Marathi Bible Reading | 7th Sunday of Easter | Ascension of the Lord 17th May 2026

 पुनरुत्थानकाळ सातवा   रविवार 

रविवार दि. १७ मे २०२६

प्रभूचे स्वर्गारोहण

“स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.

All power is given to me in heaven and in earth. 



 पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.


 प्रभू येशूने शिष्यांना म्हटले, "तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा, त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या”. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना दिलेली सुवार्ता प्रसाराची आज्ञा त्यांनी अमलात आणली. श्रद्धेने प्रेरित होऊन शिष्यांनी आपले सुवार्ता प्रसाराचे कार्य चालू ठेवले कारण प्रभू येशूने शेवटी त्यांना म्हटले, “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे”. प्रभू येशू आजसुद्धा आपल्या सर्वांच्या बरोबर आहे. प्रभू येशूची सुवार्ता आणि शिकवण इतरांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी प्रत्येक ख्रिस्ती माणसावर सोपविलेली आहे.
 प्रभू येशूकडे स्वर्गातील आणि पृथ्वीवरील अधिकार आहेत. आपण न डगमगता प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी व त्याच्या पुनरुत्थान व स्वर्गरोहणाची साक्ष देण्यासाठी विश्वासाने पुढाकार घेऊ या.पवित्र त्रैक्याच्या नावाने प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी आपल्या प्रत्येकाला पाचारण आहे.

✝️

पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १:१-११
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन  
“त्यांच्या डोळ्यांदेखत येशू वर घेतला गेला." 
हे थियफिला, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्याद्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला, त्या दिवसांपर्यंत त्याने जे जे करायला आणि शिकवायला आरंभिले होते त्या सर्वांविषयी मी पहिल्या ग्रंथात लिहिले होते. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखवले. चाळीस दिवसपर्यंत येशू त्यांना दर्शन देत असे आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो आणि ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की, येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पाहा. कारण योहानने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल.
ह्यास्तव ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, "प्रभो, ह्याच काळात तुम्ही इस्राएलचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय ?" तो त्यांना म्हणाला, "जे काळ आणि समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हांकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुम्हांवर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल आणि येरुशलेमेत, सर्व यहुदियात, शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल." असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहात होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, "अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहात उभे राहिला? हा जो येशू तुम्हांपासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले, तसाच येईल."
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 1:1-11
In the first book, O Theophilus, I have dealt with all that Jesus began to do and teach, until the day when he was taken up, after he had given commands through the Holy Spirit to the apostles whom he had chosen. He presented himself alive to them after his suffering by many proofs, appearing to them during forty days and speaking about the kingdom of God. And while staying with them he ordered them not to depart from Jerusalem, but to wait for the promise of the Father, which, he said, "you heard from me; for John baptized with water, but you will be baptized with the Holy Spirit not many days from now." So when they had come together, they asked him, "Lord, will you at this time restore the kingdom to Israel?" He said to them, "It is not for you to know times or seasons that the Father has fixed by his own authority. But you will receive power when the Holy Spirit has come upon you, and you will be my witnesses in Jerusalem and in all Judea and Samaria, and to the end of the earth." And when he had said these things, as they were looking on, he was lifted up, and a cloud took him out of their sight. And while they were gazing into heaven as he went, behold, two men stood by them in white robes, and said, "Men of Galilee, why do you stand looking into heaven? This Jesus, who was taken up from you into heaven, will come in the same way as you saw him go into heaven."
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ४७: २-३,६-९
प्रतिसाद :   जयघोष होत असता देव वर गेला आहे.

१) अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा, 
उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा!
 कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे. 
तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.

२) जयघोष होत असता देव वर गेला आहे. 
कण्यांचा शब्द होत असता परमेश्वर वर गेला आहे. 
देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा;
 आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा.

३) देव सर्व पृथ्वीचा राजा आहे, 
तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा.
 देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे; देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.

Psalm 47:2-3, 6-7, 8-9 (R6)

God goes up with shouts of joy. 
The Lord goes up with trumpet blast.

All peoples, clap your hands.
Cry to God with shouts of joy! 
For the Lord, the Most High, is awesome, 
the great king over all the earth. R.

God goes up with shouts of joy.
The Lord goes up with trumpet blast.
Sing praise for God; sing praise!
Sing praise to our king; sing praise! R

God is king of all the earth.
Sing praise with all your skill.
 God reigns over the nations.
God sits upon his holy throne. R


दुसरे वाचन  इफिस १:१७-२३
वाचक :  पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 
 “परमेश्वराने येशूला स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले."
आपला प्रभू येशू ख्रिस्त हाच देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हाला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा, म्हणजे त्यामुळे तुमचे अंत:चक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणांविषयीच्या त्याच्या सामर्थ्याने अपार महत्त्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वावर मस्तक व्हावे असे म्हणून त्यांला मंडळीला दिले. हीच मंडळी त्याचे शरीर होय. हिच्याचद्वारे तो आपले कार्य सर्वत्र आणि सर्व प्रकारे पुरे करतो."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second Reading:  : Ephesians 1: 17-23
That the God of our Lord Jesus Christ, the Father of glory, may give unto you the spirit of wisdom and of revelation, in the knowledge of him: The eyes of your heart enlightened, that you may know what the hope is of the glory of his inheritance in the saints. And what is the exceeding greatness of his power towards us, who believe according to the operation of the might of his power, Which he wrought in Christ, raising him up from the dead, and setting him on his right hand in the heavenly places. Above all principality, and power, and virtue, and dominion, and every name that is named, not only in this world, but also in that which is to come.And he hath subjected all things under his feet, and hath made him head over all the church, Which is his body, and the fulness of him who is filled all in all.
This is the word of God 
Thanks be to God 
                                    

जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा;
युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.
 आलेलुया!

Acclamation: 
R. Alleluia, alleluia.
Go and teach all nations, says the Lord; I am with you always, until the end of the world.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान: मत्तय २८:१६-२०
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. "

अकरा शिष्य गालिलात जो डोंगर येशूने सांगून ठेवला होता त्यावर गेले आणि त्यांनी येशूला तेथे पाहून नमन केले, तरी कित्येकांना संशय वाटला. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. ह्यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

Gospel Reading:
 Matthew 28: 16-20
 And the eleven disciples went into Galilee, unto the mountain where Jesus had appointed them. And seeing him they adored: but some doubted. And Jesus coming, spoke to them, saying: All power is given to me in heaven and in earth. Going therefore, teach ye all nations; baptizing them in the name of the Father, and of the Son, and of the Holy Ghost. Teaching them to observe all things whatsoever I have commanded you: and behold I am with you all days, even to the consummation of the world.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनप्रभू येशूच्या स्वर्गरोहणाचा सोहळा : आज आपण येशूच्या स्वर्गारोहणाचा उत्सव साजरा करीत आहोत. आजच्या वाचनांमधून आपल्याला आठवण होते की, येशूचे स्वर्गारोहण हे त्याच्या पृथ्वीवरील कार्याची समाप्ती नव्हे, तर त्याच्या गौरवशाली उपस्थितीचा नवा अध्याय आहे. तो पित्याच्या उजव्या हाताकडे उन्नती पावून, आता आपल्या सर्वांसाठी मध्यस्थी करतो आणि आपल्याला मिशनसाठी सामर्थ्य देतो. शिष्यांनी जेव्हा येशूला स्वर्गात जाताना पाहिले, तेव्हा ते आश्चर्य आणि विस्मयाने भरले. पण ते तेथेच थांबले नाहीत त्यांना पाठविण्यात आले होते साक्षीदार म्हणून, पृथ्वीच्या टोकापर्यंत सुवार्ता जाहीर करण्यासाठी. आपणही त्याच बोलावणीचा भाग आहोत. आपले पृथ्वीवरील जीवन हे अनंतकाळाच्या प्रवासातील एक क्षणिक श्वास आहे. आपले अंतिम गंतव्य म्हणजे स्वर्गातील आपला पिता. म्हणून चला आपले जीवन, आपले ध्येय, आणि आपले मन येशूकडे केंद्रीत करूया. आपले हृदय परमेश्वराकडे परतण्याच्या आकांक्षेने धडक दे, आणि येशूप्रमाणे आपणही स्वर्गाकडे वाटचाल करणारे साक्षीदार बनू या.
प्रार्थना : 
हे प्रभू येशू, स्वर्गराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यास व तुझी साक्ष जगाला देण्यास आम्हाला कृपा व सामर्थ्य दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या