Marathi Bible Reading | 25th week in ordinary Time | Friday 26th September 2025

सामान्यकाळातील २५ वा सप्ताह 

शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर  २०२५

पेत्राने उत्तर दिले, "देवाचा ख्रिस्त."
Peter answering, said: The Christ of God. 


संत कॉस्मस व डेमियन

- रक्तसाक्षी (३०३)

कॉस्मस आणि डेमियन हे दोघे जुळे भाऊ होते. ते अरेबियातील अत्यंत भक्तिमान असे ख्रिस्ती श्रद्धावंत होते. तुर्कस्थानातील किलिकिया प्रांतात ते वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून जनतेची सेवा करीत होते. आग्रेस ह्या बंदरावर लोकांवर औषधोपचार करीत असताना ते कुठलीही फी घेण्यास तयार नसत.

दोघांना देवाने आरोग्य दानाची देणगी दिलेली होती. आपल्या कौशल्याने ते केवळ शारीरिक आरोग्यच नव्हे तर आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगून आध्यात्मिक नवजीवन देत. त्यांच्या पवित्र जीवनाकडे पाहणारे आणि त्यांच्याकडे असलेले 'हिलिंग'चे दान प्रत्यक्ष अनुभवणारे असे अनेक लोक ख्रिस्ताकडे वळले.
डायक्लोशियन छळवादाला सुरुवात झाली तेव्हा प्रमुख ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून त्यांना प्रथम तुरुंगात टाकण्यात आले. त्यांचे हालहाल करण्यात आले आणि त्यानंतर त्यांचा एकत्र शिरच्छेद करण्यात आला. त्यांच्या कर्तृत्वाची कीर्ती संपूर्ण जगभरच्या ख्रिस्तसभेत पसरली आणि पौर्वात्य व पाश्चिमात्य ख्रिस्तसभेत त्यांच्या नावाने अनेक चर्चेस बांधण्यात आली.
संत कॉस्मस आणि डेमियन हे न्हावी, डॉक्टर्स, शस्त्रक्रिया करणारे सर्जन्स, दंतवैद्य आणि मेडिकल स्टोअर्स चालविणारे ह्यांचे आश्रयदाते संत आहेत. हर्निया व मरी ह्या रोगांवर आराम पडावा म्हणून त्यांचा धावा केला जातो. प्रभू येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले व नम्रतेचा आणि सेवेचा महान मंत्र सर्वांना दिला आहे  (योहान १३:१-२०). जुन्या करारात म्हटले आहे, “देवाची कृपा संपादन  करायची असेल तर स्वतःला नम्र केले पाहिजे" ( २ इतिहास ६ : १४).

 प्रभू येशू आपल्या शिष्यांना दोन प्रश्नविचारीत आहे. पहिला प्रश्न, 'लोक मला कोण म्हणून म्हणतात ?'  दुसरा प्रश्न विचारला की, 'तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?"अशावेळी केवळ पेत्राने उत्तर दिले की, 'तू देवाचा ख्रिस्त आहेस. 'ह्याचाच अर्थ देवापासून प्रत्यक्ष आलेला तारणारा प्रभू. सामान्य माणसांना ख्रिस्ताविषयी  माहिती असतेच मात्र ख्रिस्ती माणसांना प्रभू वैयक्तिक प्रश्न विचारत आहे,  'तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?' आपल्याला प्रभू येशूविषयी सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे.
प्रभू येशूने विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नावर आपण आज चिंतन करू या. बालपणापासून आत्तापर्यंत आपण बाप्तिस्मा, प्रायचित्त, ख्रिस्तशरीर, दृढीकरण, विवाह संस्कार किंवा दीक्षा व व्रत विधी स्वीकारलेले आहेत. अती पवित्र अशा प्रत्येक कृपा संस्कारात प्रभू येशू कोण आहे ह्याची ओळख आपल्याला झाली आहे का? 

पहिले वाचन : हाग्गय २ : १-९
वाचक :हाग्गय या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 लवकरच मी हे मंदिर वैभवाने भरीन.
दारियस राजाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे " आता यहुदाचा प्रांताधिकारी शल्तीएल याचा पुत्र जेरुब्बाबेल, मुख्य याजक यहोसादाक याचा पुत्र यहोशवा आणि शिल्लक राहिलेले लोक यांना असे विचार: “ज्याने या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? आता त्याची काय दशा तुम्हांला दिसते? ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय? हे जेरुब्बाबेल, हिम्मत धर, असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका, यहोसादाकच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर. परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो, हिम्मत धरा आणि कामास लागा, मी तुम्हांबरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही इजिप्त देशातून निघाला तेव्हा तुम्हाबरोबर केलेला करार कायम आहे आणि माझा आत्मा तुमच्या ठायी कायम आहे, तुम्ही भिऊ नका. कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश आणि पृथ्वी, समुद्र आणि कोरडी जमीन ही हालवून सोडीन, मी सर्व राष्ट्रांना हालवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांचा इच्छाविषय या मंदिरात येईल आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी या स्थळाला शांती देईन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Haggai 2: 1-9
And in the seventh month, the word of the Lord came by the hand of Aggeus the prophet, saying: Speak to Zorobabel the son of Salathiel the governor of Juda, and to Jesus the son of Josedec the high priest, and to the rest of the people, saying: Who is left among you, that saw this house in its first glory? and how do you see it now? is it not in comparison to that as nothing in your eyes? Yet now take courage, O Zorobabel, saith the Lord, and take courage, O Jesus the son of Josedec the high priest, and take courage, all ye people of the land, saith the Lord of hosts: and perform (for I am with you, saith the Lord of hosts) The word that I covenanted with you when you came out of the land of Egypt: and my spirit shall be in the midst of you: fear not. For thus saith the Lord of hosts: Yet one little while, and I will move the heaven and the earth, and the sea, and the dry land. And I will move all nations: AND THE DESIRED OF ALL NATIONS SHALL COME: and I will fill this house with glory: saith the Lord of hosts.The silver is mine, and the gold is mine, saith the Lord of hosts.Great shall be the glory of this last house more than of the first, saith the Lord of hosts: and in this place I will give peace, saith the Lord of hosts.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  ४३:१-४
प्रतिसाद :माझा मुक्तिदाता आणि माझा देव ह्याच्यावर मी भाव ठेवीन.

१) हे देवा, माझा न्याय कर, 
भक्तिहीन राष्ट्रांशी माझ्या बाजूने लढ.
 कपटी आणि कुटील 
मनुष्यांपासून मला मुक्त कर.

२)कारण हे देवा, तू माझा बळकट दुर्ग आहेस, 
तू माझा त्याग का केलास?
वैऱ्याच्या जाचामुळे सुतक्याच्या वेषाने मी का फिरावे ? 

३) तू आपला प्रकाश आणि आपले सत्यप्रकट कर, 
ती मला मार्ग दाखवोत. 
तुझ्या पवित्र पर्वतावर, 
तुझ्या निवासस्थानी मला पोहोचवोत.

४) म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ, देव जो
माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन आणि 
हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन.


Psalms 43: 1, 2, 3, 4
R. (5) Hope in God; I will praise him, my savior and my God.

1 Judge me, O God, and distinguish my cause 
from the nation that is not holy: 
deliver me from the unjust and deceitful man.
R. Hope in God; I will praise him, my savior and my God.

2 For thou art God my strength: 
why hast thou cast me off? 
and why do I go sorrowful whilst the enemy afflicteth me?
R. Hope in God; I will praise him, my savior and my God.

3 Send forth thy light and thy truth: 
they have conducted me, 
and brought me unto thy holy hill, 
and into thy tabernacles.
R. Hope in God; I will praise him, my savior and my God.

4 And I will go in to the altar of God: 
to God who giveth joy to my youth. 
To thee, O God my God, I will give praise upon the harp: 
why art thou sad, O my soul?

R. Hope in God; I will praise him, my savior and my God.

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे, ते मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक आहे.
 आलेलुया!

Acclamation: 
 Alleluia: Mark 10: 45
R. Alleluia, alleluia.
The Son of Man came to serve and to give his life as a ransom for many.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  लूक  ९:१८-२२
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तू देवाचा ख्रिस्त आहे. मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी ह्याचे अगत्य आहे."
येशू एकांती प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते. तेव्हा त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात ?" त्यांनी उत्तर दिले, बाप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतात एलिया आणि कित्येक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे. त्याने त्यांना म्हटले, "पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?" पेत्राने उत्तर दिले, "देवाचा ख्रिस्त." मग हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि म्हटले, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी, मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : 
Luke 9: 18-22
And it came to pass, as he was alone praying, his disciples also were with him: and he asked them, saying: Whom do the people say that I am? But they answered, and said: John the Baptist; but some say Elias; and others say that one of the former prophets is risen again. And he said to them: But whom do you say that I am? Simon Peter answering, said: The Christ of God. But he strictly charging them, commanded they should tell this to no man. Saying: The Son of man must suffer many things, and be rejected by the ancients and chief priests and scribes, and be killed, and the third day rise again.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
संदेष्टा हाग्गय ह्याने केलेले आवाहन लोकांनी मनावर घेतले. ते झटपट कामाला लागले आणि त्यांनी मंदिर बांधून काढले. काहीजुनेजाणते म्हणू लागले की हे मंदिर पूर्वीच्या मंदिराइतके वैभवशाली नाही. हाग्गयने त्यांना धीर देत म्हटले परमेश्वर हे मंदिर त्याच्या वैभवाने भरून टाकील. आपण मात्र त्याच्या मार्गाने चालचलणूक करायला हवी. त्यासाठी केवळ परमेश्वराविषयीचे ज्ञान असणे पुरेसे नाही तर त्याचा प्रत्यक्ष अनुभव यायला हवा. तशी मनोवृत्ती धारण करायला हवी. त्यामुळे येशू आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्या प्रेषितांचे त्याच्याविषयीचे ज्ञान तपासून पाहतो आणि नंतर त्यांना आलेला त्याचा अनुभव कथन करायला सांगतो. पेत्राने दिलेले, "देवाचा ख्रिस्त" हे उत्तर जरी त्रोटक भासत असले तरी पुढे येशू त्याचे स्पष्टीकरण करताना सांगतो, ख्रिस्त (अभिषिक्त) असणे म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे वागताना दुःख भोगण्याची तयारी ठेवणे होय.

माझा येशूविषयीचा अनुभव कसा आहे? त्यासाठी मी कोणते दुःख भोगायला तयार आहे?

प्रार्थना : हे प्रभू येशू, माझ्या वैयक्तिक जीवनात मी तुला सर्वार्थाने ओळखावे व तुला अनुसरावे म्हणून मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या