Marathi Bible Reading | 13th week in ordinary Time| Friday 4th July 2025

सामान्यकाळातील १३ वा सप्ताह 

 शुक्रवार दि.४ जुलै   २०२५

"निरोग्यांना वैद्यांची गरज नाही. मला दया पाहिजे यज्ञ नको."

 'I desire mercy, and not sacrifice. 


 पोर्तुगालची संत एलिझाबेथ

राणी (१२७१-१३३६) 

राणी एलिझाबेथ हिची दानशूरता तिच्या संपूर्ण आयुष्यभरात गोरगरीब, उपेक्षित आणि दुर्दैवी लोकांना सदैव आधार देण्यास कामी आली. हंगेरीची संत एलिझाबेथ हिच्या नावावर प्रसिद्ध झालेली एक घटना खरे पाहता पोर्तुगालच्या या राणीच्या जीवनात घडल्याचे सिद्ध झाले. ती हकिगत अशी : एकदा ती काही गरिबांना दररोजचे अन्न म्हणून काही पाव घेऊन जात होती. मनातल्या मनात ती त्या गोरगरिबांसाठी प्रार्थना करीत होती. अचानक त्या पावांची गुलाबे बनली. सर्वत्र सुंगध पसरला. प्रत्यक्ष पिशवी उघडून पाहते तो आपल्याच पिशवीतील गुलाबांचा तो सुवास होता. तिने आपल्या पतीला धारेवर धरले कारण त्यांनीच बाजारहाट करताना पावांऐवजी थैलीत गुलाबे कोंबली असावीत असा तिचा समज झाला. घरी परतल्यानंतर आपण नक्कीच पावच आणलेले होते ह्याची साक्ष पतीकडून मिळाल्यानंतर हा चमत्कार झाल्याचे तिने आनंदाने मान्य केले.

अशा प्रकारे कार्य करीत असतानाच या गरिबांच्या कैवारिणीला देवाने ४ जुलै १३३६ साली आपल्याकडे बोलावून घेतले. २०० वर्षानंतर तिला संतपदाचा सन्मान बहाल करण्यात आला.

चिंतन : हे कृपापूर्ण मरिये, हे दयामयी माते आमच्या शत्रूपासून आम्हांला सोडव आणि आमच्या मरणाचे वेळी आमच्या प्रार्थना ऐकून घे. संत एलिझाबेथ


पहिले वाचन : उत्पत्ती  २३:१-४,१९, २४:१-८,६२-६
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"इसहाकचे रिबकेवर प्रेम होते आणि तिच्यामुळे आपल्या आईच्या पश्चात त्याला समाधान लाभले."

सारा एकशेसत्तावीस वर्षे जगली; एवढेच तिचे आयुष्य होते. सारा ही कनान देशातील किर्याथ आरबा म्हणजे हेब्रोन येथे मृत्यू पावली आणि आब्राहाम तिच्यासाठी शोक आणि विलाप करू लागला. आब्राहाम साराच्या मृत देहाजवळ उभा राहून हेथीच्या लोकांना म्हणाला, मी तुमच्यामध्ये उपरा आणि परदेशी आहे. माझ्या मालकीचे कबरस्तान तुमच्यामध्ये असावे म्हणून मला जागा द्या, म्हणजे मी आपल्या मृताला मूठमाती देईन." यांनतर आब्राहामने आपली बायको सारा हिला कनान देशातले मम्रे म्हणजे हेब्रोन ह्याच्या पूर्वेला म्हणजे मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले.
आब्राहाम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला; परमेश्वराने अब्राहामला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. आब्राहामच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वांत जुना सेवक होता, त्याला त्याने म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वराची, आकाश आणि पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की, ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलीपैकी कोणतीच माझ्या मुलासाठी तू वधू म्हणून निवडणार नाहीस; तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी वधू पाहून आणशील. त्याचा सेवक म्हणाला, यदाकदाचित ती वधू माझ्याबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलाला मी परत घेऊन जावे काय ?" तेव्हा आब्राहाम त्यास म्हणाला, “खबरदार! माझ्या मुलाला तिकडे न्यावयाचे नाही. स्वर्गाच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की, 'हा देश मी तुझ्या संततीला देईन,' तो तुझ्यापुढे आपला दूत पाठवील आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी वधू आण. पण ती वधू तुझ्याबरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू या माझ्या शपथेतून मोकळा होशील. मात्र माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नकोस.
इकडे इसहाक बैर-लहाय-रोई विहिरीकडून आला होता; तो नेगेबात राहात असे. इसहाक हा संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला असता त्याने दृष्टी वर करून पाहिले तो त्याला उंट येताना दिसले. रिबकेने दृष्टी वर करून इसहाकला पाहिले तेव्हा ती उंटावरून उतरली. तिने त्या सेवकास विचारले, “हा रानात आपणास सामोरा येत आहे तो कोण ?” सेवक म्हणाला, "हा माझा धनी." तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकले. मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसहाकला सांगितले. मग इसहाकने रिबकेला आपली आई सारा हिच्या तंबूमध्ये आणले; त्याने रिबकेचा स्वीकार केला आणि ती त्याची पत्नी झाली. त्याचे तिच्यावर प्रेम होते आणि तिच्यामुळे आपल्या आईच्या पश्चात इसहाकला समाधान लाभले.

हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Genesis 23:1-4, 19; 24:1-8, 62-67 

 Sarah lived for one hundred twenty-seven years; these were the years of the life of Sarah. And Sarah died at Kiriath-arba (that is, Hebron) in the land of Canaan, and Abraham went in to mourn for Sarah and to weep for her. And Abraham rose up from before his dead and said to the Hittites, "I am a sojourner and foreigner among you; give me property among you for a burying place, that I may bury my dead out of my sight. After this, Abraham buried Sarah his wife in the cave of the field of Machpelah east of Mamre (that is, Hebron) in the land of Canaan. Now Abraham was old, well advanced in years. And the Lord had blessed Abraham in all things. And Abraham said to his servant, the oldest of his household, who had charge of all that he had, "Put your hand under my thigh, that may make you swear by the Lord, the God of heaven and God of the earth, that you will not take a wife for my son from the daughters of the Canaanites, among whom I dwell, but will go to my country and to my kindred, and take a wife for my son Isaac." The servant said to "Perhaps woman be willing to follow me to this land. Must I then take your son back to the land from which you came?" Abraham said to him, "See to it that you do not take my son back there. The Lord, the God of heaven, who took me from my father's house and from the land of my kindred, and who spoke to me and swore to me, To your offspring I will give this land', he will send his angel before you, and you shall take a wife for my son from there. But if the woman is not willing to follow you, then you will be free from this oath of mine; only you must not take my son back there." Now Isaac had returned from Beer-lahai-roi and was dwelling in the Negeb. And Isaac went out to meditate in the field towards evening. And he lifted up his eyes and saw, and behold, there were camels coming. And Rebekah lifted up her eyes, and when she saw Isaac, she dismounted from the camel and said to the servant, "Who is that man, walking in the field to meet us?" The servant said, "It is my master." So she took her veil and covered herself. And the servant told Isaac all the things that he had done. Then Isaac brought her into the tent of Sarah his mother and took Rebekah, and she became his wife, and he loved her. So Isaac was comforted after his mother's death.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  १०६ : १-५
प्रतिसाद : परमेश्वराचे उपकारस्मरण करा.

१) परमेश्वराचे स्तवन करा, 
परमेश्वराचे उपकारस्मरण करा, 
कारण तो चांगला आहे, 
त्याची दया सनातन आहे. 
परमेश्वराचे पराक्रम कोण वर्णू शकेल ? 
त्याची सर्व स्तुती कोण ऐकवील ?

२) जे त्याच्या न्यायानुसार वागतात 
आणि सर्वदा नीती आचरतात, 
ते धन्य! हे परमेश्वरा, 
तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस,
तेव्हा माझी आठवण कर. 

३ ) माझ्या उद्धारार्थ मला दर्शन दे; 
म्हणजे तुझ्या निवडलेल्या उत्कर्ष
माझ्या दृष्टीस पडेल; 
तुझ्या लोकांच्या आनंदाने मी आनंदित होईन, 
तुझ्या वतनाच्या लोकांबरोबर मी उत्सव करीन.


Psalm:  106:1-5
 R: give thanks to the Lord, for he is good. 

Give thanks to the Lord, for he is good;
for his mercy endures forever. 
Who can tell the Lord's mighty deeds, 
or recount in full his praise? R 

Blessed are they who observe what is just.
who at all times do what is right. 
O Lord, remember me with the favour 
you show to your people. R

Visit me with your saving power,
that I may see the riches of your chosen ones,
and may rejoice in the gladness of your nation, 
boasting in the glory of your heritage. R

जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
तुमचे तारण करायला समर्थ असे अंत:करणाची पकड घेणारे वचन नम्रतेने स्वीकारा.
  आलेलुया!

Acclamation: 
 Come to me, all who labour and are heavy laden, and I will give you rest, says the Lord.

शुभवर्तमान   मत्तय   :९-१३
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "निरोग्यांना वैद्यांची गरज नाही. मला दया पाहिजे यज्ञ नको."
येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, "माझ्या मागे ये." तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला.
नंतर तो घरात भोजनाला बसला असता, बरेच जकातदार आणि पापी लोक येऊन येशू आणि त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवायला बसले. हे पाहून परूशी त्यांच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू जकातदार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?" हे ऐकून येशू म्हणाला, “निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर आजाऱ्यांना आहे. 'मला दया पाहिजे, यज्ञ नको' ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका. कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलावण्यासाठी मी आलो आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Matthew 9:9-13

At that time: As Jesus passed on, he saw a man called Matthew sitting at the tax booth, and he said to him, "Follow me." And he rose and followed him. And as Jesus reclined at table in the house, behold, many tax collectors and sinners came and were reclining with Jesus and his disciples. And when the Pharisees saw this, they said to his disciples, "Why does teacher eat with tax collectors and sinners?" But when he heard it, he said, "Those who are well have no need of a physician, but those who are sick. Go and learn what this means: 'I desire mercy, and not sacrifice. For came not to call the righteous, but sinners."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: बाप्तिज्मा सांक्रामेंत आपणांस लाभलेली एक महान देणगी आहे. म्हणून परमेश्वराचे उपकार स्मरण करणे गरजेचे आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जकातदार मत्तयला पाचारण करतो. परमेश्वराच्या दयेचा, क्षमेचा व प्रेमाचा अनुभव सर्वत्र पसरविण्यासाठी प्रभू येशू मत्तयला पाचारण करतो. प्रभूचे हे पाचारण आपणा सर्वांसाठी आहे. प्रभूचे हे पाचारण कर्मकांड, नियमांचे बाह्य आचरण व पारंपरिक संस्कृती जोपासण्यासाठी आहे असे नव्हे; तर त्याच्या करुणेचा, ममतेचा, औदार्याचा अनुभव आपल्या समाजामध्ये वाढविण्यासाठी प्रभू आपल्याला बोलावित आहे. ज्याप्रमाणे आईच्या पश्चात रिबेकाने ईसाहाकाचे जीवन आपल्या प्रेमाने आनंदी व समाधानी केले; त्याचप्रमाणे दुःखी-कष्टी लोकांना आनंदी, सुखी व समाधानी करण्यासाठी प्रभू आपल्याला बोलवित आहे.

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्या पाचारणाला योग्ये तो प्रतिसाद देण्यास व तुझी साक्ष जगाला देण्यास आम्हाला सामर्थ्य व बळ दे, आमेन..


✝️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या