पुनरुत्थानकाळ आठवा सप्ताह
बुधवार दि. २७ मे २०२६
जो तुम्हांमध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे
If one of you wants to be great, he must be the servant of the rest;
कॅंटबारीचे संत अगस्तीन
महागुरू वर्तनसाक्षी (...... -६०५)
पहिले वाचन १ पेत्र : १:१८-२५
वाचक :पेत्रचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात."
तुम्हांस ठाऊक आहे की, वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, सोने, रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे, तर निष्कलंक आणि निर्दोष कोकरू असा जो ख्रिस्त, त्याच्या मौल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रकट झाला. तुम्ही त्याच्याद्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला आहा; देवानेच त्याला मेलेल्यातून उठवून त्याचा गौरव केला, ह्यामुळे तुमचा विश्वास आणि आशा देवावर आहे.
निःस्वार्थी बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने शुद्ध करून घेतले आहेत म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा. कारण तुम्ही नाशंवत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत आणिटिकणाऱ्या शब्दांच्याद्वारे पुन्हा जन्म पावलेले आहा. कारण, "सर्व मानवजात गवतासारखी आहे. आणि तिचा सर्व गौरव गवताच्या फुलासारखा आहे. गवत वाळते आणि त्याचे फूल गळते, परंतु प्रभूचे वचन सर्वकाळ टिकते." सुवार्तेचे जे वचन तुम्हाला सांगण्यात आले ते हेच होय.
First Reading :
1 Peter 1:18-25
For you know what was paid to set you free from the worthless manner of life handed down by your ancestors. It was not something that can be destroyed, such as silver or gold; it was the costly sacrifice of Christ, who was like a lamb without defect or flaw. He had been chosen by God before the creation of the world and was revealed in these last days for your sake. Through him you believe in God, who raised him from death and gave him glory; and so your faith and hope are fixed on God.Now that by your obedience to the truth you have purified yourselves and have come to have a sincere love for your fellow-believers, love one another earnestly with all your heart. For through the living and eternal word of God you have been born again as the children of a parent who is immortal, not mortal. As the scripture says, "All mankind are like grass,and all their glory is like wild flowers. The grass withers, and the flowers fall, but the word of the Lord remains for ever."
This word is the Good News that was proclaimed to you.
Thanks be to God
प्रतिसाद १४७:१२-१३,१४-१५,१९-२०
प्रतिसाद : हे यरुशलेम, परमेश्वराचा गौरव कर !
१ हे येरुशलेम, परमेश्वराचा गौरव कर !
हे सियोन, तू आपल्या देवाचे स्तवन कर !
त्याने तुझ्या वेशीचे अडसर बळकट केले आहेत,
त्याने तुझ्या ठायी तुझ्या मुलांना आशीर्वाद दिला आहे.
२ तो तुझ्या सीमांच्या आत शांतता प्रस्थापित करतो.
उत्कृष्ठ गव्हाने तुला तृप्त करतो,
तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो,
त्याचा शब्द फार वेगाने धावतो.
३ तो याकोबला आपले वचन,
इस्राएलला आपले नियम आणि निर्णय विदित करतो,
कोणत्याही राष्ट्रांबरोबर त्याने असे वर्तन केले नाही;
त्याचे निर्णय ती जाणत नाहीत. परमेश्वराचे स्तवन करा !
Psalm 147:12-15,19-20
1Praise the LORD, O Jerusalem!
Praise your God, O Zion!
He keeps your gates strong;
he blesses your people.
He keeps your borders safe and satisfies
you with the finest wheat.
15 He gives a command to the earth,
and what he says is quickly done.
He spreads snow like a blanket
and scatters frost like dust.
2 He sends hail like gravel;
no one can endure the cold he sends!
Then he gives a command,
and the ice melts; he sends the wind,
and the water flows.
He gives his message to his people,
his instructions and laws to Israel.
He has not done this for other nations;
they do not know his laws.
Praise the LORD!
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुम्ही आपली मने कठोर करू नका, तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia: Mark 10: 45
R. Alleluia, alleluia.
45 The Son of Man came to serve, and to give his life as a ransom for many.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क १०:३२-४५
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"आपण वर येरुशलेमला जात आहो, तेथे मनुष्याच्या पुत्राला धरून देण्यात येईल."
शिष्य वर येरुशलेमला जात असताना वाटेने येशू त्यांच्यापुढे चालला होता, तेव्हा ते विस्मित झाले आणि मागोमाग येणारे घाबरले. तेव्हा तो पुन्हा त्या बाराजणांस जवळ बोलावून घेऊन आपल्याला काय होणार ते त्यांना सांगू लागलाः "पाहा, आपण वर येरुशलेमला जात आहो; तेथे मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांच्या स्वाधीन करण्यात येईल, ते त्याला देहान्त शिक्षा ठरवतील आणि परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर धुंकतील, त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल."
जब्दीचे दोन मुलगे याकोब आणि योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, "गुरुजी, आम्ही आपणाजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हांसाठी करावे अशी आमची इच्छा आहे." तो त्यांना म्हणाला, "मी तुम्हासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?" ते त्याला म्हणाले, "आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे आणि एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे." येशूने त्यांना म्हटले, "तुम्ही काय मागत आहा हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय ? आणि जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्हांला घेववेल काय?" ते त्याला म्हणाले, "घेववेल." येशूने त्यांना म्हटले, "जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल आणि जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे, पण माझ्या उजवीकडे आणि डावीकडे कोणाला बसू देण्याचे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार," हे ऐकून बाकीचे दहाजण याकोब आणि योहान ह्यांच्यावर संतापले. तेव्हा त्यांना जवळ बोलावून घेऊन येशू त्यांना म्हणाला, "परराष्ट्रीयात सत्ताधारी म्हणून जे मानलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करतात आणि त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. परंतु तुमची गोष्ट तशी नाही; तर जो तुम्हांमध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे आणि जो कोणी तुम्हांमध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करायला आणि पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करायला आला आहे."