Marathi Bible Reading | 27th Sunday in Ordinary Time | 5th October 2025

सामान्यकाळातील २७ वा रविवार  

दि. ५ ऑक्टोबर २०२५

कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहे.For God hath not given us the spirit of fear: but of power, and of love, and of sobriety.




 तुम्हांमध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असे तर,.......
If you had faith like to a grain of mustard seed, 

 हबक्कूक संदेष्ट्याने देवाला विनवणी केली. देवाने हबक्कूला संदेश देऊन म्हटले ‘धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल'. अधर्मी जनांचा नाश होईल  कारण त्यांच्या ठायी विश्वास नसतो. आज आपण आपल्या विश्वासासंबंधाने  चिंतन करु या.
अनेकदा जीनवात निराशा येते. प्रार्थना, भक्ती, उपवास आणि दानधर्म करुन सुद्धा प्रार्थना निरुत्तर बनते. आपण देवाविषयी कूरकूर करु  लागतो. अशा विचारांमुळे आपला देवावरील विश्वास कमी होऊ लागतो. मन  अस्वस्थता, अस्थिरता, आजार व संकटे ह्यांनी ग्रासून जाते. 
प्रभू येशू आजप्रेषितांना म्हणत आहे, 'तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर, ह्या तुतीला, तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा, असे तुम्ही सांगताच ती तुमचे  ऐकेल.' आपण अनेक वेळा विश्वासात कमी पडतो म्हणूनच प्रेषितांप्रमाणे विनवणी करू या.  'प्रभूजी आमचा विश्वास वाढवा'. विश्वास म्हणजे, शरणागती व आत्मसमर्पण. 

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो, 'देवाने आपल्याला  भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. ' आपण निराश न होता आपली धार्मिकता, नीतिमत्ता व आचरण तपासून पहावे  आणि विश्वासाने जीवन जगावे म्हणून अंतर्मूख बनून प्रार्थना करू या. 


✝️   
पहिले वाचन : पहिले वाचन : हबक्कूक   १:२-३; २:२-४
वाचक :  हबक्कूक या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 “धार्मिक मनुष्य आपल्या विश्वासाने वाचेल.”
“हे परमेश्वरा, मी किती वेळ धावा करू? तू ऐकत नाहीस. जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करत नाहीस. मला अधर्म का पाहावयास लावतोस ? विपत्ती मला का दाखवतोस ? लुटालूट आणि जुलूम माझ्यासमोर आहेत. कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.'
 मग परमेश्वराने मला उत्तर दिले की, हा दृष्टान्त लिहून काढ, पाट्यांवर ठळक लिही, म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. कारण हा दृष्टान्त नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटाला जाण्यास स्वतःचे नेट करत आहे. तो फसवणार नाही. त्याला विलंब लागला तरी त्याची वाट पाहा, तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही, पाहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही, धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


First Reading :
: Habakkuk 1: 2-3; 2: 2-4
How long, O Lord, shall I cry, and thou wilt not hear? shall I cry out to thee suffering violence, and thou wilt not save? Why hast thou shewn me iniquity and grievance, to see rapine and injustice before me? and there is a judgment, but opposition is more powerful. And the Lord answered me, and said: Write the vision, and make it plain upon tables: that he that readeth it may run over it. For as yet the vision is far off, and it shall appear at the end, and shall not lie: if it make any delay, wait for it: for it shall surely come, and it shall not be slack. Behold, he that is unbelieving, his soul shall not be right in himself: but the just shall live in his faith.: 
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र   : ९५:१-२, ६-९
प्रतिसाद :  आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल!

१ )याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू 
आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू. 
उपकारस्मरण करत आपण त्याच्यापुढे जाऊ, 
स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.

२) याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता 
त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू कारण 
तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, 
त्याच्या हातचा कळप आहोत.

३) आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल !
 “मरिबा येथल्याप्रमाणे, रानात मस्सा येथील
 प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे 
तुम्ही आपली मने कठोर करू नका. 
तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी 
कृती पाहिली होती तरी त्यांनी माझी परीक्षा केली 
आणि मला पारखले.”


Psalm   95: 1-2, 6-7, 8-9
R. (8) If today you hear his voice, harden not your hearts.

1 Come let us praise the Lord with joy: let us joyfully sing to God our saviour.
2 Let us come before his presence with thanksgiving; and make a joyful noise to him with psalms.
R. If today you hear his voice, harden not your hearts.

6 Come let us adore and fall down: and weep before the Lord that made us.
7 For he is the Lord our God: and we are the people of his pasture and the sheep of his hand.
R. If today you hear his voice, harden not your hearts.

8 Today if you shall hear his voice, harden not your hearts:
9 As in the provocation, according to the day of temptation in the wilderness: where your fathers tempted me, they proved me, and saw my works.
R. If today you hear his voice, harden not your hearts.

दुसरे वाचन   तिमथी  १:६-८,१३-१४
वाचक: पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यास तू लाज धरू नये."

मी तुला आठवण देतो की, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठायी आहे, ते प्रज्वलित कर. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहे.
म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यास आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिणामाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे. ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेला तुझा विश्वास आणि प्रीती ह्यांमध्ये दृढपणे राख, आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या योगे ती चांगली ठेव सांभाळ.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading: : Second Timothy 1: 6-8, 13-14
For which cause I admonish thee, that thou stir up the grace of God which is in thee, by the imposition of my hands. For God hath not given us the spirit of fear: but of power, and of love, and of sobriety. Be not thou therefore ashamed of the testimony of our Lord, nor of me his prisoner: but labour with the gospel, according to the power of God, Hold the form of sound words, which thou hast heard of me in faith, and in the love which is in Christ Jesus. Keep the good thing committed to thy trust by the Holy Ghost, who dwelleth in us.

This is the word of God 
Thanks be to God 

जयघोष                                  
आलेलुया, आलेलुया !   
 हे प्रभो, तुझे वचन हे सत्य आहे,
तू आम्हांला सत्यात समर्पित कर.
आलेलुया!

Acclamation: 
AAlleluia: First Peter 1: 25
R. Alleluia, alleluia.
25 The word of the Lord remains forever. This is the word that has been proclaimed to you.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान  लूक १७:५-१०
वाचक :  लूकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जर तुम्हांमध्ये विश्वास असेल. "
प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा. प्रभू म्हणाला, तुम्हांमध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असे तर, ह्या तुतीच्या झाडाला, तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा, असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल.
तुम्हांपैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा नोकर शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, आताच येऊन जेवायला बैस ? उलट माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा आणि पी, असे तो त्याला म्हणणार नाही का ? सांगितलेली कामे नोकराने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो का? त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी नोकर आहो, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. .

Gospel Reading :
Luke 17: 5-10
And the apostles said to the Lord: Increase our faith. And the Lord said: If you had faith like to a grain of mustard seed, you might say to this mulberry tree, Be thou rooted up, and be thou transplanted into the sea: and it would obey you. But which of you having a servant ploughing, or feeding cattle, will say to him, when he is come from the field: Immediately go, sit down to meat: And will not rather say to him: Make ready my supper, and gird thyself, and serve me, whilst I eat and drink, and afterwards thou shalt eat and drink? Doth he thank that servant, for doing the things which he commanded him? I think not. So you also, when you shall have done all these things that are commanded you, say: We are unprofitable servants; we have done that which we ought to do.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
श्रद्धा म्हणजे केवळ भक्ती नसते. श्रद्धा म्हणजे केवळ ईशज्ञानसुद्धा नसते. ती तर एक बांधिलकी असते. शेंडी तुटो की पारंबी तुटो आपण कोणत्याही परिस्थितीत आपल्या परमेश्वराला सोडायचे नाही अशा प्रकारचा दृढ निश्चय त्या बांधिलकीच्या मागे असतो. आजची वाचने ह्या बांधिलकीविषयी आपल्याला तीन गोष्टींवर चिंतन करायला लावतातः १) श्रद्धा हीदुःख आणि मोहाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेली असावी लागते. आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा हबक्कक देवाला प्रश्न विचारतो की, आपल्यावर हे संकट का आलेले आहे. मात्र त्याचबरोबर तो अशी श्रद्धादेखील प्रकट करतो की नीतिमान विश्वासाने जगेल. आपल्या जीवनात आपल्याला कितीही त्रास सहन करावा लागलं तरीही आपण देवाच्या नावाचा गौरवच करू असा निर्धार ह्या पुस्तकाच्या शेवटी हबक्ककने बोलून दाखविलेला आहे. २) श्रद्धा ही सुखाच्या आणि दुःखाच्या प्रसंगीदेखील टिकवून ठेवता आली पाहिजे. दुसऱ्या वाचनात संत पॉल तीमथ्याला परंपरेने मिळालेल्या श्रद्धेत टिकन राहण्यास पाचारण करीत आहे. ही श्रद्धा त्याला आपली आई युनिके आणि आपली आजी लोईस ह्यांच्याकडून मिळाला आहे ह्याची संत पॉल त्याला आठवण करून देतो. ३) श्रद्धेचे पालन ह्या जगात मालक बनून नव्हे, तर सेवक बनून करायचे असते. थोडीशी श्रद्धादेखील मोठमोठी अद्भुत कृत्ये करू शकते. तुटीचे झाड सहज उपटून काढता येत नाही ते खणावे लागते. श्रद्धेने कठीण व अशक्य गोष्टीदेखील सहजसाध्य करता येतात असे येशू शिकवितो. इथे श्रद्धेचे प्रमाण नव्हे; तर श्रद्धेचा अस्सलपणा महत्त्वाचा आहे. अशी श्रद्धा बाळगणारा मनुष्य आपल्या श्रद्धेला आलेल्या फळाचे श्रेय कधीच स्वतःकडे घेत नाही तर आपण केवळ निरुपयोगी सेवक आहोत आणि आपण आपले कर्तव्य केले अशी भावना जपतो.

एक सेवक म्हणून मोहाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी मी माझी श्रद्धा कशी जोपासतो/ते?
प्रार्थना : हे प्रभू येशू, आमची श्रद्धा दृढ कर. विश्वासाने आम्ही जीवन जगावे, म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या