Marathi Bible Reading | 30th week in ordinary Time | Monday 27 th October 2025

सामान्यकाळातील ३० वा सप्ताह 

सोमवार  दि. २७ ऑक्टोबर २०२५

ही तर आब्राहामची कन्या आहे. पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते.
The Spirit himself bears witness with our spirit that we are children of God,

संत फ्रुमेन्शिअस

- महागुरू, वर्तनसाक्षी (३०८-३८०) 

प्रभू येशू अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेल्या एका स्त्रीला बंधनातून मुक्त करीत आहे.  प्रभू येशू सर्व प्रकारच्या  आजारांतून, विकारांतून, समस्यातून व बंधनातून मुक्त करणारा प्रभू आहे. प्रभू  येशूला काहींच अशक्य नाही. प्रभू त्याचे सामर्थ्य, गौरव आणि कृपा प्रकट करीत असताना काळ, वेळ, दिवस, गरीब, श्रीमंत अथवा पापी व पुण्यवान असे काहींच पाहत नाही तर, प्रभू केवळ त्याची करुणा व दया ह्यांचा वर्षाव सर्वांवर  करतो. प्रभू येशूच्या स्पर्शात, वचनात व नावात विकारमुक्त करण्याचे सामर्थ्य  आहे. आजसुध्दा प्रभूच्या दयेने व कृपेने अनेक आजार व समस्यांतून लोकांना मुक्ती मिळत आहे. अनेक प्रबोधन शिबीरे, प्रार्थनासभा व पवित्र आत्म्याठायी नवजीवन प्रार्थनांमध्ये प्रभूच्या नावाने अनेकांचे आजार, विकार व समस्या ह्यांतून मुक्ती मिळत आहे.

पहिले वाचन :रोम ८:१२-१७
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन ८:१२-१७
"आपण 'अब्बा, बापा,' अशी हाक मारावी असा दत्तकपणाचा आत्मा आपल्याला मिळाला आहे.”

बंधुजनहो, आपण ऋणी आहो खरे, तरी देहस्वभावाप्रमाणे जगण्यास देहस्वभावाचे ऋणी नाही. कारणजर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मराल परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे नष्ट केलीत तर जगाल. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला नाही, तर ज्याच्या योगे आपण "अब्बा, बापा," अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हांला मिळाला आहे. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो आणि जर मुले तर वारसही आहो, म्हणजे देवाचे वारस ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारस असे आहो, आपल्याला त्याच्याबरोबर गौरव प्राप्त व्हावा म्हणून त्याच्याबरोबर जर दुःख भोगत असलो तरच.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Romans 8:12-17
So then, brothers, we are debtors, not to the flesh, to live according to the flesh. For if you live according to the flesh you will die, but if by the Spirit you put to death the deeds of the body, you will live. For all who are led by the spirit of God are sons of God. For you did not receive the spirit of slavery to fall back into fear, but you have received the spirit of adoption as sons, by whom we cry, Abba! Father!" The Spirit himself bears witness with our spirit that we are children of God, and if children, then heirs - heirs of God and fellow heirs with Christ, provided we suffer with him in order that we may also be glorified with him. "
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ६७: २,४,६-७, २०-२१
प्रतिसाद :  आमचा देव आम्हाला संकटातून मुक्त करणारा देव आहे.

१) देवाने उठावे, त्याच्या शत्रूंची दाणादाण व्हावी. 
त्याचा द्वेष करणारे त्याच्यापुढून पळोत. 
परंतु नीतिमान हर्ष करोत, 
देवापुढे आनंदोत्सव करोत, 
हर्षामुळे आनंद करोत.

२) पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी 
असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे. 
एकाकी लोकांना देव घरदार देतो, 
बंदिवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो

३) प्रभू धन्यवादित असो, 
तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो.
तोच आमचा मुक्तिदाता आहे आमचा देव 
आम्हाला संकटातून मुक्त करणारा देव आहे.


Psalm 68:2 and 4, 6-7ab, 20-21
This God of ours is a God who saves. 

Let God arise; let his foes be scattered.
Let those who hate him flee from his presenc 
But the just shall rejoice at the presence of God; 
they shall exult with glad rejoicing. R

Father of orphans, defender of widows: 
such is God in his holy place.
God gives the desolate a home to dwell in; 
he leads the prisoners forth into prosperity. R 

Day after day, may the Lord be blest. 
He bears our burdens; God is our saviour. 
This God of ours is a God who saves. 
The Lord our Lord provides an escape from death. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
प्रभू म्हणतो, मी तुम्हांला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
 आलेलुया!

Acclamation: 
 R. Alleluia, alleluia.
 Your word, O Lord, is truth; sanctify us in the truth.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   लूक  १३:१०-१७
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "ही तर आब्राहामची कन्या आहे, शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय ?"
येशू शब्बाथ दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. तेव्हा अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती, ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले आणि म्हटले, "बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस." त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली आणि देवाचा महिमा वर्णू लागली. येशूने शब्बाथ दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाला, "ज्यात काम केले पाहिजे असे सहा दिवस आहेत. तर त्या दिवसांत येऊन बरे होऊन जात जा, शब्बाथ दिवशी येऊ नका.” परंतु प्रभूने त्याला उत्तर दिले, "अहो ढोंग्यांनो, तुम्हांपैकी प्रत्येकजण आपला बैल किंवा गाढव शब्बाथ दिवशी गोठ्यातून सोडून ण्यावर नेतो ना? ही तर आब्राहामची कन्या आहे. पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते. शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय?" तो हे बोलत असता त्याचे सर्व विरोधी लज्जित झाले आणि जी गौरवयुक्त कृत्येत्याच्याकडून होत होती त्या सर्वामुळे सर्व लोकसमुदायाला आनंद झाला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading : Luke 13:10-17

At that time: Jesus was teaching in one of the synagogues on the Sabbath. And behold, there was a woman who had had a disabling spirit for eighteen years. She was bent over and could not fully straighten herself. When Jesus saw her, he called her over and said to her, "Woman, you are freed from your disability." And he laid his hands on her, and immediately she was made straight, and she glorified God. But the ruler of the synagogue, indignant because Jesus had healed on the Sabbath, said to the people, "There are six days in which work ought to be done. Come on those days and be healed, and not on the Sabbath day." Then the Lord answered him, "You hypocrites! Does not each of you on the Sabbath untie his ox or his donkey from the manger and lead it away to water it? And ought not this woman, a daughter of Abraham whom Satan bound for eighteen years, be loosed from this bond on the Sabbath day?" As he said these things, all his adversaries were put to shame, and all the people rejoiced at all the glorious things that were done by him.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:  
आजच्या शुभवर्तमानात येशू एका कुबड्या स्त्रीला शब्बाथ दिवशी बरे करतो. त्या स्त्रीला विकाराचा आत्त्मा लागलेला होता असे लूक म्हणतो कारण त्यावेळी माणसाचे पुष्कळसे आजार दुष्ट शक्तीच्या प्रभावामुळे होत असतात असा समज होता. येशू त्यावेळी त्या सभास्थानात शिकवीत होता. येशू आपली शिकवण थांबवितो. शब्बाथ असूनही त्या स्त्रीला बरे करतो. ती स्त्री अठरा वर्षे आजारी होती. येशूच्या स्पर्शाने बरे होताच ती स्त्री येशूचे आभार मानीत नाही तर देवाचा महिमा वर्ण लागते. दुर्दैवाने एवढा मोठा चमत्कार होऊनही सभास्थानाचा अधिकारी येशूला उद्देशून नव्हे तर लोकांना उद्देशून म्हणतो की त्यांनी आठवड्यातील इतर दिवशी तिथे येऊन बरे व्हावे. खरे पाहता शब्बाथ हा दिवस इस्राएलची इजिप्तमधून जी मुक्तता झालेली होती त्याच्या स्मरणार्थ साजरा केला जात होता. येशू म्हणतो शब्बाथ दिवशी आपल्या गोठ्यातील बैल किंवा गाढव पाण्यावर नेण्याची सूट त्यांना देण्यात आलेली आहे. ही स्त्री तरआब्राहामची कन्या आहे. (पुढे येशू जक्कयविषयीदेखील असेच बोलणार आहे: "हाही अब्राहामाचा पुत्र आहे.") कुबडी असूनही ती स्त्री त्या दिवशी सभास्थानातील प्रार्थनेला आलेली होती. ह्याचाच अर्थ श्रद्धाळू माणसाने परिपूर्ण स्वातंत्र्य अनुभवावे अशी साक्षात देवाची इच्छा आहे. त्याने सैतानाच्या बंधनात राहावे हे देवाला आवडणारे नाही.
आज माणसाला कोणकोणत्या गोष्टी सैतानाच्या बंधनात ठेवीत आहेत ? देव आपल्याला देऊ करीत असलेले स्वातंत्र्य अनुभवण्यात आज कोणकोणते अडथळे आहेत ?

प्रार्थना : प्रभू येशू, तुझ्या कृपेचा स्पर्श अनुभवण्यास आम्हाला तुझ्या दयेच्या छत्राखाली येण्यास प्रेरणा दे, आमेन.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या