पुनरुत्थानकाळ नववा सप्ताह
सोमवार दि. १ जुन २०२६
'जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला.
The stone which the builders rejected has become the cornerstone;
चिंतन : "केवळ आपल्या प्रभू ख्रिस्तासाठी छळ सहन करण्याइतके दुसरे काहीही महान नाही. ह्याच छळामध्ये सार्वकालिक आनंद आणि आपला आत्मविश्वास दडलेला आहे.” संत जस्टीन
पहिले वाचन पेत्रचे दुसरे पत्र १:२-७
वाचक : पेत्रचे दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"देवाने आपली मोलवान आणि अतिमहान अशी वचने आपल्याला दिली आहेत."
देव आणि आपला प्रभू येशू ह्यांच्या ओळखीने तुम्हाला विपुल कृपा आणि शांती मिळो.
ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी आणि सात्त्विकतेसाठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनाला आणि सुभक्तीला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. त्याच्या योगे मौल्यवान आणि अतिमहान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्त्विकतेची, सात्त्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची आणि बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला.
First Reading :
2 Peter 1:2-7
peace be yours in abundance through the Grace and peace knowledge of our Lord. By his divine power, he has lavished on us all the things we need for life and for true devotion, through the knowledge of him who has called us by his own glory and goodness. Through these, the greatest and priceless promises have been lavished on us, that through them you should share the divine nature and escape the corruption rife in the world through disordered passion. With this in view, do your utmost to support your faith with goodness, goodness with understanding, understanding with self-control, self-control with perseverance, perseverance with devotion, devotion with kindness to the brothers, and kindness to the brothers with love.
Thanks be to God
प्रतिसाद ९१:१-२,१४-१५अ, १५ब-१६
प्रतिसाद : माझ्या देवा, तुझ्यावर मी भाव ठेवतो.
१ जो परात्पराच्या गुप्त स्थळी वसतो.
तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.
परमेश्वराला मी "माझा आश्रय,
माझा दुर्ग असे म्हणतो.
तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो."
२ माझ्यावर त्याचे प्रेम आहे,
म्हणून मी त्याला मुक्त करीन.
त्याला माझ्या नावाची जाणीव आहे
म्हणून मी त्याला उच्च स्थळी सुरक्षित ठेवीन.
तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन.
"मी तुझ्याजवळ आहे !"
३ संकटसमयी मी त्याला मुक्त करीन,
मी त्याला गौरव देईन.
त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन,
त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन-
Psalm 91:1-2, 14-15ab, 15c-16
O my God, I trust in you.
He who dwells in the shelter of the Most High,
who abides in the shadow of the Almighty,
2 will say to the Lord, “My refuge and my fortress;
my God, in whom I trust.”
Because he cleaves to me in love,
I will deliver him;
I will protect him, because he knows my name.15 When he calls to me, I will answer him; I will be with him in trouble, I will rescue him and honor him.16 With long life I will satisfy him, and show him my salvation.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अलौकिक गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
आलेलुया!
Acclamation:
: Revelation 1: 5ab
R. Alleluia, alleluia.
5ab Jesus Christ, you are the faithful witness, the firstborn of the dead; you have loved us and freed us from our sins by your Blood.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क १२:१-१२
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"त्याने त्या प्रिय आवडत्या मुलाला धरून जिवे मारले आणि द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले."
येशू दाखले देऊन परुश्यांबरोबर बोलू लागला, "एका गृहस्थाने द्राक्षमळा लावला, त्याभोवती कुंपण घातले, द्राक्षरसासाठी कुंड खणले, माळा बांधला आणि तो द्राक्षमळा माळ्यांना खंडाने देऊन आपण परदेशी निघून गेला. पुढे हंगामाच्या वेळी आपल्याला माळ्यांकडून द्राक्षमळ्याच्या फळातून काही मिळावे म्हणून त्याने माळ्यांकडे एका नोकराला पाठवले. त्याला त्यांनी धरून मारहाण केली आणि रिकामे लावून दिले. पुन्हा त्याने दुसऱ्या एका नोकराला त्याच्याकडे पाठवले, त्याचे तर डोके फोडून त्यांनी त्याचा अपमान केला. त्याने आणखी एकाला पाठवले, त्याला तर त्यांनी जिवे मारले आणि दुसऱ्या अनेकांना तसेच केले. म्हणजे त्यातून कित्येकांना त्यांनी मारहाण केली आणि कित्येकांचा जीव घेतला. अद्यापि त्याच्याजवळ एकजण उरला होता, तो म्हणजे त्याचा प्रिय आवडता मुलगा. 'आपल्या मुलाची तरी ते भीड धरतील' असे म्हणून शेवटी त्याने त्याला त्यांच्याकडे पाठवले. परंतु ते माळी आपसांत म्हणाले, 'हा वारस आहे. चला, आपण ह्याला मारून टाकू, म्हणजे आपले होईल.' मग त्यांनी त्याला धरून जिवे मारले आणि द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी काय करील बरे ? तो येऊन त्या माळ्यांचा समूळ नाश करील आणि द्राक्षमळा दुसऱ्यांना देईल. तुम्ही हा शास्रलेखही वाचला नाही काय की 'जो दगड बांधकाम करणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला. हे परमेश्वराकडून झाले आणि हे आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक कृत्य आहे."तेव्हा ते त्याला धरायला पाहू लागले, परंतु लोकसमुदायाची त्यांना भीती वाटली. कारण हा दाखला त्याने आपल्याला उद्देशून सांगितला हे त्यांच्या ध्यानात आले. मग ते त्याला सोडून निघून गेले.