सामान्यकाळातील चौदावा सप्ताह
शनिवार ११ जुलै २०२६
म्हणून भिऊ नका; पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे.
Fear not, therefore; you are of more value than many sparrows.
संत बेनेडिक्ट ह्यांच्या ज्ञानाची कीर्ती त्या काळात दिगंतापर्यंत पसरलेली होती. त्यामुळे महागुरू, मठाधिकारी, सरदार, राजे, राजपुत्र आणि सामान्य जनता आपल्या जीवनातील प्रश्न व समस्यांचे निराकरण करण्यासाठी या ज्ञानपिपासू व नीतिमान साधुपुरुषाकडे येत असत. त्यांच्या शांतचित्त, पवित्र, संयमी आणि समतोल विचारसरणीने थक्क होऊन जात. सार्वजनिक ठिकाणी ज्या व्यक्ती अधिकाराच्या जागी आहेत त्यांनी सामान्य जनतेमध्ये आपल्याविषयी धाक आणि भीती नव्हे तर प्रेम उत्पन्न करायला हवे असे त्यांना वाटे. गोरगरिबांना संत बेनेडिक्ट ह्यांच्याठायी एक सहानुभूती देणारा सत्पुरुष लाभलेला होता.
समाजातील सर्व थरातील लोकांचा आसरा आणि आश्रयदाता बनलेला ऋषीतुल्य संत बेनेडिक्ट २१ मार्च ५४७ रोजी हजारो लोकांच्या हृदयाचा ठोका चुकवून देवाघरी निघून गेला. मुख्य वेदीवरून पवित्र ख्रिस्तशरीर स्वीकारून आपले हात स्वर्गाकडे उंचावलेल्या अवस्थेतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
चिंतन : प्रार्थनापूर्वक परिश्रम करा आणि परिश्रमपूर्वक प्रार्थना करा.• संत बेनेडिक्टचे ब्रीदवाक्य
आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्ट्याला देवाने दिलेले त्याच्या वैभवाचे दर्शन आणि त्याच्या पाचारणाचा वृतांत दिला आहे. देवाने यशयाला शुद्ध करुन त्याची वाणी मोकळी केली. देवाच्या पाचारणाला प्रतिसाद देत यशया म्हणाला, 'हा मी आहे, मला पाठीव.'
आपणा प्रत्येकाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा आत्मा मिळालेला आहे. त्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने व सामर्थ्याने आपण प्रभूची सुवार्ता घोषविण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्नशील बनू या.
पहिले वाचन :यशया ६:१-८
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी अशुद्ध ओठांच्या लोकांत राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. "
उज्जिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूस उच्चस्थळी असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले; त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते; त्याच्या भोवताली सराफीम उभे होते; त्या प्रत्येकाला सहासहा पंख होते; दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी आणि दोहोंनी तो उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, "पवित्र! पवित्र ! पवित्र ! सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव होय." घोषणा करणाऱ्यांच्या ह्या वाणीने उंबरठे हालले आणि मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, "हाय हाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले.
मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला. तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, "पाहा, याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्चित्त झाले आहे." तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, "मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल ?" तेव्हा मी म्हणालो, "हा मी आहे, मला पाठव."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Isaiah 6:1-8
In the year that King Uzziah died I saw the Lord sitting upon a throne, high and lifted up; and the train of his robe filled the temple. Above him stood the seraphim. Each had six wings: with two he covered his face and with two he covered his feet, and with two he flew. And one called to another and said: "Holy, holy, holy is the Lord of hosts; the whole earth is full of his glory!" And the foundations of the thresholds shook at the voice of him who called, and the house was filled with smoke. And I said: "Woe is me! For I am lost; for I am a man of unclean lips, and I dwell in the midst of a people of unclean lips; for my eyes have seen the King, the Lord of hosts!" Then one of the seraphim flew to me, having in his hand a burning coal that he had taken with tongs from the altar. And he touched my mouth and said: "Behold, this has touched your lips; your guilt is taken away, and your sin atoned for." And I heard the voice of the Lord saying, "Whom shall I send, and who will go for us?" Then I said, "Here I am! Send me."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ९३:१,२,५
प्रतिसाद : परमेश्वराने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे.
१) परमेश्वर राज्य करतो,
त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे;
परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव
घालून कंबर कसली आहे.
२ )म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही;
तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर आहे.
तू अनादिकालापासून आहेस.
३ )तुझे निर्बंध अभंग आहेत.
हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते.
Psalm 93:1abc, 1d-2, 5
R. The Lord is king, with majesty enrobed.
The Lord is king, with majesty enrobed.
The Lord has robed himself with might;
he has girded himself with power. R
The world you made firm,
not to be moved;
your throne has stood firm from of old.
From all eternity, O Lord, you are. R
Truly your decrees are to be trusted.
Holiness is fitting to your house,
O Lord, until the end of time. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा,
तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि
ते मनापासून पाळावयास मला शिकव.
आलेलुया!
Acclamation:
Alleluia:
R. Alleluia, alleluia.
If you are insulted for the name of Christ, you are blessed, because the Spirit of glory and of God rests upon you.
R. Alleluia, alleluia.
