Marathi Bible Reading | 17th week in ordinary Time | Monday 27th July 2026 |

 सामान्यकाळातील  वा सप्ताह 

 सोमवार दि २७ जुलै  २०२६ 

"स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; 
 The kingdom of heaven is like to a grain of mustard seed, 


  
संत इनोसेंट पहिले 
• परमगुरू, वर्तनसाक्षी (४१७)
  
प्रभू येशू म्हणतो, 'देवाचे राज्य आपल्यामध्ये आहे.' आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात बाप्तिस्माद्वारे त्याचे बीज पेरलेले आहे. ख्रिस्ताची अमर्याद कृपा आणि वरदानांचा स्वीकार करुन आपल्यातील देवराज्य म्हणजेच, चांगुलपणा, नीतिमत्ता, प्रेम, सेवा व परोपकार आपण वाढीस लावला तर आपल्या आजुबाजुला त्याची गोड फळे सर्वांना उपभोगायला मिळतील. परमेश्वराने आपल्या हृदयात त्याच्या वचनांद्वारे देवराज्याचे बीज पेरलेले आहे. त्या बीजाला चांगले मूळ धरावे, श्रद्धेने त्याची जोपासना व्हावी आणि पवित्र आत्म्याच्या कृपावर्षावाने आध्यात्मिक दानांचा आपल्यावर वर्षाव व्हावा. म्हणून आपण अंतर्मुख होऊन ख्रिस्ताशी एकरुप होण्यासाठी प्रार्थना करु या.

पहिले वाचन :  यिर्मया १३ : १-११
वाचन :यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन

परमेश्वराने सांगितले, "तू जाऊन आपणासाठी तागाचा कमरबंद विकत घे, तो कमरेस गुंडाळ पण त्याला पाणी लागू देऊ नकोस." तेव्हा परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे मी कमरबंद विकत घेऊन कमरेस गुंडाळला. मग परमेश्वराचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले की, "तू विकत घेतलेला तुझ्या कमरेस असलेला कमरबंद घे, ऊठ, फरात नदीकडे जा आणि तो तेथे खडकाच्या कपारीत लपवून ठेव.” मी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे जाऊन तो फरात नदीजवळ लपवून ठेवला. बरेच दिवस लोटल्यावर परमेश्वर मला म्हणाला, "ऊठ, फरात नदीकडे जा आणि जो कमरबंद तेथे लपवून ठेवण्यास तुला मी सांगितले होते तो घेऊन ये.” तेव्हा मी फरात नदीकडे गेलो आणि कमरबंद जेथे लपवून ठेवला होता तेथून तो खणून काढला आणि पाहतो तो कमरबंद खराब,कुचकामाचा झाला होता. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले : “परमेश्वर असे म्हणतो : असाच मी यहूदाचा दिमाख, यरुशलेमाचा मोठा दिमाख नष्ट करीन. ते दुष्ट लोक माझी वचने ऐकत नाहीत, ते आपल्या अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात आणि अन्य देवाची सेवा करण्यास आणि त्यांस भजण्यास त्यांच्या मागे जातात म्हणून त्यांची गती ह्या निरुपयोगी झालेल्या कमरबंदाप्रमाणे होईल. इसराएलाचे सर्व घराणे आणि यहूदाचे सर्व घराणे ह्यांनी माझी प्रजा व्हावे आणि माझे नाम, स्तुती आणि भूषण यांस कारण व्हावे म्हणून, कमरबंद जसा मनुष्याच्या कमरेस लगटलेला असतो तसे त्यांनी मला लगटून राहावे असे मी केले, तरी त्यांनी मानले नाही, असे परमेश्वर म्हणतो."
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Jeremiah 13: 1-11
Thus saith the Lord to me: Go, and get thee a linen girdle, and thou shalt put it about thy loins, and shalt not put it into water. And I got a girdle accoding to the word of the Lord, and put it about my loins. And the word of the Lord came to me the second time, saying:
Take the girdle which thou hast got, which is about thy loins, and arise, and go to the Euphrates, and hide it there in a hole of the rock.
 And I went, and hid it by the Euphrates, as the Lord had commanded me. And it came to pass after many days, that the Lord said to me: Arise, go to the Euphrates, and take from thence the girdle, which I commanded thee to hide there. And I went to the Euphrates, and digged, and took the girdle out of the place where I had hid it: and behold the girdle was rotten, so that it was fit for no use.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र :  अनुवाद ३२:१८-१९,२०.२१
प्रतिसाद : जन्म देणाऱ्या देवाला ते विसरले.

१ त्यांना जन्माला घातलेल्या खडकाची त्यांनी पर्वा केली नाही आणि जन्म देणाऱ्या देवाला ते विसरले हे पाहून परमेश्वराला वीट आला, कारण त्याचे पुत्र आणि कन्या ह्यांनी त्याला चीड आणली.

२ मग तो म्हणाला, मी त्यांच्यापासून आपले मुख लपवीन, त्यांचा अंत कसा काय होईल ते मी पाहीन. कारण ही पिढी अतिशय कुटिल आहे, ही मुले अविश्वसनीय आहेत.

३ काल्पनिक देवांच्या योगे त्यांनी मला ईष्र्येस पेटवले, अर्थहीन मूर्तीच्या योगे त्यांनी मला चिडवले; म्हणून राष्ट्रहीन लोकांच्या योगे मी त्यांना ईष्र्येस पेटवीन. एका मूढ राष्ट्रांच्या योगे मी त्यांना चिडवीन.


Psalm: Deuteronomy 32: 18-19, 20, 21
R. (18a) You have forgotten God who gave you birth.

18 Thou hast forsaken the God that beget thee, and hast forgotten the Lord that created thee.
19 The Lord saw, and was moved to wrath: because his own sons and daughters provoked him.
R. You have forgotten God who gave you birth.

20 And he said: I will hide my face from them, and will consider what their last end shall be: for it is a perverse generation, and unfaithful children.
R. You have forgotten God who gave you birth.

21 They have provoked me with that which was no god, and have angered me with their vanities: and I will provoke them with that which is no people, and will vex them with a foolish nation.
R. You have forgotten God who gave you birth.

जयघोष                                                 
आलेलुया, आलेलुया! 
प्रभु आपल्या प्रत्येक वचनाला जागतो, त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते.
 आलेलुया!


Acclamation:
Alleluia: 
R. Alleluia, alleluia.
The Father willed to give us birth by the word of truth that we may be a kind of firstfruits of his creatures.
R. Alleluia, alleluia.

शुभवर्तमान   मत्तय १३ : ३१ - ३५
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशूने लोकसमुदायांपुढे एक दाखला मांडला तो असा की, "स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला; तो तर सर्व दाण्यांमध्ये लहान आहे तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की, आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करतात. "त्यानेत्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्रीने घेऊन तीन मापे पिठामध्ये लपवून ठेवले, त्याच्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.” ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही. ह्यासाठी की, संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असे की, “मी आपले तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रगट करीन."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading :
Matthew 13: 31-35
Another parable he proposed unto them, saying: The kingdom of heaven is like to a grain of mustard seed, which a man took and sowed in his field. Which is the least indeed of all seeds; but when it is grown up, it is greater than all herbs, and becometh a tree, so that the birds of the air come, and dwell in the branches thereof. Another parable he spoke to them: The kingdom of heaven is like to leaven, which a woman took and hid in three measures of meal, until the whole was leavened. All these things Jesus spoke in parables to the multitudes: and without parables he did not speak to them. That it might be fulfilled which was spoken by the prophet, saying: I will open my mouth in parables, I will utter things hidden from the foundation of the world.
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

 चिंतन
यिर्मया संदेष्टाचा अंगवस्त्राचा प्रतीक आपल्याला स्मरण करून देतो की देवाची सेवा शुद्ध, निष्ठावान आणि अविभक्त हृदयाने करावी. अंगवस्त्र जसे अपवित्र झाल्यावर उपयोगाचे राहत नाही, तसेच देवाशी निष्ठा हरवली तर आपले जीवन फळहीन बनते. आपली देवसेवा बाह्यरूपात नव्हे तर आतून स्वच्छ आणि त्याच्याशी जोडलेली असावी. देव आपल्याला आपल्या कंबरेला बांधलेल्या वस्त्रासारखे जवळ ठेवू इच्छितो-त्याच्या गौरवाचे साधन म्हणून. परंतु अभिमान, स्वार्थ आणि पाप आपल्याला देवाच्या उद्दिष्टापासून दूर नेतात. येशूची राईच्या दाण्याची दृष्टांत आपल्याला दाखवते की देवाच्या राज्याची सुरुवात छोटी असली तरी तिचे फळ मोठे असते. छोट्या विश्वासापासून, छोट्या प्रार्थनेपासून आणि छोट्या चांगल्याकृतींपासूनही देव महान कार्य घडवतो. किण्वाचे प्रतीक सांगते की देवाचे वचन शांतपणे, हळूहळू पण प्रभावीपणे संपूर्ण जीवन बदलते. आपली सेवा छोट्या गोष्टींमध्येही विश्वासू असली की देव ती वाढवून मोठे आशीर्वाद देतो. म्हणून अंगवस्त्रासारखी पवित्रता आणि राईच्या दाण्यासारखा छोटा पण खरा विश्वास-यांनी आपण देवाचे राज्य जगात प्रकट करू शकतो.

प्रार्थना :हे प्रभो, तुझ्या पवित्र आत्म्याने मला भरुन टाक. दिवसें दिवस माझ्या अंतःकरणातील देवराज्य वाढीस लागाने म्हणून मला तुझी कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या