सामान्यकाळातील नववा सप्ताह
गुरुवार दि. ४ जुन २०२६
जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.' ह्यांपेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही." You must love your neighbour as yourself. There is no commandment greater than these.'
देव प्रीति आहे. तो मानवावर निरपेक्ष प्रेम करतो म्हणूनच आपण देवावर प्रेम करणे ही पहिली आज्ञा प्रभूयेशूने दिली. देवाने आपल्याला त्याच्या प्रीतिचे सर्वोत्कृष्ठ दान दिलेले आहे. प्रीतिचे हे दान स्वतः पुरतेच मर्यादित नसून प्रेम हे सर्वांना देण्यासाठी आहे. म्हणूनच प्रभू येशू आजच्या शुभवर्तमानात म्हणतो, 'जशी स्वतःवर तशीच आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर'. आज आपण देवमीति व परस्पर प्रीति ह्या विषयावर चिंतन करु या. देवाचे प्रेम मी अनुभवले आहे का ? देवाच्या प्रेमाचा साक्षात्कार मला झाला आहे का ? सर्व प्रसंगी व सर्व परिस्थितीमध्ये आपण देवावर प्रेम करुन त्याला धन्यवाद देतो का ? त्याची उपकार स्तुति करतो का ? स्वतः इतकेच मी इतरांवर प्रेम करतो का ? परस्पर प्रेमाची आज्ञा मला कळली आहे का ?
देवावर प्रीति करणे व शेजाऱ्यावर प्रीति करणे म्हणजे काय व ते आचरणात कसे आणावे हे जर आपण जाणले असेल तर 'देवाच्या राज्यापासून आपण दूर नाही.'
✝️
पहिले वाचन २ तीमथीला २:८-१५
वाचक : पौलचे तीमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. जर आपण ख्रिस्त येशूबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू."
माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यातून उठवलेला, दावीदच्या संतानातील येशू ख्रिस्त, ह्याची आठवण ठेव. ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणाऱ्यासारखा बेड्यांचे देखील दुःख सोशीत आहे. तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्याच्याकरिता सर्व काही धीराने सोसतो. हे वचन विश्वसनीय आहे, "जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू, जर आपण धीराने सोसतो तर त्याच्याबरोबर राज्यही करू, आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारील, आपण अविश्वासी झालो तरी तो विश्वसनीय राहतो कारण त्याला स्वतः विरुद्ध वागता येत नाही."
तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण दे. त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, शब्दयुद्ध करू नका, ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी, असा स्वतःला सादर करण्यात होईल तितके कर.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
2 Timothy 2:8-15
Remember the gospel that I carry, 'Jesus Christ risen from the dead, sprung from the race of David'; it is on account of this that I have to put up with suffering, even to being chained like a criminal. But God's message cannot be chained up. So I persevere for the sake of those who are chosen, so that they, too, may obtain the salvation that is in Christ Jesus with eternal glory. Here is a saying that you can rely on: If we have died with him, then we shall live with him. If we persevere, then we shall reign with him. If we disown him, then he will disown us. If we are faithless, he is faithful still, for he cannot disown his own self. Remind them of this; and tell them in the name of God that there must be no wrangling about words: all that this ever achieves is the destruction of those who are listening. Make every effort to present yourself before God as a proven worker who has no need to be ashamed, but who keeps the message of truth on a straight path.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद २५:४-५,८-९,१०.१४
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझ्या वाटा मला दाखव.
१ हे परमेश्वरा, तुझ्या वाटा मला दाखव.
तुझे मार्ग मला प्रकट कर.
तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव.
मला शिक्षण दे; कारण तूच माझा उद्धारक देव आहेस.
२ परमेश्वराचा करार आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांना
त्याचे सर्व मार्ग वात्सल्यमय आणि सत्यपूर्ण आहेत.
परमेश्वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर असते;
तो आपला करार त्यांना कळवील.
Psalm 25:4-5ab, 8-9, 10 & 14
O Lord, make me know your ways.
Your ways, O LORD, make known to me;
teach me your paths,
Guide me in your truth and teach me,
for you are God my savior.
Good and upright is the LORD;
thus he shows sinners the way.
He guides the humble to justice,
he teaches the humble his way.
All the paths of the LORD are kindness and constancy
toward those who keep his covenant and his decrees.
The friendship of the LORD is with those who fear him,
and his covenant, for their instruction.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे मन वळव आणि तुझे नियम मला शिकव
आलेलुया!
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Our Savior Jesus Christ has destroyed death
and brought life to light through the Gospel.R. Alleluia, alleluia.
