Marathi Bible Reading | 5th Week of Easter Friday 3rd May 2024

पुनरुत्थान पाचवा  सप्ताह  

शुक्रवार  दि. ३ मे  २०२४  

ज्याने मला पाहिले आहे  त्याने पित्याला पाहिले आहे, 

Whoever has seen me has seen the Father. 

✝️


संत फिलीप व संत जेम्स, प्रेषित
Philip and James, Apostles
प्रेषित आणि रक्तसाक्षी 
ख्रिस्तसभा आज संत फिलिप व संत जेम्स ह्या येशूंच्या प्रेषितांचा सण साजरा करीत आहे. संत फिलिपने, 'आम्हाला पिता दाखवा' असे प्रभूला सांगितले असताना प्रभूने म्हटले होते 'ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.’ संत फिलिपने येरुशलेम मध्ये आणि कैंसरियाच्या प्रदेशात प्रभू येशूची सुवार्ता पसरविली. संत फिलिपला क्रुसावरील रक्तसाक्षीत्वाचे मरण  आले. 

संत जेम्स धाकटा हा प्रभू येशू ख्रिस्ताचा एक प्रेषित असून तो संत ज्यूड थादेऊस ह्याचा भाऊ होय. तो योहानचा भाऊ याकोब ह्याच्यापेक्षा उंचीने व व्यक्तिमत्वाने ठेंगणा असल्यामुळे त्याला बंधूवर्ग याकोब धाकटा ह्या नावाने ओळखत. पवित्र मरियेची बहीण क्लोपाची पत्नी मरिया हिचा तो मुलगा होय. त्यावरून त्याला प्रभूचा भाऊ याकोब असेही संबोधिले जाई.

संत जेम्स हा अत्यंत प्रेमळ, भक्तिमान व विरक्त वृत्तीचा होता. त्याला
“संत जेम्स न्यायी” असेही म्हटले जाई. तो येरुशलेमचा पहिला महागुरू बनला,
येरुशलेम मंदिराशी त्याने चांगले संबंध प्रस्थापित केलेले होते. मंदिराविषयी आणि प्राचीन यहुदी परंपरांविषयी त्याच्या मनात प्रचंड आदर होता. स्वभावाने तो परोपकारी वृत्तीचा होता. हेरोद अग्रीपा ह्याच्या छळवादाला त्याने शांतचित्ताने तोंड दिले.
संत याकोबने इ. सं. ४७ साली आपले पत्र लिहिले, ते सिरीयातील चर्चेसना उद्देशून लिहिले गेले असण्याचा संभव आहे. आपल्याला लाभलेल्या नव्या श्रद्धेपायी छळ सोसाव्या लागणाऱ्या सिरियाच्या भाविकांना या पत्रात जेम्स धैर्य आणि सहानुभूती दाखवितो.
संत जेम्स म्हणजेच याकोब ह्यानेसुध्दा प्रामाणिकपणे ख्रिस्ताची साक्ष दिली. त्याला मंदिराच्या अतिउंच कड्यावरून लोटून ठार मारण्यात आले. ह्या दोन्ही प्रेषितांनी प्रभूला पाहिले, अनुभवले आणि त्याची साक्ष जगाला दिली.


पहिले वाचन १करिंथ  १५:१-८
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन १५ : १-८

"प्रभू याकोबला, मग सर्व प्रेषितांना दिसला."

बंधुजनहो, जी सुवार्ता मी तुम्हांला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहा, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हांस कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हांला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.
कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांला सांगून टाकले, त्यांपैकी मुख्य हे की, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला, तो शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले पुरला गेला, आणि तो केफाला, मग बारा जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला, त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि काहीजण महानिद्रा घेत आहेत. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. 
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
1 Corinthians 15:1-8

I would remind you, brothers, of the gospel I preached to you, which you received, in which you stand, and by which you are being saved, if you hold fast to the word I preached to you- unless you believed in vain. For I delivered to you as of first importance what I also received: that Christ died for our sins in accordance with the Scriptures, that he was buried, that he was raised on the third day in accordance with the Scriptures, and that he appeared to Cephas, then to the twelve. Then he appeared to more than five hundred brothers at one time, most of whom are still alive, though some have fallen asleep. Then he appeared to James, then to all the apostles. Last of all, as to one untimely born, he appeared also to me.

This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र १९:२-५
प्रतिसाद :   त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो, किंवा आलेलुया !

१)आकाश देवाचा महिमा वर्णिते, 
अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते.
 दिवस दिवसाशी संवाद करतो,
 रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते.

२)वाचा नाही, शब्द नाही, 
त्यांची वाणी ऐकू येत नाही, 
तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी आक्रमितो, 
त्यांचे शब्द दिगंतरी पोहचतात.

Psalm 19:2-3, 4-5 (R 5a)

Their sound goes forth through all the earth.

The heavens declare the glory of God, 
and the firmament proclaims the work of his hands. 
Day unto day conveys the message, 
and night unto night imparts the knowledge. R

No speech, no word, whose voice goes unheeded; 
their sound goes forth through all the earth,
 their message to the utmost bounds of the world. R


जयघोष  

आलेलुया, आलेलुया! 
प्रभू म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.
आलेलुया !

Acclamation: 
I am the way, and the truth, and the life, says the Lord; Philip, whoever has seen me has seen the Father.

शुभवर्तमान योहान १४:६-१४
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 "मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय ?"

येशूने थोमाला म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्याला ओळखता आणि तुम्ही त्याला पाहिलेले आहे.' "
फिलीप त्याला म्हणाला, "प्रभुजी, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला पुरे आहे.” येशूने त्याला म्हटले, “फिलिपा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय ? ज्याने मला पाहिले आहे  त्याने पित्याला पाहिले आहे, तर 'आम्हांला पिता दाखवा' असे तू कसे म्हणतोस ? मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे अशी श्रध्दा तू ठेवत नाहीस काय ? ज्या गोष्ट मी तुम्हाला सांगतो त्या मी आपल्या स्वतःच्या सांगत नाही, माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करतो. मी पित्यामध्ये आणि पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना, नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना.
“मी तुम्हांला खचित खचित सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर श्रध्दा ठेवणाराही करील, आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन, तुम्ही माझ्या नामाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.” 
 "प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 14:6-14

At that time: Jesus said to Thomas, "I am the way, and the truth, and the life. No one comes to the Father except through me. If you had known me, you would have known my Father also. From now on you do know him and have seen him." Philip said to him, "Lord, show us the Father, and it is enough for us." Jesus said to him, "Have I been with you so long, and you still do not know me, Philip? Whoever has seen me has seen the Father. How can you say, 'Show us the Father? Do you not believe that I am in the Father and the Father is in me? The words that I say to you I do not speak on my own authority, but the Father who dwells in me does his works. Believe me that I am in the Father and the Father is in me, or else believe on account of the works themselves. "Truly, truly, I say to you, whoever believes in me will also do the works that I do; and greater works than these will he do, because I am going to the Father. Whatever you ask in my name, this I will do, that the Father may be glorified in the Son. If you ask me anything in my name, I will do it.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतनआज आपण संत फिलीप आणि संत जेम्स ह्यांचा सण साजरा करीत आहोत. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्या शिष्यांना स्पष्ट करतो की, तो स्वतः देव स्वरूप आहे. ज्यांनी त्याला पाहिले आहे त्यांनी परमेश्वर पित्याला पाहिले आहे आणि ह्यावर विश्वास ठेवण्यास तो त्यांना आवाहन करत आहे. अजूनही त्यांची खात्री होत नसेल तर त्याने केलेल्या चमत्काराद्वारे आणि कार्याद्वारे विश्वास ठेवण्यास सांगत आहे. जेणेकरून ते देखिल विश्वासी बनून त्याहून महत्कृत्ये करतील. संत फिलीपाने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि नाथानिएलची खऱ्या देवाबरोबर भेट घडवून येशूचा शिष्य बनण्यास मदत केली. तशाच प्रकारे जे देवाच्या शोधात आहेत अशांना आपण फिलीपाप्रमाणे देवाशी भेट घडवण्यास मदत करतो का ?

प्रार्थना :   हे प्रभू येशू, विश्वासात वाढण्यास व जीवनाद्वारे तुझी साक्ष देण्यास  आम्हाला प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या