पुनरुत्थान चौथा आठवडा
गुरुवार दि. ३० एप्रिल २०२६
आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो."and he that receiveth me, receiveth him that sent me.
येशू वरील विश्वास म्हणजे परमेश्वरा वरील विश्वास. जो येशूला पाहतो तो परमेश्वर पित्याला पाहतो. जो येशूची वचने पाळतो तो पित्याची वचने पाळतो. म्हणजे प्रभू येशू आणि पिता एक आहेत. परमेश्वर पित्याचे दैवी स्वरूप प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रकट झाले आहे. प्रभू येशू सांगत आहे मी जगात प्रकाश असा आलो आहे'. आपले सर्वांचे तारण व्हावे म्हणून प्रभू ने प्रेम, दया, क्षमा, शांति व समेटाची शिकवण आपल्याला दिली आहे. आपण पापात पडतो व अंधारात चाचपडत असतो, परंतु पिता परमेश्वर न्यायी आहे तसाच तो प्रेमळ व दयासागर आहे. आपल्या अपराधांबद्दल तो क्षमा करण्यास तयार आहे. प्रभूची ही शिकवण आपणाला अमलात आणता यावी म्हणून प्रभूशी एकनिष्ठ राहू या.
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १३:१३-२५
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“दावीदच्या वंशजातून देवाने इस्त्राएलसाठी येशू हा तारणारा उदयास आणला."
पौल आणि त्याच्या सोबतीचे लोक पफेहून तारवातून पंफुल्यातील पिर्गा येथे गेले आणि योहान त्यांना सोडून येरुशलेममध्ये परत गेला. नंतर ते पिर्गा येथून निघून फिरत फिरत पिसिदियातील अंत्युखिया येथे पोहचले आणि शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन बसले. तेव्हा नियमशास्त्राचे आणि संदेष्ट्यांच्या ग्रंथांचे वाचन झाल्यावर सभास्थानाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगून पाठवले की, "बंधुजनहो, तुम्हांजवळ लोकांकरिता काही बोधवचन असले तर सांगा.' तेव्हा पौल उभा राहून हाताने खुणावून म्हणाला :
"अहो इस्राएल लोकांनो आणि देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, ऐका. ह्या इस्राएल लोकांच्या देवाने आमच्या पूर्वजांना निवडून घेतले. ते लोक इजिप्त देशात परके असता त्यांचा उत्कर्ष केला आणि पराक्रमी बाहूने त्यांना तेथून काढले. पुढे सुमारे चाळीस वर्षेपर्यंत ते रानात असता त्याने त्यांचे गैरवर्तन सहन केले. नंतर त्याने कनान देशातील सात राष्ट्रांचा विध्वंस करून येथील भूमी त्यांना सुमारे साडेचारशे वर्षेपर्यंत वतन अशी दिली." त्यांनंतर त्याने शमुवेल संदेष्ट्यापर्यंत त्यांना न्यायाधीश नेमून दिले. मग त्यांनी राजा मागितला. तेव्हा देवाने बन्यामीन वंशातील किशाचा पुत्र शौल हा चाळीस वर्षेपर्यंत त्यांना दिला. नंतर त्याने त्याला काढून त्यांचा राजा होण्यासाठी दावीद उभा केला आणि त्याच्याविषयी प्रतिज्ञेने म्हटले की, 'इशायचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे, तो माझ्या सर्व इच्छा सिद्धीस नेईल.' ह्या मनुष्याच्या वंशजातून देवाने वचनानुरूप इस्राएलसाठी येशू हा तारणारा उदयास आणला. त्याच्या प्रकट होण्यापूर्वी योहानने पुढे येऊन पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची सर्व इस्राएल लोकांमध्ये घोषणा केली होती. योहान आपले कार्य पूर्ण करीत असता म्हणाला, “मी कोण आहे म्हणून तुम्हांला वाटते ? मी तो नव्हे, तर पाहा, ज्याच्या पायातील वहाणा सोडायला मी पात्र नाही असा कोणी माझ्यामागून येत आहे."
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
: Acts 13: 13-25
Now when Paul and they that were with him had sailed from Paphos, they came to Perge in Pamphylia. And John departing from them, returned to Jerusalem. 4 But they passing through Perge, came to Antioch in Pisidia: and entering into the synagogue on the sabbath day, they sat down. And after the reading of the law and the prophets, the rulers of the synagogue sent to them, saying: Ye men, brethren, if you have any word of exhortation to make to the people, speak.Then Paul rising up, and with his hand bespeaking silence, said: Ye men of Israel, and you that fear God, give ear. The God of the people of Israel chose our fathers, and exalted the people when they were sojourners in the land of Egypt, and with an high arm brought them out from thence, And for the space of forty years endured their manners in the desert.And destroying seven nations in the land of Chanaan, divided their land among them, by lot, As it were, after four hundred and fifty years: and after these things, he gave unto them judges, until Samuel the prophet. And after that they desired a king: and God gave them Saul the son of Cis, a man of the tribe of Benjamin, forty years. And when he had removed him, he raised them up David to be king: to whom giving testimony, he said: I have found David, the son of Jesse, a man according to my own heart, who shall do all my wills. Of this man’s seed God according to his promise, hath raised up to Israel a Saviour, Jesus: John first preaching, before his coming, the baptism of penance to all the people of Israel. And when John was fulfilling his course, he said: I am not he, whom you think me to be: but behold, there cometh one after me, whose shoes of his feet I am not worthy to loose.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ८९:२-३,२१-२२,२५,२७
प्रतिसाद : प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन.
१) प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन.
मी माझ्या तोंडाने साऱ्या पिढ्यांना
तुझ्या विश्वसनीयतेविषयी सांगेन.
तुझे प्रेम अनंतकाळ टिकेल.
तुझी विश्वसनीयता स्वर्गात स्थापलेली आहे.
२) "माझा सेवक दावीद मला मिळाला आहे.
आणि पवित्र तेलाने मी त्याला राज्याभिषेक केला आहे.
त्याच्यावर माझा वरदहस्त राहील
आणि माझ्या हाताने मी त्याला समर्थ करीन.
३) मी त्याच्यावर प्रेम करीन, त्याच्याशी एकनिष्ठ राहीन.
माझ्या नाम सामर्थ्याने त्याचा उत्कर्ष होईल.
तो मला म्हणेल, तूच माझा पिता,
माझा देव, माझा रक्षणकर्ता दुर्ग व मुक्तिदाता आहेस.
Psalms 89: 2-3, 21-22, 25 and 27
R. (2) For ever I will sing the goodness of the Lord.
2 The mercies of the Lord I will sing for ever. I will shew forth thy truth with my mouth to generation and generation.
3 For thou hast said: Mercy shall be built up for ever in the heavens: thy truth shall be prepared in them.
R. For ever I will sing the goodness of the Lord.
21 I have found David my servant: with my holy oil I have anointed him.
22 For my hand shall help him: and my arm shall strengthen him.
R. For ever I will sing the goodness of the Lord.
25 And my truth and my mercy shall be with him:
and in my name shall his horn be exalted.
27 He shall cry out to me: Thou art my father: my God, and the support of my salvation.
R. For ever I will sing the goodness of the Lord.r
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
सर्व वस्तूंचा उत्पन्नकर्ता ख्रिस्त, मेलेल्यातून उठला आहे. त्याने सर्व मानवजातीवर दया केली आहे.
आलेलुया !
Acclamation:
Alleluia, alleluia.
Jesus Christ, you are the faithful witness, the first begotten of the dead, who hath loved us, and washed us from our sins in his own blood.
R. Alleluia, alleluia.d.
शुभवर्तमान योहान १३:१६-२०
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो. "
येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतल्यावर तो त्यांना म्हणाला, "मी तुम्हांला सत्य सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा थोर नाही. जर ह्या गोष्टी तुम्हांला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात. मी तुम्हा सर्वाविषयी बोलत नाही, जे मी निवडले ते मला माहित आहेत. तरी ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे, हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे. हे मी तुम्हांला आता म्हणजे हे घडण्यापूर्वी सांगतो, ह्यासाठी की, जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की, तो मी. आहे. मी तुम्हांस ठामपणे सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो."
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:John 13: 16-20
Amen, amen I say to you: The servant is not greater than his lord; neither is the apostle greater than he that sent him. If you know these things, you shall be blessed if you do them. I speak not of you all: I know whom I have chosen. But that the scripture may be fulfilled: He that eateth bread with me, shall lift up his heel against me. At present I tell you, before it come to pass: that when it shall come to pass, you may believe that I am he. Amen, amen I say to you, he that receiveth whomsoever I send, receiveth me; and he that receiveth me, receiveth him that sent me.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: नम्रता जोपासा, त्याचे वचन सांगाः आपल्याला पौल आणि बर्णबा सापडतात अंत्युखियातील लोकांना सुवार्तेचा प्रचार करणे, जीवन बदलण्यासाठी देवाच्या वचनाची शक्ती दाखवणे. योहानाच्या शुभवर्तमानात, येशू त्याच्या शिष्यांना नम्रता आणि सेवेचे महत्त्व शिकवतो, असे घोषित करतो की सेवक त्याच्या मालकापेक्षा मोठा नाही. नम्रता ही सुपीक माती आहे जिथे करुणा, दया आणि उदारता मूळ धरते. जेव्हा आपण नम्रता जोपासतो, तेव्हा आपण वाढीसाठी जागा निर्माण करतो, इतरांना अधिक ग्रहणशील बनवतो, अभिप्रायासाठी अधिक मोकळे होतो आणि सेवा करण्यास अधिक इच्छुक होतो. नम्रता हा अभिमानाचा उतारा आहे, आपल्याला इतरांशी जोडणारा पूल आहे. या पायावर आपण आपले जीवन बांधूया. पौल आणि बर्णबा यांनी अंत्युखियामध्ये देवाचे वचन सांगितले, तसा आपण उपदेश करूया, शिकवूया आणि सामायिक करूया त्याचे वचन रिकामे परतणार नाही !
प्रार्थना : हे प्रभू येशू, तू प्रेमळ व दया सागर आहेस. श्रद्धेने आचरण करण्यास व हे तुझ्या सुवार्तेची साक्ष देण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

0 टिप्पण्या