Marathi Bible Reading | 5th Week of Easter Wednesday 1st May 2024

पुनरुत्थान पाचवा  सप्ताह  

बुधवार  दि.१ मे  २०२४ 

“संदेष्टयाला आपला देश आणि आपले घर ह्यात मात्र सन्मान मिळत नाही.”

"A prophet is not without honor except in his hometown and in his own household."

✝️


संत जोसेफ - कामगार

St Joseph the Worker - Memorial

ख्रिस्तसभा आज ध. कु. मारियेचा पती व प्रभू येशूचा पालक पिता संत जोसेफ ह्याचा कामगार म्हणून सन्मान करीत आहे. आज आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्यावर आपल्या कुटुंबाची आणि समाजाची कर्तव्यदक्ष जबाबदारी आलेली असते. संत जोसेफ एक प्रामाणिक, कष्टकरी आणि  जबाबदार कामगार होता. त्याचबरोबर तो नितीमान व भाक्तिमान होता. त्याने आपल्या कुटुंबाची जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडली. 

१ मे १९५५ रोजी संत पीटर चौकात भरलेल्या कामगारांच्या भव्य मेळाव्यात पोप पायस बारावे ह्यांनी संत योसेफ ह्यांना कामगारांचा आश्रयदाता म्हणून घोषित केले आणि रोमन मिस्साग्रंथामध्ये हा सण समाविष्ट केला. संपूर्ण जगभरच्या कामगारांसाठी संत योसेफ हा आदर्श संरक्षक आणि मेंढपाळ असल्याचेही आश्वासन त्यांना दिले.
तसे संत योसेफ आणि सर्वसामान्य कामगारांचे नाते खूप जुने आहे. आधुनिक काळात सुरू झालेल्या कामगारांच्या चळवळीत संत योसेफचा आदर्श प्रेरणादायी ठरणारा आहे. पोप लिओ तेरावे ह्यांनी १८८९ साली संत योसेफ ह्यांना कामगारांचा आश्रयदाता असावा असे सुचविले होते. पोप पायस अकरावे ह्यांनी नास्तिकवादी साम्यवादाच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आध्यात्मिक जीवन घडविण्यासाठी ह्या नाझरेथच्या सुताराची निवड केली होती. कामगारांना आपल्या कामाच्या ठिकाणी शांती, प्रेमाने ख्रिस्ताची सुवार्ता पसरविता यावी म्हणून संत योसेफ हा दीपस्तंभ कामगारांसमोर उभा करण्यात आल्याचे पोपमहाशयांनी सांगितले होते. “संत योसेफ हा कामगार होता. तो गरीब घराण्यातला होता. पवित्र कुटुंबासाठी त्याने अपार मेहनत केली. आपल्या दैनंदिन कामाशी तो विश्वासू राहिला. आपल्या घामाच्या निढळावर, हातावर कमावून खाणाऱ्यांसाठी त्याने उत्तम उदाहरण दिलेले आहे.”

ख्रिस्तसभेत चालत आलेली ही विचारांची प्रक्रिया पोप पायस बारावे ह्यांनी पूर्णत्वास नेली. कामगार दिनाच्या दिवशीच त्यांनी संत योसेफ ह्यांचा सण निश्चित केला. त्यावेळी केलेल्या भाषणात पोपमहाशयांनी पुढील प्रेरणादायी उद्गार काढले : “प्रत्येक माणसाने कामाची प्रतिष्ठा समजून घेतली पाहिजे. ह्या प्रतिष्ठेमुळे समाजात न्याय आणि सुव्यवस्था वाढीस लागेल. नाझरेथचा नम्र व त्यागी कामगार आपणासमोर देवपित्याचीच प्रतिमा उभी करतो नाही का? तसाच तो आपल्या कामाचा व आपल्या कुटुंबियांचा रक्षकही आहे हे आपण कदापिही विसरू नये ?” 
कामगारांचा आश्रयदाता आणि आदर्श असलेल्या संत जोसेफचे अनुकरण करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करु या. देवाने आपल्यावर सोपविलेली कामगिरी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडण्यासाठी आपण प्रयत्नशील बनू या. 


पहिले वाचन उत्पत्ती १:२६-२:३
वाचक : उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली जाणा."

देव बोलला, “समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशू, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवण्यासाठी आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू." देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर आणि नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, देव त्यांना म्हणाला, "फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” देव म्हणाला, "पाहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि सबीज फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हांला देतो, ही तुमचे अन्न होतील. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील सर्व पशु, आकाशातील सर्व पक्षी आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व जीवधारी प्राणी यांस अवघी हिरवळ खाण्यासाठी देतो" आणि तसे झाले. आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. संध्याकाळ झाली आणि सकाळ झाली. हा सहावा दिवस.
याप्रमाणे आकाश व पृथ्वी आणि तेथील सर्व काही अस्तित्वात आले. देवाने केलेले आपले काम सातव्या दिवशी संपवले, केलेल्या सर्व कामापासून त्याने सातव्या दिवशी विश्रांती घेतली. देवाने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला, कारण सृष्टी निर्माण करण्याचे काम संपवून त्याने त्या दिवशी विश्रांती घेतली.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Genesis 1:26-2:3 (Or: Col 3:14-15, 17, 23-24)

God said, "Let us make man in our image, after our likeness. And let them have dominion over the fish of the sea and over the birds of the heavens and over the livestock and over all the earth and over every creeping thing that creeps on the earth." So God created man in his own image, in the image of God he created him; male and female he created them. And God blessed them. And God said to them, "Be fruitful and multiply and fill the earth and subdue it, and have dominion over the fish of the sea and over the birds of the heavens and over every living thing that moves on the earth." And God said, "Behold, I have given you every plant yielding seed that is on the face of all the earth, and every tree with seed in its fruit. You shall have them for food. And to every beast of the earth and to every bird of the heavens and to everything that creeps on the earth, everything that has the breath of life, I have given every green plant for food." it was so. And God saw everything that he had made, and behold, it was very good. And there was evening and there was morning, the sixth day. Thus the heavens and the earth were finished, and all the host of them. And on the seventh day God finished his work that he had done, and he rested on the seventh day from all his work that he had done. So God blessed the seventh day and made it holy, because on it God rested from all his work that he had done in creation.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ९०:२-४,१२-१४,१६

प्रतिसाद : हे परमेश्वरा, आमच्या हातचे काम सिध्दीस ने. 
किंवा आलेलुया !

१. पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, 
तू पृथ्वी आणि जग ही निर्माण केली
 त्यापूर्वीच अनादिकालापासून 
अनंतकालापर्यंत तू देव आहेस.

२. तू मनुष्याला पुन्हा मातीला मिळवतोस 
आणि म्हणतोस, “अहो मानवांनो, परत जा." 
कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्षे
 कालच्या गेलेल्या दिवसासारखी, 
रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.

३. आमचे आयुष्य मोजके दिवस आहे 
हे आम्हाला शिकव. म्हणजे आम्ही सूज्ञ होऊ.
 हे परमेश्वरा, मागे फिर, किती वेळ लावशील ? 
तू आपल्या सेवकांवर करूणा कर.

४. तू आपल्या दयेने आम्हांला प्रभातीच तृप्त कर,
 म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन 
आमचे सर्व दिवस आनंदात घालवू. 
तुझी कृती तुझ्या सेवकांना, 
तुझे वैभव त्यांच्या मुलांना प्रकट होऊ दे.

Psalm 90:2, 3-4, 12-13, 14 and 16 (B 17c)

Give success to the work of our hands, O Lord. 

Before the mountains were born, 
or the earth or the world were brought forth, 
you are God, from age to age. R 

You turn man back to dust, 
and say, "Return, O children of men." 
To your eyes a thousand years are like yesterday,
 come and gone, or like a watch in the night. R

 Then teach us to number our days, 
that we may gain wisdom of heart. 
Turn back, O Lord! How long?
 Show pity to your servants. 
At dawn, fill us with your merciful love; 
we shall exult and rejoice all our days. 
Let your deed be seen by your servants,
 and your glorious power by their children. R


जयघोष  

आलेलुया, आलेलुया! 
प्रभू धन्यवादित असो. 
तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो, देव आमचे तारण आहे.
आलेलुया !

Acclamation: 
Day after day, may the Lord be blest. He bears our burdens; God is
our Saviour.

शुभवर्तमान मत्तय १३ : ५४-५८
वाचक :  मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
हा सुताराचा मुलगा ना ?"
स्वत:च्या गावी आल्यावर त्याने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हे ज्ञान आणि अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्याला कोठून ? हा सुताराचा मुलगा ना ? ह्याच्या आईला मरिया म्हणतात ना ? याकोब, योसे, सिमोन आणि यहूदा हे ह्याचे भाऊ ना ? ह्याच्या बहिणी, त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय ? मग हे सर्व ह्याला कोठून ?” असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यांना म्हटले, “संदेष्टयाला आपला देश आणि आपले घर ह्यात मात्र सन्मान मिळत नाही.” तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत.
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
Matthew 13:54-58

At that time: Coming to his hometown Jesus taught the people in their synagogue, so that they were astonished, and said, "Where did this man get this wisdom and these mighty works? Is not this the carpenter's son? Is not his mother called Mary? And are not his brothers James and Joseph and Simon and Judas? And are not all his sisters with us? Where then did this man get all these things?" And they took offense at him. But Jesus said to them, "A prophet is not without honor except in his hometown and in his own household." And he did not do many mighty works there, because of their unbelief.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनखिस्तसभा आज ध. कु. मारिथेचा पत्ती व प्रभू येशूचा पालक पित्ता संत जोसेफ ह्याचा कामगार म्हणून सन्मान करीत आहे. आज आपण आपल्या दैनंदिन कामाचा आढावा घेऊ या आणि संत जोसेफ बरोबरचे आपले नाते तपासून पाहू कारण आपण प्रत्येकजण कामगार आहोत. आपल्यावर आपल्या कुटुंबाची आणि समाजाची कर्तव्यदक्ष जबाबदारी आलेली असते. संत जोसेफ एक प्रामाणिक, कष्टकरी आणि जबाबदार कामगार होता. त्याचबरोबर तो नितीमान व भाक्तिमान होता. त्याने आपल्या कुटुंबाची जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडली. कामगारांचा आश्रयदाता आणि आदर्श असलेल्या संत जोसेफचे अनुकरण करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करु या. देवाने आपल्यावर सोपविलेली कामगिरी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडण्यासाठी  आपण प्रयत्नशील बनू या.

प्रार्थना :हे परमेश्वरबापा, आमची कौटुंबिक, सामाजिक व कर्तव्यदक्ष जबाबदारी पार पाडण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या