Marathi Bible Reading | 27th week in ordinary Time | Monday 6th October 2025

सामान्यकाळातील २७वा सप्ताह 

सोमवार  दिनांक ६ ऑक्टोबर  २०२५

“पण माझा शेजारी कोण?”
"And who is my neighbour?"

  ✝️  संत ब्रुनो

-मठाधिकारी, वर्तनसाक्षी (१०३५-११०१)

देवासाठी आपण जे युद्ध लढतो त्या युद्धातही जी मनःशांती असते, ती जगात कुठेही मिळत नाही.-संत ब्रुनो 

जो माणूस गरजवंतांना आणि संकटात व अडचणीत असलेल्यांना सर्वतोपरी सहाय्य करतो व त्यांची काळजी वाहतो तो खरा शेजारी होय. आपण  कुणाचेही चांगले शेजारी बनू शकतो. समोरचा माणूस अत्यंत बिकट  परिस्थितीत असताना त्याचे नाव, गाव, जात, पात ह्याविषयी जाणून न घेता त्याला मदत करायची. तो अनोळखी किंवा ओळखीचा पण असू शकतो.

पहिले वाचन :योना १:१-१७, २:१०
वाचक : योनाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“योना देवाच्या दृष्टीसमोरून पळाला.'
अमित्तयाचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, "ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि त्याच्याविरुद्ध आवाज उठव, कारण त्यांचा दुष्टपणा माझ्यासमोर आला आहे." पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिश येथे पळून जायला निघाला. तो याफो येथे गेला, तेथे त्याला तार्शिशला जाणारे जहाज आढळले, त्याने त्याचे प्रवासभाडे दिले आणि परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शिसला निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला.
तेव्हा परमेश्वराने समुद्रात भयंकर वारा सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या बेतात आले. खलाशी घाबरले आणि आपआपल्या दैवताचा धावा करू लागले, मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी गाढ झोप घेत पडला होता. तेव्हा जहाजाचा कप्तान त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास ? ऊठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.
त्यांनी एकमेकांना म्हटले, चला, आपण चिठ्या टाकू म्हणजे कोणामुळे हे संकट आपणांवर ओढवले हे आपल्याला कळेल. त्यांनी चिठ्या टाकल्या तेव्हा योनाच्या नावाची चिठी • निघाली. त्यांनी त्याला विचारले, कोणामुळे हे संकट आम्हांवर आले सांग. तुझा धंदा काय ? तू आलास कोठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस? तो त्यांना म्हणाला, "मी इब्री आहे, ज्या स्वर्गीच्या देवाने समुद्र आणि कोरडी भूमी निर्माण केली त्या परमेश्वराचा मी उपासक आहे." तोपरमेश्वरासमोरून पळून चाललेला आहे हे त्यांना कळले, कारण त्याने त्यांना तसे सांगितले होते. तेव्हा त्या माणसांना अत्यंत भीती वाटली, ते त्याला म्हणाले, तू हे काय केलेस?
नंतर ते त्याला विचारू लागले “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे ?" समुद्र तर अधिकाअधिक खवळत होता. तो त्यांना म्हणाला, "मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल, कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हांवर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे." जहाज किनाऱ्याला लावावे म्हणून ती माणसे वल्ही मारमारून थकली, पण त्यांना ते साधेना, कारण समुद्र त्यांच्यावर अधिकाधिक खवळत चालला होता. तेव्हा ते परमेश्वराचा धावा करून म्हणाले, "हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो की या माणसामुळे आम्हांला मारू नकोस आण निर्दोष जीव घेतल्याचा दोष आम्हांवर लावू नकोस, कारण तू परमेश्वर आहेस, तुला इष्ट ते तू करतोस." मग त्यांनी 'तू' योनाला धरून समुद्रात फेकून दिले, तेव्हा समुद्र खवळावयाचा थांबला. त्या माणसांना तर परमेश्वराचे फार भय वाटले, त्यांनी परमेश्वराला यज्ञ केला आणि नवसही केले.
परमेश्वराने योनाला गिळण्यासाठी एका प्रचंड माशाची योजना केली होती, योना त्या माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री होता. त्यानंतर परमेश्वराने माशाला आज्ञा केली, तेव्हा त्याने योनाला कोरड्या भूमीवर ओकून टाकले.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Jonah 1:1-17; 2:1, 10 

The word of the Lord came to Jonah son of Amittai saying, "Arise, go to Nineveh, that great city, and call out against it, for their evil has come up before me." But Jonah rose to flee to Tarshish from the presence of the Lord. He went down to Joppa and found a ship going to Tarshish. So he paid the fare and went down into it, to go with them to Tarshish, away from the presence of the Lord. But the Lord hurled a great wind upon the sea, and there was a mighty tempest on the sea, so that the ship threatened to break up. Then the mariners were afraid, and each cried out to his god. And they hurled the cargo that was in the ship into the sea to lighten it for them. But Jonah had gone down into the inner part of the ship and had lain down and was fast asleep. So the captain came and said to him, "What do you mean, you sleeper? Arise, call out to your god! Perhaps the god will give a thought to us, that we may not perish And they said to one another, "Come, let us cast lots, that we may know on whose account this evil has come upon us." So they cast lots, and the lot fell on Jonah. Then they said to him, "Tell us on whose account this evil has come upon us. What is your occupation? And where do you come from? What is your country? And of what people are you?" And he said to them, "I am a Hebrew, and I fear the Lord, the God of heaven, who made the sea and the dry land." Then the men were exceedingly afraid and said to him, "What is this that you have done!" For the men knew that he was fleeing from the presence of the Lord, because he had told them. Then they said to him, "What shall we do to you, that the sea may quiet down for us?" For the sea grew more and more tempestuous. He said to them, "Pick me up and hurl me into the sea; then the sea will quiet down for you, for I know it is because of me that this great tempest has come upon you." Nevertheless, the men rowed hard to get back to dry land, but they could not, for the sea grew more and more tempestuous against them. Therefore they called out to the Lord, "O Lord, let us not perish for this man's life, and lay not on us innocent blood, for you, O Lord, have done as it pleased you." So they picked up Jonah and hurled him into the sea, and the sea ceased from its raging. Then the men feared the Lord exceedingly, and they offered a sacrifice to the Lord and made vows. And the Lord appointed a great fish to swallow up Jonah. And Jonah was in the belly of the fish three days and three nights. Then Jonah prayed to the Lord his God from the belly of the fish. And the Lord spoke to the fish, and it vomited Jonah out upon the dry land.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र  योना २:२-४,७

प्रतिसाद : हे परमेश्वरा, मृत्यूपासून तू मला वाचव.

१) मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, 
तेव्हा त्याने माझे ऐकले. 
अधोलोकांच्या उदरातून मी आरोळी केली, 
तेव्हा तू माझा शब्द ऐकलास. 

२) तू मला डोहात, समुद्राच्या पोटात टाकलेस,
प्रवाहाने मला व्यापले.
तुझ्या सर्व लाटा आणि कल्लोळ माझ्यावरून गेले. 

३) मी म्हणालो, तुझ्या दृष्टीसमोरून तू मला दूर केले आहेस. 
तुझ्या पवित्र मंदिराकडे मी दृष्टी लावू शकेन का?

४) मी अगदी हताश झालो तेव्हा
 मी आपले चित्त पुन्हा देवाकडे लावले 
आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात 
तुझ्याजवळ पोहोचली.



Psalm .Jonah 2:2, 3, 4, 7

You brought up my life from the pit, O Lord my God.

I called out to the Lord, out of my distress, 
and he answered me;
out of the belly of Sheol I cried,
and you heard my voice. R

For you cast me into the deep, 
into the heart of the seas,
and the flood surrounded me;
all your waves and your billows
 passed over me. R

Then I said, 'I am driven away from your sight;
 yet shall again look upon your holy temple. R

when my life was fainting away, 
remembered the Lord,
and my prayer came to you,
into your holy temple. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
 आलेलुया!
Acclamation: 
 Alleluia: 
R. Alleluia, alleluia.
 A new commandment I give to you, says the Lord, that you love one another, just as I have loved you.
R. Alleluia, alleluia.


शुभवर्तमान   लूक   १०:२५-३७ 
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“माझा शेजारी कोण ?"

कोणीएक शास्त्री उभा राहिला आणि येशूची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, “गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे ? तुझ्या वाचनात काय आले आहे?" त्याने उत्तर दिले, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर." त्याने त्याला म्हटले, "ठीक उत्तर दिलेस, हे कर म्हणजे जगशील."
परंतु स्वतःला नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण?” येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य येरुशलेमहून खाली यरीहोला जात असताना लुटारूंच्या हाती सापडला, त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. थोड्या वेळाने एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता, तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता, पडलेला माणूस होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला, त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल आणि द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवूनउतारशाळेत आणले आणि त्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी त्याने दोन रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ह्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हांला देईन. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला ?" तो म्हणाला, “त्याच्यावर दया करणारा तो.” येशूने त्याला म्हटले, “जा आणि तूही तसेच कर."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :Luke 10:25-37

At that time: A lawyer stood up to put Jesus to the test, saying, "Teacher, what shall I do to inherit eternal life?" He said to him, "What is written in the Law? How do you read "And he answered, "You shall love the Lord your God with all your heart and with all your soul and with all your strength and with all your mind, and your neighbour as yourself." And he said to him, "You have answered correctly; do this, and you will live. But he, desiring to justify himself, said to Jesus, "And who is my neighbour?" Jesus replied, "A man was going down from Jerusalem to Jericho, and he fell among robbers, who stripped him and beat him and departed, leaving him half dead. Now by chance a priest was going down that road, and when he saw him he passed by on the other side. So likewise a Levite, when he came to the place and saw him, passed by on the other side. But a Samaritan, as he journeyed, came to where he was, and when he saw him, he had compassion. He went to him and bound up his wounds, pouring on oil and wine. Then he set him on his own animal and brought him to an inn and took care of him. And the next day he took out two denarii and gave them to the innkeeper, saying Take care of him, and whatever more you spend, I will repay you when I come back. Which of these three, do you think, proved to be a neighbour to the man who fell among the robbers?" He said, "The one who showed him mercy." And Jesus said to him. "You go, and do likewise."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
योना संदेष्टा हा मिशनरी संदेष्टा म्हणून प्रसिद्ध आहे कारण इस्स्राएलबाहेर जाऊन असिरियाची राजधानी निनवे येथील लोकांना आपला संदेश देण्यासाठी त्याला परमेश्वर पाठवतो. त्याच्या पुस्तकात एकूण चार प्रकारची मिशनरी प्रवृत्ती दिसून येतेः निरुत्साही,अस्वस्थ, शिस्तप्रिय आणि निराश. त्यापैकी पहिल्या अध्यायातील त्याची निरुत्साही मिशनरी प्रवृत्ती आजच्या पहिल्या वाचनात आपल्यासमोर मांडण्यात आलेली आहे. एक निरुत्साही मिशनरी म्हणून सर्वप्रथम तो देवाने सांगितलेल्या देशाच्या दिशेने नव्हे; तर त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने पळून जातो. तेथे जहाजाच्या तळाशी झोपून जातो. वादळ सुरू झाले तेव्हा समुद्रात फेकन दिला जाण्यासाठी तो तयार होतो. ह्या त्याच्या वर्तनात पळवाट, आळस आणि धरसोडवृत्ती आलेली आहे. देवावरील आणि इतर माणसावरील प्रेमापेक्षा त्याला आपली संकुचित विचारसरणी प्रिय वाटते. येशू आपल्याला देवप्रीती, शेजारप्रीती आणि सुदृढ स्वप्रीतीचे धडे देतो. जे तुझे ते माझे (लुटारूची वृत्ती) आणि जे माझे ते माझे (याजक आणि लेवी ह्यांची वृत्ती) यापेक्षा 'जे माझे ते तुझे' (शोमरोन्याची वृत्ती) ही भूमिका आपण सदैव घावी असे येशू शिकवितो.

माझ्या जीवनात देवप्रीती, शेजारप्रीती आणि सुदृढ स्वप्रीती ह्यांच्या योग्य तो मेळ घालण्याचा मी प्रयत्न करतो का?
प्रार्थना  : हे प्रभू, देवप्रीति व शेजारप्रीतिचा अंकूर आमच्या अंतःकरणात  वाढावा आणि शाश्वत जीवनाकडे आमची पाऊले पडावीत म्हणून आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या