सामान्य काळातील एकविसावा सप्ताह
शनिवार ३१ ऑगस्ट २०२४
“शाबास भल्या आणि विश्वासू दासा, तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास,
'Well done, good and faithful servant. You have been faithful over a little;
रेमंड ह्या बालकाचा जन्म होण्यापूर्वीच त्याची आई मरण पावली, त्यामुळे ऑपरेशन करून मोठ्या जिकीरीने डॉक्टरांनी बाळाला कृत्रिमरित्या जन्म दिला. अगदी अद्भुतरित्या हे बालक मृत मातेच्या उदरात जिवंत राहिले. त्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेवरून त्याला नोनाटस हे आडनाव देण्यात आले. नोनाटस म्हणजे न जन्मलेला.
रेमंडचं कुटुंब खूप गरीब होतेच. परंतु ते मूळचे कॅटालोनियन ह्या ऐश्वर्यसंपन घराण्यातले होते. धार्मिकपणाचे बाळकडू त्याला पाजण्यात आलेले होते. त्यामुळे वयात येताच रेमंडने संत पीटर नोलास्को (सण ९ मे) ह्यांच्या बार्सेलोना येथील मर्सेडरियन संस्थेत प्रवेश घेतला. त्याची जिद्द आणि उत्साह पाहून त्याला लवकरच मास्टर जनरल हा किताब देण्यात आला.
मर्सेडरियन संस्था गुलामगिरीत सापडलेल्या ख्रिस्ती गुलामांना मुक्त करण्यासाठी धडपडत होती. ह्या कार्यासाठी रेमंडला आल्जिएर्स येथे पाठविण्यात आले. परंतु तेथील प्रेषितकार्य करीत असताना रेमंडच्या हातातील सर्व निधी संपला त्यामुळे आपल्या कमाईतून आलेल्या पैशाद्वारे गुलामांना मुक्त करण्याचे प्रेषितकार्य थांबवण्याची चिन्हे दिसू लागली. अशा वेळी त्याने खंडणी घेऊन आपणा स्वतःला सरकारच्या हाती सोपविले. ही खंडणी त्याच्या संस्थेतील इतर सहकाऱ्यांनी घेऊन बऱ्याच गुलामांना स्वतंत्र केले.
तुरुंगात असताना इतर अनेक कैद्यांना त्याने ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली व मोठ्या कठीण यातना सहन करूनदेखील त्याने ख्रिस्ताचे स्तुतीगान गायला सुरुवात केली. त्यामुळे हळूहळू कैदी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेण्याच्या विचारात दिसू लागले. हे पाहून संतप्त झालेल्या मुस्लीम अधिकाऱ्यांनी त्याचे दोन्ही ओठ अणकुचीदार तारेने शिवून टाकले.
शेवटी त्याच्याच संस्थेने त्याला तुरुंगातून मुक्त केले आणि तो १२३९ साली स्पेन देशात परतला. पोप ग्रेगरी नववे ह्यांनी त्याचे प्रेषितकार्य पाहून त्याला कार्डिनलपदाची दीक्षा देण्याचा निर्णय घेतला. परंतु रोमला जात असतानाच ३० ऑगस्ट १२४० रोजी वयाच्या ३६ व्या वर्षी त्याला मरण आले. पोप आलेक्झांडर सातवे ह्यांनी १६५७ साली त्यांना संतपदाने सन्मानित केले.
प्रसूतीवेदना देत असलेल्या स्त्रिया, सुईणी आणि चुकीचा आरोप केलेले निरपराधी गुन्हेगार ह्यांच्या मदतीसाठी संत रेमंडचा धावा केला जातो आणि देऊळमाता आजारी लोकांसाठी संत रेमंडच्या सन्मानार्थ मेणबत्त्या व पाणी आशीर्वादित करते.
✝️
पहिले वाचन : : १करिथ १:२६-३१
वाचन :पौलचे करिथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
“देवाने मानवी दृष्टिकोनातून जे दुर्बळ ते निवडले. "
बंधुजनहो, तुम्हांला झालेले पाचारण घ्या; तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन, असे पुष्कळजण नाहीत; तरी ज्ञान्यांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले आणि जगातील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत् अशांना देवाने निवडले. जे आहेत ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूकडे आहा, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे, “जो अभिमान बाळगतो, त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा" हा शास्त्रलेख आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
First Reading :1 Corinthians 1:26-31
Consider your calling, brothers. not many of you were wise according to worldly standards, not many were powerful, not many were of noble birth. But God chose what is foolish in the world to shame the wise; God chose what is weak in the world to shame the strong; God chose what is low and despised in the world, even things that are not, to bring to nothing things that are, so that no human being might boast in the presence of God. And because of him you are in Christ Jesus, who became to us wisdom from God, righteousness and sanctification and redemption, so that, as it is written, "Let the one who boasts, boast in the Lord."
This is the word of God
Thanks be to God
प्रतिसाद स्तोत्र ३३:१२-१३,१८-१९, २०-२१
प्रतिसाद : ज्या लोकांना परमेश्वराने प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य!
१) ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे,
ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरिता.
प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य !
परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानवजातीला तो निरखतो.
२) पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात आणि
त्याच्या दयेची अपेक्षा करतात,
त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा आणि
दुष्काळात त्यांचा प्राण वाचवावा म्हणून
त्यांच्यावर त्याची नजर असते.
३) आमचा जीव परमेश्वराची प्रतीक्षा करत आहे,
आमचे सहाय्य आणि ढाल तोच आहे,
त्याच्या ठायी आमच्या हृदयाला आनंद आहे.
त्याच्या पवित्र नावावर आमची श्रद्धा आहे.
Psalm 33:12-13, 18-21
Blessed the people the Lord has chosen as his heritage.
Blessed the nation whose God is the Lord,
the people he has chosen as his heritage.
From the heavens the Lord looks forth;
he sees all the children of men. R
Yes, the Lord's eyes are on those who fear him,
who hope in his merciful love,
to rescue their souls from death,
to keep them alive in famine. R
Our soul is waiting for the Lord.
He is our help and our shield.
In him do our hearts find joy.
We trust in his holy name. R
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे
आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
आलेलुया!
Acclamation:
A new commandment I give to you, says the Lord, that you love one another just as I have loved you.
शुभवर्तमान मत्तय २५:१४-३०
वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो."
येशूने आपल्या शिष्यांना पुढील दाखला सांगितलाः “परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्यांच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली, एकाला त्याने पाच हजार रूपये, एकाला दोन हजार रूपये आणि एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला. ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लगेच जाऊन त्यावर व्यापार केला आणि आणखी पाच हजार मिळवले. तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्याने आणखी दोन हजार मिळवले. परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली आणि तिच्यामध्ये आपल्या धन्याचा पैसा लपवून ठेवला. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला आणि त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणाला, “महाराज, आपण माझ्यावर पाच हजार रुपये सोपवून दिले होते. पाहा, त्यांवर मी आणखी पाच हजार रुपये मिळवले आहेत.” त्याला त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास, भल्या आणि विश्वासू दासा, तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.” मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, “महाराज, आपण माझ्यावर दोन हजार रुपये सोपवून दिले होते. पाहा, त्यांवर मी आणखी दोन हजार रुपये मिळवले आहेत.” त्याला त्याच्या धन्याने म्हटले, “शाबास भल्या आणि विश्वासू दासा, तू लहानश्या गोष्टीत विश्वासू राहिलास,
मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन, तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.” नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला, “महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहा, जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करताआणि जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता, म्हणून मी भ्यालो आणि तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते, पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत.” तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले, “अरे दुष्ट आणि आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे कापतो आणि पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय ? तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, म्हणजे मी आल्यावर माझे मला व्याजासकट परत मिळाले असते. तर ते हजार रुपये त्याच्यापासून काढून घ्या आणि ज्याच्याजवळ आहेत त्याला दया. त्याला भरपूर होईल; परंतु ज्या कोणाजवळ नाही त्यांच्याजवळ जे असेल तेदेखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल. ह्या निरुपयोगी दासाला अंधारात टाका, तेथे रडणे आणि दातखाणे चालेल.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
Gospel Reading : Matthew 25:14-30:
At that time: Jesus told his disciples this parable: "It will be like a man going on a journey, who called his servants and entrusted to them his property. To one he gave five talents, to another two, to another one, to each according to his ability. Then he went away. He who had received the five talents went at once and traded with them, and he made five talents more. So also he who had the two talents made two talents more. But he who had received the one talent went and dug in the ground and hid his master's money. Now after a long time the master of those servants came and settled accounts with them. And he who had received the five talents came forward, bringing five talents more, saying, 'Master, you delivered to me five talents; here, I have made five talents more.' His master said to him, 'Well done, good and faithful servant. You have been faithful over a little; I will set you over much. Enter into the joy of your master.' And he also who had the two talents came forward, saying, 'Master, you delivered to me two talents; here, I have made two talents more. His master said to him, 'Well done, good and faithful servant. You have been faithful over a little; I will set you over much. Enter into the joy of your master. He also who had received the one talent came forward, saying, 'Master, I knew you to be a hard man, reaping where you did not sow, and gathering where you scattered no seed, so I was afraid, and I went and hid your talent in the ground. Here, you have what is yours. But his master answered him, 'You wicked and slothful servant! You knew that I reap where I have not sown and gather where I scattered no seed? Then you ought to have invested my money with the bankers, and at my coming I should have received what was my own with interest. So take the talent from him and give it to him who has the ten talents. For to everyone who has will more be given, and he will have an abundance. But from the one who has not, even what he has will be taken away. And cast the worthless servant into the outer darkness. In that place there will be weeping and gnashing of teeth.
This is the Gospel of the Lord
Praise the Lord Jesus Christ .
चिंतन:
परमेश्वर वाकड्या रेषेवर सरळ लिहितो असे म्हटले तर त्यात काही वावगे ठरणार नाही. कारण परमेश्वर अपात्र माणसांस पात्र बनवतो आणि त्यांची पात्रता जगजाहीर करतो. आजची दोन्ही वाचने आपल्याला हाच संदेश देतात की, ख्रिस्ती या नात्याने आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून परमेश्वर आपणा प्रत्येकाला पाचारण करतो. संत पौल म्हणतो, परमेश्वराने मूर्ख आणि दुर्बळ ह्यांची निवड केली म्हणजे जगाला शहाणे बनवण्यास ते समर्थ असतील. निवडलेल्यांनी देवासमोर अभिमान न बाळगता नेहमी नम्र, नितीमान नतमस्तक राहावे, हेच देवाला अभिप्रेत आहे. आपले ख्रिस्ती पाचारण बळकट करण्यासाठी परमेश्वराने आपणांस काही कलागुण आणि कौशल्ये दिली आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या दासाने त्या कला कौशल्यांचा व्यवस्थित उपयोग केला म्हणून परमेश्वराने त्यांना स्वर्गराज्य वतन म्हणून दिले. परंतु तिसऱ्या दासाने आपल्या कलागुणांचा बिलकुल वापर केला नाही. पण त्याला त्याची शिक्षा भोगावी लागली. येशूने आपल्यावर काही जबाबदारी सोपवली आहे. ती जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. तसेच ह्या जबाबदारीत आपण नेहमी सक्रिय, सर्जनशील आणि सकारात्मक असले पाहिजे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्याशी एकनिष्ठ राहून तुला अनुसरण्यास धैर्य व प्रेरणा दे, आमेन.
✝️
0 टिप्पण्या