Marathi Bible Reading | 17th week in ordinary Time | Tuesday 28th July 2026 |

 सामान्यकाळातील  वा सप्ताह 

 मंगळवार  दि २८ जुलै  २०२६ 

"जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. "

The Son of Man will send his angels, and they will gather out of his kingdom all causes of sin and all lawbreakers, and throw them into the fiery furnace. 


  संत सिस्टर अल्फोन्सा
- कुमारिका (१९१०-१९४६)

केरळातल्या कुदानाळूर नावाच्या गावात १९ ऑगस्ट १९१० साली जोसेफ व मेरी ह्यांच्या संसारवेलीवर आन्ना नावाचे चौथे अपत्य उमलले, आईच्या मृत्यूनंतर तिच्या मावशीने आन्नाचे पालन पोषण केले. तिच्या बालपणी तिने वाचलेली लिझोची संत तेरेजा हिची कहाणी वाचून आपण प्रार्थना आणि प्रायश्चित्त ह्या माध्यमातून संत व्हावे असे तिला वाटू लागले.
आन्ना हिला कॉन्व्हेंटमध्ये जायचे होते, परंतु तिच्या मावशीने तिचे आधीच लग्न ठरविलेले होते. आपली सोयरिक मोडणे आता केवळ अशक्य आहे असे दिसताच तिने आपले सौंदर्य नष्ट करण्यासाठी मोठ्या अग्नी ज्वालेमध्ये आपला पाय घातला. परंतु सुदैवाने तो घसरला आणि ती स्वतः त्या ज्वालेत पडली व मोठ्या प्रमाणात भाजली. मात्र थोड्याशा औषधोपचारानंतर ती बरी झाली. त्यानंतर तिच्या मावशीने तिला व्रतस्थ जीवनात प्रवेश करण्यास परवनागी दिली.
या महत्त्वाच्या जीवनासाठी आपली तयारी करण्यासाठी ती भारानांगानाम येथील कॉन्व्हेंटमध्ये नवशिष्य म्हणून इ. स. १९२८ साली दाखल झाली. तिथे वैराग्याची वस्त्रे पांघरल्यानंतर सिस्टर अल्फोन्सा ह्यांच्या जीवनात तीन प्रसंग येऊन गेले. इ. स. १९३५ साली कॉन्व्हेंटमध्ये प्रशिक्षण घेत असतानाच तिला एका असाध्य रोगाने पछाडले. तीन महिने ती ह्या आजाराशी झुंज देत होती. त्यावेळी तिने धन्यवादित कुरियाकोस एलायस चावरा (सण ३ जानेवारी) ह्यांचा नोव्हेना केला आणि ती ठणठणीत बरी झाली.
दुसऱ्या एका प्रसंगात एका संध्याकाळी एक चोर त्यांच्या कॉन्व्हेंटमध्ये शिरलेला पाहून तिने इतका धसका घेतला की, ती बेशुद्ध होऊन पडली. शुद्धीवर आल्यानंतर तिला तामिळ भाषेची देणगी मिळाल्याचे दिसून आले. त्याआधी तिने तामिळ ही भाषा कधी वाचली, लिहिली की बोलली नव्हती. आता ह्या नवीन दानामुळे ती तामिळी लोकांमध्ये प्रसिद्ध झाली. बरेच लोक तिच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले. तिला दूरदृष्टीची विलक्षण देणगी देखील लाभलेली होती.
तिसऱ्या एका घटनेत इ. स. १९४५ साली तिला येशूच्या दुःख सहनाशी एकरूप होण्याची संधी मिळाली. सुरूवाती सुरूवातीला हे दुःखसहन केवळ शुक्रवारी ३ तासासाठी होई. पुढे ते कधीही होऊ लागले. परंतु त्यातून बाहेर आल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर थकल्याची कुठलीही खूण दिसत नसे. उलट आगळाच ताजेतवानेपणा तिच्या मुखवट्यावर विलसत असे.
दुःखसहन प्रसंग मर्यादित व्हावे अशी प्रार्थना तू का करीत नाहीस? असा प्रश्न विचारणाऱ्या सिस्टरांना तिने दिलेले उत्तर सामान्य माणसाला अंतर्मुख करणारे असेच आहे. ती म्हणाली मी केवळ हेच दुःखसहन नव्हे तर कोणतेही दुःख सहन करण्यास तयार आहे, आजचे आधुनिक जग केवळ सुखासीनतेच्या सागरात पार डुंबलेले आहे. नाशाच्या मार्गावर असणाऱ्या जगासाठी म्हणा किंवा धर्मगुरू व धर्मभगिनींच्या उदासीन वृत्तीबद्दल म्हणा प्रभूला मला जितक्या यातना दयावयाच्या आहेत तितक्या सोसण्यास माझी पूर्ण तयारी आहे.
२८ जुलै रोजी सिस्टर अल्फोन्सा मरण पावल्या. पुढे इ. स. १९८६ सालच्या फेब्रुवारी महिन्यात जेव्हा पोप जॉन पॉल दुसरे आपल्या भारत भेटीवर आले तेव्हा कोट्टायाम (केरळ) येथे त्यांना धन्यवादित ही पदवी पोपमहाशयांनी बहाल केली.व १२ ऑक्टोबर २००८ साली पोप बेनेडिक्ट १६वे संत हि पदवी यांनी बहाल केली. 
ख्रिस्तसभा आज भारतातील प्रथम स्त्री संत असलेल्या संत ■ अल्फोन्साचा सन्मान करीत आहे. 
चिंतन : मी स्वतःला सर्वस्वी येशूचरणी वाहिलेले आहे. माझ्याशी वागताना कृपया येशूला प्रसन्न करण्याचा आपण सर्वजण एकत्र प्रयत्न करू या.केवळ देवाच्या प्रेमाखातर दुःखसहन करण्यास आनंद मानणे हीच माझी एकमेव इच्छा आहे. - संत  सि. अल्फोन्सा
संत अल्फोन्साने आपले सर्वस्व येशू चरणी वाहीले व मृत्युला सामोरे गेली. संत अल्फोन्सा खरोखरच जागृत राहून प्रभूला सामोरे गेली. केरळ येथे | असलेल्या संत अल्फोन्साच्या समाधीला आपण भेट देऊ शकता.

पहिले वाचन :  यिर्मया १४:१७-२२
वाचन : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"हे परमेश्वरा, आमची आठवण ठेव आणि तुझा आम्हांशी केलेला करार मोडू नकोस."

"तू त्यांना हे वचन सांग: माझ्या डोळ्यांतून रात्रंदिवस अश्रुधारा वाहोत, त्या न थांबोत; कारण माझ्या लोकांची कुवार कन्या भयंकर जखम लागून अति छित्रभित्र झाली आहे. मी वनात जातो तो तेथे तरवारीने वधलेले आहेत! शहरात येतो तो दुष्काळाने पीडलेले मला आढळतात. कारण संदेष्टे आणि याजक हे अज्ञात देशांत भटकत आहेत."
तू यहुदाचा अगदी त्याग केला आहेस काय ? तुझ्या जिवाला सियोनचा वीट आला आहे काय ? आम्ही बरे होऊ नये, इतके तू आम्हांला का मारले आहेस ? आम्ही शांतीची अपेक्षा करतो, पण हित काही होत नाही; आम्ही बरे होण्याची वाट पाहतो तो पहा दहशत.
हे परमेश्वरा, आमची दुष्टता, आमच्या पूर्वजांचे दुष्कर्म, आम्ही जाणतो; आम्ही तुझ्याविरूद्ध पाप केले आहे. तू आपल्या नामास्तव आमचा वीट मानू नकोस;तुझ्या वैभवाच्या गादीची अप्रतिष्ठा करू नकोस; आम्हांशी केलेला करार आठव, तो मोडू नकोस;
विदेशांच्या निरुपयोगी दैवतांमध्ये कोणी पर्जन्य देणारी
आहेत काय ? आकाशाला वृष्टी करता येईल काय ?
हे परमेश्वरा, आमच्या देवा, हे करणारा तूच ना ? आम्ही तुझी आशा धरतो, कारण तू ह्या सर्वांना उत्पन्न केले आहेस.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :Jeremiah 14:17b-22
Let my eyes run down with tears night and day, and let them not cease, for the virgin daughter of my people is shattered with a great wound, with a very grievous blow. If I go out into the field, behold, those pierced by the sword! And if I enter the city, behold, the diseases of famine! For both prophet and priest ply their trade through the land and have no knowledge. Have you utterly rejected Judah? Does your soul loathe Sion? Why have you struck us down so that there is no healing for us? We looked for peace, but no good came; for a time of healing, but behold, terror. We acknowledge our wickedness, O Lord, and the iniquity of our fathers, for we have sinned against you. Do not spurn us, for your name's sake; do not dishonour your glorious throne; remember and do not break your covenant with us. Are there any among the false gods of the nations that can bring rain? Or can the heavens give showers? Are you not he, O Lord our God? We set our hope on you, for you do all these things.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र : ७९:८-९,११,१३
प्रतिसाद : हे देवा, तू आम्हांला सहाय्य कर. 

१ आमच्याविरूद्ध आमच्या पूर्वजांची दुष्कर्मे आठवू नकोस.
 तुझी करूणा आमच्यावर सतत राहो,
 कारण आम्ही फार दुर्दशेत पडलो आहोत.
तू आपल्या नामाच्या थोरवीसाठी आम्हांला सहाय्य कर.

२) हे आमच्या उद्धारक देवा, 
आपल्या नामाकरिता आम्हांला सोडव 
आणि आमची पापे धुवून टाक.

३ )बंदिवानांचे कण्हणे तुझ्या कानी येवो; 
ज्यांचा वध करण्याचे ठरवले आहे 
त्यांना तू आपल्या बाहुबलाने वाचव. 
मग जे आम्ही तुझी प्रजा आणि 
तुझ्या कुरणातली मेंढरे ते आम्ही सर्वकाळ
 तुझे उपकारस्मरण. करीत राहू.
 तुझी कीर्ती पिढ्यान्पिढ्या वर्णीत जाऊ.

 Psalm 79:8, 9, 11, 13
For the sake of the glory of your name, free us O Lord.

Do not remember against us 
the guilt of former times.
Let your compassion hasten to meet us;
 for we have been brought very low. R

Help us, O God our saviour, 
for the sake of the glory of your name. 
Free us and forgive us our sins, 
because of your name. R

Let the groans of the prisoners
come before you, 
your strong arm reprieve 
those condemned to die. R

Then we, your people, the flock of your pasture, 
will give you thanks forever and ever. 
From age to age
we will recount your praise. R

जयघोष                                             
आलेलुया, आलेलुया! 
हे येरुशलेम, प्रभूचे गुणगान गा ! 
तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.
 आलेलुया!


Acclamation:
Alleluia: 
R. Alleluia, alleluia.
The seed is the word of God, Christ is the sower; all who come to him will live forever.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान   मत्तय १३ : ३६-४३
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. "
येशू लोकसमुदायांना निरोप देऊन घरात गेला. तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “शेतातल्या निंदणाच्या दाखल्याची आम्हाला फोड करून सांगा." त्याने उत्तर दिले की, “चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे; शेत हे जग आहे, चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत, निंदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत, ते पेरणारा वैरी हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निंदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दुतांना पाठवील आणि ते सर्व अडखळविणाऱ्यांना आणि अनाचार करणाऱ्यांना त्यांच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत ते ऐको."
Gospel Reading :
Matthew 13:36-43

At that time: Jesus left the crowds and went into the house. And his disciples came to him, saying, "Explain to us the parable of the weeds of the field." He answered, "The one who sows the good seed is the Son of Man. The field is the world, and the good seed is the sons of the kingdom. The weeds are the sons of the evil one, and the enemy who sowed them is the devil. The harvest is the end of the age, and the reapers are angels, Just as the weeds are gathered and burned with fire, so will it be at the end of the age. The Son of Man will send his angels, and they will gather out of his kingdom all causes of sin and all lawbreakers, and throw them into the fiery furnace. In that place there will be weeping and gnashing of teeth. Then the righteous will shine like the sun in the kingdom of their Father. He who has ears, let him hear."
This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .

 चिंतन
यिर्मया संदेष्टाचा रडण्याचा स्वर आपल्याला मानवाच्या वेदना, दुःख आणि देवापासून दूर गेल्यामुळे निर्माण झालेल्या संकटांची जाणीव करून देतो. लोकांची दुष्काळातील हताशता ही पापाचे परिणाम कसे संपूर्ण समाजावर पडतात याचे जिवंत चित्र आहे. तरीही त्यांच्या हृदयात देवाकडे केलेली आशेची हाक दिसते-"तूच आमची आशा, आमचे तारक." निराशेच्या काळातही देव आपल्याला टाकून देत नाही; तो आपल्या लोकांच्या पुन्हा वळण्याची वाट पाहतो. मत्तय १३:३६-४३ मध्ये येशू गहू आणि रानगवताच्या दृष्टांताद्वारे सांगतो की देवाचे राज्य जगात हळूहळू उलगडत आहे. चांगले आणि वाईट एकत्र दिसत असले, तरी शेवटी देव न्यायाने रानगवत वेगळे करेल. सध्या आपण दुःख, परीक्षा आणि अन्याय सहन करतो, पण देवाचे वचन आहे की शेवटी गव्हासारखे आपण त्याच्या प्रकाशात चमक. धैर्य, विश्वास आणि सहनशीलता हे देवाच्या राज्याचे गुपित आहे-ते शेवटी आनंदाचे फळ देते. निराशेचा रुदन आणि आशेची प्रार्थना या दोन्ही देवापुढे मौल्यवान आहेत; त्यातून हृदय परिवर्तन होते. म्हणून संकटात रडत असलो तरी विश्वासाने उभे राहू या-कारण देवाचा शेवट न्याय, प्रकाश आणि आनंदाने भरलेला असतो.
प्रार्थना :  हे प्रभो, तुझ्या पवित्र आत्म्याने मला भरुन टाक. दिवसें दिवस माझ्या अंतःकरणातील देवराज्य वाढीस लागाने म्हणून मला तुझी कृपा दे, आमेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या