सामान्यकाळातील २५ वा सप्ताह
गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५
“मी योहानचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण?” "John beheaded, but who is this about whom hear such things?"
संत सेओलफ्रिड
मठाधिपती, वर्तनसाक्षी (६४२-७१६)
पहिले वाचन : हाग्गय १ : १-८
वाचक :हाग्गय या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मंदिर पुन्हा बांधा, त्याने मी प्रसन्न होईन."
दारियस राजाच्या कारकिर्दीत दुसऱ्या वर्षी, सहाव्या महिन्याच्या प्रतिपदेस यहुदाचा प्रांताधिकारी शल्तीएल याचा पुत्र जेरुब्बाबेल आणि मुख्य याजक यहोसादाकाचा पुत्र यहोशवा यांला हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे : "सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही." तेव्हा परमेश्वराचे वचन हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे प्राप्त झाले ते असे: "इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तक्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवा. तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती थोडे लागते, तुम्ही खाता पण तृप्त होत नाही, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही, तुम्ही कपडे घालता पण त्यांनी तुम्हांला ऊब येत नाही, मजूर मजुरीने पैसा मिळवून जसे काय भोक पडलेल्या पिशवीत टाकतो."
सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, “तुम्ही आपल्या मार्गाकडे लक्ष लावा. डोंगरावर जाऊन लाकडे आणा आणि मंदिर बांधा, त्याने मी प्रसन्न होईन आणि माझा महिमा प्रकट करीन, असे परमेश्वर म्हणतो."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Haggai 1:1-8
In the second year of Darius the king, in the sixth month, on the first day of the month, the word of the Lord came by the hand of Haggai the prophet to Zerubbabel the son of Shealtiel, governor of Judah, and to Joshua the son of Jehozadak, the high priest: "Thus says the Lord of hosts: These people say the time has not yet come to rebuild the house of the Lord." Then the word of the Lord came by the hand of Haggai the prophet, "Is it a time for you yourselves to dwell in your panelled houses, while this house lies in ruins? Now, therefore, thus says the Lord of hosts: Consider your ways. You have sown much, and harvested little. You eat, but you never have enough; you drink, but you never have your fill. You clothe yourselves, but no one is warm. And he who earns wages does so to put them into a bag with holes. Thus says the Lord of hosts: Consider your ways. Go up to the hills and bring wood and build the house, that I may take pleasure in it and that I may be glorified, says the Lord."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १५०:१-९
प्रतिसाद : परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे.
१). परमेश्वराचे स्तवन करा.
नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा,
भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा.
इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो.
सियोनची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्हासोत.
२) ती नृत्य करीत त्याच्या नामाचे स्तवन करोत,
डफ आणि वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत.
कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे.
तो नम्रजनांना तारणाने सुशोभित करतो.
३) भक्त गौरवामुळे उल्हासोत,
ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत.
परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो,
जे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल.
परमेश्वराचे स्तवन करा.
Psalm 149: 1b-2, 3-4, 5-6a and 9b
The Lord takes delight in his people
Sing a new song to the Lord,
his praise in the assembly of the faithful.
Let Israel rejoice in its Maker;
let Sion's children exult in their king. R
Let them praise his name with dancing,
and make music with timbrel and harp.
For the Lord takes delight in his people;
he crowns the poor with salvation. R
Let the faithful exult in glory,
and rejoice as they take their rest.
Let the praise of God be in their mouths.
This is an honour for all his faithful. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्याद्वारे जीवन मिळवून दिले.
आलेलुया!
Acclamation:
I am the way, and the truth, and the life, says the Lord no one comes to the Father except through me.
शुभवर्तमान लूक ९:७-९
वाचक :लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी योहानचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण ?"
घडत असलेल्या सर्व गोष्टीविषयी मांडलिक हेरोदने ऐकले आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला, कारण योहान मेलेल्यातून उठला आहे असे कित्येक म्हणत होते, कित्येक एलिया प्रकट झाला आहे असे म्हणत होते आणि कित्येक प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे असे म्हणत होते. पण हेरोद म्हणाला, “मी योहानचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण?” म्हणून त्याला पाहण्याची तो संधी पाहत होता..
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Luke 9:7-9
At that time: Herod the tetrarch heard about all that was happening, and he was perplexed, because it was said by some that John had been raised from the dead, by some that Elijah had appeared, and by others that one of the prophets of old had risen. Herod said, "John beheaded, but who is this about whom hear such things?" And he sought to see him.
चिंतन:
हेरोदाने योहानाचा शिरच्छेद केल्यानंतर येशूविषयीची कीर्ती त्याच्या कानावर पडते. त्याच्या मनाचा गोंधळ उडाला. कारण काही लोकांच्या मते योहानाचा आत्मा येशूठायी कार्य करीत आहे. काहींच्या मते येशू हा एलिया किंवा प्राचीन संदेष्ट्यांपैकी एक आहे. त्यामुळे हेरोद घाबरून गेला आणि येशूला पाहण्याची संधी शोधू लागला. अधिकाराच्या जागी असूनही हेरोद असुरक्षित होता. कारण त्याच्या जीवनात परमेश्वराला स्थान नव्हते. बाबिलोनच्या हद्दपारीतून परतलेली जनता आपापल्या घरादारांची उभारणी करण्यात आणि शेतमळ्यांची निगा राखण्यात गढून गेली परंतु परमेश्वराचे मंदिर ओसाड पडलेले होते त्याविषयी त्यांना काहीच वाटत नव्हते. त्यामुळे शेतेमळे लावूनही त्यांच्या हाती फारसे काही पडत नव्हते. पुष्कळ पेरणी करूनही त्यांना फारसे पीक मिळत नव्हते. हाग्गय संदेष्ट्याने त्यांना योग्य तो मार्ग दाखविला. त्यामुळे ते पुन्हा एकदा उत्सव साजरा करू लागले.
माझ्या जीवनात परमेश्वराला प्रथमस्थान देण्याविषयी मी कोणती भूमिका घेतली आहे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तूच मार्ग व जीवन आहेस, आम्हाला तुझ्या वचना प्रमाणे जीवन जगण्यास प्रेरणा दे, आमेन.
0 टिप्पण्या