Marathi Bible Reading | 30th week in ordinary Time | Tuesday 28th October 2025

सामान्यकाळातील ३० वा सप्ताह 

मंगळवार दि. २८ ऑक्टोबर २०२५

येशू प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला. 
Jesus went out to the mountain to pray, and all night he continued in prayer to God.

संत सायमन व ज्यूड 
-प्रेषित, रक्तसाक्षी (१ ले शतक)

शिमोन कनानी  : खरे पाहता येशूचा एक शिष्य सायमन अथवा शिमोन ह्याच्याविषयी इतिहासात फारशी माहिती कुठेही उपलब्ध नाही. त्याला जिलोत म्हटलेला सिमोन (लूक ६:१५) किंवा शिमोन कनानी (मार्क ३:१८) असे म्हटलेले आहे. येशूने पुकारलेल्या प्रेषितांच्या यादीमध्ये शक्यतो त्याचा क्रम अकरावा लागलेला आढळतो. जिलोत ह्या नावावरून एक तर त्याला मोशेच्या नियमशास्त्राची इतकी आवड असेल की त्याला वकील किंवा कायदेतज्ज्ञ म्हणून समाजात मान्यता मिळालेली असेल अथवा रोमच्या अवजड जोखडाखालून मुक्त होण्यासाठी बंड पुकारणाऱ्या देशभक्त झिलट किंवा जिलोत पंथाशी तो संबंधित असावा. ग्रीक आणि कॉप्टिक लोकांच्या परंपरेनुसार सिमोन हा काना येथील लग्नामध्ये वरपक्षाचा होता. अथवा खुद्द वर होता. तेथे येशूने आपला पहिला चमत्कार केला.

पुढे सिमोनने येशूची सुवार्ता कुठे पसरविली, तो कुठे रक्तसाक्षी झाला त्याचे थडगे कुठे आहे ह्याविषयी इतिहासात कोणताही साक्षीपुरावा उपलब्ध नाही. कातडे कमावणारे व लाकूडतोड करणारे यांचा तो आश्रयदाता संत मानला जातो.
संत ज्यूड : प्रभूचा भाऊ समजला जाणारा धाकटा याकोव ह्याचा ज्यूड हा भाऊ मानला जातो. म्हणजेच तो येशूचा चुलत भाऊ होय. ज्यूड तद्दय किंवा यहुदा ह्याने नव्या करारात एक पत्र लिहिलेले आहे. संत ऑरिजेन ह्या धर्मपंडिताच्या म्हणण्यानुसार यहुदाने अगदी मोजक्या ओळीत फार मोठे धर्मतत्त्वज्ञान सांगितलेले आहे.
अखेरच्या भोजनाच्या वेळी ह्याच यहुदाने येशूला विचारले, “आपण स्वत: केवळ आम्हा शिष्यांनाच ह्या गोष्टी का सांगता? संपूर्ण जगाला का सांगत नाहीत?" तेव्हा तो त्यांना म्हणाला, "माझ्या आज्ञा पाळून माझ्याशी विश्वासू राहणाऱ्यांनाच मी प्रकट होत असतो” (योहान १४:२२).
संत ज्यूडने विशेषत: पॅलेस्टाईन येथे येशूची सुवार्ता पसरविली त्यानंतर तो पर्शिया व आर्मेनिया या ठिकाणी गेला व रक्तसाक्षी झाला.
पुढे डोमिशियन राजाने संत ज्यूडच्या नातवंडांना गालिलातून रोममध्ये पकडून आणले; परंतु जेव्हा ते राजकीय विरोधक नाहीत हे राजाला कळले तेव्हा त्याने त्यांना सोडून दिले.
संत ज्यूड हा हॉस्पिटलचा आणि निराशग्रस्तांचा आश्रयदाता संत मानला जातो. झांशी ह्या ठिकाणी त्याचे तीर्थस्थान आहे. वसईतील निर्मळ येथे डोंगरमावलीच्या शेजारी त्याची इमाज निराशग्रस्तांना आधार देत उभी आहे. अलिकडे त्याची भक्ती अधिक लोकप्रिय होत आहे.

पहिले वाचन : इफिसकरांस ६:१०-२०

वाचन :पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
 "वाईट दिवसात तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा."

प्रभूमध्ये त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. 
सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्ताधाऱ्यांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्यांच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. ह्या कारणास्तव तुम्हाला वाईट दिवसांत प्रतिकार करता यावा आणि सर्व काही केल्यावर टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामुग्री धारण करा. तर मग आपली कंबर सत्याने कसा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा आणि ह्या सर्वांबरोबरच जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हांला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या आणि उभे राहा. तारणाचे शिरस्त्राण आणि आत्म्याची तरवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या. सर्व प्रकारची प्रार्थना आणि विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने आणि सर्व पवित्र जनांसाठी विनवणी करत जागृत राहा, ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे, तिचे रहस्य उघडपणे कळविण्यासाठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावे आणि जसे बोलायला हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे म्हणून माझ्यासाठी विनवणी करा.
प्रभूचा शब्द. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Ephesians 2:19-22
Brethren: You are no longer strangers and aliens, but you are fellow citizens with the saints and members of the household of God, built on the foundation of the apostles and prophets, Christ Jesus himself being the cornerstone, in whom the whole structure, being joined together, grows into a holy temple in the Lord. In him you also are being built together into a dwelling place for God by the Spirit.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र   १९:२-५

प्रतिसाद :  निशीदिनी त्यांचा स्वर पृथ्वी व्यापतो.

१) आकाश देवाचा महिमा वर्णिते, 
अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. 
रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.
दिवस दिवसाशी संवाद करतो,

२) वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, 
तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी व्यापतो, 
त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात.

Psalm 19:2-3, 4-5

Their sound goes forth through all the earth.

The heavens declare the glory of God, 
and the firmament proclaims the work of his hands. 
Day unto day conveys the message.
and night unto night imparts the knowledge. R

No speech, no word, whose voice goes unheeded; 
their sound goes forth through all the earth.
 their message to the utmost bounds of the world. R 

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया!  
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे,
माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही
 आलेलुया!

Acclamation: 
 R. Alleluia, alleluia.
 We praise you, O God, we acclaim you as Lord; the glorious company of Apostles praise you
R. Alleluia, alleluia.


शुभवर्तमान   लूक  ६:१२-१६
वाचक : लूकलिखित  पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

"येशूने आपल्या शिष्यांमधून बारा जणांना निवडून त्यांस प्रेषित असे नाव दिले. "
येशू प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यातून पुढील बाराजणांना निवडून त्यांना प्रेषित असे नावही दिले : शिमोन, ह्याला त्याने पेत्र हेही नाव दिले आणि त्याचा भाऊ आंद्रेया, याकोब, योहान, फिलीप, बार्थोलोम्यू, मत्तय, थॉमस, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन, याकोबाचा मुलगा यहूदा आणि जो पुढे विश्वासघातकी निघाला तो यहुदा इस्कर्योत.
प्रभूचे हे शुभवर्तमान
 हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.सर्व :

Gospel Reading : Luke 6:12-19

In those days Jesus went out to the mountain to pray, and all night he continued in prayer to God. And when day came, he called his disciples, and chose from them twelve, whom he named apostles: Simon, whom he named Peter, and Andrew his brother, and James and John, and Philip, and Bartholomew, and Matthew, and Thomas, and James the son of Alphaeus, and Simon who was called the Zealot, and ludas the Ison of James, and Judas Iscariot, who became a traitor. And he came down with them and stood on a level place, with a great crowd of his disciples and a great multitude of people from all Judea and Jerusalem and the sea coast of Tyre and Sidon, who came to hear him and to be healed of their diseases. And those who were troubled with unclean spirits were cured. And all the crowd sought to touch him, for power came out from him and healed them all.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

चिंतन:  
ख्रिस्तसभा आज संत सायमन आणि संत ज्यूड ह्या दोन प्रेषितांचा सण साजरा करीत आहे.

संत सायमन ह्याचे नाव शिमोन कनानी किंवा जिलोत म्हटलेला शिमोन म्हणून शुभवर्तमानामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. जिलोत ह्या शब्दाचे दोन अर्थ होऊ शकतातः आवेशी किंवा हिंसाचारी. एक तर तो मोशेच्या नियमशास्त्राविषयी आवेशी असावा किंवा इस्त्राएलमध्ये हिंसेच्या मार्गाने रोमन सत्ता उलथून टाक पाहणाऱ्या राष्ट्रीय संघटनेचा तो सभासद असावा. दुसरी शक्यता जर अधिक विश्वासार्ह असेल तर एका हिंसाचारी व्यक्तीचे येशूसारख्या शांतिप्रिय व्यक्तीशी सख्य जुळणे हाच मोठा चमत्कार आहे. ग्रीक आणि कॉप्टिक ख्रिस्ती लोकांमध्ये अशी एक परंपरा आहे की शिमोन कनानी हा काना येथील लग्नात वर म्हणून होता. तेथील चमत्कारानंतर तो येशूच्या मागे आला. तो लाकडतोडये आणि चांभार ह्यांचा आश्रयदाता आहे. संत ज्यूड हा तद्दय ह्या नावाने देखील ओळखला जातो. त्याने पॅलेस्टाईन मध्ये सुवार्ता सांगितली. कालांतराने तो संत सायमन ह्यांच्यासह पर्शिया आणि आर्मेनिया येथे गेला तिथेच दोघांना रक्तसाक्षीत्वाचे मरण आले. तो निराशाग्रस्तांचा आश्रयदाता आहे. भारतात झाँशी येथे त्याचे तीर्थक्षेत्र आहे.

येशूचे शिष्यत्व मी कितपत स्वीकारलेले आहे? अजूनही मी कोणाकोणाला सुवार्ता सांगायला हवी असे मला वाटते?

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझी संतगणाद्वारे आम्हाला प्रेरणा मिळते तुझे  सुवार्ताकार्य करण्यास आम्हाला कृपा व शक्ती दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या