Marathi Bible Reading | 5th Week of Easter Thursday 2nd May 2024

पुनरुत्थान पाचवा  सप्ताह  

गुरुवार  दि.२ मे  २०२४ 

जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा.

As the Father has loved me, so have I loved you. Abide in my love.

✝️

संत अथनेशियस
- महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपाल, धर्मपंडित (२९५-३७३)

अथनेशियस हे इजिप्तमधल्या आलेक्झांड्रिया शहराचे रहिवासी होते. आलेक्झांड्रिया हे शहर त्या काळात एक मोठे व्यापारी केंद्र होते. तसेच तत्वज्ञान ईशज्ञानाचे शिक्षणकेंद्र होते. अशा वातावरणात अथनेशियस ह्यांचे बालपण एका उच्चभ्रू ख्रिस्ती कुटुंबात गेले. तरुण असतानाच तो ज्ञानपिपासू बनलेला होता. तसेच त्याला भक्ती-श्रद्धा-देव-धर्म ह्याची विलक्षण आवड होती.
अथनेशियस केवळ उपधर्मगुरू असताना आलेक्झांड्रियाच्या पेट्रिआर्कने त्याला आपला सचीव म्हणून निवडून घेतले. ते त्याच्याकडे धर्माच्याबाबतीत सल्लाही मागत असत. इ. स. ३२५ साली नायसिया येथे भरलेल्या परिषदेसाठी त्यांनी अथनेशियस ह्यांना आपणाबरोबर नेले. याच परिषदेत एरियस नावाच्या पाखंडमतवाद्याला धर्मबहिष्कृत केले आणि ख्रिस्ताचे ईश्वरी रुप जगापुढे ठामपणे जाहीर केले. 
संत अथनेशियस हे एक सिद्धहस्त लेखक होते. येशूच्या देहधारणेवर त्यांनी उपधर्मगुरू असतानाच लेखन केले होते. आपल्या तिसऱ्या हद्दपारीच्या वेळी इजिप्तच्या अरण्यातील मठवाश्यांसह राहत असताना त्यांनी “एरियनवादाचा इतिहास” हा ग्रंथ लिहिला. त्यांनी लिहिलेल्या "लाईफ ऑफ सेंट अँथनी" ह्या पुस्तकामुळे सर्वत्र व्रतस्थ व विरक्त जीवनाला उधाण आले होते.
चिंतन : "केवळ पाप टाळण्यात कसली आलीय नीतिमत्ता? उलट चांगले टाळणे हेही पापच नव्हे काय? एकच नियम असता उलट फिरविता येतो.” संत अथनेशियस


पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये  १५:७-२१

वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"माझे मत असे आहे की, जे परराष्ट्रीयातून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये."

पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला: “बंधुजनहो, तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या तोंडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीच्या दिवसांपासून तुम्हांमध्ये देवाने माझी निवड केली आणि हृदय जाणणाऱ्या देवाने जसा आपणांला तसा त्यांनाही पवित्र आत्मा देऊन त्यांच्याविषयी साक्ष दिली. त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुद्ध करून त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही. असे असताना जो जोखड आपले पूर्वज आणि आपणही वाहण्यास समर्थ नव्हतो ते शिष्यांच्या मानेवर घालून तुम्ही देवाची परीक्षा का पाहता? तर मग त्याच्याप्रमाणेच आपलेही तारण प्रभू येशूच्या कृपेने होईल असा आपला विश्वास आहे.” 
तेव्हा सर्व लोक गप्प राहिले आणि बर्णबा आणि पौल ह्यांना आपल्याद्वारे देवाने परराष्ट्रीयांमध्ये जी जी चिन्हे आणि अद्भुते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले. मग त्यांचे भाषण संपल्यावर याकोब म्हणाला,
"बंधुजनहो, माझे ऐका. परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली, हे शिमोनने सांगितले आहे आणि ह्यांच्याशी संदेष्ट्यांच्या उक्तीचाही मेळ बसतो. असा शास्त्रलेख आहे की, ह्यानंतर मी परत येईन आणि दावीदचा पडलेला डेरा पुन्हा उभारीन आणि त्याची भगदाडे बुजवून तो पुन्हा नीट करीन. इतर माणसांनी आणि ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा, हे जे त्याला युगादिपासून माहित आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. ह्यास्तव माझे तर मत असे आहे की, जे परराष्ट्रीयातून देवाकडे वळतात त्यांना त्रास देऊ नये, तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तीचे अमंगळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी आणि रक्त ह्यांपासून तुम्ही अलिप्त असा. कारण प्राचीन काळापासून दर शब्बाथ दिवशी सभास्थानात मोशेचे पुस्तक वाचून दाखवून त्याची घोषणा करणारे लोक प्रत्येक नगरात आहेत.”
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 15:7-21
In those days: After there had been much debate, Peter stood up and said to them, "Brothers, you know that in the early days God made a choice among you, that by my mouth the Gentiles should hear the word of the gospel and believe. And God, who knows the heart, bore witness to them, by giving them the Holy Spirit just tas he did to us, and he made no distinction between us and them, having cleansed their hearts by faith. Now, therefore, why are you putting God to the test by placing a yoke on the neck of the disciples that neither our fathers nor we have been able to bear? But we believe that we will be saved through the grace of the Lord Jesus, just as they will." And all the assembly fell silent, and they listened to Barnabas and Paul as they related what signs and wonders God had done through them among the Gentiles. After they finished speaking, James replied, "Brothers, listen to me. Simeon has related how God first visited the Gentiles, to take from them a people for his name. And with this the words of the prophets agree, just as it is written, ""After this I will return, and I will rebuild the tent of David that has fallen; I will rebuild its ruins, and I will restore it, that the remnant of mankind may seek the Lord, and all the Gentiles who are called by my name, says the Lord, who makes these things known from of old. Therefore my judgment is that we should not trouble those of the Gentiles who turn to God, but should write to them to abstain from the things polluted by idols, and from sexual immorality, and from what has been strangled, and from blood. For from ancient generations Moses has had in every city those who proclaim him, for he is read every Sabbath in the synagogues."

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र ९६:१-३,१०

प्रतिसाद : देशोदेशी प्रभूची अलौकिक कृत्ये जाहीर करा.

१) एखादे नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा, 
पृथ्वीवरील समस्त जनहो, प्रभूचे गुणगान करा. 
प्रभूचे गुणगान करा, त्याच्या नामाचा धन्यवाद गा.

२) त्याने केलेल्या उद्धाराची दिवसानुदिवस घोषणा करा, 
देशोदेशी त्याचा महिमा वर्णा, 
साऱ्या मानवजातीला त्याची अलौकिक कृत्ये जाहीर करा.

३) सगळ्या राष्ट्रांना जाहीर करा, “प्रभू राजा आहे.” 
जगाची स्थापना करा, "प्रभू राजा आहे." 
जगाची स्थापना झालेली असून ते अढळ आहे. 
तो मानवजातीचा यथार्थ न्याय करील.

Psalm 96:1-2a, 2b-3, 10 (R. 3)

Tell among all the peoples the wonders of the Lord.

O sing a new song to the Lord;
sing to the Lord, all the earth.
O sing to the Lord;
bless his name. R

Proclaim his salvation day by day.
Tell among the nations his glory, 
and his wonders among all the peoples. R 

Say to the nations, "The Lord is king." 
The world he made firm in its place; 
he will judge the peoples in fairness. R


जयघोष  

आलेलुया, आलेलुया! 
येशूने म्हटले, “थोमा, तू मला पाहिले आहे म्हणून श्रद्धा ठेवली आहे. पाहिल्यावाचून श्रद्धा ठेवणारे ते धन्य.”
आलेलुया !

Acclamation: 
My sheep hear my voice, says the Lord; 
and I know them, and they follow me.

शुभवर्तमान योहान १५ :९-११
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

  "माझ्या प्रीतीत राहा म्हणजे तुमचा आनंद परिपूर्ण होईल."

येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले, जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे. तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल. माझा आनंद तुम्हांमध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 15:9-11
At that time: Jesus said to his disciples, "As the Father has loved me, so have I loved you. Abide in my love. If you keep my commandments, you will abide in my love, just as I have kept my Father's commandments and abide in his love. These things I have spoken to you, that my joy may be in you, and that your joy may be full."
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनह्या जगातील कोणतीही शक्ती अथवा मृत्यू देवाचे प्रेम नष्ट करू शकत नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? परमेश्वर पिता आणि त्याचा पुत्र प्रभू येशूचे प्रेम हे सर्जनशील आहे, आणि या प्रेमाचा स्वीकार करणाऱ्या सर्वांना अतुलनीय आनंद आणि चिरकाल टिकणारी मैत्री प्राप्त होते. परमेश्वर जगावर प्रेम करतो कारण त्याने, त्याचा गौरव करण्यासाठीच हे जग आणि आपणा सर्वांना त्याची प्रतिमा आणि प्रति रुपासारखे निर्माण केले आहे. आपण प्रभू येशूशी आपणांस त्याच्यापासून विभक्त न करणाऱ्या ऐक्य, शांती आणि आनंद या मूल्यांनी एकत्रित असावे म्हणून परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राला ह्या जगात पाठविले. आपला नाश होण्यासाठी नव्हे तर आपणास पाप आणि मृत्यूपासून सोडवून, तारण करण्यासाठी पाठविले. संत पॉल सांगतो की, आपणांस विपुल आनंद आणि आशा मिळू शकते कारण देवाने आपल्या अंतःकरणात त्याच्या प्रीतीचा वर्षाव केला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना नवीन आज्ञा दिली. नवीन आज्ञेचे सार काय आहे ? तर मरणापर्यंत प्रेम, शुद्ध करणारे प्रेम, स्वार्थ, भीती, अहंकार यावर विजय मिळविणारे प्रेम, इतरांसाठी सर्वस्व पणाला लावणारे प्रेम आणि निःस्वार्थी करणारे प्रेम होय.

प्रार्थना : हे परमप्रिय प्रेमळ परमेश्वरा, आमच्या अंत:करणात तुझ्या प्रीतिची ज्योत प्रज्वलित कर व आम्हाला तुझी प्रीतिची आज्ञा पाळण्यास प्रेरणा दे, आमेन
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या