पुनरुत्थान पाचवा सप्ताह
शनिवार दि.४ मे २०२४
"मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते."
I chose you out of the world, therefore the world hates you.
✝️
सध्या ऑस्ट्रीयाचा भाग असलेल्या नोरिकूम येथल्या रोमन सैन्यदलामध्ये फ्लोरियन अत्यंत महत्त्वाच्या हुद्यावर कार्यभार सांभाळीत होता. डायक्लोशियन सम्राटाच्या काळात ख्रिस्ती लोकांचा जो छळ झाला त्यावेळी आपल्या श्रद्धेची साक्ष देण्यासाठी फ्लोरियन ह्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले.
त्याने स्वहस्ते लिहिलेल्या "कृत्ये" या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे लॉर्ख या ठिकाणी अक्विलिनस या सुभेदाराचे सैनिक ख्रिस्ती लोकांना पकडण्यासाठी फिरत होते. फ्लोरियन त्यांना शरण गेला. त्याने आपली ख्रिस्ती श्रद्धा सोडून द्यावी म्हणून त्याच्यावर खूप जबरदस्ती करण्यात आली. तरीही तो आपला विश्वास पायदळी तुडवायला तयार नव्हता. त्याला एका खांबाला बांधून फटके मारण्यात आले. त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. शेवटी त्याच्या गळ्याभोवती दगड बांधून त्याला एन्स नदीमध्ये फेकून देण्यात आले.
एका कुलीन व घरंदाज स्त्रीच्या हाती त्याचा मृतदेह लागला. तिने त्याला ख्रिस्ती पद्धतीने पुरले. परंतु लवकरच त्याचे अवशेष लिन्स नजीकच्या संत अगस्तीनच्या मठात नेण्यात आले. इ. स. ११३८ साली पोप लुसियस तिसरे ह्यांनी ह्या संताचे अवशेष पोलंडचा राजा कामीर ह्यांना दिले आणि काही अवशेष क्रॅकोव्हच्या बिशपांकडे सुपूर्द केले असे म्हटले जाते. त्या वेळेपासून फ्लोरियन ह्यांना पोलंड आणि लिन्सचा आश्रयदाता संत मानले जाते.
मध्य युरोपात संत फ्लोरियन ह्यांची भक्ती खूप मोठ्या प्रमाणात आढळते. त्याच्या मध्यस्थीने बरेच आजार समूळ नाहिसे झाल्याचे आढळते. आजही अग्नी आणि पाणी ह्यांपासून उद्भवणाऱ्या आपत्तीच्या वेळी संत फ्लोरियनचा धावा केला जातो.
प्रभू येशू म्हणत आहे, 'मी तुम्हाला जगातून निवडले आहे.' प्रभू म्हणत आहे की, 'तुम्ही जगाचे नाहीत' म्हणजेच ' प्रभूच्या वचनाप्रमाणे आपण सार्वकालिक जीवनाचे सहभागीदार आहोत. ज्या जीवनदात्या व मुक्तीदात्या परमेश्वराला आपण ओळखतो त्याची साक्ष जगाला देण्यासाठी प्रभूने आपल्या सर्वांना निवडले आहे.
देवाच्या योजनेप्रमाणे योग्य अशा सुवार्तीकांची निवड सुवार्ता प्रसारासाठी आणि देवाच्या कार्यासाठी होत असते. देवाने केलेली ही निवड आव्हानात्मक असते, तरी सुद्धा निवडलेल्या सर्वांनी ख्रिस्ताची साक्ष द्यायची असते.
ख्रिस्तामध्ये स्नानसंस्कार स्वीकारलेल्या आपणा सर्वाना प्रभूची सुवार्ता पसरविण्याचे पाचारण आहे. प्रभू म्हणतो, 'त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेहि पाळतील. '
✝️
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये १६:१-१०
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला साहाय्य कर."
त्यानंतर पौल दर्बे आणि लुस्त्र येथे आला. तेथे तिमथी नावाचा शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या कोणाएका यहुदी स्त्रीचा मुलगा होता, पण त्याचा बाप हेल्लेणी होता. त्याला लुस्त्रातले आणि इकुन्यातले बंधू नावाजत होते. त्याने आपल्याबरोबर यावे अशी पौलची इच्छा होती. तेव्हा त्या ठिकाणी जे यहुदी होते त्यांच्याखातर त्याने त्याला घेऊन त्याची सुंता केली, कारण त्याचा बाप हेल्लेणी आहे हे सर्वांना ठाऊक होते. तेव्हा त्यांनी नगरांमधून जाता जाता येरुशलेमातील प्रेषित आणि वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळायला नेमून दिले. ह्यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या आणि दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली.
नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया आणि गलतिया ह्या प्रांतांमधून गेले आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनिया येथे जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. मग ते मुसियाजवळून जाऊन त्रोवसला गेले. तेथे रात्री पौलला असा दृष्टान्त झाला की, मासेदोनियाचा कोणीएक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे : "इकडे मासेदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर." त्याला असा दृष्टान्त झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगायला देवाने आम्हाला बोलावले आहे असे अनुमान करून आम्ही मासेदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 16:1-10
In those days: Paul came to Derbe and to Lystra. A disciple was there, named Timothy, the son of a Jewish woman who was a believer, but his father was a Greek. He was well spoken of by the brothers at Lystra and Iconium. Paul wanted Timothy to accompany him, and he took him and circumcised him because of the Jews who were in those places, for they all knew that his father was a Greek. As they went on their way through the cities they delivered to them for observance the decisions that had been reached by the apostles and elders who were in Jerusalem. So the churches were strengthened in the faith, and they increased in numbers daily. And they went through the region of Phrygia and Galatia, having been forbidden by the Holy Spirit to speak the word in Asia. And when they had come up to Mysia, they attempted to go into Bithynia, but the Spirit of Jesus did not allow them. So, passing by Mysia, they went down to Troas. And a vision appeared to Paul in the night: a man of Macedonia was standing there, urging him and saying, "Come over to Macedonia and help us." And when Paul had seen the vision, immediately we sought to go on into Macedonia, concluding that God had called us to preach the gospel to them.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १००:१-३,५
प्रतिसाद : पृथ्वीवरील सर्व लोकहो, प्रभूचा जयजयकार करा.
१) पृथ्वीवरील सर्व लोकहो, प्रभूचा जयजयकार करा.आनंदाने प्रभूची सेवा करा. आनंदगीते गात त्याच्यासमोर या.
२) प्रभू हाच देव आहे याची जाणीव ठेवा. आमचा निर्माणकर्ता तोच, आम्ही त्याचेच, त्याचे लोक, त्याच्या कुरणातला कळप आहो.
३) खरोखर प्रभू चांगला आहे, त्याचे वात्सल्य अनंतकाळ टिकते. त्याची सात्त्विकता पिढ्यान्पिढ्या टिकते.
Psalm Psalm 100:1-2, 3, 5 (R. 1)
Cry out with joy to the Lord, all the earth.
Cry out with joy to the Lord, all the earth.
Serve the Lord with gladness.
Come before him, singing for joy.
Know that he, the Lord, is God.
We are his people,
the sheep of his flock. R
Indeed, how good is the Lord,
eternal his merciful love.
He made us; we belong to him.
He is faithful from age to age. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहा, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे, तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा.
आलेलुया !
Acclamation:
If then you have been raised with Christ, seek the things that are above, where Christ is seated at the right hand of God.
शुभवर्तमान योहान १५ :१८-२१
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तुम्ही जगाचे नाही, परंतु मी तुम्हांला जगातून निवडले आहे. "
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही केला आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते, परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते. दास धन्यापेक्षा मोठा नाही, हे जे वचन मी तुम्हाला सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील, त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील. परंतु ते माझ्या नावाकरिता हे सर्व तुम्हाला करतील, कारण ज्याने मला पाठवले त्याला ते ओळखत नाहीत.”
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 15:18-21
At that time: Jesus said to his disciples, "If the world hates you, know that it has hated me before it hated you. If you were of the world, the world would love you as its own; but because you are not of the world, but I chose you out of the world, therefore the world hates you. Remember the word that I said to you: 'A servant is not greater than his master.' If they persecuted me, they will also persecute you. If they kept my word, they will also keep yours. But all these things they will do to you on account of my name, because they do not know him who sent me.
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू जगाद्वारे होणाऱ्या आपल्या शिष्यांच्या छळाविषयी सांगत आहे. ज्याप्रमाणे जगाने प्रभू येशूचा छळ केला, द्वेष केला, त्याची थट्टा केली, त्याची चेष्टा केली, त्याला बहिष्कृत केले, त्याला मरण दंडाची शिक्षा ठोठावून जीवे मारले. तशाचप्रकारे जो शिष्य येशूवर विश्वास ठेवतो. अशा आस्तीकाचाही जग द्वेष आणि छळ करतो. "जग" ही अशाप्रकारची लोकं आहेत जी प्रभू येशूवर विश्वास ठेवत नाहीत, जे तारण झाले नाही, जे हरवलेले किंवा देवापासून दुर गेलेले आहेत. ज्यांचे जीवन देहाच्या आणि पापांच्या लालसेवर केंद्रीत आहे. म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्याने हताश होऊ नये तर पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवावा कारण त्याने द्वेषावर तसेच मरणावर विजय मिळवीला आहे. जगाद्वारे जेव्हा आपला छळ होतो तेव्हा आपल्या तारणाऱ्या प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवतो का ?
प्रार्थना : हेहे प्रभू येशू, तुझी साक्ष जगाला देण्यासाठी माझी निवड केल्याबद्दल तुझे मी आभार मानतो. मला सबळ कर, मला प्रेरणा दे व मला तुझ्या कृपेचे दान दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या