पुनरुत्थानकाळ सातवा सप्ताह
बुधवार दि. २० मे २०२६
"हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे "Holy Father, keep them in your name, which you have given me, that they may be one, even as we are one.
सिएनाचा संत बर्नाडिन
•वर्तनसाक्षी (१३८०-१४४४)
२० मे १४४४ रोजी आपल्या मृत्यूशयेवर असताना त्यांनी पुढील शब्दांत आपला आत्मा देवाच्या हाती सोपविला. “पित्या, मी तुझे नाव प्रकट केलेले आहे, आता मी तुजजवळ परतत आहे.” अवघ्या ६ वर्षांनी १४५० साली त्यांना संतपद देण्यात आले.
चिंतन : आपल्या सर्व कृत्यांमध्ये प्रथम देवाला आणि त्याच्या राज्याला अग्रक्रम द्या. बंधुत्वाचे नाते दृढ करा. इतरांना जे शिकवायचे ते प्रथम आचरणात आणा. -संत बर्नाडिन
