Marathi Bible Reading | Wednesday 11th February 2026 | 5th Week in ordinary Time

सामान्यकाळातील ५ वा  सप्ताह

बुधवार   दि ११ फेब्रुवारी  २०२६

“हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा.” 
"Do whatever he tells you."
✝️


 लुर्ड्सची माता  धन्य कुमारी पवित्र  मरियेचा सण 
 ✝️   

ख्रिस्तसभा आज पवित्र मरियेने लुर्डस् येथील तिचा सन्मानदिन साजरा करीत आहे.  काना गावातील प्  मरियेची भूमिका अखिल मानवावरील प्रेमाचे उत्तम उदाहरण आहे. अडचणीत आलेल्या घरधन्याच्या मदतीला मरिया माता धावून आली. तिच्या पुत्रापाशी मरीयेने विनंती केली आणि कानागावी पाण्याचा द्राक्षरस झाला. . पवित्र मरिया आपल्या सर्वांसाठी तिच्या पुत्रापाशी विनंती करीत  म्हणते, '(प्रभू येशू) हा तुम्हाला जे सांगले ते करा. प्रभू येशू शिकवण, वचने व आज्ञा आपण आचरणात आणण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपण पवित्र मरिये जवळ गेल्यावर ती आपल्याला येशूकडे जाण्यास सांगते. आपण  मरिया माता सांगते त्याप्रमाणे येशू जवळ जाऊ या. त्याची आज्ञा व वचने पाळू या.  पवित्र जपमाळेचा संदेश आपल्या जीवनात उतरवू या आणि आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक प्रार्थनेत जपमाळेच्या प्रार्थनेला प्राधान्य देऊ या. गरजवंतांच्या सहायाला धावून जाणे म्हणजेच मरियेमातेचा सन्मान करणे होय.

पहिले वाचन यशया ६६:१० -१४
वाचक :यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"पाहा, नदीप्रमाणे शांती मी तिच्याकडे वाहवितो."

“येरुशलेमबरोबर आनंद करा, तिच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिच्यामुळे उल्हासा, तिच्यासाठी शोक करणारे तुम्ही सर्व तिच्याबरोबर अत्यंत हर्षित व्हा, म्हणजे तुम्ही तिचे स्तन चोखून तृप्त व्हाल, सांत्वन पावाल आणि तिचे विपुल वैभव भोगून संतुष्ट व्हाल."
कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, नदीप्रमाणे शांती आणि पाण्याच्या पुराप्रमाणे राष्ट्रांचे वैभव मी तिच्याकडे वाहवितो. तुम्ही स्तनपान कराल, तुम्हांला कडेवर वागवतील, मांडीवर खेळवतील.
जशी एखाद्याची आई त्याचे सांत्वन करते तसे मी तुमचे सांत्वन करीन, येरुशलेममध्ये तुमचे सांत्वन करीन. ते पाहून तुमचे हृदय आनंदित होईल, कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडे तरतरीत होतील, परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठायी प्रकट होईल.”
 प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading Isaiah:66: 10-14 
Rejoice with Jerusalem; be glad for her,all you that love this city!
Rejoice with her now, all you that have mourned for her!
11 You will enjoy her prosperity, like a child at its mother's breast.
12 The LORD says, "I will bring you lasting prosperity; the wealth of the nations will flow to you like a river that never goes dry. You will be like a child that is nursed by its mother, carried in her arms, and treated with love. 131 will comfort you in Jerusalem, as a mother comforts her child. 14 When you see this happen, you will be glad; it will makeyou strong and healthy. Then you will know that I, the LORD, help those who obey me, and I show my anger against my enemies."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद   स्तोत्र यहूदीथ १३:१८-१९
प्रतिसाद :  प्रभू देव धन्य! त्यानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली! 
१)"मुली परात्पर देवाने पृथ्वीवर साऱ्या 
स्त्रियांमध्ये तुला धन्य केले आहे. 
प्रभू देव धन्य! त्यानेच स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली! 
आपल्या शत्रूचे शीर तोडण्यास त्यानेच तुला मार्गदर्शन केले.

२) देवाचे सामर्थ्य आठवीत असताना 
लोकांच्या मनात तू निर्माण केलेली
 आशा कधीच मावळणार नाही.


: Psalms Judith 13:18–20
18 And Uzziah said to her, “O daughter, you are blessed by the Most High God above all women on earth; 
and blessed be the Lord God, who created the heavens 
and the earth, who has guided you to strike the head of the leader of our enemies. 

19 Your hope will never depart from the hearts of men, 
as they remember the power of God. 

20 May God grant this to be a perpetual honor to you,
 and may he visit you with blessings, because you did not spare your own life when our nation was brought low, 
but have avenged our ruin, walking in the straight path before our God.” 
And all the people said, “So be it, so be it!”

जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
 तेव्हां मरीया म्हणाली :
'माझा जीव प्रभूला' थोर मानितो आणि 
'देव जो माझा तारणारा' त्याच्या मुळे माझा आत्मा 'उल्हासला आहे;
 आलेलुया!

Acclamation: 
Alleluia: Psalms 119: 36, 29b
R. Alleluia, alleluia.
36, 29b Incline my heart, O God, to your decrees; and favor me with your law.
R. Alleluia, alleluia.


शुभवर्तमान   योहान  २: १-११
वाचक :  योहान लिखितपवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
गालीलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला आणि त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षारस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” येशू तिला म्हणाला, “बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही.” त्याची आई चाकरांना म्हणाली, “हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा.” तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा” आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, “आता त्यातले काढून भोजनकारभाऱ्याकडे न्या.” तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षारस बनलेले पाणी भोजनकारभाऱ्याने चाखले, तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून म्हणाला, "प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले की मग नीरस वाढतो, तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत राखून ठेवला आहेस.” येशूने गालीलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केला आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
 John : 2: 1-10
Two days later there was a wedding in the town of Cana in Galilee. Jesus' mother was there, and Jesus and his disciples had also been invited to the wedding. When the wine had given out, Jesus' mother said to him, "They have no wine left."
"You must not tell me what to do," Jesus replied. "My time has not yet come."
 Jesus' mother then told the servants, "Do whatever he tells you."
The Jews have rules about ritual washing, and for this purpose six stonewater jars were there, each one large enough to hold about a hundred litres.
Jesus said to the servants, "Fill these jars with water." They filled them to the brim, & and then he told them, "Now draw some water out and take it to the man in charge of the feast." They took him the water, which now had turned into wine, and he tasted it. He did not know where this wine had come from (but, of course, the servants who had drawn out the water knew); so he called the bridegroom  and said to him, "Everyone else serves the best wine first, and after the guests have had plenty to drink, he serves the ordinary wine. But you have kept the best wine until now!"
Jesus performed this first miracle in Cana in Galilee; there he revealed his glory, and his disciples believed in him,
  This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनकाना गावच्या लग्नात द्राक्षारस संपला आणि येशूने पहिले चिन्ह प्रकट केले. पण त्यामागे पवित्र मरियेची मध्यस्थी आणि तिचा पूर्ण विश्वास होता. त्याच विश्वासाने ती म्हणते "हा जे काही सांगेल ते करा.” पवित्र मरिया आपल्याला नेहमी येशूकडे नेते, कारण ती जाणते की खरा आनंद आणि परिपूर्ण जीवन फक्त तिच्या पुत्राकडेच आहे. लुर्डसची माता म्हणून आजही जगभरात उपचार, सांत्वन आणि कृपेचे चिन्ह बनून राहिली पवित्र मरिया; तिच्या माध्यमातून येशूच्या जवळ जाऊया, कारण तीच आपल्या विश्वासाची वाट दाखवते. लुर्डसची माता धन्य कुमारी मरिये, मला तुझ्या पुत्राकडे ने. माझा विश्वास दृढ कर आणि माझे जीवन त्याच्या कृपेने बरे कर.

प्रार्थना : हे पवित्र मरिये, तु महान आहेस. आमच्या सर्व गरजा तू भागवतेस गरजवंताच्या सहाय्याला धावून जाण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या