Marathi Bible Reading | Fifth Sunday of Easter | 28th April 2024

पुनरुत्थानकाळातील 

पाचवा  रविवार 

दिनांक   २८ एप्रि २०२

मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, 

 Whoever abides in me and I in him, he it is that bears much fruit, for apart from me you can do nothing.


"मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. "

शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणत आहे, “मी द्राक्षवेल आहे, तुम्ही माझे फाटेआहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो”. आपण बाप्तिस्मा संस्काराद्वारे ख्रिस्ताच्या जीवनात सहभागी होत असतो. आपले आध्यात्मिक जीवन प्रभू येशू ख्रिस्त जो जीवन देणारा द्राक्षवेल आहे त्यामध्ये एकरुप होत असते. त्याच्या कृपेने तो आपल्याला सदैव फलद्रुप  होण्यासाठी जीवन रस पुरवितो. प्रभू येशूचा जीवन रस म्हणजेच त्याची  जीवनदायी वचने आणि प्रीतिच्या आज्ञा आहेत. आपण सर्वांनी सतत वचनांद्वारे  अमृत प्राशन करावे व त्याच्या आज्ञाप्रमाणे जीवन जगावे.
आपण आज ह्या वचनावर चिंतन करु या. खरोखर आपण येशूच्या जीवनरस पुरविणाऱ्या द्राक्षवेलाचे फाटे बानू या व येशूची वचने  आत्मसात करुन आपले जीवन ख्रिस्ताठायी फलद्रुप बनण्यास  आपण ख्रिस्ताचे प्रतिबिंबित रुप होऊन ख्रिस्ताठायी एकजीव बनून त्याची सुवार्ता पसरविण्यास कृपा मागू या.

✝️
             
पहिले वाचन  प्रेषितांची कृत्ये  ९:२६-३१
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले हे बर्णबाने शिष्यांना सांगितले. "
शौल येरुशलेमला आला आणि शिष्यांबरोबर मिळण्या मिसळण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु हा शिष्य आहे असा त्यांचा विश्वास नसल्यामुळे ते सर्व त्याला भीत होते. तेव्हा बर्णबा त्याला घेऊन प्रेषितांकडे आला आणि त्याला वाटेत प्रभूचे दर्शन कसे झाले, प्रभू त्याच्याबरोबर कसा बोलला आणि येशूच्या नावाने दिमिष्कात त्याने धैर्याने कसे भाषण केले हे सर्व त्यांने त्यांना सांगितले आणि तो येरुशलेमात प्रभू येशूच्या नावाने धैर्याने बोलत त्यांच्याबरोबर जात येत असे. आणखी तो हेल्लेणी यहूद्यांबरोबरही बोलत असे आणि वादविवाद करीत असे. म्हणून ते त्याला मारण्याचा प्रयत्न करू लागले. बंधुजनांस हे समजल्यावर त्यांनी त्याला कैसरीयात नेले आणि पुढे तार्सस येथे पाठवले.
अशा प्रकारे सर्व यहुदिया, गालील आणि शोमरोन ह्या प्रदेशातील मंडळीला स्वस्थता मिळाली आणि तिची उन्नती होऊन ती प्रभूच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

First Reading :
Acts 9:26-31
In those days: When Saul had come to Jerusalem, he attempted to join the disciples. And they were all afraid of him, for they did not believe that he was a disciple. But Barnabas took him and brought him to the apostles and declared to them how on the road he had seen the Lord, who spoke to him, and how at Damascus he had preached boldly in the name of Jesus. So he went in and out among them at Jerusalem, preaching boldly in the name of the Lord. And he spoke and disputed against the Hellenists. But they were seeking to kill him. And when the brothers learned this, they brought him down to Caesarea and sent him off to Tarsus. So the church throughout all Judea and Galilee and Samaria had peace and was being built up. And walking in the fear of the Lord and in the comfort of the Holy Spirit, it multiplied.
This is the word of God 
Thanks be to God 

प्रतिसाद स्तोत्र २२:२६-२८,३०-३२
प्रतिसाद : भक्तांच्या महासभेत मी तुझे स्तवन करीन.

१) तुला भिऊन वागणाऱ्यांसमक्ष मी आपले नवस फेडीन. दीनजनांना हवे तितके खायला मिळेल. प्रभूला शरण जाणारे त्यांचे स्तवन करतील. त्यांच्या मनाला चिरशांती लाभो !

२.) सारी पृथ्वी प्रभूचे स्मरण करील आणि त्याला अनुसरेल, सगळ्या राष्ट्रांतील कुळे लवून तुला मुजरा करतील. भूतलावरले सारे सुखसंपन्न त्यांच्यापुढे दंडवत घालतील. मातीला मिळणारे सगळे त्याला नमन करतील.

३) मी तर त्याच्यासाठी जगेन, माझे वंशजही त्याची सेवा करतील. पुढल्या पिढीला प्रभूविषयी हे सांगितले जाईल. ते येऊन भावी पिढीला त्याची न्यायपरायणता कथन करून म्हणतील,
"ही त्याचीच करणी."

Psalm 22:26b-27, 28 and 30, 31-32 ( 26a)
You are my praise, Lord, in the great assembly.

My vows I will pay before those who fear him. 
The poor shall eat and shall have their fill. 
They shall praise the Lord, those who seek him. 
May their hearts live on for ever and ever! 

I All the earth shall remember and return to the Lord, 
all families of the nations worship before him. 
They shall worship him, all the mighty of the earth; 
before him shall bow all who go down to the dust. .

And my soul shall live for him, my descendants serve him. 
They shall tell of the Lord to generations yet to come, 
declare his saving justice to peoples yet unborn: 
"These are the things the Lord has done." .


दुसरे  वाचन योहानचे पहिले पत्र  ३:१८-२४ 
वाचक : योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 
"त्याच्या पुत्रावर आपण श्रद्धा ठेवावी आणि आपण एकमेकांवर प्रेम करावे, अशी परमेश्वराची आज्ञा आहे. "
मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने आणि सत्याने आपण प्रेम करावे. आपण सत्याचे आहो हे ह्यावरून आपल्याला कळून येईल आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरवते, त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ. कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे, त्याला सर्व काही कळते.
प्रियजनहो, आपले मन आपल्याला दोषी ठरवत नसेल तर देवासमोर येण्याचे धैर्य आम्ही करतो आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्याला जे आवडते ते करतो. त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आपण श्रद्धा ठेवावी आणि त्याने आम्हांला आज्ञा दिल्याप्रमाणे आपण एकमेकांवर प्रेम करावे. त्याच्या आज्ञा पाळणारा माणूस त्याच्या ठायी राहतो आणि तो त्या माणसाच्या ठायी राहतो. त्याने आम्हांला दिलेल्या आत्म्यावरून आम्हांला कळून येते की, तो आम्हांठायी राहतो.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

Second reading : 1 John 3:18-24

Little children, let us not love in word or talk but in deed and in truth. By this we shall know that we are of the truth and reassure our heart before him; for whenever our heart condemns us, God is greater than our heart, and he knows everything. Beloved, if our heart does not condemn us, we have confidence before God; and whatever we ask we receive from him, because we keep his commandments and do what pleases him. And this is his commandment, that we believe in the name of his Son Jesus Christ and love one another, just as he has commanded us. Whoever keeps his commandments abides in God, and God in him. And by this we know that he abides in us, by the Spirit whom he has given us.

जयघोष  
आलेलुया, आलेलुया!
तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन, असे प्रभू म्हणतो; 
जो माझ्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळे देतो.
 आलेलुया!

Acclamation: 
  Abide in me, and I in you, says the Lord; whoever 
abides in me bears much fruit.

शुभवर्तमान योहान १५ : १-८
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. "
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा बाप माळी आहे. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. जे वचन मी तुम्हांला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहा. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुझ्यामध्ये राहीन. जसे फाटे वेलात राहिल्यावाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणार नाही. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हांला काही करता येत नाही. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात. तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हांमध्ये राहिली तर जे काही तुम्हांला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हांस प्राप्त होईल. तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचा गौरव होतो आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल."

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

Gospel Reading:
John 15:1-8
At that time: Jesus said to his disciples, "I am the true vine, and my Father is the vinedresser. Every branch in me that does not bear fruit he takes away, and every branch that does bear fruit he prunes, that it may bear more fruit. Already you are clean because of the word that I have spoken to you. Abide in me, and I in you. As the branch cannot bear fruit by itself, unless it abides in the vine, neither can you, unless you abide in me. I am the vine; you are the branches. Whoever abides in me and I in him, he it is that bears much fruit, for apart from me you can do nothing. If anyone does not abide in me he is thrown away like a branch and withers; and the branches are gathered, thrown into the fire, and burned. If you abide in me, and my words abide in you, ask whatever you wish, and it will be done for you. By this my Father is glorified, that you bear much fruit and so prove to be my disciples.
 This is the Gospel of the Lord 
Praise the Lord Jesus Christ .
                                                 
चिंतन:आजच्या वाचनांमध्ये ख्रिस्ती लोकांनी दयाळूपणा, परोपकारी आणि पवित्रतेची फळे निर्माण करण्याची अट म्हणून खिस्तामध्ये राहण्याची आवश्यकता आहे. यावर जोर दिलेला आहे. प्रेषितांनी पुनरुत्थित झालेल्या प्रभूशी घनिष्ठ नातेसंबंध ठेवल्यामुळे त्यांना मिळालेल्या आध्यात्मिक फळांच्या विपुलतेची साक्ष आजच्या पहिल्या वाचनात दिलेली आहे. दुसऱ्या वाचनात संत योहान त्याच्या पहिल्या पत्रात स्पष्ट करतो की त्याच्याकडून आपली आध्यात्मिक शक्ती मिळवून त्याच्याशी एकरूप राहिलो तरच आपण देवाच्या आज्ञा विशेषतः प्रेमाच्या आज्ञेचे पालन करू शकू. शुभवर्तमानात प्रभू येशू त्याच्या शिष्यांना त्याच्याशी असलेले त्याचे नातेसंबंध आणि ते टिकवून ठेवण्याची गरज समजून घेता यावी यासाठी द्राक्षवेल व फांदी ही प्रतिमा वापरतो. या दाखल्याद्वारे प्रभू येशू आपल्या निवडलेल्या शिष्यांना अखेरच्या भोजनाच्या वेळी आश्वासन देतो की, जीवन देणारा आत्मा ज्याला प्रभू येशू पाठवेल, तो त्याच्या शिष्यांमध्ये आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये उपस्थित राहून सक्रीय असेल. चारही शुभवर्तमाने आपल्याला प्रभू येशूचे खरे शिष्य कसे बनायचे आणि वेलाच्या मुख्य खोडात फांद्या राहतात आणि वेल्यातून त्यांचे जीवन काढतात त्याप्रमाणे येशूमध्ये राहून खऱ्या जीवनाचा अनुभव घेण्यासाठी प्रभू येशूच्या आत्म्याच्या विरूद्ध असलेल्या सर्व गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकणे आणि आपल्या जीवनात ख्रिस्ती आदर्शाप्रती आपल्या बांधीलकीचे दररोज नूतनीकरण करणे आपल्याकडून अपेक्षीत आहे, ह्यांकडे लक्ष वेधतात. प्रभूमध्ये राहण्यासाठी छाटणीचे साधन म्हणजे आपल्या वाईट प्रवृत्ती, व्यसने आणि विकृतींवर आत्मनियंत्रण ठेवणे. आपल्या शेजारच्या आणि समाजातील विविध संस्कृती, वंश, धर्म व प्रांतांच्या लोकांशी सहानुभूतीने व मोकळेपणाने वागणे. प्रभू येशू आम्हाला आमच्या ख्रिस्ती जीवनात विश्वासाच्या धैर्याने सर्व अडचणींचा सामन करण्यासाठी शक्ती पुरवितो, तो आपल्याला शुद्ध, सक्षम व मजबूत बनवितो.

प्रार्थनाहे प्रभू येशू, तुझ्या द्राक्षवेल रुपी जीवनाचे फळे देणारे फाटे बनण्यास आम्हाला सर्वदा तुझा जीवनरस प्राशन करण्यास प्रेरणा दे,आमेन.
✝️      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या