Marathi Bible Reading | 29th week in ordinary Time | Tuesday 21th October 2025

सामान्यकाळातील २९ वा सप्ताह 

मंगळवार  दि. २१ ऑक्टोबर २०२५

तो रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येईल तेव्हा जे त्याला असे आढळतील ते धन्य आहेत.If he comes in the second watch, or in the third, and finds them awake, blessed are those servants!

संत हिलेरियन महान 

मठाधिकारी, वर्तनसाक्षी (२९१-३७१)

आपले मानवी जीवन क्षणभंगूर आहे. आपला श्वास, आपले विचार, आपले बोलणे, आपली कृती हे सर्व परमेश्वराच्या कृपनेच आपल्या जीवनात घडत असते. आपल्या जीवनाचा स्वामी परमेश्वर आहे म्हणूनच तो आपल्याला सावधान करुन सांगत आहे, 
'तुम्ही सिद्ध असा,' कारण तुम्हास वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. प्रभू येशू वैभवाने पुन्हा येणार असून सर्वांचा न्यायनिवाडा होणार आहे, अशी आपली ख्रिस्ती श्रद्धा आहे. 'प्रभू येशू ख्रिस्ताने घोषित केलेले देवराज्याचे कार्य विफळ होण्यासाठी सैतान सतत कार्यशील असतो' (१ पेत्र ५:८), म्हणूनच आपण सर्वदा जागृत राहून जीवन जगणे गरजेचे आहे.

प्रभू येशू मार्ग, सत्य, जीवन आणि प्रकाश आहे. त्याच्या दिव्य प्रकाशात चालत राहून आपण आपले जीवन आचरण करण्यास प्रेरणा मागू या. प्रभूच्या स्वर्गीय नंदनवनात सहभागी होण्यास पात्र ठरावेत म्हणून आपण जागृत राहून प्रभू समवेत प्रार्थना, मनन, चिंतन करु या. प्रभू म्हणतो, 'जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य.'

पहिले वाचन : रोम.  ५:१२,१५,१७-२१
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“जर ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर जे कृपेच्या दानाची विपुलता स्वीकारतात, ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील."
    एका माणसाच्या द्वारे जगात पाप शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली, तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळ जणांकरिता विशेषकरून अधिक झाली. जर त्या एकाच इसमाच्याद्वारे, त्या एकाच इसमाच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले, तर जे कृपेचे आणि नीतिमत्त्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, ते विशेषकरून त्या एकाच येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील.
    तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्त्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्त्व प्राप्त होते. जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतील. जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा अधिक प्रमाणात झाली, जसे पापाने मरणाच्यायोगे राज्य केले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे सार्वकालिक जीवनासाठी येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे राज्य करावे.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Romans 5:12, 15b, 17-19, 20b-21

Brethren: Just as sin came into the world through one man, and death through sin, and so death spread to all men because all sinned - If many died through one man's trespass, much more have the grace of God and the free gift by the grace of that one man Jesus Christ abounded for many. For if, because of one man's trespass, death reigned through that one man, much more will those who receive the abundance of grace and the free gift of righteousness reign in life through the one man Jesus Christ. Therefore, as one trespass led to condemnation for all men, so one act of righteousness leads to justification and life for all men. For as by the one man's disobedience the many were made sinners, so by the one man's obedience the many will be made righteous. Where sin increased, grace abounded all the more, so that, as sin reigned in death, grace also might reign through righteousness leading to eternal life through Jesus Christ our Lord.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ४०: ७-१०, १७
प्रतिसाद :   प्रभो, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे. 

१) यज्ञपशू आणि अन्नार्पण ह्यात तुला संतोष नाही,
पण ऐकायला तू माझे कान उघडले आहेस. 
होम आणि पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. 
ह्यावरून मी म्हणालो, पाहा, मी आलो आहे. 

२) ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की, 
हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे,
 तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. 

३) महामंडळात मी नीतिमत्त्वाचे सुवृत्त सांगितले.
 हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही 
हे तू जाणतोस. 

४ )तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी
आनंद आणि उल्हास पावोत.
तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे
परमेश्वराचा महिमा वाढो, असे सतत म्हणोत.

Psalm 40:7-8a, 8b-9, 10, 17
See, I have come, Lord, to do your will.

You delight not in sacrifice and offerings,
but in an open ear. 
You do not ask for holocaust and victim.
Then said, "See, I have come." R 

In the scroll of the book it stands
written of me: 1 delight to do your will, O my God;
your instruction lies deep within me." 

Your justice I have proclaimed 
 in the great assembly. 
My lips I have not sealed; 
you know it, O Lord. R

O let there be rejoicing and gladness 
for all who seek you.
Let them ever say, "The Lord is great," 
who long for your salvation.R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
हे प्रभो, तुझी वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत. सार्वकालिक जीवनाची वचने आपणांजवळ आहेत.
 आलेलुया!

Acclamation: 
 R. Alleluia, alleluia.
Stay awake at all times, praying that you may have strength to stand before the Son of Man.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक   १२:३५-३
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य."
येशू आपल्या शिष्यांस म्हणाला, तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लावलेले असू द्या. धनी लग्नाहून येऊन दार ठोकील तेव्हा आपण त्याच्यासाठी तात्काळ उघडावे म्हणून, तो परत येण्याची वाट पाहत असलेल्या माणसांसारखे तुम्ही असा. धनी आल्यावर जे दास जागृत असलेले त्याला आढळतील ते धन्य. मी तुम्हांला सत्य सांगतो की, तो आपली कंबर बांधून त्यांना जेवायला बसवील आणि येऊन त्यांची सेवा करील. तो रात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रहरी येईल तेव्हा जे त्याला असे आढळतील ते धन्य आहेत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 12:35-38

At this time: Jesus said to his disciples, "Stay dressed for action and keep your lamps burning, and be like men who are waiting for their master to come home from the wedding feast, so that they may open the door to him at once when he comes and knocks. Blessed are those servants whom the master finds awake when he comes. Truly, I say to you, he will dress himself for service and have them recline at table, and he will come and serve them. If he comes in the second watch, or in the third, and finds them awake, blessed are those servants!
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन: 
नित्य नवा दिस जागृतीचा' ह्या नियमानुसार माणसाने जीवनात सतत जागरूक आणि सतर्क असणे गरजेचे असते. आपल्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारींविषयी तर त्याने अधिकच सावध आणि जागृत असायला हवे कारण कधी काय होईल हे सांगता येत नाही. एखाद्याची परीक्षा असते, तो अभ्यासाविषयी चालढकल करीत "नंतर अभ्यास करू, सध्या मला थोडीविश्रांती घेऊ दे" किंवा "थोडीशी मौजमजा करू दे" असे म्हणतो. अचानक एखादा अपघात होतो, किंवा जवळच्या माणसाचा मृत्यू होतो, मग ह्या विद्यार्थ्यांची धावपळ ती काय वर्णावी? इस्राएलमध्ये लग्नाच्या वरातींना रात्री उशीर व्हायचा. एखादा घरधनी आपल्या चाकरांवर घरादाराची जबाबदारी सोपवून लग्नाला जायचा. त्याला यायला उशीर व्हायचा. अशा वेळेला आपल्या कंबरा बांधलेल्या आणि आपले दिवे लावलेले असू द्या असे येशू म्हणतो ह्याचा अर्थ हा घरधनी कोणत्याही क्षणाला दार ठोठावू शकतो. तत्क्षणी दार उघडण्याइतकी आपली तयारी असावी असे येशू शिकवितो. हे प्रतीक देवराज्याच्या आगमनासाठी,येशूच्या पुनरागमनासाठी, युगाच्या समाप्तीसाठीही वापरता येऊ शकते.
आपण सतत घाई, गडबडीत असतो असे आपल्याला जाणवते की संथ नदीप्रमाणे आपले जीवन सुरळीतपणे चाललेले आहे असा आपल्याला अनुभव येतो? आपल्या जीवनात आपण जास्त प्रमाणात सतर्क आणि जागृत असतो की बेफिकीर/बेसावध असतो ?

प्रार्थना :हे प्रभू येशू, जीवनात सतर्क व जागृत राहून तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या