सामान्य काळातील
बाविसावा रविवार
१ सप्टेंबर २०२४
बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही.
There is nothing outside a person that by going into him can defile him,

इस्त्राएल लोकांनी देवाच्या सर्व आज्ञा, नियम व विधी प्रामाणिकपणे पाळावेत. त्या सर्वांनी सुज्ञतेन आणि समंजसपणाने वागावे, तसेच देवाचे महान व सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून इस्त्राएलला ओळखावे असा सल्ला आजच्या पहिल्या वाचनात मोशे त्यांना देत आहे. आजच्या दुसऱ्या वचनात संत याकोब मंडळीला उपदेश करताना म्हणतो की, 'वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असु नका' देवाच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण करा.
प्रभू येशू धर्मशास्त्र व मोशेच्या नियमांचे नेतृत्व करणाऱ्या शास्त्री परुश्यांची वरपांगी शिकवण मोडित काढतो. केवळ वरवरुन देव धर्माचा पाढा वाचणाऱ्या व धार्मिकतेचा देखावा करणाऱ्या धर्मपंडितांना प्रभू येशू म्हणत आहे. ' तुम्ही देवाची अज्ञा बाजूला सारून देन व माणसांच्या 'संप्रदायाना चिकटून राहता.' प्रभू येशू आज आपल्या सर्वांना आपली धार्मिकता, नीतिमत्ता आणि आचरण तपासून पहायला सांगत आहे. केवळ वरपांगी प्रार्थना, भक्ती व कर्मकांड करून देवाला प्रसन्न करता येत नाही. केवळ ओठांनी देवाचा गौरव सन्मान न करता अंत:करण पासून तो केला पाहीजे.
प्रभू येशू आज आपल्याला आपल्या अंतर्मनाची शुद्धता तपासून पाहायला सांगत आहे. कारण वाईट विचार, कल्पना आणि अशुद्धता अंतःकरणा पासून निघत असते. प्रभूचरणाशी नतमस्तक होऊन त्याला आपले तन व मन समर्पित करू या. खरे धर्माचरण अमलात आणण्यासाठी प्रयत्नशील बनू या.
पहिले वाचन : अनुवाद ४:१-२,६-८
वाचक : अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन
"जी आज्ञा मी तुम्हांला देत आहे तिच्यात काही अधिक करू नका, अशासाठी की, परमेश्वराच्या आज्ञा तुम्ही पाळाव्या."
मोशे लोकांना म्हणाला, अहो इस्राएल लोकहो, जे विधी आणि नियम मी तुम्हाला शिकवीत आहे ते पाळावे म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या म्हणजे जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश देत आहे त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्या. जी आज्ञा मी तुम्हाला देत आहे तिच्यात काही अधिक उणे करू नका तुमचा देव परमेश्वर ह्यांच्या ज्या आज्ञा मी तुम्हांला देत आहे त्या तुम्ही पाळाव्या. तुम्ही ते विधी आणि नियम काळजीपूर्वक पाळावेत. कारण त्यामुळे देशोदेशींच्या लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ आणि समंजस असे दिसाल. त्या सर्व विधीसंबंधी ऐकून ते म्हणतील की, हे महान राष्ट्र खरोखर बुद्धीमान आणि समजंस लोकांचे आहे. कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो, तेव्हा तो आमच्याजवळ असतो, ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हाला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी आणि नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे ?
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :Deuteronomy 4:1-2.6-8
Moses said to the people, saying, "Now, O Israel, listen to the
statutes and the rules that I am teaching you, and do them, that you may live, and go in and take possession of the land that the LORD, the God of your fathers, is giving you. You shall not add to the word that I command you, nor take from it, that you may keep the commandments of the LORD your God that I command you. Keep them and do them, for that will be your wisdom and your understanding in the sight of the peoples, who, when they hear all these statutes, will say, 'Surely this great nation is a wise and understanding people.' For what great nation is there that has a god so near to it as the LORD our God is to us, whenever we call upon him? And what great nation is there, that has statutes and rules so righteous as all this law that I set before you today?
This is the word of God
प्रतिसाद स्तोत्र १५:१-५
प्रतिसाद : हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील?
१) हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र पर्वतावर कोण राहील?
जो सात्त्विकतेने चालतो आणि नीतीने वागतो तो,
जो मनापासून सत्य बोलतो तो,
जो आपल्या जिभेने चुगली करत नाही तो.
२) तो आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही,
तो आपल्या शेजाऱ्याची निंदा करत नाही,
तो अधर्माला तुच्छ लेखतो,
तो परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो.
३) तो आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले
तरी ती मोडत नाही, तो आपला पैसा व्याजी लावत नाही,
तो निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाच घेत नाही.
जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.
Psalm 15:2-3a, 3bc-4ab, 5 (1a)
O Lord, who may abide in your tent?
Whoever walks without fault;
who does what is just,
and speaks the truth from his heart.
Whoever does not slander with his tongue. R
Who does no wrong to a neighbour,
who casts no slur on a friend,
who looks with scorn on the wicked,
but honours those who fear the Lord. R
Who lends no money at interest,
and accepts no bribes against the innocent.
Such a one shall never be shaken. R
दुसरे वाचन याकोबचे पत्र १:१७-१८.२१-२२.२७
वाचक : याकोबचे पत्र यातून घेतलेले वाचन
"तुम्हांला आज्ञापिलेल्या वचनाप्रमाणे तुम्ही आचरण करा."
प्रत्येक उत्तम देणगी आणि प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही आणि जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते. आपण त्याच्या सृष्ट वस्तूंतील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्यवचनाने जन्म दिला.
सर्व मलिनता आणि उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ असे दृढावलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा आणि विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे आणि स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
Second reading : James 1:17-18.21b-22.27
My beloved brothers: Every good gift and every perfect gift is from above, coming down from the Father of lights, with whom there is no variation or shadow due to change. Of his own will he brought us forth by the word of truth, that we should be a kind of first fruits of his creatures. Receive with meekness the implanted word, which is able to save your souls. But be doers of the word, and not hearers only, deceiving yourselves. Religion that is pure and undefiled before God the Father is this: to visit orphans and widows in their affliction, and to keep oneself unstained from the world.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
प्रभू म्हणतो, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. ही भाकर जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल.
Acclamation:
R. Alleluia, alleluia.
Of his own will he brought us forth by the word of truth that we should be a kind of first fruits of his creatures.
R. Alleluia, alleluia.
शुभवर्तमान मार्क ७: १-८,१४-१५,२१-१३
वाचक: मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसांच्या संप्रदायाला चिकटून राहता."
परुशी आणि येरुशलेमहून आलेले कित्येक शास्त्री एकत्र जमून येशूकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अस्वच्छ म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. (परुशी) आणि इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट धुतल्यावाचून जेवत नाहीत; बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत आणि प्याले, घागरी, पितळेची भांडी धुणे आणि असल्या बऱ्याच रुढी ते पाळतात.) ह्यावरून परुश्यांनी आणि शास्त्र्यांनी त्याला विचारले, “आपले शिष्य हात न धुता जेवतात, वाडवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत ?” त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्हा ढोंग्यांविषयी यशयाने चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे. तो असा :हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे; ते व्यर्थ माझी उपासना करतात,कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात, ते असतात मनुष्यांचे नियम. तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देता आणि माणसाच्या संप्रदायाला चिकटून राहता."त्याने लोकसमुदायाला पुन्हा बोलावून म्हटले, “तुम्ही सर्वजण माझे ऐका आणि समजून घ्या; बाहेरून माणसाच्या आत जाऊन त्याला भ्रष्ट करील असे काही नाही. तर माणसाच्या आतून जे निघते तेच त्याला भ्रष्ट करते. कारण आतून म्हणजे माणसाच्या अंत:करणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अंहकार, मूर्खपणा ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात आणि माणसाला भ्रष्ट करतात.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading: Mark 7:1-8.14-15.21-23
At that time: When the Pharisees gathered to Jesus, with some
of the scribes who had come from Jerusalem, they saw that some of his disciples ate with hands that were defiled, that is, unwashed. (For the Pharisees and all the Jews do not eat unless they wash their hands properly, holding to the tradition of the elders, and when they come from the marketplace, they do not eat unless they wash.) And there are many other traditions that they observe, such as the washing of cups and pots and copper vessels and dining couches. And the Pharisees and the scribes asked him, "Why do your disciples not walk according to the tradition of the elders, but eat with defiled hands?" And he said to them, "Well did Isaiah prophesy of you hypocrites, as it is written, ""This people honours me with their lips, but their heart is far from me; in vain do they worship me, teaching as doctrines the commandments of men. You leave the commandment of God and hold to the tradition of men." And he called the people to him again and said to them, "Hear me, all of you, and understand. There is nothing outside a person that by going into him can defile him, but the things that come out of a person are what defile him." For from within, out of the heart of man, come evil thoughts, sexual immorality, theft, murder, adultery, coveting, wickedness, deceit, sensuality, envy, slander, pride, foolishness. All these evil things come from within, and they defile a person."
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन: "आजची उपासना परमेश्वराच्या सानिध्यात राहून आनंद करण्यास बोलावित आहे. त्यासाठी परमेश्वराचे नियम हे प्रेमाने व शुद्ध अंतःकरणाने जगायला हवे. पहिल्या वाचनात मोशे इस्रायल लोकांसमोर पर्याय ठेवतो. "तुम्ही जर देवाचे नियम पाळले तर देव तुम्हांस आशीर्वादीत करून जो देश देणार आहे तो तुम्हांस मिळेल.” परंतु देवाच्या नियमाचे उल्लंघन झाले तर तुमचा मृत्यू होईल. दुसऱ्या वाचनात संत याकोब, देवाच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण काय? याचा प्रत्यय देतो. आपला पापी व दृष्ट स्वभाव, मलीनता आपल्याला परमेश्वराच्या प्रेमापासून अलिप्त करते. देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी त्याचा त्याग करावा व देवाने दिलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालण करावे. शुभवर्तमानात खरे धर्माचरण कसे असावे याची शिकवणूक देतो. प्रभू येशू परूशाच्या ढोंगी वृत्तीला योग्य उत्तर देत आहे. "लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण" अशा शब्दात येशू त्याच्या अंतःकरणात लपलेल्या अशुद्धतेला जागे करतो. परूशी देवाचे नियम स्वतः पाळत नसायचे. अशा वृत्तीचा प्रभू तिरस्कार करतो. आपल्या बाह्य देखाव्यापेक्षा अंतःकरणात लपलेल्या मलिनतेवर लक्ष केंद्रीत करण्यास प्रभू बोलावित आहे.
आत्मचिंतन : प्रामाणिक माणसे देवाच्या सानिध्यात राहतात आणि आनंद उपभोगतात. म्हणजे देवाच्या आज्ञा पाळून अंतःकरण शुद्ध ठेवतात. मी माझे अंतःकरण देवासाठी शुद्ध ठेवतो का ? ठेवते का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, शुद्ध मनाने तुझी उपासना करण्यास व तुझ्या आज्ञेप्रमाणे जीवन आचरण करण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
0 टिप्पण्या