Marathi Bible Reading | 29th week in ordinary Time | Wednesday 22nd October 2025

सामान्यकाळातील २९ वा सप्ताह 

बुधवार दि. २२ ऑक्टोबर २०२५

" ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागितले  जाईल.Everyone to whom much was given, of him much will be required,


 संत पोप जॉन पॉल २रे 
२२ ऑक्टोबर 
प्रभू येशू ख्रिस्ताठायी आपल्या सर्वांना जीवनदायी नीतिमत्व आणि  कृपा प्राप्त झाली आहे. आपले जीवन देवाच्या कृपेत वाढत राहावे आणि फलदायी बनावे म्हणून देवाने त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे अनेक वरदाने व कृपादाने आपल्याला दिली आहेत. आपल्या कृपादानांचा योग्य तो परिणाम आपल्या जीवनात दिसून यायला हवा म्हणून प्रभू येशू आपल्याला सतर्कतेचा इशारा देत आहे. देवाने आपल्या प्रत्येकाला आपल्या योग्यतेप्रमाणे कलागुण व वरदाने दिलेली आहेत. आपण त्यांचा योग्य तो वापर देवाच्या गौरवासाठी आणि परस्परसेवेसाठी करणे महत्वाचे आहे.
प्रभू येशू आज आपल्या प्रत्येकाला जागृत राहून आपल्या परमेश्वराठायी असलेल्या बांधिलकीची आठवण करून देत आहे. परमेश्वराने दिलेल्या विनामुल्य मात्र अनमोल दानांची परतफेड  आपल्याला करायची आहे.

प्रभू येशू आज स्पष्टपणे सांगत आहे की आपण जर देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलो नाही तर आपल्याला पुष्कळ फटके मिळतील. आपल्या कलागुणांचा व  धनसंपत्तीचा वापर देवाच्या कार्यासाठी कसा करता येईल ह्यावर आपण अंतर्मुख होऊन चिंतन करु या.  

पहिले वाचन :रोम.  ६:१२-१८
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा."

तुम्ही आपल्या शरीरवासनांच्या अधीन होऊ नये म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. तुम्ही आपले अवयव अनीतीचे साधने होण्याकरीता पापाला समर्पण करत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वत:स देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहा. म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही.
तर मग काय? आपण नियमशास्त्राधीन नसून कृपेच्या अधीन आहो म्हणून पाप करावे काय? कधीच नाही! आज्ञा पालनाकरिता ज्याला तुम्ही स्वतःला गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहा. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्त्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहा. ते तुम्हांला ठाऊक नाही काय? तुम्ही गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणीच्या पदरी तुम्हांला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्त्वाचे गुलाम झाला, म्हणून देवाची स्तुती असो.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Romans 6:12-18

Brethren: Let not sin reign in your mortal body, to make you obey
its passions. Do not present your members to sin as instruments for
unrighteousness, but present yourselves to God as those who have been brought from death to life, and your members to God as instruments for righteousness. For sin will have no dominion over you, since you are not under law but under grace. What then? 
Are we to sin because we are not under law but under grace? By no means! Do you not know that if you present yourselves to anyone as obedient slaves, you are slaves of the one whom you obey, either of sin, which leads to death, or of obedience, which leads to  righteousness? But thanks be to God, that you who were once slaves of sin have become obedient from the heart to the standard of teaching to which you were committed, and, having been free from sin, have become slaves of righteousness.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र प्रभूच्या नामामुळे आमचा उद्धार होतो.

१) आता इस्राएलने म्हणावे की, 
जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, 
लोक आमच्यावर उठले तेव्हा, 
जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, 
तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला 
त्यावेळी त्यांनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते.

२) जलांनी आम्हाला बुडवले असते, 
त्यांचा लोंढा आमच्या गळ्याशी आला असता, 
खळवळलेले लोंढे आमच्या गळ्याशी आले अंसते. 
परमेश्वर धन्यवादित असो. 
त्याने आम्हांला त्यांच्या दाढांत भक्ष्य म्हणून पडू दिले नाही.

३) आमचा जीव पक्ष्याप्रमाणे पारध्याच्या 
पाशातून मुक्त झाला आहे.
खरोखर पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहो. 
आकाश आणि पृथ्वी ह्यांचा निर्माणकर्ता 
परमेश्वर त्याच्या नावामुळे आमचा उद्धार होतो.

Psalm 124:1-3, 4-6, 7-8 
Our help is in the name of the Lord.

"If the Lord had not been on our side," 
let Israel say- "If the Lord had not been on our side
when people rose against us, 
then would they have swallowed us alive 
when their anger was kindled. R 

Then would the waters have engulfed us. 
the torrent gone over us; 
over our head would have swept 
the raging water 
Blest be the Lord who did not
a prey to their teeth, 

Our life, like a bird, has escaped 
from the snare of the fowler
Indeed, the snare has been becken 
and we have escaped 
Our help is in the name of the Lord 
who made heaven and earth.


जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
 आलेलुया!

Acclamation: 
 R. Alleluia, alleluia.
Stay awake, and be ready, the Son of Man is coming at an hour you a not expect
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक   १२:३९-४८
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

“ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल."

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, हे लक्षात घ्या की, अमक्या घटकेस चोर येईल हे घरधन्याला कळले असते तर त्याने आपले घर फोडू दिले नसते. तुम्हीही सिद्ध असा, कारण तुम्हांला वाटणार नाही त्या घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. तेव्हा पेत्राने म्हटले, प्रभो, हा दाखला आपण आम्हालाच सांगता की, सर्वांना? तेव्हा प्रभू म्हणाला, आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधासामुग्री द्यावयास धनी ज्याला नेमील असा विश्वासू आणि विचारशील कारभारी कोण? त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य. मी तुम्हांस खरे सांगतो की, त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमील. परंतु आपला धनी येण्यास उशीर लागेल असे आपल्या मनात ठरवून तो दास चाकरांना आणि चाकरिणींना मारहाण करू लागेल आणि खाऊन पिऊन मस्त होईल. मग तो वाट पाहत नाही अशा दिवशी आणि त्याला ठाऊक नाही अशा घटकेस त्याचा धनी येऊन त्याला कापून टाकील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याची जागा नेमील. आपल्या धन्याची इच्छा काय आहे हे माहीत असता ज्या दासाने तयारी केली नाही किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे केले नाही त्याला पुष्कळ फटके मिळतील, व ज्याने फटके मिळण्याजोगी कृत्ये माहीत नसता केली त्याला थोडे मिळतील. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्याजवळून पुष्कळच अपेक्षिले जाईल
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 12:39-48

At this time: Jesus said to his disciples. "Know this, that if the master of the house had known at what hour the thief was coming, he would not have left his house to be beken into. You also must be ready, for the Son of Man is coming at an hour you do not expect Peter said, "Lord, are you telling this parable for us or for all!" And the Lord said, "Whe then is the faithful and wise manager, whom his master will set over his household, to ge them their portion of food at the proper time! Blessed is that servant whom his master will find so doing when he comes. Truly, say to you, he will set him over all his possessions But if that servant says to himself, 'My master is delayed in coming, and begins to beat the male and female servants, and to eat and drink and get drunk, the master of that senant will come on a day when he does not expect him and at an hour he does not kn and will cut him in pieces and put him with the unfaithful. And that servant who knew his master's will but did not get ready or act according to his will, will receive a sever beating. But the one who did not know, and did what deserved a beating, will receive light beating. Everyone to whom much was given, of him much will be required, and from him to whom they entrusted much, they will demand the more.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:  
ख्रिस्तसभा आज संत जॉन पॉल दुसरे ह्यांची स्मृती साजरी करीत आहे. त्यांनी १९७८ ते २००५ पर्यंत २८ वर्षे पोप महोदय म्हणून ख्रिस्तसभेची धुरा वाहिली. यात्रेकरू पोप म्हणून जगातील कितीतरी देशांना त्यांनी भेटी दिल्या. आजच्या शुभवर्तमानातील विश्वासू सेवकासारखी त्यांनी ख्रिस्तसभेची इमाने इतबारे सेवा केली. ते स्वतःला सेवकांचा सेवक म्हणायचे. मदर तेरेजा आणि दलाई लामा ह्या धार्मिक नेत्यांबरोबरच त्यांनी जगातील अनेक राजकीय नेत्यांना आपलेसे करून जगात शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. दुर्दैवाने आजच्या शुभवर्तमानातील उर्वरित तीन प्रकारच्या चाकरांसारखे सेवकनेते आज जगात आहे. अविश्वासू चाकरांसारखे ते स्वतःची तुंबडी भरून घेत सोबतीच्या चाकरांना अपमानकारक वागणूक देत आहेत. काही तर परमेश्वराची इच्छा काय आहे आणि आपल्या लोकांना काय हवे आहे हे ठाऊक असूनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत. काही जण केवळ अज्ञानापोटी चुकीचे वर्तन करीत आहेत. अशा तिन्ही प्रकारच्या लोकांना स्वर्गीय आनंद मिळूच शकत नाही उलट दुःख आणि त्रासच त्यांच्या वाटेल आयेणार आहे असे भाकीत येशू करतो.

वरील चारपैकी मी कोणत्या प्रकारच्या वर्गात मोडत आहे ?
प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या सर्व कृपादानांबद्दल तुला धन्यवाद, तुझ्या इच्छेप्रमाणे फलदायी जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या