Marathi Bible Reading | Thursday 12th February 2026 | 5th Week in ordinary Time

सामान्यकाळातील ५वा  सप्ताह

गुरुवार   दि १२ फेब्रुवारी  २०२६

  ✝️ 

ती आपल्या घरी गेली, तो मुलीला अंथरुणावर टाकले आहे आणि भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले.
And she went home and found the child lying in bed and the demon gone.
✝️

संत गौडेन्शिअस
महागुरू, वर्तनसाक्षी (३६०-४२७)
✝️
प्रभू येशू दयाळू आणि कृपाळू आहे, मात्र त्यावरील श्रद्धेच्या कसोटीत । | आपण उत्तीर्ण व्हायला हवे. आपल्याला जीवनात स्वास्थ्य हवे असते, सुख हवे असते, बंधनातून मुक्तता हवी असते, आणि त्यासाठी आपण प्रभू येशू कडून चमत्काराची अपेक्षा करीत असतो. चमत्कार घडून येण्यासाठी मन परिवर्तनाची आणि देवावरील दृढश्रद्धेची गरज असते. प्रभू येशूच्या सहवासात जाण्याची त्यावरील आपली श्रद्धा, भक्ती आणि कृती वेळोवेळी तपासून पहायला हवी. आपण अनेकदा खऱ्या ख्रिस्ती जीवनापासून बहकतो. जसे आजच्या पहिल्या वाचनात शलमोनाने अन्य देवनांची पुजा केली व अमंगळ कृत्य केले, तसे आपण सुद्धा अन्य धर्मियां प्रमाणे केवळ जादू-टोणा, चमत्काराची अपेक्षा करतो.प्रभू येशू मात्र आपल्या श्रद्धेची कसोटी घेत असतो. आपल्यातील दुष्ट प्रवृत्ती व अंधश्रद्धा ह्या अंधकारातून बाहेर पडता यावे  व खरे ख्रिस्त जीवन आचरण करता यावे म्हणून श्रद्धेत दृढबनू या.

पहिले वाचन १ राजे ११:४ - १३
वाचक :राजाच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तू करार पाळला नाहीस म्हणून मी तुझे राज्य तुझ्यापासून तोडून घेईन. माझा सेवक दावीद याच्या प्रीत्यर्थ तुझ्या पुत्राच्या हाती मी एक वंश राहू देईन. 

शलमोन म्हातारा झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याचे मन अन्य देवांकडे वळवले; त्याचा बाप दावीद याचे मन परमेश्वराकडे पूर्णपणे असे त्याप्रमाणे त्याचे नसे. सिदोन्यांची देवी अष्टोरेथ आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम यांच्या नादी शलमोन लागला. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते शलमोनने केले, त्याचा बाप दावीद याच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही. तेव्हा शलमोनने येरुशलेमच्या समोरील पहाडावर मवाबचे अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मोलख यांच्यासाठी एकएक उंच स्थान बांधले. ज्या विदेशी स्त्रिया आपआपल्या दैवताला धूप दाखवीत आणि यज्ञ करीत त्या सर्वांसाठी त्याने अशीच व्यवस्था केली.
शलमोनचे मन इस्राएलचा देव परमेश्वर याच्याकडून फ़िरले म्हणून परमेश्वर त्याच्यावर कोपला; त्याला त्याचे दोनदा दर्शन झाले होते. त्याला या बाबतीत आज्ञा केली होती की अन्य देवांच्या नादी लागू नको; पण परमेश्वराने केलेली ही आज्ञा त्याने पाळली नाही. यास्तव परमेश्वर शलमोनला म्हणाला, “माझा करार आणि मी तुला लावून दिलेले नियम न पाळता हे असे आचरण तू केले त्याअर्थी मी तुझे राज्य तुझ्यापासून तोडून घेऊन तुझ्या एका सेवकाला देईन; पण तुझा बाप दावीद याच्याप्रीत्यर्थ तुझ्या हयातीत मी असे करणार नाही, तर तुझ्या पुत्राच्या हातून राज्य तोडून घेईन. तरी मी सगळेच राज्य तोडून घेणार नाही; माझा सेवक दावीद याच्याप्रीत्यर्थ आणि मी निवडलेल्या येरुशलेमप्रीत्यर्थ तुझ्या पुत्राच्या हाती मी एक वंश राहू देईन." 
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading 1 Kings 11:4-13

When Solomon was old his wives turned away his heart after other gods. and his heart was not wholly true to the Lord his God, as was the heart of David his father. For Solomon went after Ashtoreth the goddess of the Sidonians, and after Milcom the abomination of the Ammonites. So Solomon did what was evil in the sight of the Lord, and did not wholly follow the Lord, as David his father had done. Then Solomon built a high place for Chemosh the abomination of Moab, and for Molech the abomination of the Ammonites, on the mountain east of Jerusalem. And so he did for all his foreign wives, who made offerings and sacrificed to their gods. And the Lord was angry with Solomon, because his heart had turned away from the Lord, the God of Israel, who had appeared to him twice and had commanded him concerning this thing that he thing should not go after other gods. But he did not keep what the Lord commanded. Therefore the Lord said to Solomon, "Since this has been your practice and you have not kept my covenant and my statutes that I have commanded you, I will surely tear the kingdom from you and will give it to your servant. Yet for the sake of David your father I will not do it in your days, but I will tear it out of the hand of your son. However, I will not tear away all the kingdom, but I will give one tribe to your son, for the of David my servant and for the sake of Jerusalem, which I have chosen."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद  स्तोत्र १०६:३-४,३५-३७,४०
प्रतिसाद :  हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस, तेव्हा माझी आठवण कर.

१) जे त्याच्या न्यायानुसार वागतात आणि 
सर्वदा नीती आचरतात ते धन्य! 
हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस,
तेव्हा माझी आठवण कर.

२) तर ते त्या राष्ट्रात मिसळले आणि 
त्यांचे आचार शिकले. 
त्यांनी त्यांच्या मूर्तीची पूजा केली, 
त्या त्यांना पाशरूप झाल्या

३) त्यांनी आपले पुत्र आणि कन्या 
ह्यांचे बळी भूतांना दिले. 
त्यामुळे परमेश्वराचा कोप 
त्याच्या लोकांवर भडकला;

Psalm 106:3-4, 35-37 & 40 
R  O Lord, remember us with the favour you show to your people. 

Blessed are they who observe what is just,
 who at all times do what is right.
O Lord, remember me 
with the favour you show to your people. 
Visit me with your saving power. R

 Instead they mingled with the nations, 
and learned to act as they did.
They also served their idols,
and these became a snare to entrap them.

They even offered their sons and 
their daughters in sacrifice to demons
Then God's anger blazed against his people 
he was filled with horror at his heritage. R


जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
 हे प्रभो, तुझी वचने आत्मा आणि 
जीवन अशी आहेत. सार्वकालिक जीवनाची 
वचने आपणाजवळ आहेत.
  आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
Receive with meekness the implanted word, which is able to save your souls.
Alleluia, alleluia.
शुभवर्तमान   मार्क ७:२४-३०
वाचक :मार्कलिखितपवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 “घरची कुत्रीही मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात."

 गनेसरेत येथून निघून येशू सोर प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला. हे कोणाला कळू नये असे त्याच्या मनात होते, तरी त्याला गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका बाईने त्याच्याविषयी लागलेच ऐकले आणि ती येऊन त्याच्या पाया पडली. ती बाई हेल्लेणी असून सुरफूनीकी जातीची होती. तिने त्याला विनंती केली “माझ्या मुलीतून भूत काढा." तो तिला म्हणाला, “मुलांना प्रथम तृप्त होऊ दे, कारण मुलांची भाकरी घेऊन घरच्या कुत्र्यांना टाकणे ठीक नाही." यावर तिने उत्तर दिले, “खरे आहे महाराज, तरी घरची कुत्रीही मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.” तो तिला म्हणाला, “तुझे म्हणणे पटले, जा; तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे." मग ती आपल्या घरी गेली, तो मुलीला अंथरुणावर टाकले आहे आणि भूत निघून गेले आहे असे तिला आढळून आले.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Mark 7:24-30
At that time; Jesus arose and went away to the region of Tyre and Sidon. And he entered a house and did not want anyone to know, yet he could not be hidden. But immediately a woman, whose little daughter had an unclean spirit heard of him and came and fell down at his feet. Now the woman was a Gentile, a Syrophoenician by birth. And she begged him to cast the demon out of her daughter. And he said to her, "Let the children. be fed first, for it is not right to take the children's bread and throw it to the dogs." But she answered him, "Yes, Lord; yet even the dogs under the table eat the children's crumbs." And he said to her, "For this statement you may go your way; the demon has left your daughter." And she went home and found the child lying in bed and the demon gone.
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआजच्या सुवार्तेत आपण एका सुरफूनिकी स्त्रीला भेटतो. ही स्त्री यहुदी नव्हती, पण तिचा विश्वास अतुलनीय होता. तिच्या मुलीच्या आरोग्यासाठी ती येशूकडे धाव घेते, आणि येशूची कठोर चाचणीही ती नम्रतेने स्वीकारते. तिचा विश्वास तिच्या शब्दांत झळकतोः "हो प्रभू, पण कुत्र्यांनाही मेजाखाली पडणारे तुकडे मिळतात." तिच्या नम्रतेने आणि विश्वासाने ती येशूचे हृदय जिंकन घेते.
हा प्रसंग आपल्याला शिकवतो की खरा विश्वास कधीच थांबत नाही; तो नम्रतेतून शक्ती मिळवतो आणि चिकाटीने कृपेचे दरवाजे उघडतो. प्रार्थनाः प्रभू, मला या स्त्रीसारखा अढळ, नम्र आणि धैर्यशील विश्वास दे. माझ्या विश्वासाला तुझ्या कृपेने उत्तर दे.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, श्रद्धेत वाढण्यास व तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास मला प्रेरणा व शक्ति दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या