पुनरुत्थान पाचवा सप्ताह
सोमवार दि.२९ एप्रिल २०२४
जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील, मीही त्याच्यावर प्रीती करीन आणि स्वतः त्याला प्रकट होईन."
he who loves me will be loved by my Father, and I will love him and manifest myself to him."
सिएनाची संत कॅथरीन
- कुमारिका व धर्मपंडित
ख्रिस्तसभेच्या नूतनीकरणासाठी आणि ऐक्यासाठी आपला देह झिजविणाऱ्या या ख्रिस्तसभेच्या युवराज्ञीला आयुष्यातील अखेरचे तीन महिने महाभयंकर अशा यातनांना सामोरे जावे लागले. तरी हे दुःखसहन तिने मोठ्या धैर्याने, सहनशिलतेने आणि प्रेमाने स्वीकारले आणि शेवटी वयाच्या ३३ व्या वर्षी आपला आत्मा देवाच्या हाती सोपविला.
“सुसंवाद” साहित्यकृतीत तिने देवपित्याने तिला आध्यात्मिक क्षेत्रात दाखविलेल्या प्रकाशाचे वर्णन केले आहे.
कॅथरीन ३० एप्रिल १३८० साली मरण पावली व पोप पायस दुसरे ह्यांनी तिला १४६१ साली संत पदाचा नजराणा बहाल केला. पुढे इ. स. १९७० साली पोप पॉल सहावे ह्यांनी तिला ख्रिस्तसभेची धर्मपंडिता म्हणून सन्मानीत केले. ती इटलीची आश्रयदाती संत आहे. अग्नी, मरी आणि डोकेदुःखी ह्याविरूद्ध तिचा धावा केला जातो.
चिंतन : भूतकाळातील आपल्या पातकांची आठवण करू नका आणि जर ती करायचीच असेल तर देवाच्या क्षमाशीलतेच्या प्रकाशात ती होऊ द्या. सिएनाची संत कॅथरीन.
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १४:५-१८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगतो."
पौल आणि बर्णबा यांचा उपमर्द करून त्यांना दगडमार करण्याकरिता परराष्ट्रीय आणि यहुदी आपल्या अधिकाऱ्यांसह त्यांच्यावर धावून जाणार होते, हे ओळखून ते लुकवनिया प्रांतातील लुस्त्र आणि दर्बे ह्या नगरात आणि त्या सभोवतालच्या प्रदेशात पळून गेले आणि तेथे ते सुवार्ता सांगत राहिले.
लुस्त्र येथे पायांनी अधू असा कोणीएक माणूस बसला होता, तो जन्मतः पांगळा असून कधी चालला नव्हता. तो पौलचे बोलणे ऐकत असे. पौलने त्याच्याकडे दृष्टी लावून आणि त्याला आपण बरे होऊ असा विश्वास आहे असे पाहून, मोठ्याने म्हटले, “तू आपल्या पायांवर नीट उभा राहा." तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. मग पौलने जे केले ते पाहून लोकसमुदाय लुकवनी भाषेत मोठ्याने ओरडून बोलले, “देव माणसांच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत!" त्यांनी बर्णबाला ज्युपिटर म्हटले आणि पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले. मग नगरापुढे असलेल्या ज्युपिटराच्या पुजाऱ्याने बैल आणि माळा दरवाजाजवळ आणल्या आणि लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे असे त्याच्या मनात होते. हे ऐकून प्रेषितांनी म्हणजे बर्णबा आणि पौल ह्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून त्यांनी ओरडून म्हटले, "गृहस्थांनो, हे काय करता? आम्ही आणि तुम्ही समभावनेची माणसे आहोत. तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यातील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपआपल्या मार्गानी चालू दिले. तथापि त्याने स्वतःला साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले. आकाशापासून पर्जन्य आणि फलदायक ऋतू तुम्हांस दिले आणि अन्नाने आणि हर्षाने तुम्हांस मन भरून तृप्त केले." असे बोलून त्यांनी आपणाला बलिदान करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 14:5-18:
In those days: When an attempt was made (at Iconium) by
both Gentiles and Jews, with their rulers, to mistreat Paul and Barnabas and to stone them, they learned of it and fled to Lystra and Derbe, cities of Lycaonia, and to the surrounding country, and there they continued to preach gospel, Now at Lystra there was a man sitting, who could not use his feet, he was crippled from birth and had never walked. He listened to Paul speaking. And Paul, looking intently at him and seeing that he had faith to be made well, said in a loud voice, "Stand upright on your feet." And he sprang up and began walking. And when the crowds saw what Paul had done, they lifted up their voices, saying in Lycaonian, "The gods have come down to us in the likeness of men!" Barnabas they called Zeus, and Paul, Hermes, because he was the chief speaker. And the priest of Zeus, whose temple was at the entrance to the city, brought oxen and garlands to the gates and wanted to offer sacrifice with the crowds. But when the apostles Barnabas and Paul heard of it, they tore their garments and rushed out into the crowd, crying out, "Men, why are you doing these things? We also are men, of like nature with you, and we bring you good news, that you should turn from these vain things to a living God, who made the heaven and the earth and the sea and all that is in them. In past generations he allowed all the nations to walk in their own ways. Yet he did not leave himself without witness, for he did good by giving you rains from heaven and fruitful seasons, satisfying your hearts with food and gladness." Even with these words they scarcely restrained the people from offering sacrifice to them,
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ११६: १-४,१५-१६
प्रतिसाद : प्रभो, तुझ्या नामाचा गुणगौरव होवो.
१) आमचा नको प्रभू, आमचा नकोच.
पण तुझे वात्सल्य आणि सत्य यांच्याखातर
तुझ्या नामाचा गुणगौरव होवो.
राष्ट्रांनी काय म्हणून विचारावे,
“आता कुठे आहे तुमचा देव ?"
२) आमचा देव तर स्वर्गात आहे.
योग्य दिसेल ते तो करतो.
त्याच्या मूर्ती म्हणजे केवळ सोनेरुपे,
मानवी हातांच्या कृती.
३) स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता प्रभू
तुम्हांला आशीर्वाद देवो. स्वर्ग हा प्रभूचाच स्वर्ग आहे.
पृथ्वी मात्र मानवजातीला दिली आहे.
Psalm 115:1-4, 15-16
Not to us, O Lord, not to us,but to your name give the glory,
Not to us, O Lord, not to us,
but to your name give the glory,
for your merciful love and fidelity.
Why should the nations say:
"Where is their God?" R
But our God is in the heavens;
he does whatever he wills.
Their idols are silver and gold,
the work of human hands. R
May you be blest by the Lord, the maker of heaven and earth.
The heavens, the heavens belong to the Lord,
but to the children of men,
he has given the earth.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख सोसावे आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे
आलेलुया !
Acclamation:
The Holy Spirit will teach you all things and bring to your remembrance all that I have said to you.
शुभवर्तमान योहान १४:२१-२६
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"ज्याला पिता पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्व काही शिकवील. "
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील, मीही त्याच्यावर प्रीती करीन आणि स्वतः त्याला प्रकट होईन." यहुदा (इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “प्रभो, असे काय झाले की, आपण स्वतः आम्हांला प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही ?" येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले आहे त्याचे आहे."
मी तुम्हांजवळ राहत असताना तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण देईल.
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 14:21-26: At that time: Jesus said to his disciples, "Whoever has my commandments and keeps them, he it is who loves me. And he who loves me will be loved by my Father, and I will love him and manifest myself to him." Judas (not Iscariot) said to him, "Lord, how is it that you will manifest yourself to us, and not to the world? Jesus answered him, "If anyone loves me, he will keep my word, and my Father will love him, and we will come to him and make our home with him. Whoever does not love me does not keep my words. And the word that you hear is not mine but the Father's who sent me. These things I have spoken to you while I am still with you. But the Helper, the Holy Spirit, whom the Father will send in my name, he will teach you all things and bring to your remembrance all that I have said to you.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आजच्या पहिल्या वाचनामध्ये पौल व वर्णवा या दोघांचे कार्य पाहून परराष्ट्रीय लोक इतके प्रभावीत झाले की त्यांनी या दोघांना देव बनवायचं ठरवलं. त्यांचं म्हणणं होतं की साक्षात देव आमच्यामध्ये उत्तरले आहेत. विशेषतः पौल ज्या अधिकारवाणीने बोलला, "तू आपल्या पायांवर नीट उभा राहा", तेव्हा तो पांगळा माणूस उभाच नाही राहिला; तर चालायला लागला आणि म्हणून पौलला त्यांनी त्यांच्या एका देवाचे तर बर्णबाला दुसऱ्या देवाचे नाव देऊन ते हारतुरे घेऊन आले. खरं पाहता पौल व बर्णबाची ही खरी कसोटी होती. मात्र त्यांनी त्यांचा गैरफायदा न उठविता त्यांना खऱ्या देवाची ओळख करून दिली व प्रामाणिकपणे मान्य केले की आम्ही तुमच्यासारखेच मानव आहोत. माणसाला देव म्हणू नका. माणूस हा माणूसच व देव हा देवच आहे. आम्ही प्रभू ख्रिस्त नाहीत तर तुम्हाला प्रभू ख्रिस्ताकडे घेऊन जाण्यासाठी आम्ही आहोत. आम्ही जे केले ते आमच्या शक्तीसामर्थ्याने नाही तर देवाच्या ख्रिस्तामध्ये प्रकट झालेल्या सामर्थ्याने व कृपेने केले आणि म्हणून तुम्ही देवाचे श्रेय आम्हाला देऊ नका तर आमच्यात वस्ती करणाऱ्या देवालाच द्या. ह्याला म्हणतात प्रेषितीय धैर्य. माणसं श्रद्धेमध्ये बळकट होतात, ती त्यांच्यात असलेल्या नम्रतेमुळे व देवाच्या कृपेमुळे. म्हणून शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त स्पष्टीकरण करून परत परत सांगतात, माझी आज्ञा पाळा आणि एकमेकांवर प्रीती करा. तुम्ही जर माझ्यावर संतुष्ट झाला असाल तर मग तुम्ही एकमेकांवर दया करायची आणि एकमेकांवर प्रेम करायचं.
प्रार्थना :- हे प्रभू येशू, तुझ्या दिव्य वचनांप्रमाणे आचरण करण्यास व तुझ्या | आज्ञा पाळण्यास मला कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या