पुनरुत्थान सहावा सप्ताह
सोमवार दि.६ मे २०२४
"जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, "When the Helper comes, whom I will send to you from the Father, the Spirit of truth,
✝️
संत डॉमणिक सावियो
- वर्तनसाक्षी (१८४२-१८५७)
९ मार्च १८५७ रोजी मृत्यूशय्येवर खिळलेला असताना डॉमणिकला एक स्वर्गीय दृष्टांत झाला आणि तो हर्षातिशयाने ओरडला, “अरे वा! काय सुंदर दृश्य आहे हे!
डॉमणिकच्या मृत्यूनंतर जवळजवळ शंभर वर्षे त्याच्या जीवनाविषयी सखोल अभ्यास करण्यात आला. शेवटी त्याला संतपद देण्याचे ठरले. १२ जून १९५४ साली आयोजित करण्यात आलेल्या त्याच्या भव्य संतीकरण सोहळ्यात पोप पायस बारावे ह्यांनी पुढीलप्रमाणे डॉमणिक सावियो ह्याच्या जीवनाचा आढावा घेतला. “आजच्या युगात युवकांच्या हृदयातून सत्प्रवृत्ती समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असताना केवळ १५ वर्षीय डॉमणिक सावियो ह्याला आल्ताराचा बहुमान देण्यास आम्हाला विशेष आनंद होत आहे. सर्व युवकांनी डॉमणिक सावियोचे अनुकरण करावे असे आदर्श जीवन तो जगला. • शारीरिकदृष्ट्या जरी तो अशक्त असला तरी ख्रिस्तावरील प्रीतीबाबत तो खंबीर आणि निश्चयी स्वभावाचा होता. त्याचे जीवन हा देवाला वाहिलेला पवित्र आणि सुयोग्य असा यज्ञच मानावा लागेल."
चिंतन : मी मोठमोठ्या गोष्टी करू शकत नाही, परंतु जे काही मी करीन ते अगदी लहानातली लहान गोष्टसुद्धा देवाच्या महान गौरवासाठी करीन. संत डॉमणिक सावियो
✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये १६:११-१५
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"लुदियेचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलच्या सांगण्याकडे तिचे लक्ष दिले. "
त्रोवसा पासून हाकारून आम्ही नीट संथारा येथे गेलो आणि दुसऱ्या दिवशी नियापुलीस गेलो, तेथून फिलीपी येथे गेलो, ते माझेदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमी लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. मग शब्बाथ दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी, जेथे प्रार्थना होत असते असे आम्हाला वाटले तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती, ती चुनतीरा नगरची असून जांभळी वस्त्रे विकीत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा आणि तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली, "मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानीत आहा तर माझ्या घरी येऊन राहा.' तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :
Acts 16:11-15
Setting sail from Troas, we made a direct voyage to Samothrace, and the following day to Neapolis, and from there to Philippi, which is a leading city of the district of Macedonia and a Roman colony. We remained in this city some days. And on the Sabbath day we went outside the gale to the riverside, where we supposed there was a place of prayer, and we sat down and spoke to the women who had come together. One who heard us was a woman named Lydia from the city of Thyatira, a seller of purple goods, who was a worshipper of God. The Loed opened her heart to pay attention to what was said by Paul. And after she was baptised and her household as well, she urged us, saying, "If you have judged me to be faithful to the Lord, come to my house and stay. And she prevailed upon us.
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र १४९: १-६,९
प्रतिसाद : परमेश्वर आपल्या लोकांवर प्रसन्न आहे.
१ परमेश्वराचे स्तवन करा!
नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा,
भक्तांच्या सभेत त्याचे स्तुतिस्तोत्र गा.
इसाएल आपल्या निर्माणकर्त्यांच्या ठायी आनंद करो,
सियोनची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्हास पावोत.
२) ती नृत्य करीत त्याच्या नामाचे स्तवन करोत,
डफ आणि वीणा यांवर त्याला स्तुतिस्तोत्रे गावोत.
कारण परमेश्वर आपल्या लोकांवर प्रसन्न आहे.
तो दीनांना तारणाने सुशोभित करतो.
३) भक्त गौरवामुळे उल्हासोत,
ते आपल्या अंथरुणांवरून हघोष करोत.
परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो
हे त्यांच्या सर्व भक्तांना भूषण होईल.
परमे बराचे स्तवन करा
Psalm 149:1-2, 3-4, 5-6a and 9h
The Lord takes delight in his people.
Sing a new song to the Lord,
his praise in the assembly of the faithful.
Let Israel rejoice in its Maker,
let Sion's children exult in their king.
Let then praise his name with dancing,
and make music with timbrel and harp.
For the Lord takes delight in his people,
he crowns the poor with salvation. R
Let the faithful exult in glory,
and rejoice as they take their rest.
Let the praise of God be in their mouths.
This is an honour for all his faithful. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
खिस्त मेलेल्यातून उठला आहे.
आणि आम्हाला प्रकाशित केले आहे.
त्याने आपल्या रक्ताने आमचे तारण केले आहे..
आलेलुया !
Acclamation:
The Spirit of truth will bear witness about me, says the Lord, you also will bear witness.
शुभवर्तमान योहान १५:२६-१६:४
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“सत्याचा आत्मा माझ्याविषयी साक्ष देईल."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल आणि तुम्हीही साक्ष द्याल, कारण तुम्ही माझ्याबरोबर आरंभापासून आहा."
"तुम्ही अडखळविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. ते तुम्हांस सभाबहिष्कृत करतील, इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहो असे वाटेल, अशी वेळ येत आहे. त्यांनी पित्याला आणि मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील. मी तुम्हांला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या की, त्यांची वेळ आली म्हणजे त्या मी सांगितल्याची तुम्हांला आठवण व्हावी."
"प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading:
John 15:26-16:43
At that time: Jesus said to his disciples, "When the Helper comes, whom I will send to you from the Father, the Spirit of truth, who proceeds from the Father, he will bear witness about me. And you also will bear witness, because you have been with me from the beginning. "I have said all these things to you to keep you from falling away. They will put you out of the synagogues. Indeed, the hour is coming when whoever kills you will think he is offering service to God. And they will do these things because they have not known the Father, nor me. But I have said these things to you, that when their hour comes you may remember that I told them to you."
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू आणखी दोन साक्षीदारांविषयी सांगत आहे. पहिला म्हणजे पॅराक्लेट म्हणजेच सत्याचा आत्मा. ज्याला येशू आपल्या पित्याकडून पाठवेल, तो प्रभू येशूची साक्ष देईल आणि जे काही प्रभू येशूने लोकांना सांगितले त्याची आठवण तो त्यांना करुन देईल. दुसरा साक्षीदार म्हणजे येशूचे शिष्य, ते येशू बरोबर राहिले. येशूने जे काही त्यांना शिकविले त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ते सुवार्ता पासून त्याच्याबरोबर राहील आणि त्यांना दिलेल्या अधिकारामुळे ते आता त्याचे साक्षीदार होण्यास पात्र आहेत. त्याच्या वाट्याला येणाऱ्या छळाविषयी तो त्यांना अगोदरच चेतावनी देत आहे जेणेकरून त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही तर येशूवर विश्वास ठेवावा. आपल्या जीवनाद्वारे आपण येशूची साक्ष कशाप्रकारे देत आहोत?
प्रार्थना : पवित्र आत्म्या ये आणि आम्हाला ख्रिस्ताच्या सुवार्तेचे साक्षीदार बनण्यास प्रेरणा दे, आमेन
✝️
0 टिप्पण्या