him up, saying, "Stand up: I too am a man." And as he talked with him, he went in and found many persons gathered. And he said to them, "You yourselves know how unlawful it is for a Jew to associate with or to visit anyone of another nation, but God has shown me that I should not call any person common or unclean. So when I was sent for, came without objection. I ask then why you sent for me." And Cornelius said, "Four days ago, about this hour, I was praying in my house at the ninth hour, and behold, a man stood before me in bright clothing and said, 'Cornelius, your prayer has been heard and your alms have been remembered before God. Send therefore to Joppa and ask for Simon who is called Peter. He is lodging in the house of Simon, a tanner, by the sea. So sent for you at once, and you have been kind enough to come. Now therefore we are all here in the presence of God to hear all that you have been commanded by the Lord." So Peter opened his mouth and said: "Truly I understand that God shows no partiality, but in every nation anyone who fears him and does what is right is acceptable to him.
प्रतिसाद स्तोत्र ४२ : २-३,४३:३-४
प्रतिसाद : माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे;
१) हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी
लुलपते तसा हे देवा,
माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे.
२) माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी
तान्हेला झाला आहे;
मी केव्हां देवासमोर येऊन त्याचें दर्शन घेईन ?
३) तुझा देव कोठे आहे, असे ते मला सतत म्हणतात,
म्हणून अहोरात्र माझे अश्रु माझा आहार झाले आहेत.
४) तूं आपला प्रकाश व आपले सत्य प्रगट कर;
ती मला मार्ग दाखवोत;
तुझ्या पवित्र डोंगरावर,
तुझ्या निवासस्थानी मला पोहंचवोत;
५) म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ,
देव जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन;
आणि हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझें गुणगान गाईन..
Psalm: Psalm 42:2-3; 43:3, 4
R My soul is thirsting for God, the God of my life.
Like the deer that yearns for running streams,
so my soul is yearning for you, my God.
My soul is thirsting for God, the living God;
when can I enter and appear before the face of God? R
O send forth your light and your truth;
they will guide me on.
They will bring me to your holy mountain,
to the place where you dwell. R
And I will come the altar of God,
to God, my joy and gladness.
To you will I give thanks on the harp,
O God, my God. R
दुसरे वाचन १पेत्र १:३-९
वाचक : पेत्राचे पहिले पत्र ह्यामधून घेतलेले वाचन
आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या -महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरु त्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला ; जें तारण शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे, तें प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीनें विश्वासाच्या योगें रक्षिलेले आहां, त्या तुम्हांसाठीं तें वतन स्वर्गांत राखून ठेवलें आहे. त्याविषयीं तुम्ही उल्हास करितां, तरी तुम्हीं आता थोडा वेळ, भाग पडलें तसें निरनिराळ्या परीक्षामुळे दुःख सोस ह्यासाठीं कीं, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीनें करितात त्या सोन्यापेक्षां मूल्यवान् असे जें तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणें तें येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावें. त्याला पाहिलें नसतांहि त्याच्यावर तुम्ही प्रीति करिता ; आतां तो दिसत नसतां त्याच्यावर विश्वास ठेवतां; आणि त्या विश्वासाचें पर्यविसान जे आपल्या जिवांचें तारण तें उपभोगीत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदानें उल्लासतां.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
Second Reading : 1 Peter 1:3-9
Blessed be the God and Father of our Lord Jesus Christ! According to his great mercy, he has caused us to be born again to a living hope through the resurrection of Jesus Christ from the dead, to an inheritance that is imperishable, undefiled, and unfading, kept in heaven for you, who by God's power are being guarded through faith for a salvation ready to be revealed in the last time. In this you rejoice, though now for a little while, if necessary, you have been grieved by various trials, so that the tested genuineness of your faith, more precious than gold that perishes though it is tested by fire, may be found to result in praise and glory and honour at the revelation of Jesus Christ. Though you have not seen him, you love him. Though you do not now see him, you believe in him and rejoice with joy that is inexpressible and filled with glory, obtaining the outcome of your faith, the salvation of your souls.
This is the word of God
Thanks be to God
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
येशूनें त्याला म्हटलें, तूं मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे; पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारे ते धन्य.
Acclamation:
Have you believed, Thomas because you have seen me? says the Lord: blessed are those who have not seen and yet have believed.
शुभवर्तमान योहान २०:२४-२९
वाचक : योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
तूं मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे;
येशू आला तेव्हां बारांतील एक म्हणजे दिदुम' म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितलें, आम्हीं प्रभूला पाहिलें; पण त्यानें त्यांना म्हटलें, त्याच्या हातांत खिळ्यांचे वण पाहिल्यावांचून, खिळे होते त्या जागीं आपलें बोट घातल्यावांचून व त्याच्या कुशींत आपला हात घातल्यावांचून मी विश्वास धरणारच नाहीं. मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदां आंत असतां त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हां दारें बंद असतांना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हांस शांति असो. नंतर त्यानें थोमाला म्हटलें, तूं आपलें बोट इकडे कर व माझे हात पाहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असूं नको, तर विश्वास ठेवणारा ऐस. थोमानें त्याला म्हटलें, माझा प्रभु व माझा देव ! येशूनें त्याला म्हटलें, तूं मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे; पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारे ते धन्य.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.