Marathi Bible Reading | 15th week in ordinary Time | Wednesday 15th July 2026 |

 सामान्यकाळातील पंधरावा सप्ताह 

बुधवार   जुलै  २०२६ 

 माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे 
All things have been handed over to me by my Father, 


संत बोनावेंचर
- महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१२१८-१२७४)

इटालीमधील  जन्मलेला जॉन फिडान्झा वयाच्या चौथ्या वर्षी एका असाध्य दुखण्याने आजारी पडला; परंतु संत फ्रान्सिस असिसीच्या प्रार्थनेने तो बरा झाला. त्यामुळे वयाच्या १७ व्या वर्षी त्याने फ्रान्सिस्कन संस्थेमध्ये प्रवेश घेतला. तेथे त्याने बोनावेंचर हे नवीन नाव धारण केले.
फ्रान्सिस्कन संघामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने अभ्यास करून इ. स. १२५७ साली डॉक्टरेट ही पदवी मिळविली.
त्याच वर्षी त्याला फ्रान्सिस्कन संघाचे जनरल म्हणून निवडण्यात आले. त्यावेळी त्याचे वय केवळ ३६ वर्षाचे होते. त्याच्या कारकीर्दीत फ्रान्सिस्कन संस्थेतील दोन मतप्रवाहामध्ये सौम्य असा संघर्ष सुरू झाला होता. काहींना वाटे फ्रान्सिस असिसीकर ह्याने दिलेली आचारसंहिता काटेकोरपणे पाळायलाच हवी तर काहींच्या मते बदलत्या जमान्यानुसार त्या आचारसंहितेत शिथिलता आणण्यात यावी. शेवटी बोनावेंचर ह्यांनी दोन्ही मतप्रवाह जाणून घेऊन सुवर्णमध्य काढला आणि संस्थेचे कार्य फोफावण्यास सुरूवात झाली. त्यामुळे संत बोनावेंचर ह्यांना फ्रान्सिस्कन संस्थेचे दुसरे संस्थापक अशा नावाने संबोधले जाते.
पवित्र मरियेला देवदूताचा संदेश या घटनेच्या स्मरणार्थ दर दिवशी उजाडण्यापूर्वी आणि दिवस मावळण्याच्या वेळी देवळाची घंटा वाजविली जावी आणि 'नमो कृपापूर्ण मरिये' ही प्रार्थना म्हटली जावी असा आदेश त्यांनी सर्व फ्रान्सिस्कन मठांना दिला होता. पुढे तर ही परंपरा इतकी रुजली की, आज ती प्रार्थना जगभरच्या ख्रिस्तसभेच्या प्रार्थनेचा एक भाग बनलेली आहे. फ्रान्सचा राजा संत लुईस नववा (सण २५ ऑगस्ट) ह्यांच्या विनंतीवरून बोनावेंचर ह्यांनी येशूच्या दुःखसहनावर आधारित सुंदर प्रार्थनाविधीसुद्धा लिहिलेला आहे. इ. स. १२६५ साली संत बोनावेंचर ह्यांना यॉर्क शहराचे आर्चबिशप म्हणून नियुक्त करावे असा पोपमहाशयांचा मानस होता परंतु बोनावेंचर ह्यांनी त्या सन्मानास नम्रपणे नकार दर्शविला. आठ वर्षांनी मात्र पोपमहाशयांनी आपल्या विशेषाधिकाराने त्यांना आल्यानोचे कार्डिनल बिशप नेमले. जेव्हा त्यांचे नियुक्तीपत्रक घेऊन पोपमहाशयांचे प्रतिनिधी बोनावेंचर ह्यांच्याकडे गेले तेव्हा फ्लॉरेन्स येथल्या एका मठामध्ये ते जेवणाच्या वशा आणि भांडी धूत होते. त्यांनी प्रतिनिधींना कार्डिनलपदाची टोपी आपले काम संपेपर्यंत जवळच्या खुंटीवर टांगून ठेवण्यास सांगितले.
कार्डिनल बोनोवेंचर हे पोप ग्रेगरी दहावे ह्यांचा उजवा हात होते. लिऑन्स येथे भरलेल्या १४ व्या विश्वपरिषदेची पूर्वतयारी करण्याचा अधिकार पोपनी बोनावेंचर ह्यांना दिलेला होता. स्वत: पोप ह्या पूर्वतयारीच्या सर्व सभांना जातीने उपस्थित होतेच त्यावेळी कार्डिनल बोनावेंचर ह्यांनी प्रत्येक सभेला केलेले मार्गदर्शन, त्यांची विद्वता आणि ख्रिस्तसभेशी असलेली एकनिष्ठा व तळमळ व्यक्त करणारे होते. दुर्दैवाने ह्या परिषदेचे कामकाज संपण्यापूर्वीच कार्डिनल बोनावेंचर ह्यांना देवाने आपल्याकडे बोलावून घेतले.
संत बोनावेंचर १५ जुलै १२७४ साली मरण पावले. १४८२ साली संतपदाला पोहोचले आणि १५८८ त्यांना ख्रिस्तसभेने धर्मपंडित ही पदवी देऊन गौरविले.
 पोप लिओ तेरावे ह्यांनी त्यांना “देऊळमातेचा साक्षात्कारी राजपुत्र" अशी पदवी बहाल केली.
ईशज्ञान, तत्त्वज्ञान अध्यात्म, दैनंदिन जीवन आणि पवित्र शास्त्रावरील भाष्य अशा विविध क्षेत्रातील मौल्यवान खजिना संत बोनावेंचर ह्यांनी आपल्यासाठी मागे ठेवलेला आहे. वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचे कॉमेंट्री ऑफ द सेंटेन्सेस नावाचे बायबलवर ४,००० पानांचे लिखाण आजही तितकेच प्रेरणादायी आहे. संत फ्रान्सिस असिसीकर ह्यांचे त्यांनी लिहिलेले चरित्र इ. स. १२६३ साली पिसा येथल्या एका महासभेत फ्रान्सिस्कन संस्थेच्या संस्थापकाचे अधिकृत चरित्र म्हणून सन्मानीत केले गेले.संत बोनावेंचर ह्यांच्याठायी एक उत्तम वक्तादेखील दडलेला होता. राजे महाराजे, महागुरू, धर्मगुरू, सामान्य जनता किंवा आपल्या मठातील प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी सर्वांना ते अत्यंत आत्मियतेने व तळमळीने मार्गदर्शन करीत असत, प्रवचन, व्याख्याने, भाषणे ह्यांची एकही संधी त्यांनी गमावली नाही. सर्वांपर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पसरवीत असताना ते स्वतः ख्रिस्तमय झाले आणि सर्वांपर्यंत जाऊन पोहोचले.

चिंतन : धार्मिक माणसाच्या जीवनाची खरी परिपूर्ती साध्यासुध्या गोष्टी अगदी सुरळीतपणे व व्यवस्थितरित्या करण्यात दडलेली आहे. - संत बोनावेंचर

आज प्रभू येशू प्रामुख्याने तीन महत्त्वाची सत्ये समजावून सांगत आहे.  पहिले म्हणजे ज्ञानी नव्हे तर साध्या, भोळ्या आणि नम्रवृत्तीच्या माणसांनाच  देवाच्या शहाणपणाचा आणि सत्याचा उलगडा होत असतो. दुसरे सत्य म्हणजे  प्रकटीकरण पित्या परमेश्वराने केवळ येशू ख्रिस्ताद्वारेच केलेले आहे आणि सर्वं  अद्भुत कृत्ये करण्याचे सामर्थ्य येशूलाच देण्यात आले आहे. तिसरे सत्य  माणजेच त्याची इच्छा असणाऱ्या निवडलेल्यांनाच देवाचे प्रकटीकरण होत 
असते. आपण आज प्रभू येशूने दिलेल्या तीन महत्त्वाच्या गोष्टींवर चिंतन करु या.

पहिले वाचन :यशया १०:५-७,१३-१६
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
सोटाआपणास हाती धरणाऱ्याला गरगर फिरवी ल काय?

परमेश्वर म्हणतो, “जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातातील सोटा माझा कहर आहे त्या असिरियाचा धिक्कार असो. मी त्याला अधर्मी राष्ट्रावर पाठवीन. माझ्या क्रोधाला पात्र झालेल्या लोकांची लूट हरण करावी, त्यांनी लुबाडलेल्या मालमत्तेचा अपहार करावा आणि त्यांना रस्त्यावरील चिखलाप्रमाणे तुडवावे, अशी त्यांच्यासंबधाने त्यांना आज्ञा करीन. तथापि त्याचा विचार काही असा नाही; त्यांच्या मनाचा समज असा नाही, कारण केवळ नासधूस करावी, बहुत राष्ट्रांची कत्तल करावी हेच त्याच्या मनात आहे."
परमेश्वर म्हणतो, “माझ्याच बाहुबलाने आणि माझ्या स्वतःच्या अकलेने हे मी केले आहे, मी चतुर आहे; मी राष्ट्रांच्या सीमा फिरवल्या आहेत आणि त्यांची भांडारे लुटली आहेत; बलाढ्य वीराप्रमाणे मी तक्तांवर बसलेल्यांना ओढून काढले आहे. पक्ष्यांच्या कोटराप्रमाणे राष्ट्राचे धन माझ्या हाती लागले आहे; पक्ष्यांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे सर्व पृथ्वी मी हस्तगत केली आहे; तेव्हा कोणी पंख फडफडावले नाहीत, तोंड उघडले नाही, चिवचिव केले नाही."
कुऱ्हाडीने तोडणाऱ्यापुढे कुऱ्हाड घमेंड करील काय? करवत, आपणाला चालवणाऱ्या पुढे, आढ्यता मिरवील काय? सोट्याने, आपणास हाती धरणाऱ्याला गरगर फिरवावे, काष्ठाने काष्ठेतराला उचलावे तसा मी आहे. यास्तव प्रभो, सेनाधीश प्रभो, त्याच्या पुष्ट जणांना रोडपणा आणील; त्याच्या वैभवाखाली, अग्निज्वालेसारखी ज्वाला भडकेल.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Isaiah 10:5-7, 13-16

Thus says the Lord: Woe to Assyria, the rod of my anger, the staff in their hands is my fury! Against a godless nation I send him, and against the people of my wrath I commend him, to take spoil and seize plunder, and to tread them down like the mire of the streets. But he does not so intend, and his heart does not so think; but it is in his heart to destroy, and to cut off nations not a few, For he says: "By the strength of my hand I have done it, and by my wisdom, for I have understanding: I remove the boundaries of peoples, and plunder their treasures; like a bull I bring down those who sit on thrones. My hand has found like a nest the wealth of the peoples, and as one gathers eggs that have been forsaken, so I have gathered all the earth; and there was none that moved a wing or opened the mouth or chirped." Shall the axe boast over him who hews with it, or the saw magnify itself against him who wields it? As if a rod should wield him who lifts it, or as if a staff should lift him who is not wood! Therefore the Lord God of hosts will send wasting sickness among his stout warriors, and under his glory a burning will be kindled, like the burning of fire.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ९४:५-६, ७-८, ९-१०,१४-१५

प्रतिसाद :   परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.

१ )हे परमेश्वरा,
ते तुझ्या लोकांचा चुराडा करतात.
तुझ्या वतनाला पीडतात. 
ते विधवा आणि उपरी ह्यांचा जीव घेतात, 
अनाथांना ठार मारतात.

२) ते म्हणतात, “परमेश्वर पाहत नाही, 
याकोबचा देव लक्ष देत नाही.” 
अहो, पशुतुल्य लोकहो, लक्ष द्या; 
मूर्खानो, तुम्ही कधी शहाणे व्हाल ?

३) ज्याने कान घडवला तो ऐकणार नाही काय ? 
ज्याने डोळा बनवला तो पाहणार नाही काय ? 
जो राष्ट्रांचा शास्ता, मानवांचा ज्ञानदाता, 
तो शासन करणार नाही काय ?

४ )कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही; 
तो आपले वतन सोडून देणार नाही. 
न्याय नीतिमानाकडे वळेल आणि 
सरळ मनाचे सर्व जन त्याला अनुसरतील..

Psalm 94:5-10, 14-15

The Lord will not abandon his people. 
They crush your people, Lord; 
and they humble your inheritance. 
They kill the widow and the stranger, 
and murder the fatherless child. R 

And they say, "The Lord does not see, 
the God of Jacob pays no heed."
Mark this, you senseless people, 
fools, when will you understand? R

Can he who planted the ear not hear? 
Can he who formed the eye not see?
Will he who trains the nations not punish? 
Will he who teaches man not have knowledge? R

The Lord will not abandon his people, 
nor forsake those who are his heritage; 
for judgment shall again be just, 
and all true hearts shall uphold it. R

जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
तू आपल्या वात्सल्याने मला नवजीवन दे, 
म्हणजे मी तुझ्या इच्छेप्रमाणे वागेन.
 आलेलुया!

Acclamation:
Alleluia:
R. Alleluia, alleluia.
Blessed are you, Father, Lord of heaven and earth, that you have revealed to little children the mysteries of the kingdom
R. Alleluia, alleluia.

मत्तय ११शुभवर्तमान:२५-२७
मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन वाचक :पवित्र

"ज्ञानी लोकांपासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांस प्रकट केल्या."

येशू बोलू लागला: “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो; कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकांना प्रकट केल्या; खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे आणि पित्यावाचून पुत्राला कोणी ओळखत नाही आणि पुत्रावाचून व ज्या कोणाला त्याला प्रकट करावयाची इच्छा असेल, त्याच्यावाचून पित्याला कोणी ओळखत नाही.
 
: प्रभूचे हे शुभवर्तमान .लोक
हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. सर्व :

Gospel Reading 

Matthew 11:25-27


At that time Jesus declared, "I thank you, Father, Lord of heaven and earth, that you have hidden these things from the wise and understanding and revealed them to little children; yes, Father, for such was your gracious will. All things have been handed over to me by my Father, and no one knows the Son except the Father, and no one knows the Father except the Son and anyone to whom the Son chooses to reveal him."

 This is the Gospel of the Lord  
Praise the Lord Jesus Christ .
                                                 

चिंतन
यशया आपल्याला आठवण करून देतो की अहंकाराने भरलेल्या आणि देवाला न मानणाऱ्या राष्ट्राचे पतन निश्चित असते. बलशाली सेना, सत्ता किंवा सामर्थ्य असले तरी देवाच्या न्यायापासून कोणीही सुटत नाही. मीच करतो, माझ्यामुळेच सर्व घडते हा अभिमान व्यक्तीला अंध करतो आणि सत्यापासून दूर नेतो. देव अशा गर्विष्ठांना नम्र करतो, कारण त्यांची शक्ती ही तात्पुरती आणि भ्रमित करणारी असते. देवाच्या दृष्टीने खरी शक्ती नम्रतेत, सेवेत आणि सत्यस्वरूप जगण्यात आहे. मत्तयाच्या सुवार्तेत, येशू सांगतो की खरे शहाणपण आणि आकलन देवच नम्रजनांस उघडकरतो. अहंकारी मन परमेश्वराच्या रहस्यांना ग्रहण करू शकत नाही, कारण ते स्वतःमध्येच गुंतलेले असते. ख्रिस्ताकडे जाणारी वाट नम्रतेतून, शरणागतीतून आणि विश्वासातूनच उघडते. देवाची ओळख, त्याची योजना आणि खरे ज्ञान हे केवळ येशू ख्रिस्ताद्वारेच आपल्याला प्रकट होते. म्हणून आजचा संदेश स्पष्ट आहेः अहंकार सोडा, नम्रतेत रहा, आणि देवाच्या शहाणपणाला स्वतःमध्ये रुजू द्या.

प्रार्थनाहे प्रभो, नम्रतेने व प्रामाणिकपणे तुला ओळखण्यास व खरे ख्रिस्ती  जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या