ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा व
रक्ताचा सोहळा
रविवार
७ जून २०२६
जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो.
He that eateth my flesh, and drinketh my blood, hath everlasting life:
✝️
ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीराचा
व रक्ताचा सोहळा
परमेश्वराबरोबर केलेला आज्ञापालनाचा, शुद्धतेचा व समेटाचा करार पाळण्यासाठी मोशेने इस्त्रायली जनतेला सतत मार्गदर्शन केले.इस्त्रायली जनता चाळीस वर्षे रानात भटकत असताना परमेश्वराने त्यांचे रक्षण केले. विशेष रितीने त्यांची उपासमार होऊ नये म्हणून स्वर्गीय मान्ना खाऊ घालून देवाने त्यांचे पोषण केले.
प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले, 'घ्या, माझे शरीर आणि हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, पुष्कळांकरिता सांडले जात आहे'. आपली तहान व भूक भागविण्याचे सामर्थ्य प्रभू येशूच्या शरीर व रक्तामध्ये आहे. कारण, प्रभू येशू म्हणत आहे, 'स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे'. सर्वकाळ जीवन देणारी स्वर्गीय भाकर स्वतः प्रभू येशू आहे.
आज आपण प्रभू येशूच्या अतिपवित्र शरीराचा व रक्ताचा सोहळा साजरा करीत आहोत. पवित्र मिस्साबलीदानाद्वारे हाच प्रभू येशू आपल्या सर्वांसाठी स्वतः भाकरीच्या रुपाने आपल्यामध्ये येतो. त्याच्या सेवनाने आपण त्याच्याशी एक शरीर बनत असतो. ही सहभागिता आपल्या आध्यात्मिक जीवनात परिवर्तन आणणारी असून, आपल्या ख्रिस्ती जीवनाचा अविभाज्य भाग आहे.
पहिले वाचन अनुवाद ८:२-३ . १४-१६वाचक : अनुवाद ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"देवाने तुम्हांला किंवा तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून तुमचे पोषण केले."
मोशे लोकांना म्हणाला, “तुम्हांला लीन करावे आणि तुमच्या मनात काय आहे म्हणजे तुम्ही त्याच्या आज्ञा पाळणार की नाही ह्याची कसोटी पाहावी म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्याने चाळीस वर्षे तुम्हांला उजाड रानातून कोणत्या रीतीने चालवले ह्याचे स्मरण करा. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल ह्याची जाणीव तुम्हांला, व्हावी म्हणून त्याने तुम्हांला लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि तुमच्या पूर्वजांनाही माहीत नसलेला मात्रा खाऊ घालून त्याने तुमचे पोषण केले.
"तेव्हा तुमचे मन उन्मत्त होऊ नये आणि तुमचा देव परमेश्वर ज्याने तुम्हांला मिसर देशातून, दास्यगृहातून काढून आणले त्याला तुम्ही विसरू नये म्हणून सांभाळा. आग्या सापांनी व विंचवांनी व्यापलेल्या घोर व भयानक रानातून आणि रुक्ष व निर्जल भूमीतून त्याने तुम्हांला आणले, त्याने तुमच्यासाठी गारेच्या खडकातून पाणी काढले आणि उजाड रानात तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेला मात्रा खाऊ घालून त्याने तुमचे पोषण केले.”
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Deuteronomy 8: 2-3, 14b-16a
And thou shalt remember all the way through which the Lord thy God hath brought thee for forty years through the desert, to afflict thee and to prove thee, and that the things that were in thy heart might be made known, whether thou wouldst keep his commandments or no. He afflicted thee with want, and gave thee manna for thy food, which neither thou nor thy fathers knew: to shew that not in bread alone doth man live, but in every word that proceedeth from the mouth of God. Thou remember not the Lord thy God, who brought thee out of the land of Egypt, out of the house of bondage:And was thy leader in the great and terrible wilderness, wherein there was the serpent burning with his breath, and the scorpion and the dipsas, and no waters at all: who brought forth streams out of the hardest rock, And fed thee in the wilderness with manna which thy fathers knew not.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १४७:१२-१५, १९-२०
प्रतिसाद : हे येरुशलेम, परमेश्वराचा गौरव कर. किंवा परमेश्वराचे स्तवन करा.
१.हे येरुशलेम, परमेश्वराचा गौरव कर,
हे सीयोन, तू आपल्या देवाचे स्तवन कर.
त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत,
त्याने तुझ्या ठायी मुलांना आशीर्वाद दिला आहे.
२. तो तुझ्या सीमांच्या आत शांतता पसरितो,
उत्कृष्ट गव्हाने तुला तृप्त करतो.
तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो,
त्याचा शब्द फार वेगाने धावतो.
३. तो याकोबला आपले वचन,
इस्राएलला आपले नियम आणि निर्णय जाहीर करतो.
कोणत्याही राष्ट्रांबरोबर त्याने असे वर्तन केले नाही,
त्याचे निर्णय ती जाणत नाहीत.
परमेश्वराचे स्तवन करा.
147: 12-13, 14-15, 19-20
R. (12) Praise the Lord, Jerusalem.
12 Praise the Lord, O Jerusalem: praise thy God, O Sion.
13 Because he hath strengthened the bolts of thy gates, he hath blessed thy children within thee.
R. Praise the Lord, Jerusalem.
14 Who hath placed peace in thy borders: and filleth thee with the fat of corn.
15 Who sendeth forth his speech to the earth: his word runneth swiftly.
R. Praise the Lord, Jerusalem.
19 Who declareth his word to Jacob: his justices and his judgments to Israel.
20 He hath not done in like manner to every nation: and his judgments he hath not made manifest to them. Alleluia.
R. Praise the Lord, Jerusalem.
दुसरे वाचन १ करिंथ १०:१६-१७
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"आपण पुष्कळजण असून एक भाकर, एक शरीर, असे आहो."
जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही ? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळजण असून एक भाकर, एक शरीर, असे आहो, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहो..
प्रभूचा शब्द
सर्व : देवाला धन्यवाद.
Second reading : First Corinthians 10: 16-17
The chalice of benediction, which we bless, is it not the communion of the blood of Christ? And the bread, which we break, is it not the partaking of the body of the Lord? For we, being many, are one bread, one body, all that partake of one bread.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे,
या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
आलेलुया!
Acclamation:
John 6: 51
R. Alleluia, alleluia.
51 I am the living bread that came down from heaven, says the Lord; whoever eats this bread will live forever.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान योहान ६:५१-५८
वाचक : योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे.'
येशू यहूद्यांना म्हणाला, “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल, जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे. "तेव्हा यहूदी आपसामध्ये वितंडवाद करू लागले आणि म्हणाले, “हा आपला देह आम्हांला खायला कसा देऊ शकतो?” ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर मीच होय, तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही, ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading: John 6: 51-58
I am the living bread which came down from heaven.If any man eat of this bread, he shall live for ever; and the bread that I will give, is my flesh, for the life of the world.The Jews therefore strove among themselves, saying: How can this man give us his flesh to eat?
Then Jesus said to them: Amen, amen I say unto you: Except you eat the flesh of the Son of man, and drink his blood, you shall not have life in you.He that eateth my flesh, and drinketh my blood, hath everlasting life: and I will raise him up in the last day.For my flesh is meat indeed: and my blood is drink indeed.He that eateth my flesh, and drinketh my blood, abideth in me, and I in him.As the living Father hath sent me, and I live by the Father; so he that eateth me, the same also shall live by me.This is the bread that came down from heaven. Not as your fathers did eat manna, and are dead. He that eateth this bread, shall live for ever.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आज आपण प्रभू येशूच्या अतिपवित्र शरीराचा रक्ताचा सोहळा साजरा करीत आहोत. अर्थात आपण पवित्र मिस्साचा सण साजरा करीत आहोत. प्रभू येशूच दुःख, मरण व पुनरुत्थान हेच आपण प्रत्येक मिस्सामध्ये साजरा करत असतो. आज्ञा गुरुवारच्या दिवशी येशू आपल्या प्रेषितांबरोबर शेवटचे भोजन घेत असताना त्याने पवित्र मिस्साबलीची स्थापना केली. आपल्या शिष्यांना म्हटले "घ्या आणि खा हे माझे शरीर आहे, घ्या आणि यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे याद्वारे भाकरीचे रूपांतर प्रभू येशूचे शरीरामध्ये व द्राक्षरसाचे रूपांतर प्रभू येशूच्या रक्तामध्ये झाले, तोच सोहळा आज आपण साजरा करीत आहोत. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने इस्रायल लोकांची शारीरिक गरज भागविण्यासाठी त्यांना माना दिला मात्र त्याचबरोबर लोकांना आठवण करून दिलीजाते की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे., तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू यहुद्यांस सांगत आहे “स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल." हीच जिंवत भाकर आपल्याला प्रत्येक मिस्साबलिदानामध्ये मिळते. संत मदर तेरेसा म्हणतात 'जेव्हा तुम्ही क्रुसाकडे पाहता तेव्हा तुम्हाला समजते की त्याचे तुमच्यावर किती प्रेम आहे आणि जेव्हा तुम्ही पवित्र भाकर पाहता तेव्हा तुम्हाला समजते की येशू आता तुमच्यावर किती प्रेम करतो.' मिस्साबलीमध्ये सहभाग घेत असताना मला येशूचा साक्षात्कार घडतो का ?
प्रार्थना : हे, प्रभू येशू, तुझ्या पवित्र शरीराने व अमोलिक रक्ताने आमचे जीवन संवर्धन कर आणि तुझी सेवा करण्यास कृपा व शक्ती दे, आमेन.
0 टिप्पण्या