Marathi Bible Reading | 8th week in ordinary Time| Tuesday 26th May 2026 |

 पुनरुत्थानकाळ  आठवा  सप्ताह 

मंगळवार  दि. २६ मे २०२६

तुम्हांला सांप्रतकाळी आणि येणाऱ्या युगात छळवणुकीबरोबर शंभरपटीने सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही."Amen I say to you, there is no man who hath left house or brethren, or sisters, or father, or mother, or children, or lands, for my sake and for the gospel, 



संत फिलीप नेरीचा सण .

आपण आपल्या जीवनातील लहानसहान चुकांची काळजी घेतली पाहिजे. कारण अशा चुकांकडे दुर्लक्ष केल्याने हळूहळू माणसाची पापाविषयी संवेदनक्षमता बोथट बनते आणि मनुष्य आध्यात्मिकदृष्ट्या रसातळाला जातो.
-संत फिलीप नेरी.

फिलीपचा जन्म इटलीतील फ्लॉरेन्स या ठिकाणी झाला. आपले आणि आपल्या या जगाचे पावित्र्य वाढविण्याच्या हेतूने वयाच्या २६ व्या वर्षी त्याने आपला व्यवसाय बंद करून रोमच्या दिशेने प्रयाण केले. तिथे राहून त्याने तत्त्वज्ञान व इशज्ञानाचा अभ्यास केला. विरक्ती प्रायश्चित्त, कडक उपवास आणि प्रार्थनामय जीवन ह्याद्वारे त्याने स्वतःच्या शरीरावर आणि मनावर ताबा मिळविला.
संत फिलीप हा अत्युत्तम असा आध्यात्मिक मार्गदर्शक होता. त्याला अंतर्ज्ञानाची देगणी लाभलेली होती. दिवस उजाडण्यापूर्वी कामाला जाताना दररोज ४० कामगार त्याच्याकडे कुमसारासाठी येत असत. त्यानंतरही ते देवळात कुमसार ऐकण्यासाठी बसत असत. दहा कार्डिनल्स, अनेक धर्मगुरू आणि असंख्य प्रापंचिक लोक त्याच्याकडे नियमितपणे पापनिवेदन करीत. दुपार होण्याआधी अगदी प्रेमाने पवित्र मिस्सा अर्पण करीत. दुपारनंतर ते युवक, आणि मुले ह्यांना शिक्षण देण्यात, त्यांच्यासाठी खेळ घेण्यात आणि सात देवळांना भेटी देण्यात गुंग असत. कुमसाराचे महत्त्व ते केवळ पापक्षमा असे मानीत नव्हते तर आध्यात्मिक मार्गदर्शनाचे एक प्रभावी साधन असे मानीत. त्यामुळे ते आपल्या प्रवचनांद्वारे मुलांना व तरुणांना प्रसन्नता, भक्ती, नम्रता, आणि त्यागवृत्ती इत्यादीचे धडे देत असत.

संत फिलीप आध्यात्मिक सत्ये लोकांच्या मनावर अगदी प्रभावीपणे आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने बिंबवित असत. एक मनुष्य नेहमी कम्युनियन घेतल्यानंतर घाईघाईने देवळातून लगेच बाहेर पडत असे. संत फिलीप ह्यांच्या लक्षात आल्यानंतर एके दिवशी या माणसाने कम्युनियन घेताच संत फिलीप ह्यांनी दोन वेदीसेवकांना आपल्या हाती मेणबत्त्या घेऊन त्या माणसाच्या पाठोपाठ पाठविले. ह्या प्रकाराने तो मनुष्य ओशाळला आणि अगदी निवांतपणे पवित्र साक्रामेंताचा आदरसन्मान करू लागला.

दुसरी एक कथा सर्वपरिचित आहे. एका स्त्रीला लोकांची निंदा करण्याची सवय होती. फिलीपने तिच्या हाती पक्ष्याच्या पिसांनी भरलेली पिशवी दिली आणि म्हटले “डोंगराच्या उंच कड्यावरून ही पिसे वाऱ्यावर उडवून दे, ती स्त्री मोठ्या आनंदाने डोंगरमाथ्यावर गेली आणि तिने ती पिसे वाऱ्यावर उडवून दिली.' फिलीपने त्यानंतर तिला सांगितले की, हीच पिसे आता परत गोळा करून आण. ते तर तिला अशक्यच होते. तेव्हा फिलीप तिला म्हणाले, 'जशी ही पिसे गोळा करणे अशक्य आहे तसे तुझ्या तोंडून बाहेर पडलेले शब्द पुन्हा माघारी घेणे अशक्य आहे. तेव्हा शब्द जपून वापर.'
  
पहिले वाचन : पेत्रचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन१:१०-१६
वाचक : "मनोरूपी अडथळ्यांपासून मुक्त व्हा."
ज्या संदेष्ट्यांनी तुम्हांवर होणाऱ्या कृपावर्षावाविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला; त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दुःखे आणि त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या, त्यात त्याने कोणता व कसा काळ सुचवला ह्याविषयी ते शोध करीत होते. असे त्यांना प्रगट करण्यात आले होते. स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे तुम्हांला सुवार्ता सांगणाऱ्यांनी त्या गोष्टी आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळवण्याची सेवा ते स्वतःसाठी नव्हे, तर तुम्हासाठी करत होते; त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे.
म्हणून तुम्ही आपली मनोरुपी कंबर बांधा आणि सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्यावेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा, तुम्ही आज्ञांकित मुले व्हा, अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार आचरण करू नका, तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा; "तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे." असा शास्त्रलेख आहे.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
 First Peter 1: 10-16
Of which salvation the prophets have inquired and diligently searched, who prophesied of the grace to come in you.
 Searching what or what manner of time the Spirit of Christ in them did signify: when it foretold those sufferings that are in Christ, and the glories that should follow: To whom it was revealed, that not to themselves, but to you they ministered those things which are now declared to you by them that have preached the gospel to you, the Holy Ghost being sent down from heaven, on whom the angels desire to look. Wherefore having the loins of your mind girt up, being sober, trust perfectly in the grace which is offered you in the revelation of Jesus Christ, As children of obedience, not fashioned according to the former desires of your ignorance: But according to him that hath called you, who is holy, be you also in all manner of conversation holy: Because it is written: You shall be holy, for I am holy.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र 

प्रतिसाद : ९७:१,२-३,४

प्रतिसाद : परमेश्वराने आपला विजय घोषित केला आहे.

१ परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,

कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत.त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधला आहे.

२ परमेश्वराने आपला विजय घोषित केला आहे, राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे. त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली दया आणि आपली सत्यता ह्यांचे स्मरण केले आहे.

३. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा; उच्च स्वराने, आनंदाने गा; त्याची स्तोत्रे गा.

: Psalms 98: 1, 2-3ab, 3cd-4
R. (2a) The Lord has made known his salvation.

1 Sing ye to the Lord anew canticle: because he hath done wonderful things. His right hand hath wrought for him salvation, and his arm is holy.
R. The Lord has made known his salvation.

2 The Lord hath made known his salvation: he hath revealed his justice in the sight of the Gentiles.
3ab He hath remembered his mercy his truth toward the house of Israel.
R. The Lord has made known his salvation.

3cd All the ends of the earth have seen the salvation of our God.
4 Sing joyfully to God, all the earth; make melody, rejoice and sing.
R. The Lord has made known his salvation.

जयघोष  
आलेलुया, आलेलुया! 
आलेलुया, आलेलुया ! हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने.
आलेलुया !

Acclamation: 
Alleluia: Matthew 11: 25
R. Alleluia, alleluia.
25 Blessed are you, Father, Lord of heaven and earth; you have revealed to little ones the mysteries of the Kingdom.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान मार्क १०:२८-३१
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्हांला सांप्रतकाळी आणि येणाऱ्या युगात छळवणुकीबरोबर शंभरपटीने सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही."

पेत्र येशूला म्हणू लागला, "पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत.” येशूने उत्तर दिले, "मी तुम्हांला नक्की सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता आणि सुवार्तेकरिता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे, किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळवणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आईवडील, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. तरी पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल."
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:Mark 10: 28-31
 And Peter began to say unto him: Behold, we have left all things, and have followed thee. Jesus answering, said: Amen I say to you, there is no man who hath left house or brethren, or sisters, or father, or mother, or children, or lands, for my sake and for the gospel, Who shall not receive an hundred times as much, now in this time; houses, and brethren, and sisters, and mothers, and children, and lands, with persecutions: and in the world to come life everlasting. But many that are first, shall be last: and the last, first.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन:शिष्यत्वाचे फळः पेत्र येशूचा पाठलाग करण्यासाठी स्वतःने आणि इतर शिष्यांनी केलेल्या त्यागाबद्दल चिंता व्यक्त करतो. त्यावर येशू त्याला खात्री देतो की, 'ज्यांनी माझ्या नावासाठी आपले कुटुंब, संपत्ती किंवा सुखसोयी मागे सोडल्या आहेत, त्यांना या जीवनात आणि येणाऱ्या युगात शंभरपट बक्षीस मिळेल.' हे वचन देवाच्या दैवी उदारतेचे आणि शिष्यत्वाच्या गहन फळांचे दर्शन घडवते. येशूचे शब्द आपल्याला राज्याचे एक रहस्य शिकवतात जो सुवार्तेसाठी त्याग करतो, तोच खरे आणि विपुल जीवन शोधतो. शेवटी आपण जाणतो की येशूसाठी स्वतःला हरवणे म्हणजे सर्व काही प्राप्त करण्याची गुरुकिल्ली आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्यासारखे नम्र हृदय मजला लाभावे म्हणून माझ्यातील  अहंकार व गर्विष्ठपणा काढून टाक आणि माझे जीवन परिवर्तन कर, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या