सामान्यकाळातील पंधरावा सप्ताह
गुरुवार १६ जुलै २०२६
“अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.
“अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन.
"Come to me, all who labour and are heavy laden, and I will give you rest.
कार्मेलाईट संस्थेचा संस्थापक संत सायमन स्टॉक (सण १६ मे) ह्यांनी आपल्या संस्थेचा चाललेला छळ रोखण्यासाठी पवित्र मरियेकडे संरक्षणाचे साकडे घातलेले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इ. स. १२५१ साली इंग्लडमधील केंब्रिज ह्या ठिकाणी पवित्र मरियेने या वृद्ध सत्पुरुषाला दर्शन दिले आणि त्यांना तपकिरी रंगाची बेंतीण दिली. त्यावरून ख्रिस्तसभेत पवित्र मरिया ही “बेंतीणीची राणी ” म्हणून ओळखली जाऊ लागली व बेंतीण हा ख्रिस्ती परंपरेचा एक भाग बनली. प्रथम ख्रिस्तशरीर स्वीकारणाऱ्या मुलांचे सर्व वाईटांपासून रक्षण व्हावे म्हणून त्यांना बेंतीण देण्यात येते.संत सायमन स्टॉक ह्यांना पवित्र मरियेने बेंतीण देतेवेळी अशी शाश्वतीदेखील दिली की, जो कोणी ही बेंतीण अत्यंत श्रद्धेने आणि मातेच्या वात्सल्याने आपल्याकडे बाळगील त्या व्यक्तीला पवित्र मरियेच्या मध्यस्थीचा विशेष लाभ होईल. तसेच मरणाच्या वेळी त्याला खास असे संरक्षण देण्यात येईल आणि अनंत यातनांपासून त्यांचे रक्षण करण्यात येईल.एलिया संदेष्ट्याने कार्मेल नावाच्या पर्वतावर प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन जगाला घडविले ती कथा १ राजे अध्याय १८ मध्ये वर्णन करण्यात आलेली आहे. शिवाय पॅलेस्टाईनमधल्या या कार्मेल पर्वतावर अनेक प्राचीन मठवासियांचे वास्तव्य होते, त्यामुळे हा पर्वत पवित्र भूमी म्हणून गौरविला गेला आहे. १३ व्या शतकात सारासीन लोकांनी मोठे हत्याकांड घडवून आणल्यामुळे सायमन स्टॉक ह्यांच्या मठवासियांनी कार्मेल पर्वतावरून पलायन केले आणि एकांतवासाऐवजी लोकांतवासाची परंपरा अंगिकारली. काही उपासतापासाचे आणि मौनाचे कडक कायदे त्यांनी शिथिल केले.
चिंतन: पवित्र मरियेने या जगासाठी मध्यस्थी केली नसती तर हे जग कधीच नष्ट झाले असते. - संत फ्रुमेन्शिअस यूड्स
कार्मेलाईट संस्थेचा संस्थापक संत सायमन स्टॉक (सण १६ मे) ह्यांनी आपल्या संस्थेचा चाललेला छळ रोखण्यासाठी पवित्र मरियेकडे संरक्षणाचे साकडे घातलेले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून इ. स. १२५१ साली इंग्लडमधील केंब्रिज ह्या ठिकाणी पवित्र मरियेने या वृद्ध सत्पुरुषाला दर्शन दिले आणि त्यांना तपकिरी रंगाची बेंतीण दिली. त्यावरून ख्रिस्तसभेत पवित्र मरिया ही “बेंतीणीची राणी ” म्हणून ओळखली जाऊ लागली व बेंतीण हा ख्रिस्ती परंपरेचा एक भाग बनली. प्रथम ख्रिस्तशरीर स्वीकारणाऱ्या मुलांचे सर्व वाईटांपासून रक्षण व्हावे म्हणून त्यांना बेंतीण देण्यात येते.
संत सायमन स्टॉक ह्यांना पवित्र मरियेने बेंतीण देतेवेळी अशी शाश्वतीदेखील दिली की, जो कोणी ही बेंतीण अत्यंत श्रद्धेने आणि मातेच्या वात्सल्याने आपल्याकडे बाळगील त्या व्यक्तीला पवित्र मरियेच्या मध्यस्थीचा विशेष लाभ होईल. तसेच मरणाच्या वेळी त्याला खास असे संरक्षण देण्यात येईल आणि अनंत यातनांपासून त्यांचे रक्षण करण्यात येईल.
एलिया संदेष्ट्याने कार्मेल नावाच्या पर्वतावर प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन जगाला घडविले ती कथा १ राजे अध्याय १८ मध्ये वर्णन करण्यात आलेली आहे. शिवाय पॅलेस्टाईनमधल्या या कार्मेल पर्वतावर अनेक प्राचीन मठवासियांचे वास्तव्य होते, त्यामुळे हा पर्वत पवित्र भूमी म्हणून गौरविला गेला आहे. १३ व्या शतकात सारासीन लोकांनी मोठे हत्याकांड घडवून आणल्यामुळे सायमन स्टॉक ह्यांच्या मठवासियांनी कार्मेल पर्वतावरून पलायन केले आणि एकांतवासाऐवजी लोकांतवासाची परंपरा अंगिकारली. काही उपासतापासाचे आणि मौनाचे कडक कायदे त्यांनी शिथिल केले.
चिंतन: पवित्र मरियेने या जगासाठी मध्यस्थी केली नसती तर हे जग कधीच नष्ट झाले असते. - संत फ्रुमेन्शिअस यूड्स
