पुनरुत्थान पाचवा सप्ताह
मंगळवार दि.३० एप्रिल २०२४
"मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हांला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही.
"Peace I leave with you; my peace I give to you. Not as the world gives do I give to you.
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १४:१९-२८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“आपण देवाच्या सहवासात असताना देवाने आपणांकरिता काय काय केले हे त्यांनी सांगितले. "
अंत्युखिया आणि इकुन्या येथून कित्येक यहूदी आले. त्यांनी लोकांचे मन वळवून पौलला दगडमार केला आणि तो मेला असे समजून त्याला नगराबाहेर काढून टाकून दिले. पण त्याच्याभोवती शिष्य जमल्यावर तो उठला आणि नगरात निघून आला, मग दुसऱ्या दिवशी बर्णबाबरोबर तो दवें येथे गेला.
त्या नगरात सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य बनविल्यावर लुस्त्र, इकुन्या आणि अंत्युखिया ह्या नगरात ते परत आले आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, विश्वासात टिकून राहा, कारण आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. त्यानी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडीलजन निवडले आणि उपास व प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्यांच्याकडे त्यांना सोपवले.
मग ते पिसिदियामधून पंफुल्यात गेले आणि पिर्गा येथे वचन सांगितल्यावर ते अत्तलिया येथे उतरले. तेथून ते अंत्युखियाला जाण्यास तारवात बसून निघाले. जे कार्य त्यांनी सिद्धीस नेले होते त्याकरिता त्यांना ह्याच ठिकाणाहून देवाच्या कृपेवर सोपवून पाठवण्यात आले होते. तेथे पोहचल्यावर त्यांनी मंडळी जमवून आपण देवाच्या सहवासात असताना देवाने काय काय केले आणि परराष्ट्रीयांकरिता विश्वासाचे दार कसकसे उघडले, हे सांगितले. मग ते शिष्यांबरोबर बराच काळ राहिले.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 14:19-28
In those days: Jews came to Lystral from Antioch and Iconium, and having persuaded the crowds, they stoned Paul and dragged him out of the city, supposing that he was dead. But when the disciples gathered about him, he rose up and entered the city, and on the next day he went on with Barnabas to Derbe. When they had preached the gospel to that city and had made many disciples, they returned to Lystra and to Iconium and to Antioch, strengthening the souls of the disciples, encouraging them to continue in the faith, and saying that through many tribulations we must enter the kingdom of God. And when they had appointed elders for them in every church, with prayer and fasting they committed them to the Lord in whom they had believed. Then they passed through Pisidia, and came to Pamphylia. And when they had spoken the word in Perga, they went down to Attalia, and from there they sailed to Antioch, where they had been commended to the grace of God for the work that they had fulfilled. And when they arrived and gathered the church together, they declared all that God had done with them, and how he had opened a door of faith to the Gentiles. And they remained no little time with the disciples.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १४५: १०-१३,२१
प्रतिसाद : प्रभो, तुझे भक्त तुझी महान कृत्ये मानवजातीला जाहीर करतात.
१) प्रभो, सारा प्राणिमात्र तुझे स्तवन करतो,
तुझे भक्त तुला धन्यवाद देतात.
तुझ्या राज्याचा ऐश्वर्य ते वर्णितात आणि
तुझा पराक्रम कथन करतात;
२) तुझी महान कृत्ये आणि तुझ्या राज्याचे शाही वैभव
ते मानवजातीला जाहीर करतात
तुझे राज्य म्हणजे युगानुयुगीचे राज्य.
तुझी सत्ता पिढ्यान्पिढ्या टिकते.
३) माझ्या तोंडी प्रभूचे स्तवन असेल,
त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद
सारा प्राणीमात्र युगानुयुग गावो.
Psalm 145:10-13ab, 21
Your friends make known, O Lord, the glory of your reign.
All your works shall thank you, O Lord,
and all your faithful ones bless you.
They shall speak of the glory of your reign,
and declare your mighty deeds. R
They shall make known your might to the children of men,
and the glorious splendour of your reign.
Your kingdom is an everlasting kingdom;
your rule endures for all generations. R
Let my mouth speak the praise of the Lord;
let all flesh bless his holy name forever,
for ages unending. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे, मी माझ्या मेंढरांना ओळखतो आणि माझी मेंढरे मला ओळखतात.
आलेलुया !
Acclamation:
Christ should suffer and on the his glory. third day rise from the dead, and enter into
शुभवर्तमान योहान १४:२७-३१
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“मी माझी शांती तुम्हांस देतो."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हांला देतो, जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये, मी जातो आणि तुम्हाकडे येईन, असे जे मी तुम्हांला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हांला आनंद वाटला असता, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हांला सांगितले आहे. ह्यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकार येतो. तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही, परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे मी करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते.”
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 14:27-31a
At that time; Jesus said to his disciples: "Peace I leave with you; my peace I give to you. Not as the world gives do I give to you. Let not your hearts be troubled, neither let them be afraid. You heard me say to you, 'I am going away, and I will come to you. If you loved me, you would have rejoiced, because I am going to the Father, for the Father is greater than I. And now I have told you before it takes place, pla so that when it does take place you may believe. I will no longer talk much with you, for the ruler of this world is coming. He has no claim on me, but I do as the Father has commanded me, so that the world may know that I love the Father."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: युद्धाच्या अभावासारखी प्रभू येशू खिस्ताची शांती नसते. जग युद्धात गुंतले नाही म्हणून जगात निःसंशय शांती आहे असे आपण म्हणू शकत नाही. मनःशांती विचलीत होणाऱ्या गोष्टी पावलो पावली घडतात. माणसाच्या जीवनात अनेक समस्यांमुळे किंवा आव्हांनामुळे तणाव नाही त्यामुळे ख्रिस्ताची शांती आली आहे असं म्हणायचं नाही. ख्रिस्ताची शांती ही अंतर्यामातील एक स्थिती आहे. जर आपल्या अंतःकरणामध्ये ख्रिस्ताची शांती असेल तर आपण अस्वस्थ बनत नसतो. परिणामी जर का माणूस अस्वस्थ बनला असेल तर ख्रिस्ताची शांती न अनुभवता ती व्यक्ती भावनिक बनून उद्धिग्न मनाने आक्रमक व हिंसक होत असते. प्रभूची शांती जर अंतर्यामी असली तर माणूस कधी निराश बनत नाही. तो कधी वैतागत नाही आणि कोणाला वैताग आणत नसतो. मनःस्थिती जर स्थीर असेल तर माझं मनही स्थितप्रज्ञ असते. स्थितप्रज्ञ म्हणजे कोणी कौतुक किंवा स्तुती केली असता मी जर ख्रिस्ताच्या शांतीत असेल तर त्या स्तुतीने मी गर्वाने फुगत नाही आणि कोणी माझ्यावर रागावले आणि माझ्या अंतर्यामी ख्रिस्ताची शांती असेल तर मी रागाने पेटून उठत नाही. पवित्र आत्म्याठायी व पवित्र आत्म्याच्या अधीन राहून आज्ञाधारक बनून जीवन जगणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचे तारण झालेले आहे आणि अशा समाधानी व्यक्तीमध्ये ख्रिस्ताची शांती वसती करते. हीच खरी साक्ष संत पौलने आजच्या पहिल्या वाचनात दिलेली आहे. आजच्या शुभवर्तमानाची सुरूवातच तशी आहे, "मी तुम्हाला माझी शांती देतो, जग देते तशी नाही," आपल मन स्थितप्रज्ञ होईल अशी शांती प्रभू येशू मागू या.
प्रार्थना :- हे प्रभू येशू, तुझ्या शांतिचे वरदान मला दे, धैर्याने व शांतचित्ताने जीवन जगण्यास कृपा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या